प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शरीरसंवर्धन:- शरीरसंवर्धन कसें होतें हें सांगतांनां शरीरांतील सर्व प्रकारच्या रचनांनां व त्यांत विशेषेकरून स्नायु, अस्थी, व मज्जा या बहुसंख्याक व महत्त्वाच्या रचनांनां अन्न मिळून त्यांची वाढ कशी होते व शरीरव्यापार चालविण्याची ताकद त्यांत कशी उत्पन्न होऊन त्यामुळें होणारी झीज कशी भरून येते व या झिजेमुळें उत्पन्न होणार्‍या दूषित व टाकाऊ पदार्थांचें उत्सर्जन कसें तें या सर्व घडामोडींचें वर्णन केलें पाहिजे. अन्न किती प्रकारचें असतें याचें पथ्यापथ्यविचार या सदराखालीं सविस्तर विवेचन आलें आहेच; प्रस्तुत ठिकाणीं अन्नप्रकारांपैकीं पौष्टिक व नैट्रोजनयुक्त प्रोटीन प्रकारचें अन्न, पिष्टान्न व स्निग्ध अगर वसामय अन्न यांचें पचन कसें होतें याचाच मुख्यत: विचार केलेला आहे.

अन्नपचनाची रासायनिक क्रिया:- अन्न पचून त्याचें रक्त, मांस वगैरे जिवंत शरीर बनण्यास त्या अन्नाचें रूपांतर पाचकरसामुळें व्हावें लागतें. हें घडवून आणणारे जे पदार्थ आहेत त्यांनां एन्झाइम म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रकारच्या अन्नांत ते घातले असतां दुधांत विरजण घातलें म्हणजे जसें दुधाचं रूपांतर होऊन दहीं, लोणी बनतें तद्वत त्या अन्नाचीं घटकद्रव्यें वेगळीं होऊन तीं पचनास सुलभ अशा अवस्थेमध्यें रूपांतर पावतात व तेणेंकरून शरीरांतील स्नायू, अस्थी वगैरे रचनांतील पेशींनां त्यांतील अन्नांश अतिशय सुलभतेनें ग्रहण करतां येईल अशा रूपांत तें अन्न पेशी पचवून अन्नांशांचे प्रोटोप्लाझम अथवा पेशींतील जीवनरूपी पदार्थांत व शक्ति, चलनवलन या क्रियांत रूपांतर होतें. न पचलेल्या अन्नाचे मलमूत्र, स्वेद, वगैरे बनून ती घाण शरीराबाहेर टाकली जाते. हे एन्झाइम म्हणजे एक तर्‍हेचे रासायनिक स्थित्यंतरें घडविणारे पदार्थ हे बहुधां शरीरांतील विविध पाचक इंद्रियांत आयत्या वेळीं उत्पन्न होतात व निर्जीव वस्तूंतहि सांपडतात. व त्यांच्यातहि प्रोटिन उर्फ नैट्रोजनयुक्त पदार्थपाचक, पिष्टान्नपाचक, स्निग्धान्नपाचक अशा अनेक जाती आहेत. ७० सेंटिग्रेडपेक्षां अधिक उष्णता लावल्यानें त्यांतील रासायनिक धर्म नाहींसें होऊन त्यांकडून अन्नपचन होत नाहीं. ते प्रगट होण्याच्या अगोदर एक पदार्थ त्यांत सुप्तस्थितींत असतो. त्यास प्रथम उद्दीपित केलें म्हणजे त्या त्या प्रकारचा एन्झाइम कार्यक्षम होऊन आपलें कार्य करतो. क्लोरोफार्म वगैरे विषांमुळें अगर त्या एन्झाइमनीं उत्पन्न केलेले फाजील रस व पचलेलें अन्न तेथेंच फार जमूं दिल्यानें त्यांची उत्पत्ति खुंटते. अन्नपचन स्थलदर्शक कोष्टक पुढें दिलें आहे.

मुखांत लाळेमुळें घडणारें अल्प अन्नपचन:- लाळ हा पाण्याप्रमाणें पातळ व किंचित चिकट पाचक रस काबाच्या पुढें जिभेखालीं दोन्हीं बाजूंनीं असणार्‍या लालापिंडांतून आयत्या वेळेस स्त्रवूं लागून पिष्टमय अन्नाचें थोडें साखरेंत रूपांतर म्हणजे पचन करतो. भाकरीचा तुकडा आपण चावून चघळूं लागलों म्हणजे तो चवीस पूर्वीपेक्षां घर्षणानें अधिक गुळचट लागतो. याचें कारण लाळेंतील फर्मेट (विरजण) जातीच्या टायलिन नामक पदार्थांमध्यें अन्नांतील पिष्टमय (स्टार्च) पदार्थाचें शर्करेंत म्हणजे पचनास सुलभ अशा अवस्थेंत रूपांतर करण्याचा गुण आहे. या पदार्थाशिवाय पिष्ट अन्न पचलें जाणार नाहीं. कारण स्टार्च पाण्यांत विरघळत नसल्यामुळें तो तसाच रक्तांत मिसळूं शकत नाहीं. म्हणून पिष्टान्नाची येणेंप्रमाणें झालेली शर्करा अंशत: रक्तांत विद्रव्य असल्यामुळें रक्तांत शोषिली जाते. चावलेल्या अन्नाची जिभेच्या साहाय्यानें गोळी बनून मुखाच्या मागें असणार्‍या अन्ननलिकेंत गळ्यांतून घांस गिळतांनां लोटली जाते व अन्न जठरांत उतरतें. यावेळपर्यंत पिष्टान्नाचें लाळेमुळें पूर्ण पचन झालेलें नसतें तें पुढील अन्नमार्गांत होतें.

अन्नपचनस्थलदर्षक कोष्टक.
पचल्या जाणार्‍या अन्नाचे प्रकार एन्झाइमचें नांव सांपडण्याचें स्थल.
प्रोटीनउर्फ नैट्रोजनयुक्त अन्न पचविण्यास जठर पेप्सीन.टिप्सीन.इरेप्सीन. जठररस प्यांक्रियारस. लघुआंत्र.
विविध व इतर रस. इतर रचना
स्निग्ध, तेलकट अन्न पचण्यास जठर. वसापाचक रस. प्यांक्रिया पिंड व इतर ठिकाणीं.
पिष्टान्न पचविण्यास जठर टायलीन लाळ.
प्यांक्रियारस प्यांक्रियारस.
मॉल्टशर्करोत्पादक रस ''
स्थित्यंतरोत्पादक रस लघु आंत्र.
दुग्धपाचक रस ''
इतर पाचकरस लघु आंत्र व यकृतादि रचना.

     
जठरांतील अन्नपचन:- जठर ही स्नायूमय पिशवी असून तींत आकुंचन-प्रसरणशक्ति फार असल्यामुळें तींत सांठलेलें (जेवलेलें) अन्न घुसळलें जाऊन त्यांत जाठररस पूर्णपणें मिश्रित होतो. व तो तें अन्न पुढील अन्नमार्गांत (आंतडीं) जें आणखी पचन व्हावयाचें असतें तें होण्यास लायक अशा अम्ल स्थितीप्रत तें अन्न आणतो. जठररसाच्या अम्लगुणधर्मांमुळें अन्नांत शिरलेले रोगजंतू मृत होतात हा एक जठररसाचा मोठा उपयोग आहे. जठररसांत हैड्रोक्लोरिक अॅसिड हा द्रव व पाचक पदार्थ आहे व तो उत्पन्न करण्याचे पिंड जठरांत आहेत त्यांतून तो त्यावेळीं घामासारखा निथळूं लागतो. तो जमला म्हणजे जाठररसांतील दुसरा फर्मेंट (विरजण) जातीचा घटक जो पेप्सीन तो आपलें नैट्रोजनयुक्त अन्न पचवण्याचें कार्य करण्यास समर्थ होतो. अॅसिड नसलें अगर कमी असलें तर पेप्सीन चांगलें व पुरेसें उत्पन्न होत नाहीं. पेप्सीनोप्तादक पिंड जठरांत वेगळे असतात त्यांतून तो पदार्थ स्त्रवतो. दोन्ही मिळून झालेला जाठररस पाण्याच्या रंगाचा असून चवीस आंबट असतो. पेप्सीनचें कार्य, नैट्रोजनयुक्त जें प्रोटीन अन्न तें तसेंच रक्तांत शोशलें जाण्यास असमर्थ असतें म्हणून त्याचे प्रोटीओज, आलब्युमोस व अखेरीस पेप्टोन या रक्तांत सहज विद्राव्य अशा प्रकारच्या स्वरूपांत रूपांतर करणें हें होय. यामुळें अन्न लहान आंतड्यांतून रक्तांत सहज शोशलें जातें. जठरामध्यें स्टार्च व स्निग्ध अन्नाचें किंचित पचन होतें असे कोणी म्हणतात. म्हणून स्निग्ध व प्रोटीन यांनीं बनलेलीं जडान्नें व पक्वान्नें जठरांत साध्या अन्नाइतकीं लवकर पचलीं जात नाहींत व लवकर तीन चार तासांत पोट रिकामें व्हावें तसें होत नाहीं. जसजसें अन्न पचेल तसें जठर व आंतडें यांमधील छिद्र मधून मधून कित्येक वेळां सैल होऊन लघुआंतड्यांत अन्न लोटलें जातें. जठरामध्यें दूध विरजणारा व पचवणारा एक रेनिन नामक अगर रेनेट नामक फर्मेंट जातीचा पदार्थ असतो. तूप, लोणी वगैरे स्निग्धान्नाचें दुधाप्रमाणें बारीक कण असून ते पातळ स्थितींत असल्यास त्याचें थोडें पचन जठरांत होतें व त्यासाठीं जठर व लघुआंत्र यांमधील छिद्र उघडून प्यांक्रियांतील पाचक रसाचा उलट प्रवाह जठरांत येतो. जठरांत अन्नाचें पचन झाल्यावर अन्नास पांढर्‍या दाटसर प्रवाही पदार्थाचें रूप प्राप्त होतें, व नंतर लघु आंत्रांतील पचनक्रियेस आरंभ होते; त्याची पहिली अवस्था प्यांक्रिया रसानें पचन होणें ही होय. येथें त्या अन्नावर प्यांक्रिया रस येऊन त्याचें आणखी पचन घडवितो. तो पाण्यासारखा व त्यांतील सोडिअम कार्बोनेटमुळें अल्कली धर्माचा रस असतो व यामुळें तेथें जठरांतून पोंचलेल्या अन्नाची अम्लात मोडते. या पाचक रसांत तीन प्रकारचे एन्झाइम (फर्मेंट) जातीचे पदार्थ असतात:- (१) ट्रिप्सीन हा विरजण पदार्थ प्रोटीन (नैट्रोजनयुक्त) अन्नाचे आणखी पूर्ण पचन करतो. व ह्यांचें कार्य जरी पेप्सींनप्रमाणें असलें तरी त्यांतील पाचक धर्म अल्कलीमुळें अन्नाची अम्लता मोडल्यावरच प्रथम होतो. व प्रोटीन अन्नाचे पुरें पचन करून म्हणजे प्रोटीओन पेप्टोन्य या रूपांत असलेल्या प्रोटीन अन्नाचें अॅमिनो अॅसिड व इतर अधिक विद्राव्य स्वरूपांत तो अन्नरस आणिला जाऊन रक्तांत मिळून जाण्यास पूर्ण लायक होतो. (२) या प्यांक्रिया रसांतील दुसरा घटक डायास्टीज नामक फर्मेंट जातीचा पदार्थ होय. यामुळें पिष्टान्नाचें लाळेंतील टायनिक फर्मेंटनें जें मायेज नामक गुळचट शर्करेमध्यें किंचित रूपांतर केलेलें असतें त्या पिष्टान्नाची यामुळें मल्टोज शर्करा पूर्णपणें बनून तें अन्न रक्तांत मिसळून जाण्यास लायक होतें. (३) तिसरा घटक झायमोजन नामक फर्मेंट असून त्याचा गुण असा आहे कीं, तूप, लोणी, चरबी वगैरे स्निग्धान्नांचे स्निग्ध अॅसिडें व ग्लिसरीन या सहज पचल्या जाणार्‍या रूपांत रूपांतर होतें. या रसांत (४) दूध गोठवून पचविणारा रेनेटप्रमाणें एक फर्मेंट आहे. आणखी दोन प्रकारचे फर्मेंट या रसांत असून ते या व इतर प्रकारच्या अन्नाचें पूर्ण पचन करतात. प्यांक्रिया रसाचें येणेंप्रमाणें कार्य पूर्ण झाल्यावर आंत्ररसाचें पाचक कार्य त्या अन्नरसावर होणें ही आंतड्यांतील अन्नपचनाची दुसरी अवस्था होय. हा रस पातळ, गढूळ पिवळ्या रंगाचा व सोडियम कार्बोनेटमुळें पूर्ण अल्कली धर्माचा असतो. वर वर्णिलेले बहुतेक सर्व फर्मेंट म्हणजे पाचक क्रिया घडविणारे विरजणासारखे पदार्थ या आंत्ररसांत असतात व ते आंतड्यांच्या आंतील श्लेष्मल त्वचेंतील पिंडांतून उत्पन्न होतात व उरलेलें अन्नपचनकार्य म्हणजे अन्न पराकाष्ठेच्या विद्राव्य, सूक्ष्म आणि पातळ स्थितींत आणून तें रक्तांत सुलभतेनें मिसळून जाईलसें करतात.

पित्तरसाचें कार्य:- पित्ताचा अन्नपचनाच्या कामीं अप्रत्यक्षपणें उपयोग होतो, तो त्यामध्यें असणार्‍या पित्तक्षारामुळें होतो; तो असा कीं, त्यांत स्निग्ध अन्न व स्निग्ध अॅसिडें विरघळतात व त्यामुळें प्यांक्रियांतील स्निग्धान्नपाचक घटक असतो त्याच्या उत्पादनास उत्तेजन मिळतें. पित्तामध्यें कॉलेस्टीन नामक घटक द्रव स्थितींत असतो. यकृतपिंडाच्या मलोत्सर्जक टाकाऊ पदार्थांनीं भरलेला हा पित्तरस असतो. याचा रंग पिंगट असून अल्कली गुणधर्माचा असतो. तो सांठण्यासाठीं पित्ताशय ही पिशवी व तीला जोडलेल्या नळ्या असतात. पित्तामध्यें पित्तांतील अॅसिडें म्हणून क्षार असतात. हे क्षार जर पित्तनळ्यांतून आंतड्यांत वाहून गेले नाहींत तर ते रक्तांत शिरून कावीळ उत्पन्न करतात. अन्न खाल्लें व तें अम्लस्थितींत आंतड्यांत येऊन पोंचलें म्हणजे पित्तोत्सर्जनास विशेष जोर येतो. विरघळलेले पित्तक्षार आंतड्यांतून पुन:रक्तांत शोशले जाऊन परत यकृतांत जातात व पुन:पित्तांत विरघळून आंतड्यांत प्रवेश करतात व या प्रदक्षिणा करतांना ते कांहीं प्रकारच्या जडान्नविषबाधेचा व विषांचा दुष्परिणाम शरीरावर होऊ देत नाहींत. पित्तामुळें अन्नांतील जंतू कुजण्याची क्रिया नाहींशी होते. या नानाविध जठर व लघुआंत्रांतील पाचक रसामुळें प्रोटीन, पिष्ट, व स्निग्धक्षारादि सर्व प्रकारच्या अन्नाचा पूर्ण रस होऊन तें रक्तांत मिसळून कसें अंगीं लागतें हें वर्णन पुढें येईलच. या अन्नासारखा रक्तांत मिसळून न जाण्यासारखा अवशिष्ट निरूपयोगी जो चोथ्यासारखा टाकाऊ भाग असतो त्याची विष्ठा बनते व ती मोठ्या आंतड्यांतील अन्नरसशोशक नलिकांनां त्यांतून जो अन्नरसांश ग्रहण करण्यासारखा असेल तो शोषण्यास पुरेसा वेळ मिळतो. या मोठ्या आंतड्यांच्या अन्नपचन सामर्थ्यामुळें रोगी बेशुध्द असेल तर गुदद्वारावाटे पातळ व कोमट अन्न, दूध वगैरे घातलें तर तें पचतें व त्यावर रोगी बरा होईपर्यंत कित्येक दिवस राहूं शकतो. मोठ्या आंतड्यांत अभिशोषणक्रिया पूर्ण झाल्यामुळें मळ घट्ट होऊन त्यास दुर्गंधि प्राप्त होऊन तो विष्ठेच्या रूपानें बाहेर पडतो.

पाचक रस उत्पन्न होण्याचीं साधनें व कारणें:- लालापिंडांतील लाळ उत्पन्न होण्यास सुग्रास अन्नाचा वास, स्वाद, भूक, अगर प्रयोगार्थ विजेची ब्याटरी लावणें, कॉर्डाटिपनाय व मेंदूपासून निघणारा नवममज्जातंतु उत्तेजित होणें हीं कारणें होतात. कांहीं पिंडांत पातळ लाळ व कांहींत दाट लाळ उत्पन्न होऊन त्यांच्या नलिकामार्गें ती मुखांत येते. जाठररस उत्पन्न होण्यास मेंदूतील व्हेगस नामक दशमतंतु भूक व सुग्रास अन्नामुळें उत्तेजित होणे हें एक मुख्य कारण व जठरांत येउन पोंचलेल्या अन्नामुळें जाठराची अंतस्त्वचा उद्दीपित होऊन जठररस स्त्रवतो हें दुसरें कारण. आपल्या जठर रसांतील हायड्रोक्लोरिक अॅसिड उत्पन्न होण्याचें कारण आपल्या आहारांत व अन्नांत जें मीठ असतें त्यामुळें त्याची उत्पत्ति होते हें आहे. दशममज्जातंतूचा मध्यंतरी छेदं केल्यानें रसोत्पत्ति होऊ शकत नाहीं असें प्रयोगांतीं सिध्द झालें आहे.

प्यांक्रियारसाच्या उत्पत्तीचें एक कारण वरील मेंदूतून निघणारा दशममज्जातंतु होय हें सिद्ध झालें आहे. व दुसरें कारण धाकट्या आंतड्यांतील श्लेष्मल त्वचेंत उत्पन्न होणार्‍या फर्मेंट (विरजण) जातीच्या पदार्थामुळें या रसाच्या उत्पत्तीस चलन मिळतें. या पदार्थास सीक्रीटीव म्हणतात व तो उत्पन्न होण्यास आंतड्यांत अम्लस्थितींत जठरापासून येणारा अन्नरस होय. आत्रांतील पाचक रसाची उत्पत्ति वरच्याप्रमाणें अंशत: मज्जातंतूच्या नियामक शक्तीमुळें, व अंशत: फर्मेट जातीच्या पदार्थांमुळे होत असावी असा तर्क आहे. वरील इतर रसोत्पत्तींच्या शोधाप्रमाणें हा तर्क प्रयोगावरून सिध्द करतां आला नाहीं.

अन्नमार्गातील अन्न पुढें लोटलें जाण्याची क्रिया अगर गति:- मुखामध्यें खालचा जबडा हलवून दांतांच्या योगें अन्नाचें पीठ करतां येतें व लाळेनें मऊ झालेला अन्नाचा लगदा जिभेनें मागील छिद्रावाटे अन्ननलिकेंतून जठरांत उतरतो व त्यावेळीं घसा व गळा येथें असणारे गिळण्याची हालचाल करणारे स्नायू अन्न खालीं लोटण्यास मदत करतात. पातळ अन्न तीन सेकंदांत ती नळी ओलांडून सुमारें तीन सेकंद त्याच्या अधोभागीं घुटमळून जेव्हां जठराचें अग्रद्वार नंतर लवकर आपोआप उघडतें तेव्हां तें जठरांत जातें; परंतु इतर अन्न त्या नलिकेंतून जाण्यास व जठरांत पोंचण्यास त्याच्या घट्ट अगर मऊपणाच्या मानानें जास्त अगर कमी वेळ लागतो.

जठराची पचनक्रियेस साहाय्यक अशी हालचाल पाहण्यासाठीं प्रयोग करतांना बिस्मथ नामक क्षारमिश्रित अन्न दिल्यानें त्या अन्नास काळसर रंग चढतो व नंतर ''क्ष'' किरणसाहाय्यानें हालचाल पहातां येते अगर त्याची प्रतिमा घेतां येते. ती हालचाल अशी:- जठराच्या बुडाशी फक्त अन्न येउन सांठतें व पोट भरलें म्हणजे जठराच्या मध्यभागांत आकुंचनाची लाट उत्पन्न होऊन ती जठराच्या अधश्छिद्रापर्यंत जाते. अशा आकुंचन लाटा दर १०।२० सेकंदांनीं उत्पन्न होऊन आंतील अन्न जाठररसांत जसजसें मुरलें व पचलें जातें तसतसें मधून मधून दोन आकुंचनलहरींच्या दरम्यान अन्नरस लघुआंत्रांत जावा म्हणून अधछिद्र उघडतें व पुन: मिटतें. याप्रमाणें सर्व जठर रिकामें होईपर्यंत जठरांतील या आकुंचनलहरी उत्पन्न होत असतात. जेवढें अन्न असेल तेवढ्याच आकाराची व मापाची जठराची पोकळी असते. जठर रिकामें झाल्यावर पोकळ जागा नसते. आंतड्यामध्येंहि अशीच हालचाल असून त्यायोगें अन्नरस पुढें लोटला जातो तो प्रकार असा:आंतड्याच्या आंतील स्नायू वर्तुलावर व बाहेरील स्नायू लांबट असतात. एक प्रकारच्या हालचालींमुळें अन्नरसावर दाब पडून तो एकदम पुढें ढकलला जातो व त्याचें पाचक रसाशी चांगलें मिश्रण होतें. आकुंचनलहरीस्वरूपाच्या दुस-या प्रकारच्या हालचालीं असून त्या फार सावकाश व जोराच्या असतात व त्यांस आरंभ जठराच्या अधश्छिद्रापासून होऊन सुमारें १ मिनिटांत सर्व आंतड्यापर्यंत या गतिची लाट पोंचते. ज्या वर्तुळाकार भागीं आकुंचन होतें त्यापुढील आंतडें विस्तरण पावतें व लगेच तेथें आकुंचन लहरी येउन विस्तृत झालेला भाग आकुंचित होऊन आंतील अन्नरस पुढें लोटला जातो. ज्याप्रमाणें किडा अगर सुरवंट चालतांना आपल्या अंगाची वरचेवर उत्पन्न होणार्‍या आकुंचनलहरींमुळें सुरकुत्या असलेली जाड वळकटी करतो व ती सैल पडून तशी दुसरी आकुंचनलहरी उत्पन्न झाली म्हणजे त्यामुळें पुढें सरकतो तशीच ही पचलेलें अन्न पुढें सरकण्याची गति असते. विष्ठा पुरेशी ठराविक वजनाची बनल्यावर व जन्मल्यावर मलोत्सर्जनक्रियेची इच्छा उत्पन्न होते. जठरांत फार अजीर्ण झाल्यास तोंडास मळमळ, ओकारी येऊ लागून उर्ध्वगतीमुळें शेवटीं वांति होते. या दोन्ही क्रिया परिचित असतातच.

अन्न पचणें, जिरणें, अंगीं लागणें (अभिशोषण):- मुखामध्यें पूर्ण पचन होऊन तें अंगी जिरत नाहीं. जठरामध्येंहि फार थोडा प्रोटीन जातीचा अन्नांश जिरून रक्तांत मिसळतो. पाणी व अल्कोहल (मद्यार्क) लवकर आणि बदल न होता रक्तांत मिळून जातात. पाण्यांत ज्या प्रमाणांत क्षार अगर साखर विरघळून घालावी त्याप्रमाणें ते पदार्थ लवकर अगर उशिरां रक्तांत मिसळतात. अन्न जिरून (रक्तांत मिसळून) तें अंगीं लागण्याचें मुख्य स्थान लघुआंत्र होय. त्याच्या खालोखाल महांत्र असून तेथें प्रोटीन प्रकारचें अन्न येण्यापूर्वी त्यापैकीं शे. ८६ अन्न लघुआंत्रांत जिरलेलें असतें. मखमालीच्या कापडावर जसे मऊ उंचवटे असतात तसे तेथें असून प्रत्येकांत अति सूक्ष्म अन्नरसवाहिनी व रक्तवाहिनी असून स्निग्धान्यरसाचा रक्तांत प्रवेश या दोन्ही वाहिन्यांच्या झिरझिरीत पापुदर्‍यांतून होतो. शरीरांत रसग्रंथी व रसवाहिन्या आहेत त्यांतून मोठ्या अन्नरसनाडींत शिरून तिच्यावाटे त्याचा रक्तांत शिरकाव होतो. प्रोटीन व पिठूळ अन्नरसास आंतड्यांतील रक्तवाहिन्यांतून यकृतरक्तवाहिनींत प्रथम प्रवेश करावा लागतो. यकृतामध्यें त्या अन्नांतील कांहीं सत्त्वाचा शर्करारूपानें सांठा करून नंतर यकृताबाहेर जाणार्‍या मोठ्या रक्तवाहिनींतून रक्तांत मिसळून त्या अन्नरसास जावें लागतें; व येणेंप्रमाणें लवणक्षार, शर्करा, स्निग्ध पिष्टसत्त्वान्नादि सर्व प्रकारचें अन्न, पाणी व रस विविध तर्‍हेनें रक्तांत मिसळून जातात. पचन झालेला अन्नरस रक्तांत मिसळण्यास रक्तवाहिन्या व रसवाहिन्यांतून मुख्यत्वें करून उपयोगी असतात. अति सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून अन्नरस स्थूल रसवाहिन्यांत शिरून शेवटीं गळ्यांतील मोठ्या रक्तवाहिन्यांत पोंचून तेथून तो सर्व शरीरभर पसरतो व झिजलेलें शरीर पुष्ट करतो.

अन्नरूपी भांडवलाच्या आयव्ययाचा हिशोब:- जसजसें आपलें शरीर व त्यांतील रचना झिजतात तसतसें आपणांस अन्न खावें लागतें व त्यासाठीं आपणांस भूक लागते. शरीर झिजणें ही ज्वलनरूपी क्रिया असल्यामुळें शरीर उबदार लागतें. ज्याप्रमाणें पेटविलेली शेगडी तशीच राहूं दिली तर कोळशांच्या आभावी कांहीं कालानें विझून जाईल व ती उष्णता जाईल तसे वरच्यावर अन्नाचा पुरवठा न झाल्यास मरण येऊन शरीररूपी शेगडी थंड होईल. अन्न हें आपलें सरपण अगर भांडवल होय. अग्नीच्या ज्वलनानें म्हणजे झिजेनें तिचा व्यय म्हणजे खर्च होऊन कार्बनडायाक्साइड या मलरूपी वायूचें उत्सजन होतें तद्वत शरीर झिजतांना कार्बन डायाक्साइड हा विषारी वायु श्वासानें व मल, मूत्र, स्वेद इत्यादि रूपांनीं बाहेर पडून जात असतो. या झिजेबरोबर त्याचवेळीं झिजलेल्या भागांची अन्नरसाच्या पुरवठ्यामुळें नवी मांडणी होत असते. ह्रदयाचा एक ठोका पडला अगर डोक्यांत कांहीं एक विचार व कल्पना आली तर तितकेच हे भाग झिजतात व त्याचें पुनरूज्जीवन अन्नरसानें होत असतें. मोठाले ज्वर, दुखणीं व उपवासामध्यें रोगी अनेक दिवस अगर आठवडे अन्नाशिवाय अगर अल्प आहारावर काढतो हें कसें? याचें कारण कांहीं मर्यादेपर्यत यकृतांत सांठविलेलें ग्लायकोजन नामक शर्करासत्त्व ही झीज भरून काढण्यास उपयोगी पडतें हें होय. ज्याप्रमाणें मनुष्य बाल, तरूण, वृध्द, गर्भिणी, अशक्त, रोगी, सशक्त असेल अगर जसा त्याचा व्यवसाय बैठा अगर मध्यम अगर अति मेहनतीचा असेल त्या मानानें त्याच्या शरीराचा खर्च कमी अधिक असल्यामुळें त्याच्या व्यवसायानुसार त्यास स्निग्ध, पिष्ट, शर्कराप्रोटीनादि विविधान्नें युक्त प्रमाणांत दिलीं पाहिजेत. याची माहिती 'पथ्यापथ्य विचार' या लेखांत सांपडेल.

वमन व स्वेद मलमूत्रोत्सर्जनादि क्रिया:- या आपोआप होणार्‍या असून त्या बिनबोभाट न चालतील तर रोग व पीडा उत्पन्न होईल. त्या चिरपरिचित असल्यामुळें त्यांचें वर्णन दिलें नाहीं.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .