विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्हर्जिन बेटें:- वेस्ट इंडीजमधील लहान लहान १०० बेटांचा समुदाय. यांतील बहुतेक बेटें ओसाड आहेत. यांचें क्षेत्रफळ सुमारें ४६५ चौरस मैल आहे. बहुतेक बेटें खडकाळ व ओसाड असून कांहीं जागीं ऊस, मका, कॉफी, कापूस व नीळ हे पदार्थ उत्पन्न होतात. कांहीं बेटांवर अमेरिका (संयुक्त संस्थान), कांहींवर डेन्मार्क व कांहीं बेटांवर ग्रेटब्रिटन यांची मालकी आहे. कोलंबसानें दुसर्या सफरींत ह्या बेटांचा शोध लाविला. (सन १४९४) व ह्यांनां लास व्हर्जेनेस हें नांव दिलें. १७ व्या शतकांत व्हर्जिन बेटांत चांचे लोक येत असत.