विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शकुनि:- गांधार देशाधिपति सुबलराजाचा पुत्र. हा गांधारीचा भ्राता होता. स्वभावानें पराकाष्ठेचा दुष्ट असून, कपटद्यूत खेळण्यांत मोठा प्रवीण होता. यानेंच पांडवांच्या नाशार्थ दुर्योधनाला कपटविद्या शिकविल्या. भारतीययुध्दांत हा सहदेवाच्या हातून मृत्यू पावला.