प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शाहू थोरला- हा संभाजी वन येसूबाई यांचा पुत्र. जन्म १६८० चा दिसेंबर; मूळ नांव शिवाजी, स्वतःच्या मुद्रेंतहि हा आपणाला शिवाजींच म्हणवितो; औरंगजेबानें शाहू नांव ठेविलें अशी दंतकथा आहे. रायगड औरंगजेबाच्या हातीं लागला (१६९०) तेव्हां त्यांत शाहू व येसूबाई हीं त्याच्या ताब्यांत आलीं. यापुढें १७ वर्षें शाहूला मुसुलमानांच्या नजरकैदेंत रहावें लागलें. औरंगजेबानें शाहूला जिवंत टेवलें तें मराठयांत दुफळी पाडण्यासाठींच ठेवलें आणि तसा प्रयत्न त्यानें स्वतःच्या शेंवटच्या काळांत केलाहि. औरंगजेबाच्या एका मुलीनें शाहू व येसूबाई यांची अखेरपर्यंत उत्तम बरदास्त ठेविली होती. उद्धव योगदेव राजाज्ञा, जेत्याजी केसरकर यांनीं शाहूस लहानपणीं शिक्षण दिलें. राजारामानें त्याच्या सुटकेचा प्रयत्न दोन तीनदां केला पण तो निष्फळ झाला. जनान्यांत कोंडल्यामुळें शाहूचा स्वभाव थंड, शांत, आरामप्रिय, मुसुलमानी पातशाहीविषयीं थोडासा आदर धरणारा असा बनला. बादशाहीचा प्रत्यक्ष पाडाव करण्यास तो अनुकूल नसल्यानें असले आलेले एक दोन प्रसंग पेशव्यांनां सोडून द्यावें लागले. मात्र राजकारणाचें शिक्षण त्याला बरेंच मिळालें.

शाहूचें लग्न औरंगजेबानें १६९९ च्या सुमारास थाटानें करविलें व ५ परगणे जहागीर दिले. या वेळच्या त्याच्या दोन बायका अंबिकाबाई व सावित्रीबाई या होत; या प्रसंगींच विरुबाई नांवाची दासी शाहूस मिळाली. तिच्यावर त्याचा अखेरपर्यंत लोभ होता. औरंगजेब मेल्यावर अजीमशहा उत्तरेकडे जात असतां, त्याच्याकडून शाहू होता. तेव्हां मराठयांत भेद पडावा व आपल्या पिच्छावर असलेले मराठे मागें रहावेत यासाठीं, आपला अंकित असें शाहूकडून कबूल करवून, अजीमशहानें त्याला सोडलें (एप्रिल १७०७), प्रसंगवेळ जाणून शाहूनें ही अट कबूल केली. या वेळीं शिवाजीचा स्वराज्य म्हणून ठरविलेला प्रांत व गुजराथ, कर्नाटक, गोंडवण वगैरे थोडासा जास्त मुलूखहि त्यानें मिळविला. मार्गांत येतांनां हळू हळू त्यानें फौज वाढविली. शिवाजीबद्दल आदर असल्यानं त्याला सर्व लोकांनीं हरप्रकारें मदत केली. इकडे पूर्वीच ताराबाईनें आपल्या मुलाची मुंज करून व शाहूचा हक्क बुडवून धाकटया शिवाजीला गादीवर बसविलें होतें. प्रथम शाहू हा तोतया आहे, असें तिनें उठविलें. व मग त्याच्यावर परशुरामपंत प्रतिनिधि व धनाजी जाधव यांस बर्‍याच सैन्यानिशीं धाडलें. भीमथडींतील खेडकडूस येथें धनाजीची व शाहूची गांठ पडली. परंतु शाहू हा तोतया नाहीं अशी खात्री झाल्यावर धनाजी शाहूस एकदम मिळाला. प्रतिनिधीनें लढाई केली पण त्याचा मोड झाला. खेडहून निघून एकामागून एक किलले घेत शाहूनें सातार्‍याचा किल्ला अखेरीस घेतला व पुढें थोडयाच महिन्यांनीं स्वतःस राज्याभिषेक करविला (१७०८ जानेवारी). या वेळीं (१७०७-१०) शाहूची सत्ता सातारा किल्ल्याभोंवतीं ५०२५ मैलांपलीकडे नव्हती. दोन्ही राण्या दिल्लीस ओलीस राहिल्यानें शाहूनें या सुमारास आणखीं दोन लग्नें केलीं. या नवीन राण्यांचीं नांवें सगुणाबाई व सकवारबाई होतीं.

धनाजी जाधव डोईजड झाल्यानें शाहूनें बाळाजी विश्वनाथास हाताशीं धरलें. शाहूला खेड येथें मिळणार्‍या मंडळींत बाळाजी असून शाहूला गादीवर बसविण्यांतहि त्याचें अंग बरेंच होतें. त्यामुळें संधि येतांच शाहूनें त्याला पेशवाई दिली. पुढें शंकराजी मल्हार यानें बादशहा व शाहु यांच्यामध्यें एक तह घडवून आणला. त्यामुळें शिवाजीचा स्वराज्याचा प्रांत, खेरीज खानदेश, गोंडवण, वर्‍हाड, हैद्राबाद, कर्नाटक हे प्रांतहि शाहूस मिळाले आणि मोंगलांईत (दक्षिणेंतील) सरदेशमुखी व चौथाई मिळूं लागली. या तहानें शाहूचें वजन महाराष्ट्रांत वाढलें. बाळाजीनें मराठयाचें लक्ष घरगुती भांडणांतून काढून या तहामुळें मुलखगिरीकडे वळविलें. त्यास शाहूचीहि संमति होती. चौथाईच्या निमित्तानें स्वराज्याचा विस्तार होऊं लागला. बाळाजी विश्वनाथाच्या पश्चात जुने सरदार व प्रधान हे दुर्बळ ठरल्यानें शाहूनें बाजीरावालाच हातीं धरलें. कोल्हापूचा संभाजी आपला वैरी आहे असें ओळखून त्यावर प्रत्यक्ष चढाई केली. तीत संभाजीचा मोड होऊन तो शाहूस शरण आला व वारणेचा तह होऊन स्वराज्यांतील एक मोठीशी जहागिरी संभाजीस तोडून दिली (१७३१). शाहूनें ब्रह्मोंद्रस्वामीच्या सांगण्यावरून पेशव्यांकडून जंजिर्‍याच्या शिद्दीवर मोहीम करवून त्याचा मोड केला व त्या भागांतील हिंदूंनां निर्भय केलें.

नानासाहेब पेशव्यावरहि शाहूचा लोभ नानाच्या लहानपणापासून बसला होता. रघूजीनें पेशवाई नानास न देतां बाबाजू बारामतीकरास देण्याचा आग्रह शाहूस चालविला, पण त्यानें तो मोडून नानासच पेशवाई दिली. उत्तरेकडे राज्यविस्तार करण्याची सल्ला त्यानेंच नानास दिली. परंतु शाहू जिवंत असेपर्यंत नानास स्वतंत्र मसलती पार पाडतां आल्या नाहींत. मात्र शाहूनें पेशवे-भोंसले यांचें सख्य करुन दिलें. त्यामुळें त्यांच्या मुलुखगिर्‍यांनीं शाहूच्या ऐश्वर्याचा कळस होऊन मराठयांचा वचक सर्वत्र बसविला. शाहूची करकीर्द पहिल्या तीन पेशव्यांच्या कारकीर्दीशीं समकालीन असल्यानें तींतील महत्वाच्या गोष्टी त्या त्या पेशव्यांच्या चरित्रांतून आढळतील. शाहूच्या कारकीर्दीत मराठी साम्राज्याची कशी वाढ झाली, त्याच्या आळशीपणाचा राज्यावर कसा परिणाम झाला वगैरे संबंधीचें विवेचन ज्ञानकोशाच्या ४ थ्या विभागांत 'हिंदूंची उचल' या प्रकरणांत (प. ४३६-४४०) केलेंच आहे. यासाठीं पुन्हां द्विरुक्ति टाळली आहे. वृद्धपणीं शाहू पेशव्यांवर जास्त अवलंबून राहूं लागला. त्याच्या दोन राण्यांत नेहमीं भांडणें होत त्यामुळें तो फार त्रासला होता. शिवाय पुत्र नसल्यानें तो उदासीन राही. ताराबाईनेंहि आपल्या खटपटी चालविल्या; त्यांत भर म्हणून विरुबाईहि वारली, व बरेच कर्ते पुरुषहि वारले. थोरल्या राणीनें रघूजीस दत्तक घेण्याचा शाहूस तगादा लावला; पेशव्यांच्या विरुद्ध पक्षानें त्याच्याबद्दल फार कागाळया केल्या, इत्यादि कारणांनीं शाहू फारच त्रासला. तेव्हां पेशव्याची परीक्षा घेण्यासाठीं कांहीं दिवस त्यानें नानास पेशवाईवरून काढलें परंतु विरुद्ध पक्षांत पेशवाई चालविण्याची धमक कोणांतच नसल्यानें अखेरीस पु्हां नानासच 'खरे एकनिष्ठ सेवक' म्हणून पेशवाई दिली. याच वेळीं पेशव्यानें शाहूचें सर्व कर्च वारलें. यापुढें दत्तकाबद्दल अनेक व्यक्तींनीं अनेक खटपटी केल्या त्या सर्व एकीकडे ठेवून शाहूनें आपल्या हातचा लेख करुन देऊन पेशव्यास मराठी राज्याचा सर्वाधिकार दिला व रामराजास आपल्यामागें गादीवर बसविण्यास सांगितलें. त्यानंतर थोडयाच दिवसांनं शाहुनगर (सातारा) येथें रंगमहाल राजवाडयांत शाहू छत्रपतीचा अंत झाला (ता. १५-१२-१७४९). त्याची अंत्यक्रिया संगममाहुलीस झाली. तेथें त्याची समाधि आहे. त्याची थोरली राणी त्याच्याबरोबर सती गेली. (शाहूमहाराज चरित्र; शाहूची रोजनिशी; नानासाहेब पेशवे यांची रोजनिशी; म.सा.छो. बखर; डफ; म.रियासत. म विभाग १-२.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .