विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शक्तिसंस्थान:- मध्यप्रांत, छत्तिसगड मांडलिक संस्थानांतील एक संस्थान. क्षेत्रफळ १३८ चौरस मैल. यांत पावसाची सरासरी (दरसालची) ६१.७७ इंच असून हवा साधारणपणें बिलासपूर जिल्हयासारखी आहे. येथील राजघराणें राजगोंड आहे. लोकसंख्या (१९२१) ४१५५४. संस्थानांतील लोकांचा धंदा मुख्यत्त्वेंकरून शेतकींचा असून लोक छत्तिसगडी हिंदी भाषा बोलतात. सर्व वस्ती हिंदूंची (गोंड) असून मुसुलमान लोक फारच थोडे आहेत. येथील मुख्य पीक भाताचें होय. कोशा व सुती विणकाम, व बांबूच्या टोपल्या व चट्या तयार करणें हे उद्योगधंदे होत. या भागांतील जंगल फारसें महत्त्वाचें नाहीं व खनिजसंपत्तीचा अजून कोणी शोध केला नाहीं. या संस्थानांतून बंगाल-नागपूर रेल्वे जात असून शक्ति गांव रेल्वेचें स्टेशन आहे. संस्थानची जमा (१९०८) सालची ५००००० रूपये आहे.