प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शाई- शाईचा उपयोग लिहिण्यास सुरुवात झाल्यानंतर बर्‍याच काळानें झाला. अक्षरें प्रथम धुळीवर बोटानें अथवा काडीनें लिहित असत. दुसरी पायरी म्हणजे महत्वाचे लेख जास्तवेळ टिकावे म्हणून दगडावर कोरण्यांत येत. हा प्रयोग अर्थात जास्त मेहनतीचा असून दगडांच्या जडपणामुळें ते हलविणें हें काम मोठें कष्टदायक असलें पाहिजे. त्यानंतर दगडाऐवजीं लांकडयाच्या पाटया अथवा कांहीं विशिष्ट जाड पत्रे लिहिण्याच्या उपयोगासाठीं सोईस्कर पडूं लागले. परंतु लांकडावर कोरून काढलेलीं अक्षरें स्वच्छ असलीं तरी दिसण्यास जास्त अस्पष्ट अशीं असतात. नंतर त्यांत काजळी भरण्यांत येई व अशा रीतीनें कोंरीव अक्षरें काळीं व स्पष्ट दिसत. यानंतर शाईचा शोध लागलेला असावा. तो नक्की कधीं व कोणीं लावला हें सांगतां येणें कठिण आहे. प्रथम शाई बहुतेक सर्व ठिकाणीं काजळापासूनच करण्यांत येत असें. तींत माक्याचा रस, गोंद, साखर, इत्यादि द्रव्यें टाकून ती जास्त पक्की तयार करण्यांत येत असे. विशेष महत्वाचे लेख ताडपत्रावर लिहून ते जमीनींत पुरीत अथवा पाण्यांत ठेविण्यांत येत असत व त्या स्थितींत ते कित्येक शतकेंपर्यंत नीट टिकत असत. त्यावरील शाई देखील बिलकुल बिघडत नसे. या शाईंतील सर्व द्रव्यें पाण्यातं विरघळणारीं नसल्यामुळें अथवा तसें होण्यास जास्त पाणी लागत नसल्यामुळें तींत गाळ पुष्कळ असतो. शाईंत गोंद टाकल्यास शाई दाट होते व गाळहि कमी राहतो. परंतु गोंदामुळें शाई घट्ट होऊन ती वाळणयास जास्त वेळ घेते. त्यांतील रंग पूर्णपणें आंत न विरघळतां वर तरंगत राहिल्यास त्याचे कण तसेच राहून बारीक अक्षरें काढण्यास सुलभ जात नाहीं. शिवाय असलीं अक्षरें लवकर पुसलीं जातात. लिहिण्याची शाई वाळल्यानंतर काळी दिसावयास पाहिजे. तसेंच लेखणींतून बाहेर पडतांनां ती काळी दिसावयास पाहिजे. त्यांतील रंगाचें आणि इतर द्रव्यांचें पाण्याबरोबर चांगलं मिश्रण व्हावयास पाहिजे. ती पातळ असून कागदावर वाळल्यानंतर पाणी अथवा मद्यार्क यांनीं धुतली जाऊं नये. तिच्यांत उजेड अथवा वारा यामुळें फिक्कटपणा येतां उपयोगी नाहीं तसेंच तिच्यावर हवेचा व तिपासून कागदावर वाईट परीणाम होतां कामा नये. असली सर्वगणसंपन्न शाई अद्यापि तयार झालेली नाहीं.

नेहमीं वापरण्यांत येणारी शाई म्हणजे लोखंड व गॅलिक अम्ल यांच्या मिश्रणापासून झालेली असते आणि ही टॅनीन आणि आयर्नसल्फेट एकत्र करुन करतात. हें मिश्रण नवें असतांनां अगदीं काळें असत नाहीं. तरी पण त्यास हवा लागल्यास हवेंतील प्राणवायूमुळें त्याचें ऑक्सिडेशन होऊन त्यापासून दाट जांभळा रंग तयार होतो. ताजी शाई कागदावर लिहितांना साधारण फिक्कट अशीच दिसते व नंतर ती जास्त काळी दिसते. जुन्या शाईंत गाळाचें प्रमाण जास्त असतें. ऑक्सिडेशनची क्रिया सावकाश व्हावी म्हणून तींत थोडें हायड्रोक्लोरिक अम्ल टाकतात. तसेंच गाळ न होण्याकरितां कॅर्बोलिक अथवा सॅलिसायलिक अम्लें टाकण्याचा प्रघात आहे. साधारणतः शाईचें प्रमाण पुढीलप्रमाणें असतें - एक लिटर पाणी, त्यांत २३.४ ग्रॅम टॅनीन, ७७ ग्रॅम गॅलिक अम्ल, ३०० ग्रॅम आयर्नसल्फेट, १० ग्रॅम गोंद, २.५ ग्रॅम हायड्रोक्लोरिक अम्ल, आणि १ ग्रॅम कॅर्बोलिक अथवा सॅलिसायलिक अम्ल इत्यादि. लोखंड व गॅलिक अम्ल यांच्या मिश्रणानें तयार केलेल्या शाईस हवेपासून दूर ठेवावयास पाहिजे. चांगली शाई नीट जपून ठेवल्यास पुष्कळ वर्षेंपर्यंत टिकते. क्लोरिन वायूचा तिच्यावर परीणांम होऊन त्यामुळें ती पुसट दिसावयास लागते परंतु तसें झाल्यास तीस पुन्हां पोटॅशियमफेरोसाय नेटच्या पाण्यानें धुतल्यास ती पूर्ववत होऊन अक्षरें स्वच्छ दिसावयास लागतात.

शाई करण्याच्या कृतींत अलझिरीन शाईचा शोध लावून लिओनाडाअ यानें सन १८५५ त मोठीच सुधारणा केली. यांत टॅनिक-अम्ल, गॅलिक अम्ल व लोखंड यांच्याबरोबर ''इन्डिगो ब्ल्यू साल्फोनिक अम्ल'' हे मिश्र करतात. यामुळें शाई नेहेमीं स्वच्छ दिसून आंतील अम्लामुळें जास्त वेळ टिकते. थोडें असलेलें अम्ल कागदास नुकसान करीत नाहीं. एक तर त्याचें मिश्रण हळू हळू होत असतें शिवाय हायड्रोक्लोरिक अम्लाप्रमाणें तें उडून जात नाहीं. गंधकासारखें तीव्र अम्ल घेतल्यास त्यामुळें कागदाच्या पृष्ठभागावर असलेल्या चुन्याचा नाश होऊन शाई फुटते व टांकांवर ह्याचा परिणाम होऊन टांक खराब होतात तें निराळेंच. शाईंत असलेल्या इतर अम्लांमुळें लोखंड अथवा पोलादी टांकावर त्यांचा थोडाअधिक परीणाम होतोच.यामुळें सोन्याचे टांक (सोन्यावर ह्या अम्लांचा परिणाम अगदींच थोडा होत असल्यामुळें) जास्त वेळ टिकतात.

पायरोगॅलोल- हिमारोक्झिलीन आणि पायरोगॅलोलपासून झालेल्या इतर द्रव्यांचाहि शाई करण्यांत उपयोग केला जातो. टॅनिक अम्लांपेक्षां गॅलिक अम्लांपासून केलेल्या शाईचीं अक्षरें जास्त काळीं दिसतात. ब्ल्यू नांवाच्या लांकडापासूनहि शाई तयार करण्यांत येते. यांतहि टिकण्यासाठीं थोडें अम्ल टाकावें लागतेंच. निग्रोसीन आणि इन्डुलीन शाई म्हणजे त्या त्या रंगपदार्थांचें पाण्याबरोबर केलेलें निव्वळ मिश्रण असतें. तें काळें होत नाहीं तसेंच पाण्यानें पुसलेंहि जातें.

तांबडी शाई (अ) रेडवुड, फटकी, वाईनस्टोन (  सोडियम - पोटयाशियम टार्ट्रेट) आणि गोंद; अथवा (आ) कॅर्मीन आणि गोंदाचें पाणी यांपासून तयार करतात. व्हायोलेट, निळी, हिरवी इत्यादि शाई त्या त्या अनिलीन रंगपदार्थांचीं पाण्याबरोबर केलेलीं मिश्रणें असतात. कॉपीइंग शाई अथवा प्रती काढण्याची शाई ही नेहेमींची शाईमिश्रणेंच असून त्यांत फक्त पाण्याचें प्रमाण बरेंच कमी केलेलें असतें. शिवाय त्यांत गोंद जास्त प्रमाणांत टाकून थोडें ग्लिसरीन टाकण्यांत येतें. यामुळें ओला केलेला कागद त्यावर दाबल्यास पुरे न विरघळलेले शाईंतील पदार्थ त्या ओल्या कागदावर येऊं शकतात. गोंद आणि ग्लिसरीन यामुळें विरघळण्याची क्रियाहि फार जलद होऊं शकत नाहीं. ग्लिसरीनमुळें ही शाई बरीच चिकट असते व तिला एक प्रकारची चकाकी येते. (हिन्रिक्शेन उन्टरसुखुंग फॉन आयसेन ग्लॅलुस टिन्टेन) लेखन डॉ।वा.द्वा.कोर्डे.)

चिनीशाई- ही सर्वांत प्रथम तयार झालेली शाई होय. अजूनहि चीन जपान या देशांत लेखणीऐवजीं कुंचल्यानें लिहितांनां याच शाईचा उपयोग करतात. शिल्पकार, एंजिनियर व चित्रकार या शाईचा कित्येक ठिकाणीं उपयोग करतात. या शाईच्या कांडया किंवा वडया केलेल्या असतात व उपयोग करण्याच्या वेळीं त्या पाण्यांत गंधाप्रमाणें उगाळून घेतात. काजळ व सरसासारखा कांहीं पदार्थ एकत्र करून ही शाई केलेली असते. जास्त किंमतीची शाई अत्तरादिकांनीं सुवासिक केलेली असते.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .