विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वैतरणी:- एक नदी. ओरिसा प्रांतांत केओंझरच्या वायव्येस उगम पावून, धामर नदी या नांवानें ही बंगालच्या उपसागरास मिळते. हिला बर्याच नद्या मिळतात. मुखापासून १५ मैल पर्यंत या नदींतून होड्या चालतात. वैतरणी या नांवाची नदी पाताळात नरक लोकांत जाण्याच्या वाटेवर असल्याचे पुराणांतून उल्लेख आहेत.