विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिगात्झे- हें तिबेटांतील ल्हासाच्या खालोखाल महत्वाचें शहर आहे. 'ताशी लुंपो' नांवाचें एक प्रचंड देऊळ येथील डोंगरावर आहे. या देवळांत ३३०० भिक्षू आहेत. कधीं कधीं या भिक्षूंची संख्या ५००० पर्यंत होते.
येथील लामाचा मान दलाई लामाच्या खालोखाल आहे. याच्या हातीं कांहीं सत्ता नाहीं, तथापि चीनच्या बादशहाकडून यास दलाई लामापेक्षांहि अधिक थोर पदवी आहे. कधीं कधीं एक दलाई लामा जाऊन दुसरा दलाईलामा येईपर्यंत याच्या हातीं अधिकार येतो.