प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शारीरांत्र गूहकसंघ- या संघांतील प्राण्यांची ठोकळ कल्पना जलव्याल प्राण्यांच्या निरीक्षणानें येईल. जलव्यालजातिविशेष पुष्कळ आङेत.यांपैकीं कांहीं पांढुरके असतात व कांहीं हिरवे असतात. हा प्राणी गवताच्या काडीसारखा असून पाव इंच लांब असतो. एक टोंक पाण्यांतील एखाद्या वस्तूला चिकटलेलें असतें व दुसर्‍या टोंकाच्या मध्यभागीं या प्राण्याचें मुख असतें. तोंडाभोंवतीं लहान लहान बाहुरुपी शाखा फुटलेल्या असतात. या प्राण्याचें कांड व शाखा आंतून पोकळ असतात व तया पोकळीला शरीरांत्रगुहा म्हणतात. कांडाच्या शरीरपुटांत सूक्ष्मदर्शकाखालीं पेशींचे दोन थर दिसतात. बाहेरच्या थऱांत सोंगटीसारख्या पेशी असतात. त्यांचीं वाटोळीं चपटीं टोंकें बाहेरच्या बाजूस असतात व निमुळतीं टोंकें आंतल्या बाजूस असतात. आंतल्या थरांतल्या पेशी लांबट व मोठया असतात व गुहेच्या बाजूस त्यांच्यांत पुष्कळ जलविवरें दिसतात. बाहेरच्या थरांतील पेशींच्या निमुळत्या टोकांच्यामध्यें बारीक बारीकवाटोळया लहान पेशी असतात व त्यांनां सांधिक किंवा पूरक पेशी म्हणतात. या पेशींचा उपयोग निरनिराळया कामीं होतो. बाह्य थरांतील पेशी मेल्या अथवा गळून पडल्या तर त्यांची जागा त्या भरून काढतात ठराविक भागीं दरसाल मधून मधून या गोल पेशींची वाढ होऊन जननेंद्रियें तयार होतात. या पूरक पेशींपैकीं कांहीं बाहेरच्या थरांत घुसून पृष्ठभागापर्यंत पोंचतात. या पेशींत एक द्रवयुक्त कोश बनतो. या पेशीस्थ कोशाच्या आवरणाचें किंवा पापुद्य्राचं एख टोंक बाहेर लांब ओढल्यासारखें होऊन एक अणीदार पोकळ दंशसूत्र तयार होतें. हें दंशसूत्र उलट आंत ओढलें जाऊन दंशकोशाच्या आंत व्यावषर्तमंडलाप्रमाणें गुंढाळलेलें असतें. दंशकोश ज्या पेशींत तयार होतो त्या दंशपेशीला बाहेरच्या बाजूनें एक अणीदार दंशसूचि असते. या दंशसूचीला इतर जीवांचा स्पर्श जाला म्हणजे दंशपेशी आकुंचन पावून दंशकोशावर दाब पडतो व दंशसूत्र जोरानें बाहेर फेंकलें जातें, व त्याच्या मार्‍यानें ते शत्रूला निश्चेष्ट करितात. दंशकोश शाखांवर फार असतात. एखादा भक्ष्य जीव जलव्यालाच्या आसपास आला म्हणजे आपली शाखा त्याच्यावर जोरानें फेंकून त्याच्यावर दंशसूत्राचा मारा होतो व तो प्राणी निश्चेष्ट पडतो. बर्‍याच वेळां दंशसूत्र व त्यांचे कोश जलव्यालांच्या शरीरांतून सुटून निश्चेष्ट पडलेल्या भक्ष्य प्राण्याच्या शरीराला चिकटलेले आढळतात. जलव्यालावर सूक्ष्मदर्शकाखालीं थोडें खारें पाणी घातलें तर सूत्र व कोश बाहेर पडतील.

जलव्यालाला आपल्या शरीराचे भाग कांड व बाहुशाखा हे कमजास्त लांब करतां येतात. बाहेरच्या थरांतील पेशींनां आंतल्या बाजूनें आकुंचनशील पुच्छें असतात व त्यांची रचना अन्वायाम असतें. त्यांच्या आकुंचनानें हा प्राणी आंखुड होतो. तसेंच आंतल्या थरांतील पेशींनां बाहेरच्या बाजूनें पुच्छें असतात; परंतु त्यांची रचना अनुविस्तर असते. म्हणून त्यांच्या आकुंचनानें परीघ कमी होतो व लांबी वाढते.

आपल्या कांडाला व बाहुशाखांनां वाटेलतसें वांकवून व कमजास्त लांब करून आसपास येणारे भक्ष्यप्राणी जलव्यालाला पकडतां येतात व दंशकोशांच्या मार्‍यानें निश्चेष्ट पाडतां येतात. नंतर हे निचेष्ट प्राणी बाहुशाखांच्या साहाय्यानें तोंडांतून शारीरांत्र गूहेंत सारले जातात. तेथें शरीरपुटांतील आंतल्या थराच्या पेशी पाचक द्रव तयार करुन त्याच्यावर सोडतात. या द्रवांत भक्ष्यप्राण्याचें चैतन्यद्रव्यहि विरघळतें. हा अन्नरस आंतल्या थरांतील पेशी शोषून घेतात. भक्ष्यजीवाचे निरुपयोगी अवशिष्ट भाग तोंडांतून बाहेर फेंकले जातात. आंतल्या थरांतील कांहीं पेशींनां एकेक प्रतोदहि असतो व त्याचा उपयोग भक्ष्यप्राणी शारीरांत्रगुहेंत इकडून तिकडे फिरविण्यांत होतो.

हा प्राणी नेहमीं कोणत्या न कोणत्या तरी पदार्थाला पाण्यांत चिकटलेला आढळतो तरी त्याला स्थलांतर करतां येतें. आपल्या स्पर्शशाखांचीं टोंकें इष्ट दिशेनें दुसर्‍या ठिकाणीं लांबून कांड किंवा मागील भाग त्याला जळूसारखा वळवून पुढें ओढून घेतां येतो.

शरत्कालीं याच्या सांधिक पेंशींपासून अंडीं व शुक्रबीजें तयार होतात व पाण्यांत सोडलीं जातात. पोहतां पोहतां अंडीं व शुक्रबीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा होते. गर्भावर एक कंटकित कवच तयार होऊन तो चिखलांत पडतो व थंडीच्या दिवसांत तसाच संकुचित स्थितींत राहतो व उन्हाळयाच्या आरंभीं एक चिमुकला चलव्याल कवचाबाहेर येतो. वरील द्वंद्वोत्पत्तीशिवाय निद्वंर्दोत्पत्तीनेंहि अपत्योत्पादन होतें. या दुसर्‍या प्रकारांत खोडाला बाहेरच्या बाजूनें टेंगूळ येतें, व तें वाढून त्यांत शारीरांत्रगूहेचा भाग पसरतो. नंतर पुढल्या बाजूला बाहुशाखा फुटतात व जन्मद प्राण्याचा संबंध तुटून नवीन प्राणी तयार होतो.

मोठमोठया उत्क्रान्त प्राण्यांच्या शरीरांत दोन स्वंतत्र पोकळया सांपडतात. त्यांपैकीं एक पचनेंद्रियनलिकेंत असते. व तींत अन्नाचें पचन होतें. दुसरी पोकळी अथवा शारीरगुहा ही अगदीं निराळीं असून तींत सर्व अंतरिद्रियें ठेवली आहेत असें वाटतें. उलटपक्षीं वरील जलव्याल प्राण्यांत एकच पोकळी असते व तींत या प्राण्याचे सर्व व्यापार होतात. म्हणून या पोकळीला शारीरांत्रगुहा म्हणतात व वरील तर्‍हेची पोकळी या संघांतील सर्व प्राण्यांत असते. आतां आपण या संघांतील इतर प्राण्यांचें अवलोकन करूं.

या संघांतील जल्थजंतुवर्गांत जलव्यालापेक्षां जास्त संकीर्ण व उत्क्रांत असे प्राणी आहेत. जलव्याल प्राण्याच्या खोडाची लांबी वाढून व त्याला अंकुरोत्पत्तीनें उत्पन्न होणार्‍या संततीचा व जन्मदा जलव्यालांचा सांधा कायम राहून व खोडाची वाढ संततीहि होऊन व त्यांनां पिलें फुटण्याचा क्रम चालू राहून ज्या तर्‍हेचा प्राणिवृंद तयार होईल अशा तर्‍हेचे प्राणिद्रुम या वर्गांतील संकीर्ण प्राण्यांत सांपडतात. ओबेलिया हा त्यांपैकीं एक आहे.

ओबेलिया- पाण्यांत पडलेल्या लांकडांवर लोंकरीच्या तंतूसारखीं पांडुरकीं जाळीं असतात. तीं या प्राणिवृंदांचीं बनलेलीं असतात. यांपैकीं कांहीं तंतू पाकिटाच्या दोर्‍याइतके जाड असतात व त्यांनां फांद्या फुटून तयार झालेलीं जाळीं लांकडाला बळकट चिकटलेलीं असतात. यांनां उभे फांटे फुटलेले असतात व त्यांनां बाजूला शाखा असतात व प्रत्येक शाखेच्या शेवटीं जलव्यालासारखे भाग असतात. त्यांपैकीं कांहीनां बाहुशाखा असतात व कांहींनां नसतात. सबाहु व्यालाकडे प्राणिद्रुमाकरितां अन्न पुरविण्याची कामगिरी असते. अबाहुव्याल आपल्या शरीरापासून जननक्षम स्वैरव्यालांनां उत्पन्न करतात.

या प्राणिद्रुमाच्याविस्तारयुक्त कांडावर एक पिंवळट शांर्गीय पापुद्रा असतो त्याला प्राणिवल्कल म्हणतात. हें वल्कल कांडाच्या पुटांतील बाहेरच्या पेशींच्या थरानें म्हणजे बाह्यत्वचेनें तयार झालेलें असतें. बाह्यत्वचा व अंतस्त्वचा यांच्यामध्यें एक पातळ सांद्र निपशीय थर असतो. अंतस्त्वचेंच्या आंत पोकळी असते व ती अग्रभागीं सलेल्या सबाहु व्यालाच्या शरीरांत्रगुहेला मिळालेली असते. प्राणीवल्काचाहि सबाहूव्यालासभोंवतीं एक पेला झालेला असतो व बाहुशाखा आंत ओढून गेऊन संकटकालीं त्या पेल्यांत सबाहुव्यालाल लपून बसतां येतें.

सबाहुव्यालांच्या बाहुशाखांवर वल्कल नसतें व त्या शाखा आंतून पोकळ नसतात. भक्ष्य पकडण्यासाठीं किंवा त्याच्यावर दंशसूत्राचा मारा करण्यासाठीं किंवा पकडलेल्या भक्ष्याला तोंडांत ढकलण्यासाठीं चालू असलेली धडपड नेहमीं दृष्टीस पडते. प्राणिद्रुमावरील अबाहुव्यालांवर सर्व बाजूंनीं वल्कलाचें वेष्टण असतें. अबाहुव्यालाल बाजूनें अकुंर फुटतात व ते वाढून छत्रीप्रमाणें किंवा छत्रक गोमयजांप्रमाणें दिसतात. या स्थितींत हीं स्वैरव्यालें अबाहुव्यालाच्या वेष्टणाला या सुमारास असलेल्या भोंकांतून बाहेर पडतात व पाण्यांत स्वैर विहार करतात. स्वैरव्यालाच्या उघडलेल्या छत्रीसारख्या भागाला छत्र म्हणतात व त्याच्याकडेला १६ बाहुशाखा असतात. छत्राच्या अधरतलाच्या मध्यभागीं एक दांडा असतो व त्याच्या शेवटीं या प्राण्याचें तोंड असतें. या दांडयाला शुंडा म्हणतात. पचननलिका शुंडेतून छत्रांत शिरली म्हणजे तिची पोकळी वाढते व तिला चार नळया फुटतात. या अरनलिका छत्रीच्या काडयाप्रमाणें कडेपर्यंत जातात. छत्रीच्या कडेला समान्तर एकवाटोळी नळी असते. त्या वाटोळया नळीला या अरनलिका मिळतात. शुंडेंतील पचननलिकेंत अन्नपचन होऊन पक्कान्नरस छत्रांतील नळयांत जातो.

अरनलिकांच्या योगानें छत्रांचे चार भाग पडतात व या प्रत्येक चतुर्थांश भागांत दोन बाहुशाखांच्या आरंभीं ज्ञानेंद्रिय म्हणून एक वाटोळी लहान पोकळी असते व तींत कर्करकण असतात. या खळग्यांत बाजूच्या पेशींनां पक्ष्महि फुटलेले असतात. या ज्ञानगर्तेंतील कर्करकण व पक्ष्म यांच्या योगानें याला आपल्या प्रवासाची दिशा समजत असावी. बाहूशाखांची संख्या नेहमींच १६ नसते. बर्‍याच वेळां १६ पेक्षां जास्त बाहुशाखा आढळतात. छत्राच्या कडेला एक पातळ अरुंद चैतन्यद्रव्याची झालर असते.

सबाहुव्याल व स्वैरव्याल यांची मूलरचना एकच असून त्यांच्यांतील निरनिराळया भागांच्या कमीजास्त वाढीनें वरील तर्‍हेचे भिन्न आकार उत्पन्न झाले आहेत हें थोडया विचारानें लक्षांत येईल. बाहुशाखा व मुख यांच्यामधील परिमुखपटलाची खूप वाढ होऊन छत्राचा अधरतल तयार होतो. छत्राच्या अधरतलावर अरनलिकांपासून पेरूच्या आकाराचीं चार जननेंद्रियें लोंबत असतात. स्वैरव्यालांत स्त्रीपुरुष हा भेद असल्यामुळें पुंव्यालांपासून शुक्रबीजें उत्पन्न होतात व स्त्रीव्यक्तींकडून अंडीं तयार होतात. शुक्रबीजें तयार झालीं म्हणजे पाण्यांत सोडलीं जातात व नंतर ती पाण्याबरोबर स्त्रीव्यालांकडे जातात व अंडयाशीं संयोग पावून गर्भ तयार होतो. या एकपेशीय गर्भापासून अनेक द्विधाकरणांनीं पुष्कळ पेशी तयार होतात व त्यांचा समूह बुंदीच्या लाडवासारखा दिसतो. बाहेरच्या बाजूस असणार्‍या पेशींनां पक्ष्म असतात. व आंतलया बाजूस एक पोकळी तयार होते. आपल्या पक्ष्मांच्या योगानें हा गोळा पाण्यांत पोहतो म्हणून त्याला स्वैर डिंभ म्हणतात. कांहीं कालानें एखाद्या वस्तूला चिकटून जलव्यालासारखा हा होतो व त्याच्यापासून अंकुरोत्पत्तीनें प्राणिद्रुम तयार होतो.

वरील वर्णनावरून लक्षांत येईल कीं, ओबेलिया प्राणिद्रुमाला जननेंद्रियें नाहींत व त्यांची वाढ अंकुरोत्पत्तीनें होते. या व्यालद्रुमाचे कांहीं अंकुर स्वतंत्र होऊन स्वैरव्याल बनतात व त्यांनां जननेंद्रियें असतात. या स्वैरव्यालांपासून गर्भोत्पत्तीनें नवीन व्यालद्रुम तयार होतो. म्हणजे जसें झाडापासून बीज व बीजापासून झाड तसें परस्परांपासून परस्पर उत्पन्न होतात. अर्थात ह्या प्राण्यांत अन्योन्यसंतति दृष्टीस पडते.

जलव्याल वर्गांतील कृशयष्टिगणांत ओबेलियांप्रमाणें पुष्कळ प्राण्यांत अन्योन्य संतति आढळते. निर्द्वन्द्व व अंकुरवृद्धिक्षम पिढीमध्यें यांचा आकार व्यालद्रुमासारखा असतो व गर्भवृद्धिक्षम पिढींत यांचा आकार स्वैरव्यालाप्रमाणें असतो. कांहींच्या सबाहु व अबाहु व्यालांभोवतीं प्राणिवल्कल नसतें. प्रतनुछत्रगणांत प्राणिद्रमावस्था नसते व स्वैरव्यालांपासून गर्भोत्पत्तीनें स्वैरव्याल उत्पन्न होतात. या गणांत आखारवैचित्र्य फार आढळतें. कांहींचा व्यास चार इंचांपर्यंत असतो व निःपेशीय सांद्रमध्याची वाढ फार होऊन छत्रहि जाड होतें. कांहीं प्राण्यांत जननेंद्रियें शुंडादंडाला चिकटलेलीं असतात. प्रवालव्यालगणांत प्राणिवल्कल कर्करमय असतें व प्राणिद्रुमाचा सांगाडा चेंडूसारखा किंवा विस्तारयुक्त वृक्षासारखा असतो व यालाच प्रवाल म्हणतात. या गणांतील एका जातीला सहस्त्रवदन म्हणतात. कारण याच्या वाळलेल्या सांगाडयाला हजारों भोकें असतात, व सर्व सांगाडयांत बारीक नळयांचे जाळें झालेलें असतें. पृष्ठभागावर दिसणारीं भोकें हीं या नळयांचीं तोंडें आहेत. हीं भोंकें दोन आकाराचीं असतात. जिवंतपणीं लहान भोंकांतून लहान रक्षकव्यालव मोठया भोंकांतून उदरंभरव्याल बाहेर येतात. उदरंभरव्यालाच्या नळयांत आडवे पडदे असतात. सप्लवव्यालगणांत पिरंगी नौकाप्राणी येतो. हा एक समुद्रांतील स्वैरविहारी प्राणिद्रुप आहे. याचें खोड किरकोळ व लांब असतें. याच्या खोडाच्या वरच्या टोंकाला एक फुगा असतो व त्यांत हवा असते. या प्लवामुळें या व्यालद्रुमाला पोहतां येतें. या संकीर्ण प्राण्याच्याविकलव्यालांत श्रमविभागाच्या अनुरोधानें आकारवैचित्र्य फार आढळतें. या द्रुमांतील कांहीं विकलप्राणी घंटेसारखे असून त्यांच्या तालबद्ध आखुंचनप्रसरणांनीं हा प्राणिद्रुम इकडे तिकडे पोहतो. यांच्या प्रसरणाबरोबर पाणी आंत जातें व आकुंचनाबरोबर तें जोरानें बाहेर येतें व उलट दिशेनें प्राणी पुढे ढकलला जातो. या घंटेसारख्या व्यालांनां शुंडादंड नसतो. दुसरीं कांहीं विकलाव्यालें या वृंदाकरितां अन्नग्रहण करतात व त्या प्रत्येकाला पुष्कळ फांटे असलेली एकेक शाखा असते व या शाखेवर अगणित दंडकोश असतात. दुसर्‍या कांहीं विकलव्यालांनां स्पर्श समजतो व ह्या स्पर्शवेदी व्यालांनां तोंडें नसतात परंतु एकेक लांब बाहुशाखा असते. या स्पर्शवेदी व्यालांशेजारीं या प्राणिद्रुमांचीं जननेंद्रियें असतात व ती जरी फुग्यासारखीं असलीं तरी तीं विकृत झालेली व्यालेंच आहेत. जननेंद्रियांच्या आच्छादनासाठीं कांहीं व्यालें पानांसारखी होतात व त्यांनां व्यालपर्ण म्हणतात. यावरून या प्राणिद्रुमाच्या विकलव्यालांत श्रमविभागाच्या अनुरोधानें कार्यसापेक्ष आकारवैचित्र्य फार आढळतें हें सहजीं लक्षांत येईल.

सांद्रमत्स्य- बरेच वेळां समुद्रकांठीं ओल्या वाळूंत आढळणारा आरेलिया प्राणी हा या सांद्रमत्स्य वर्गांत येतो. हा बशीसारखा असून याच्या खालच्या भागाच्या मध्यावर चार मुख्परसर लोंबत असतात.पालथ्या बशीसारखें दिसणारें याचें छत्र पारदर्शक असतें व तेवढेंच मोठें असतें. याच्या मध्यभागीं आंत्रगुहेंत असलेली अश्वनालासारखीं चार तांबडीं जननेंद्रियें बाहेरुन दिसतात. साधारणतः या प्राण्यांत व मागील वर्गांतील स्वैरव्यालांत फारच साम्य आहे. छत्राच्या कडेला पुष्कळ सीमान्त दशा असतात; तसेंच छत्राच्या वाटोळया कडेला आठ ठिकाणीं खांचा असतात व त्यांत वल्ह्यांसारखे दोन प्रसर असतात. या प्राण्याला फार आंखूड शुंडादंड नसल्यामुळें अधरतलाच्या मध्यभागीं याचें चौकोनी मुख असतें व त्याच्या बाजूंनां चार मुखप्रसर अशतात. हे मुखप्रसर केवडयाच्या पानांसारखे मिटलेले असून त्यांच्याकडेवर त्यांच्यासारखेच बारीक दांते असतात व त्यांच्या पृष्ठभागांवर पुष्कळ दंशकोश असतात.

पचननलिकेला मुखापासून सुरुवात होते व पहिल्या आंखुड ऊर्ध्वभागाला गलविवर व अन्ननलिका म्हणतात. गलविवर छत्रांत शिरलें म्हणजे अन्ननलिका मोठी ऐसपैस होते व या भागाला जठर म्हणतात. या जठराच्या चार बाजूंनां चार पिशव्या असतात व त्यांनां उपजठरें म्हणतात. जठर व त्याचीं उपजठरें मिळून छत्राची बरीच जागा व्यापतात. उपजठरांनां बाहेरच्या बाजूने बारीक बारीक नळया फुटलेल्या असतात व त्या नळया छत्राच्या कडेपर्यंत गेल्या म्हणजे तेथें एक त्या सर्वांनां जोडणारी वाटोळी व कडेला समान्तर अशी नळी असते. उपजठरांच्या कडेला अस्वनालासारख्या जननेंद्रियांच्या आंतल्या बाजूस बारीक जठरप्रसरांची रांग असते व या प्रसरांवर दंशकोश पुष्कळ असतात. अशा तर्‍हेचा या प्राण्याचा पचनेंद्रियव्यूह आहे. वरील दंशकोशाचा उपयोग भक्ष्यस्थानीं पडलेल्या जिवंत प्राण्यांनां ठार मारण्याकडे अथवा अचेतन करण्याकडे होतो.

या प्राण्याचीं चेतनेंद्रियें आठ असून त्यापैकीं एकेक छत्राच्या कडेला असलेल्या प्रत्येक खांचींत असतें. प्रत्येकाचा आकार बोटासारखा असून टोंकाला एक रंगित ठिपका असतो; व आंतल्या पोकळींत बारीक बारीक कर्करमय कण असतात. रंगीत ठिपक्याला चित्रभानु व या प्रत्येक इंद्रियाला चेतनांगुली म्हणतात. ह्या चेतनांगुली सीमान्तप्रसरामुळें व त्यांनां जोडणार्‍या फणेमुळें दिसत नाहींत.

उपजठरांच्या कडेला आंतल्या बाजूनें झालरीसारखें इंद्रिय असतें. त्याच्यापासून स्त्रीव्यक्तींत अंडी व पुरुषव्यक्तींत शुक्र हीं तयार होतात. अंडपेशीचें रुपांतर गर्भांत झालें म्हणजे अनेक द्विधाकरणांनीं गर्भापासून पुष्कळ पेशी तयार होतात आणि गर्भ बुंदीच्या लाडवासारखा दिसतो. नंतर गर्भांत एक पोकळी तयार होते आणि त्या पोकळीसभोंवतीं एकेर्‍या पेशींचा थर तयार होतो. एखाद्या पोकळ रबरी चेंडूला एका बाजूनें दाबून त्याची गोलार्धासारखी वाटी तयार करितां येतें त्याप्रमाणें या रिक्तमध्यगर्भापासून एक दुपदरी एकमुखी गोल तयार होतो. या दुपदरी गोलांत ही जी नवीन पोकळी तयार होते तिला आद्यांत्रगुहा म्हणतात. या गोलांतील पेशींच्या बाहेरील थराला बाह्यत्वचा व आंतल्या थराला अंतस्त्वचा म्हणतात. बाह्य त्वचेंतील पेशींनां कशा फुटून हा दुपदरी सकलव्यालगर्भ पाण्यांत पोहतो. नंतर कशा नाहींशा होऊन हा व्यालगर्भ एखाद्या जागीं एका टोंकानें चिकटतो. या लांबट प्राण्याच्या दुसर्‍या टोंकाला बाहेरुन चेपल्याप्रमाणें एक खळगा पडतो. अर्थात् या खळग्याच्या आंतल्या बाजूच्या पेशी बाह्यत्वचेंतील असतात. नंतर हा खळगा व आद्यांत्रगुहा यांमधील विभाजक पुट नाहींसें होऊन या प्राण्याची शरीरांत्रगुहा तयार होते. हा जो बाहेरुन नवीन खळगा पडला त्याला मुखक्रोड म्हणतात. तोंडाच्या दोन बाजूंनां दोन शाखा फुटतात व आणखी दोन शाखा फुटून तोंडाच्या चार बाजूंनां चार शाखा होतात. अशा रीतीनें मधल्या जागेंत नवीन नवीन शाखा उत्पन्न होऊन त्यांची संख्या सोळा होते. या सुमारास मुखाकडील भाग वाढतो व चिकटलेला भाग फारसा वाढत नाहीं. अशा तर्‍हेनें हा प्राणी स्थूलमानानें जलव्यालासारखा दिसतो. नंतर अनुविस्तर अथवा आडव्या खांचा पडून या प्राण्याच्या वाटोळया चकत्या पडतात व त्या प्रत्येकीपासून वर वर्णन केलेला एकेक आरेलिया प्राणी तयार होतो.

सांद्रमत्स्यवर्गांत याच्यासारखे पुष्कळ जातींचे प्राणी आहेत. त्यांच्यांतील मुख्य फरक त्यांच्या छत्रांच्या आकारांत व चेतनांगुलींच्या संख्येंत. असतो. कांहींचीं छत्रें घुमटासारखीं किंवा घनाकार असतात व कांहीं छत्रांवर निरनिराळया खांचा असतात. कांहीं सांद्रमत्स्यांनां चेतनांगुली मुळींच नसतात व कांहींनां चारपासून सोळापर्यंत असतात. हे प्राणी मांसाहारी असून समुद्रांतील इतर लहानमोठया प्राण्यांनां सबंधच्या सबंध पोटांत ढकलून त्यांच्यावर उपजीविका करतात. यांच्या या स्थूल देहांत घनपदार्थ फार थोडा असतो. हे प्राणी लवकर कुजून नाहींसे होतात. पूर्वकालीन सांद्रमत्स्यांचे अश्मीभूत अवशेष क्वचितच आढळतात.

