विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वैशंपायन:- व्यासाच्या चार शिष्यांतील संपूर्ण यजुर्वेद पढलेला शिष्य. हा याज्ञवल्क्यऋशीचा मातुल असून यजुर्वेदांतील एका प्रमुख शाखेचे अध्ययन करण्याच्या संबंधांत गुरूहि होता. याज्ञवल्क्यापासून यानेंच यजुर्वेद माघारा घेतला. तीच यजुर्वेदाची तैत्तिरीय शाखा होय. हा पुराणिक म्हणून प्रख्यात आहे. यानें जनमेजयास महाभारत कथन केलें.