विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्हिलिंजम्:- (याला राजेंद्रजोलपुरम् असेहि म्हणतात) मद्रास, त्रावणकोर संस्थानांतील एक बंदर. हें त्रिवेंद्रमपासून १२ मैल आहे. एका काळीं हें अतिशय महत्त्वाचें बंदर असून चोल राजांची राजधानी येथें होती. सन १६४४ मध्यें वायनाड राजांनीं व्हिलिंजम् इंग्लिश ईस्टइंडिया कंपनीला देऊन टाकिलें. हल्लीं या ठिकाणीं फारसा व्यापार नाहीं.