समुद्रपुष्पवर्ग- समुद्रकिनार ओहोटीच्या वेळीं सुक्या पडलेल्या वाळूंत, खडकांत किंवा अशा ठिकाणच्या डबक्यांत कोणत्याना कोणत्या तरी वस्तूला चिकटलेले समुद्रपुष्प नांवाचे प्राणी बर्‍याच वेळां आढळतात. अशा वेळीं हे प्राणी वाळूंत लपण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांचा शोभिवंत रंगीबेरंगीपणा फारसा दिसत नाहीं. यांपैकीं कांहीं प्राणी दोन तीन इंच व्यासाचे व तितक्याच उंचीचे असतात. यांच्या वरच्या सपाट बाजूच्यामध्यें यांचें लांबट तोंड असतें व इतर ठिकाणीं पुष्कळ आंखुड शाखारुपी बाहू असतात. या प्राण्याचें शरीरपुट जाड असून आंतल्या शारीरांत्रगुहेचे कप्पे पडलेले असतात. तोंडापासून दोनहि बाजूंनां उघडी असलेल्या पिशवीसारखा याचा अन्नमार्ग (अथवा अन्ननलिका) शारीरांत्रपोकळींत लोंबत असतो. शरीरपुटापासून निघालेले कांहीं ऊर्ध्व पडदे अन्नमार्गाला मिळतात; परंतु अन्नमार्ग गुहेच्या तळापर्यंत पोंचत नसल्यामुळें शारीरांत्रगुहेचे हे कप्पे आंतल्या बाजूनें उघडे असतात. कांहीं विभाजक पडदे वरच्या भागांतहि अन्नमार्गाला पोंचत नाहींत. या विभाजक पडद्यांच्या आंतल्या कडेला बारीक व लांब तंतू फुटलेले असतात व ते तोंडांतून किंवा शरीरांतील छिद्रांतून बाहेर काढतां येतात.

आकारमानानें याचें शरीरपुट जाड असतें व त्यांत तीन थर असतात. बाह्यत्वचेंतील पेशी व दंशकोश लांब असतात. तसेंच अंतस्त्वचेंतील पेशी लांब व पक्ष्मल असतात. मधला थर अथवा सांद्रमध्य फार जाड असून त्यांत स्नायुतंतूहि असतात. विभाजक पडद्यांवर व बाहूंवर दंशकोश फार असतात. विभाजक पडद्यांत आडव्या, उभ्या व तिर्कस स्नायुपेशी असतात, व त्यांच्या आकुंचनानें सर्व शरीराचा आकार थोडा बदलतां येतो व बाहू आंत ओढून घेतां येतात. शरीराच्या बाह्यत्वचेंत एक ज्ञानतंतूंचा थर असतो व त्यांत मोठया ज्ञानपेशी सांपडतात. बाहू व परिमुखपटलांत ज्ञानपेशी पुष्कळच आढळतात.

ह्या प्राण्यांत स्त्री व पुरुष हा भेद असून अंडाशय व मुष्क विभाजक पडद्यावर लागलेले असतात. शुक्रबीज तयार झालें म्हणजे तें मुखद्वारांतून बाहेर पडून पाण्याबरोबर स्त्री व्यक्तीच्या शारीरांत्रगुहेंत शिरून व अंडयांशीं त्यांचा संयोग होऊन गर्भधारणा होते. नंतर गर्भापासून अनेक द्विधाकरणांनीं एकपदरी रिक्तमध्यव्यालगर्भ व यापासून पक्ष्मलव्यालगर्भ तयार होतो. हा पक्ष्मलव्यालगर्भ जननीच्या शरीराबाहेर पडून व कांहीं वेळ पाण्यांत पोहून एखाद्या ठिकाणीं चिकटून राहतो. नंतर त्याचें मुख तयार होतें; व पुढें बाहू फुटून व इतर फरकहोऊन या स्वैर डिंभाचें रुपांतर समुद्रपुष्पांत होतें.

या वर्गांत समुद्रपुष्पांशिवाय प्रवालजंतूंचाहि समावेश होतो. प्रवालजंतूंचें प्रवाल कीटक हें नांव रुढ झालेलें आहे; परंतु वरील सामासिक शब्दातील कीटक शब्द या जंतूंपेक्षां फारच उत्क्रांत व सर्व बाजूंनीं मर्यादित अशा एक प्राणिवर्गालाहि लावण्याचा प्रघात असल्यामुळें तो शब्द अशा तर्‍हेनें व्यर्थी वापरणें इष्ट नाहीं. या वर्गंतील प्राण्यांत स्वैरव्याल नसतात व अन्नमार्ग हें एक या वर्गाचें विशिष्ट लक्षण आहे. या वर्गांतील इतर प्राण्यांची अंकुरोत्पत्तीनें वाढ होऊन त्यांच्यापासून निरनिराळया आकाराचे व मोठमोठे प्राणिवृंद तयार होतात. या प्राणिवृंदांनां टणकपणा येण्यासाठीं खोडापासून व प्रत्येक विकलप्राण्यापासून निरनिराळया द्रव्यांचा सांगाडा तयार होतो. कांहीं एकाकी प्राणी आपल्याभोंवतीं दंशकोशाचें आवरण तयार करतात. तसेंच कांहींच्या शरीरासभोंवतीं कर्करमय पेला तयार होतो व शारीरांत्रगुहेंतील विभाजक पडद्याप्रमणें त्या पेल्याच्या आंतल्या बाजूला पडदे असतात. कांहीं प्राणिवृंदांच्या सांद्रमध्यांत शांर्गीय किंवा कर्करमय कंटक तयार होतात व ते एकमेकांत गुंतून सांगाडा तयार होतो. बाजारांत मिळणार्‍या तांबुस पोंवळयांचा सांगाडा तयार होतांनां कंटकांमध्यें कर्करमय पूरण पडतें व या प्राणिद्रुमातचा सांगाडा कठिण व टणक विस्तारयुक्त होतो. कांहीं प्राणिवृंदांत सांगाडा बाह्य त्वचेकडून तयार होतो. हे सांगाडे निरनिराळया आकाराचे असतात. कांहीं सांगाडे सनईच्या आकाराचे असतात; कांहीं पंख्यासारखे, किंवा टांकासारखे किंवा झुडुपासारखे दिसतात. त्यांचे रंगहि तांबडे, काळे, जांभळे वगैरे निरनिराळे असतात. तसेंच जीवंतपणीं या प्राण्याचे रंगहि निरनिराळे शोभिवंत असतात. कांहीं सांगाडे खडूचे असतात व ते दगडाप्रमाणें दिसतात. परंतु त्यांनां छिद्रें सर्व ठिकाणीं बारीक बारीक असतात.

तांबडया पोंवळयाचे प्राणी भूमध्यसमुद्राच्या तळाशीं दहापासून तीस पुरुष खोल पाण्यांत आढळतात. बहुतेक जाती पृथ्वीच्या बहुतेक भागांत समुद्रकिनार्‍यावर आढळतात. यांच्या अगणित वाढीची व त्यांच्यापासून होणार्‍या अजस्त्र खडकांची कल्पना येण्याकरितां एवढेंच सांगितलें म्हणजे बस्स आहे कीं, पॅसिफिक महासागरांत कित्येक बेटें यांच्याच सांगाडयाचीं झालीं आहेत.

या वर्गांतील कांहीं प्राणी दुसर्‍याचे भोजनभाऊ बनून ते मुख्यतः आपलें व कांहीं अंशीं आपल्या आश्रयदात्याचेंहि कल्याण करतात. कांहीं बारीक बारीक जलचर प्राणी कांहीं प्रवालजंतूंच्या शरीरपोकळींत आपलें कायमचें वसतिस्थान करतात.

या संघांत कंकतिकगात्रजंतूंचाहि समावेश होतो. या वर्गांत प्राणिवृंद नसतात व एकाकी प्राणी समुद्राच्या पृष्ठभागावर आढळतात. या वर्गांतील एका जातीचे प्राणी भोंवर्‍यासारखे असून बोराएवढे मोठे असतात. त्यांच्या निमुळत्या टोंकाला त्यांचें तोंड असतें. उलट बाजू वाटोळी असते व मध्यभागीं त्याचें ज्ञानेंद्रिय असतें. या प्राण्यानां दोनच शाखा असतात व त्यांनां बारीक प्रसर फुटलेले असतात. या शाखांचा उगम पृष्ठभागावरील दोन खळग्यांत होतो व त्या खळग्यांत यांनां ओढून घेतां येतें. पश्चिमभागावर कंकतिकगात्रांच्या आठ उभ्या रांगा असतात. यांच्या हालचालीनें हा प्राणी पाण्यांत पोहतो. हीं गात्रें फणीसारखी असून याच्या एका बाजूला फणीच्या दांत्यांसारखे प्रसर असतात व दुसर्‍या बाजूनें तीं शरीराला चिकटलेलीं असतात.

या वर्गांतहि असेच निरनिराळया दिशेनें संकीर्णता झाली आहे. एका बाजूनें जलव्यालप्राण्याची वनस्पतींप्रमाणें वाढ होऊन प्राणिद्रुम तयार होतात, व दुसर्‍या बाजूनें जलव्यालाच्या छत्राची खूप वाढ होऊन त्याच्या बाहुशाखा वाढून व शारीरांत्रगुहेचे निरनिराळे कर्मसापेक्ष भाग पडून निरनिराळे रंगीबेरंगी दर्शनीय प्राणी तयार होतात.

सच्छिद्र प्राणी व या संघांतील प्राणी स्थूल मानानें सारखेच दिसतात. परंतु या दोन संघांतील प्राण्यांत पुष्कळ बाबतींत फरक आहे. उदाहरणार्थ स्पंजाच्या शरीरपुटाला पुष्कळ छिद्रें अथवा छिद्रनलिका असून त्यांचा उपयोग जलप्रवाह चालूं ठेवण्यांत होतो. स्पंजाचें मुख व समुद्रपुष्पाचें मुखद्वार हीं जरी सारखीं दिसलीं तरी त्यांच्या उत्पत्तींत पुष्कळ फरक आहे. यावरून या प्राण्यांचे हे दोन संघ करण्यांतील हेतु लक्षांत येईल. (लेखक. व्ही.एम्. अत्रे)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .