प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वेल्स:- इंग्लंडच्या पश्चिमेचा भाग. क्षेत्रफळ ७४६७ चौरस मैल. लांबी दक्षिणोत्तर १३६ मैल व रूंदी पूर्वपश्चिम ९२ मैल आहे. किनारा ३९० मैल आहे. वेल्सचे उत्तर वेल्स व दक्षिण वेल्स असे दोन भाग पडतात. हा प्रदेश डोंगराळ आहे. त्यामुळें लहान लहान तलाव पुष्कळ आहेत. नद्याहि बर्‍याच आहेत पण त्या सर्व लहान आहेत. सर्वांत मोठी नदी सेव्हर्न ही १८० मैल लांब आहे. हिच्या खालोखाल वे, उस्क, डी, वगैरे नद्या आहेत.

लोकसंख्या:- येथील वस्ती दाट आहे. कोळशाच्या खाणीमुळें हें उद्योगधंद्याचें केंद्र बनलें आहे. १९२१ च्या खानेसुमारीप्रमाणें वेल्सची लोकसंख्या २२०६७१२ आहे. ज्या कौंटीमध्यें खाणी आहेत तेथील लोकसंख्या वाढत असून शेतकीच्या कौटीमधील लोकसंख्या कमी होत आहे. ग्लेमोर्गन शायरमध्यें वेल्सच्या मोठ्या खाणी असल्यामुळें तेथें जवळ जवळ वेल्समधील निम्मी लोकसंख्या आहे. व मध्यविभागांत लोकसंख्या विरळ आहे.

धर्म:- कॅंटरबरीच्या आर्चबिशपास वेल्श लोक धर्मगुरू मानतात. बहुतेक सर्व पंथाचें लोक वेल्समध्यें आहेत. परंतु त्यांतल्या त्यांत तीन पंथ प्रमुख आहेत: (१) काँग्रिगेशनॅलिस्ट; (२) कॅल्व्हिनिस्टिक मेथॉडिस्ट व (३) बॅप्टिस्ट. यांशिवाय बारीक सारीक पंथहि बरेच आहेत. रोमनकॅथॉलिक चर्चला मजूरवर्गांतून बराच पाठिंबा आहे.

उद्योगधंदे:- या देशातील मुख्य धंदा म्हटला म्हणजे कोळशाच्या खाणींचा होय. साम्राज्यांतील सर्वांत मोठ्या खाणी या ठिकाणीं आहेत. दरसाल २,३०,००,००० टन कोळसा या खाणींतून बाहेर निघतो. याशिवाय चुनखडी व लोखंडाच्याहि खाणी येथें आहेत. या खाणींतून ४,००,००० टन लोखंड दर वर्षी बाहेर पडते. लोंखंड व कोळसा यांच्या निकट सान्निध्यानें साहजिकच तेथें मोठमोठें कारखाने आहेत. तांबें, जस्त, शिसें हींहि सांपडतात व ठिकाठिकाणीं त्यांचे कारखानेहि आहेत. मेरि ओन्थशायर व कर्मारशायरमध्यें थोडेसें सोनेंहि सांपडतें, वे, उस्क, डी, डोव्हो वगैरे खोरीं सुपीक आहेत. त्यांत ओट, गहूं पेरतात. डोंगराळ भागामुळें कांहीं ठिकाणीं नुसता माळ आहे. तेथें गवताचीं कुरणें आहेत. मेंढयांनां चरण्यास तें गवत उपयोगी पडतें. यामुळें लोंकरीचा धंदाहि तेथें चालतो. शिवाय समुद्रकिनार्‍यालगत मच्छीमारीचा धंदा चालतो.

दळणवळण:- या देशांत दोन मोठ्या रेल्वेलाईनी आहेत. एक लंडन अॅण्ड नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, ही वेल्सच्या उत्तरेकडच्या किनार्‍यानें जाते. तिचें मुख्य ठिकाण होलीहेड हें आहे. दुसरी ग्रेट वेस्टर्न, ही दक्षिण वेल्समध्यें आहे. हिचें मुख्य ठिकाण फिशगार्ड बंदर आहे. किनार्‍यानें आगबोटीचें दळणवळण चालतें.

राज्यव्यवस्था:- इंग्लंड आणि वेल्स हीं एकाच राज्यव्यवस्थेखाली आहेत. इंग्लंडची जी राज्यव्यवस्था तीच वेल्सची आहे. ज्यावेळीं पार्लमेंटमध्यें एखादा कायदा पास होतो त्यावेळीं त्यांत 'इंग्लंड आणि वेल्स' करतां असा अर्थ अभिप्रेत असतो. वेल्समधील वेल्श कोर्ट ऑफ ग्रेट सेझन्स १८३० त कायदा होऊन बंद झाल्यानें इंग्लंडचें कोर्ट मुख्य झालें. ज्यावेळीं एखादा कायदा अगर कायद्याचें कलम खास वेल्स करतांच करावयाचें असेल त्यावेळीं मॉनमाउथ शायरने तो कायदा अगर कायद्याचें कलम मान्य केलें कीं सबंध वेल्सला तो कायदा अगर कायद्याचें कलम लागू होतें. १८८१ त रविवारीं वेल्समध्यें मादक द्रव्यें प्रवाशांशिवाय कोणांस विकत देऊ नयेत म्हणून वेल्सकरतां स्वतंत्र कायदा पास झाला. १८८९ मध्यें वेल्समधील इंटरमीजिएट व औद्योगिक शिक्षणाकरितां खाय कायदा झाला होता. हे दाने कायदे सोडून इंग्लंड व वेल्स यांनां एकच कायदा लागू आहे.

इतिहास:-ख्रिस्ती शतकापूर्वी ५५ व्या वर्षी ज्यावेळीं रोमन लोक ब्रिटनमध्यें आले त्यावेळीं ४ प्रमुख जाती सेव्हर्नच्या पश्चिमेस होत्या. ओस्टरियस ब्रिटनमधून पुढें आला. त्यावेळीं ह्या जातीकडून वेल्समध्यें त्यास अडथळा झाला. परंतु लवकरच तो विजयी झाला. व लोकांनां कैद करून रोमकडे पाठवून देऊ लागला. वेल्समध्यें रोमन लोकांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊ लागून ५, ६ व ७ या शतकांत केल्टिक मिशनर्‍यांकडून तो दृढमूल झाला. ६ व ७ व्या शतकांत वेल्सवर सॅक्सनांच्या दोन स्वार्‍या झाल्या त्यांत त्यांचा उद्देश रोमन लोकांनां घालवून देण्याचा होता. ९ व्या शतकांत पुन्हां सॅक्सन व डेन्स यांनीं जमीन व समुद्र या दोहोंवरून स्वारी केली. रॉडिक दि ग्रेट हा ८७७ मध्यें वारल्यानंतर त्याच्या तीन मुलांमध्यें राज्याची वांटणी झाली. परंतु पुढें हॉवेल रॉडिकचा नातू हा प्रसिध्द राजा होऊन गेला व यानेंच प्रथम कायदे केले.

विजयी विल्यमनें इंग्लंड जिंकल्यावर १०८१ मध्यें त्यानें वेल्सला भेट दिली. नार्मन लोक आल्यापासून वेल्सला महत्त्वाचा फायदा म्हटला म्हणजे वे पासून मिलफोर्ड हॅवनपर्यंत एक किल्यांची साखळी बांधली गेली. १२७२ मध्यें लेवेलिन नांवाचा वेल्सचा राजा होता. वेल्श हे प्राचीन ब्रिटनी लोकांचे वंशज असून ते या लेवेलिनला मोठा मान देत व त्यासहि आपल्या जातीचा मोठा अभिमान असे. इंग्लंडमध्यें ज्यावेळेला गोल नाणें सुरू होईल तेव्हां वेल्श राजास लंडनास इग्लंडच्या गादीवर राज्याभिषेक होईल असें एक भाकीत होतें. तो राज्याभिषेक आपल्याला होणार या आशेनें, लेवेलिननें वेल्समध्यें धुमाकूळ मांडला. पहिल्या एडवर्डनें स्वारी केल्यावर त्यानें नमतें घेतलें. परंतु पुन्हां ४।५ वर्षांनीं बंड केलें. एडवर्डनें पुन्हां स्वारी केली. युध्दांत लेवेलिन मारला गेला व वेल्स एडवर्डच्या ताब्यांत आलें. पूर्ववेल्स इंग्लिश उमरावांच्या ताब्यांत देऊन सरहद्दीवर कांहीं किल्लें आपलें स्वामित्व दृढ करण्यासाठीं इंग्रजांनीं बांधलें. याच एडवर्डनें आपल्या वेल्समध्यें जन्मलेल्या मुलास तो वेल्समध्यें जन्मला म्हणून लेवेलिनची १३०१ सालीं काढून घेतलेली 'प्रिन्स ऑफ वेल्स' ही पदवी दिली. त्याच मुलास पुढें राज्य देण्यांत आलें व त्यावरून पुढें इंग्लंडच्या प्रथम राजपुत्रास 'प्रिन्स ऑफ वेल्स' म्हणण्यांत येऊ लागलें.

१४०१-०६ पर्यंतच्या काळांत पुन्हां एक बंड झालें. ओवेन ग्लेनडोवर हा पूर्वींच्या राजांचा वंशज बंडाचा प्रमुख होता. किल्यांची पाडापाडी व षहरांची जाळपोळ यानें सुरू केली व वेल्समध्यें धुमाकूळ उडवून दिला. त्याच्या मागण्या मुख्यत: अशा होत्या:- (१) इंग्लिश पार्लमेंटच्या धर्तीवर वेल्सला वेगळें स्वतंत्र पार्लमेंट मिळावें, (२) वेल्सचें चर्च स्वतंत्र असावें आणि (३) वेल्सकरितां वेल्समध्येंच एक स्वतंत्र कॉलेज असावें. याकरितां वेल्समधील लॉर्डांची त्यानें ताबडतोब सभाहि भरविली. चवथ्या हेनरीनें बण्ड मोडण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले! काहीं काळपर्यंत ओवेननें वेल्सचें स्वामित्व भोगलें परंतु १४०८ च्या सुमारास तें बंड जसें उद्भवलें तसेंच आपोआप शमलें व परत इंग्रजांचा अम्मल सुरू झाला.

१५३६ मध्यें वेल्स व इंग्लंडकरतां संयुक्त कायदे करण्यांत आले. वेल्स प्रदेशाची विभागणी इंग्लंडच्या धर्तीवर कौंटी शायरांत करण्यांत आली. १२ कौंटी मधून २४ उमेदवार इंग्लंडच्या पार्लमेंटांत पाठविण्याचा अधिकार देण्यांत आला. वेळोवेळीं निरनिराळें कायदे करून वेल्स हें इंग्लंडांत विरत चाललें. १८३२ पर्यंत न्यायकोर्ट तरी वेगळें होतें तेंहि त्यासालीं एकच करण्यांत आलें. सोळाव्या शतकाच्या अखेरपासून पुढें वेल्सला इंग्लंडच्या इतिहासाव्यतिरिक्ति इतिहास नाहीं. वेल्सच्या आंग्लीभवनानें वेल्सची केल्टिक भाषाहि नामशेष होत चालली आहे. १८४१ मध्यें शेकडा ६७ लोक केल्टिक भाषा बोलत होते तर १८९३ मध्यें ६० लोक केल्टिक भाषा बोलत होते.

वाड्.मय:- वेल्श वाड्.मयाला साधारणत: ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकापासून सुरवात होते. आठव्या शतकापूर्वीचें नांव घेण्यासारखे ग्रंथकार म्हणजे गिलस व नेन्नीयस हे होत. त्यांचे ग्रंथ लॅटिन भाषेत आहेत. ८ व्या शतकापासून तों दहाव्या शतकाच्या मध्यकाळापर्यंतच्या काळांत वेल्समध्यें महाकाव्यें निर्माण झालीं. या महाकाव्यांत आयर्लंडमधील यूरीएन र्‍हेगेर, हीर यांसारख्या पराक्रमी पुरूषांच्या शौर्यांची वर्णनें आलीं आहेत. अशा महाकाव्यांमधील प्रमुख अॅनेरीन, लीबर्कहेन, तालीसीन, व पर्डिन यांचीं काव्यें होत. अॅनेरीनचें महाकाव्य वेल्श लोक राष्ट्रीय काव्य मानतात. ११ व्या शतकांत वेल्समध्यें कथावाड्.मय बरेंच निर्माण झालें. त्यांपैकीं मॅबीनोगी कथासंग्रह व वीरांच्या कथांचा संग्रह हे मुख्य होत. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धांतील दोन प्रसिध्द कवी म्हणजे कीवीलीयॉग व ग्विनेड हे होत. कीवीलीयॉगचें हर्लास हें काव्य सुंदर आहे. तेराव्या शतकांत बरेच कवी वेल्समध्यें निर्माण झाले. त्यांमध्यें कोच हा प्रसिध्द आहे. १३४०-१४४० हा शंभर वर्षांचा काळ वेल्श वाड्.मयाचा सुवर्णकाल होय. या अवधींत वेल्समध्यें उत्कृष्ट कविता निर्माण झाली. या काळांतील प्रसिध्द कवि ग्विलिम होय. यानें आपल्या काव्यांत धर्मगुरूंची टर उडवलेली आहे. १४४० ते १५५० च्या दरम्यानच्या काळाला रौप्ययुग अशी संज्ञा देण्यांत येते. या काळांत एडमंड, लिन, मिडल्टन, इत्यादि नामांकित कवी होऊन गेले. या काळाच्या प्रारंभीं वेल्श काव्याला जरी कृत्रिमता आली होती तरी थोडक्याच काळानंतर काव्यावरील कृत्रिमतेचीं बंधनें नाहींशी होऊन कविता पुन्हां स्वतंत्र वातावरणांत निर्माण होऊ लागली. १३०० ते १५५० या दरम्यानच्या काळांत वेल्समध्यें गद्यवाड्.मय फारच थोडें निर्माण झालें व जें झालें तेंहि हलक्या दर्जाचें होतें. १५५० नंतर अर्वाचीन वेल्स गद्याला प्रारंभ झाला. १५४६ मध्यें वेल्स भाषेत बायबलमधील निवडक वेच्यांचें पुस्तक प्रसिध्द झालें. त्यानंतर सेल्सबरीनें (१५२०-१६००) 'ए डिक्शनरी इन इंग्लिश ऍंड वेल्स', किन्निव्हर लिथ ए बॅन व न्यू टेस्टॉमेंटचें भाषांतर इत्यादि ग्रंथ प्रसिध्द केले. या ग्रंथांमुळें वेल्स गद्याला उत्तेजन मिळालें व गद्यग्रंथ झपाट्यानें बाहेर पडण्यास सुरूवात झाली. मार्गनचें वेल्श बायबल हें वेल्समधील त्या काळच्या उत्कृष्ट गद्य वाड्.मयाचा नमुना म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: किफिनच्या शुध्द व जोरदार भाषेचा परिणाम त्याच्यानंतरच्या ग्रंथकारांच्या भाषेवर झालेला आढळतो. किफिननंतर जे वेल्श ग्रंथकार झाले त्यांपैकीं बर्‍याच लेखकांचे ग्रंथ धार्मिक आहेत, तर कांहीं भाषांतरवजा आहेत. सतराव्या ते अठराव्या शतकाच्या दरम्यान, प्रीस, प्रिचर्ड, फर्गम, फिचन इत्यादि प्रसिध्द कवी होऊन गेले व त्यांनीं जुन्या वृत्तांत आपलीं कविता न रचितां नवीन वृत्तें निर्माण केलीं. मीबियान हा या काळांतील सर्वांत प्रसिध्द कवि होय. १७५०-१८३० या काळांत ओवेन (१७२२-६९) व विल्यम्स हे प्रतिभासंपन्न कवी होऊन गेले. १८३० पूर्वीची वेल्स कविता व गद्य हें संकुचित स्वरूपाचें होतें. धर्मपर अगर नीतिपर विषय घेऊन त्याच्यावर ग्रंथ लिहिण्यापलीकडे ग्रंथकारांची मजल गेली नव्हती पण १८३० नंतरच्या वाड्.मयांत, हरएक प्रकारचें वाड्.मय निर्माण होऊ लागलें. हिरेथोग हा नवीन वाड्.मयाचा सूचक असा ग्रंथकार होय. डॅनियल ओवेन (१८६३-९५) हा राष्ट्रीय कादंबरीकार होऊन गेला. त्यानें कादंबरीक्षेत्रांत नवीन संप्रदाय निर्माण केला. विनी पॅरी या त्याच्या शिष्यिणीनें त्याच्यापेक्षां उच्च दर्जाच्या कादंबर्‍या लिहिल्या. एडवर्ड्स (१८५८) हा गद्य ग्रंथकारांत सर्वश्रेष्ठ होय. १८३० नंतरच्या काळांत वीणाकाव्याची वाढ वेल्श वाड्.मयांत प्रामुख्यानें नजरेस पडते. अॅनाग्रिफीथ्स व एव्हान्स हे वीणाकाव्यें लिहिण्याबद्दल अत्यंत प्रसिध्द आहेत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .