विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेल्लाळ:- मद्रासकडील एक शेतकरी जात. यांची एकंदर वस्ती २६ लाख आहे; पैकीं २५ लाखांवर मद्रास इलाख्यांत व बाकीचे कोचीन-त्रावणकोर संस्थानांत आहेत. धार्मिक विधींत हे फार कडवे आहेत हे लोक मांसमच्छर किंवा दारू याला बिलकुल शिवत नाहींत. यांचे चार मुख्य भेद आहेत: (१) तोडामंडलम्, (२) चोशिय, (३) पांड्य व (४) कोंगा हे होत. बालविवाह व प्रौढविवाह या दोन्हीहि चाली यांच्यांत आहेत. नांचिनाथ वेल्लाळ हे फक्त त्रावणकोरमध्येंच आढळतात.