विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शांतीपूर- बंगाल, नडिया जिल्ह्याच्या राणाघाट सबडिव्हिजनमधील एक शहर लोकसंख्या (१९११) २६७०३. जिल्ह्यांतील हें अतिशय दाट लोकवस्तीचें शहर आहे. १८६५ सालीं येथें म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. पूर्वी येथील मलमलीचा धंदा फारच ऊर्जितावस्थेस पोहोंचला होता. यूरोपात देखील त्या मलमलीची फार तारीफ होत असे. सन १८९७ मधील भूकंपानें पुष्कळशा मोठमोठया इमारती जमीनदोस्त झाल्या.येथें झनाना मिशनची एक शाळा व दवाखाना हीं आहेत.