प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शिंपी- या जातींत भावसार (बाहुसार), नामदेवशिंपी, वैष्णवशिंपी, नामदेव क्षत्रिय वगैरे जातींचा अंतर्भाव होतो. यांतील निवारीनामदेव, कोंकणस्थनामदेव नामदेवशिंपी हे वर्ग नामदेवशिंपी या वर्गांत एक होऊं पहात आहेत; पण भावसार (बाहुसार) व नामदेवशिंपी हे आपणांला एकशाखीय म्हणण्याला व एकाच नांवाखालीं आपला अंतर्भाव करुन घेण्याला अद्याप तयार नाहींत. या समाजाच्या उत्पत्तीसंबंधानें अनेक दंतकथा उपलब्ध आहेत. तसेंच स्कंदपुराण, हरिवंश वगैरे पुराणग्रंथांतूनहि उल्लेख आहेत. त्यांवरूनहा समाज क्षत्रिय कुलोत्पन्न असल्याचें दिसतें; व आज सर्व शिंपीसमाज आपणाला क्षत्रियवर्णाचा समजतो व समाजाच्या शिंपी या रुढ नांवावरून समाजाचा मुख्य धंदा कापडाची व्यापार व शिवणकाम हा समजला जातो. तथापि या समाजांत पूर्वकालीं रंगाचीं वगैरेहि कामें करणारीं कित्येक कुटुंबें होतीं, अशी माहिती मिळते. त्यावरून तोहि धंदा त्या समाजांत होता असें दिसतें. शिवाय हिंदु रंगार्‍यांचा समावेश शिंपी जातींतच करण्यांत येतो. नामदेवशिंपी, कोंकणस्थ, नामदेवशिंपी, निळारी नामदेवशिंपी, क्षत्रियनामदेवशिंपी, नामदेवजांगडाठाकूरशिंपी, वैष्णवनामदेवशिंपी, बाहुसार व भावसार क्षत्रिय या सर्व शाखा पूर्वी केव्हांतरी एक असाव्यात आणि देश, काल, स्थपरत्वें चालीरीतींत फेरबदल झाल्याच्या योगानें मतभेद वाढून त्यांच्यांत तट पडले सावेत व ते तट दीर्घकाल टिकल्यानें प्रत्येक वर्ग स्वतंत्र नांवाचा स्वीकार करून परस्परांपासून तुटकपणें वागूं लागला असें. अनुमान काढण्यांत येतें. बर्‍याच प्राचीन काळीं या शिंपीसमाजास कोणत्या नांवानें संबोधिलें जात होतें हें समजण्यास कांहीं साधार मार्ग नाहीं. नामदेवांनीं आपल्या जन्मवृत्ताच्या अभंगांत ''शिंपीयाचे कुळीं जन्म माझा झाला''; ''कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा'' व आणखीं इतरहि कित्येक अभंगांतून शिंपीं ज्ञातींत जन्म असल्याचें स्पष्ट लिहिलें आहे. त्यावरून एवढें सिद्ध होतें कीं, नामदेवकाळीं या समाजास शिंपी हें नांव होतें. नामदेवानंतर त्यांच्या अनुयायी मंडळींनीं आपल्या ज्ञातिनांवामागें नामदेव हें उपपद जोडलें असावें. देश व भाषापरत्वें नामसादृस्य असलेलीं छिपी, छिबा, शिंपी, चाटी वगैरे नांवें ज्या ज्या प्रांतांत रुढ आहेत ते ते सर्व एकच समजण्यास हरकत नाहीं; मात्र अहीर, शिंपी वगैरे आणि उत्तर हिंदुस्थानांतील रामवंशी, नामोंशी वगैरे म्हणवून घेणारे व कित्येक शीखपंथी लोक नामदेवपंथी अथवा नामदेवानुयायी दरजी वगैरे म्हणवून घेतात ते व हे शिंपी एकच कीं काय याबद्दल खात्रीलायक माहिती नाहीं. आतां शिंप्यांतील भावसार व नामदेवशिंपी या दोन वर्गांसंबंधीं कांहीं विवेचन करूं.

भावसार- भावसार कीं बाहुसार याबद्दल या समाजांत मोठा वाद माजून राहिला आहे. या वादास प्रारंभ १९११ सालीं धारवाड येथें भरलेल्या पहिल्या भावसार क्षत्रिय परिषदेपासून झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. ''भावसार'' या शब्दाला कांहीं अर्थ नाहीं म्हणून ''बाहुसार'' हें नांव योजण्याचा कांहीं व्यक्तींनीं प्रयत्न केला व त्याबद्दल शिवगंगामठाच्या शंकराचार्यांकडून पुष्टि मिळविली. पण भावसार हें नांव बहुतेकांनां मान्य दिसतें. भावसार हें नांव रंगारी या अर्थी आहे. भाव नांवाची एक प्रकारची रंग तयार करण्यास उपयोगी पडणारी वनस्पति आहे. गुजराथेंत भावसार हे रंगारीच आहेत. बाहुसार म्हणविणारे लोक बहुधा सोलापुराकडचे आहेत. हा भावसार समाज प्रथम केवळ शक्ति-उपासक होता. पुढें या समाजांत नामदेवांचा जन्म झाल्यावर त्यांच्या अनुयायांनीं भक्तिपंथाची कांस धरिली वते नामदेवशिंपी म्हणून प्रसिद्धीस आले. राहिलेली मंडळी जी पूर्वीप्रमाणेंच हिंगळा देवीची उपासना करीत ती वरील नामदेवशिंप्यापासून अलग राहूं लागली; तेव्हां साहजिकच दोन भेद झाले. पुन्हां नामदेवशिंप्यांत कोंकणस्थ, नाशिककर, निळारी म्हणून आणखी भेद पडले. तेव्हां या सर्व भिन्न वर्गांत नांवाखेरीज इतर बाबतींत फारसा भेद नाहीं. म्हणून हे सर्व वर्ग एकवटण्याचा कांहीं प्रयत्न सध्यां सुरु आहे. पण या एकवटल्या जाणार्‍या समाजास काय नांव द्यावयाचें याबद्दल एकमत नाहीं. भावसार म्हणतात कीं, नामदेवमहाराज आमच्यांतून निघाले तेव्हां मूळ जातींचें नांव सर्व समाजास द्यावें. नामदेव सिंपी याला कबूल नाहींत. या दोन प्रमुख वर्गांत आज रोटीबेटीव्यवहार बंद आहे. यापुढें नामदेवशिंप्यांसंबंधानें जी माहिती दिली आहे तीच सामान्यतः व्यवहार व चालीरीति या बाबतींत भावसारादि इतर शिंपी समाजास लागू पडते.

नामदेव शिंपी- नामदेवशिंपी या नांवानें संबोधला जाणारा समाज सर्व दक्षिण हिंदुस्थानांत पसरला आहे. पुणें, सातारा, नाशिक, अहमदनगर, धारवाड, बळेगांव, ठाणें, मुंबई शहर, कुलाबा, रत्नागिरी, विजापूर व कारवार ह्या सर्व जिल्ह्यांतून आणि कर्नाटक वगैरे प्रांतांतून कमी जास्त प्रमाणानें ह्या समाजाची वस्ती आहे. ह्यांखेरीज देशी संस्थानांतून (कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, फलटण, भोर, इंदूर, बडोदा, जत, म्हैसूरप्रांत वगैरे) देखील बरीच वस्ती आहे. तसेंच महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतांतून आणि वर्‍हाड, खानदेश वगैरे भागांतहि कोठें कोठें ह्या समाजाची तुरळक वस्ती आहे. महाराष्ट्र आणि देशी संस्थानें या सर्व ठिकाणची मिळून सुमारें सत्तर ते ऐशीं हजारांपर्यंत लोकसंख्या असावी असें अनुमान आहे. नामदेवशिंपी म्हणविणारांशिवाय कोंकणस्थ नामदेव, निळारी नामदेव, वैष्णव शिंपी, बाहुसार शिंपी (क्षत्रिय), औरंगाबादकर शिंपी आणि अहिर शिंपी वगैरे आणखी निरनिराळया पोटशाखा आहेत. त्यांची लोकसंख्या वरील खेरीज निराळी आहे. या सर्व पोटजाती (शाखा) पूर्वी एकच होत्या कीं, मूळच्याच त्या भिन्न आहेत याबद्दल खात्रीलायक माहिती मिळविण्याचा फारसा जोराचा प्रयत्नहि झालेला नाहीं. मात्र यांपैकीं निळारी नामदेवशिंपी या समाजांतील कांहीं गृहस्थांनीं (नामदेव समाजोन्नति परिषदेच्या द्वारें) कांही वर्षांपूर्वी चळवळ करुन परिषदेमार्फत एक निर्णायक कमिटी नेमून घेतली. या कमिटीचें काम ४।५ वर्षें चालून तिनें कागदोंपत्रीं कांहीं पुरावा गोळा करुन त्यावरून निळारी नामदेव हे आपल्या (नामदेव शिंपी समाजा) पैकींच आहेत असा निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार मुंबई इथें नामदेव समाजोन्नतिपरिषदेचें १२ वें अधिवेश भरलें होतें त्यांत एक तशा प्रकारचा ठरावहि झाला, परंतु परिषदेचे ठराव स्थानिक ज्ञातिनिर्बंध मोडण्यास बंधनकारक नसल्यामुळें कित्येक गांवचे लोक त्या ठरावाविरुद्ध आहेत व त्यामुळें ठराव होऊनहि हे दोन्ही समाज असून भिन्नच वागत आहेत.

या सर्वपोट शाखांत परस्परांत बेटीव्यवहार (शरीरसंबंध) मुळींच होत नाहींत. अन्नव्यवहार (एकाच पंक्तींत सहभोजन) कारणपरत्वें कोठें कोठें खासगी स्वरुपांत होतो. परंतु प्रसिद्धपणें ज्ञातिभोजन अगर लग्नकार्यें वगैरे बाबतींत मात्र पूर्ण बंदी असते. नामदेव शिंपी समाजांतील लोकांचीं आणि इतर शाखांतील लोकांचीं उपनामें, त्यांचे धंदे, साधारणतः त्यांची दिनचर्या आणि त्यांच्यांतील लग्नकार्यें व नित्यनैमित्तिक इतर कार्यें ह्यांमध्यें बर्‍याच गोष्टींत साम्य आहे. देशपरत्वें निरनिराळया प्रांतांत राहणार्‍या लोकांच्या कांहीं चालीरीतींत भिन्नपणा, किंवा दुसर्‍याचे पाहून उचललेले रीतिरिवाज आढळून येतात, परंतु मुख्य गोष्टींत फारसा फरक नाहीं.

नामदेवशिंपी समाजाचा मुख्य धंदा कापड विकणें, व शिवणें हा होय. क्वचित् लोक शेतकीचा व किराणा वगैरे वाणीपणाचा धंदा करणारे आहेत. अलीकडे वीस पंचवीस वर्षांत धंद्याचीं बंधनें थोडीं शिथिल झाल्यामुळें कांहीं लोक निरनिराळे धंदे करुं लागले आहेत. नोकर्‍या करण्याकडेहि कित्येक लोकांची प्रवृति दिसून येत आहे. सुमारें २००।३०० लोक सरकारी नोकरी करीत असावे असा अंदाज आहे. शिक्षणाच्या बाबतींत हा समाज बराच मागासलेला आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं, मात्र समाजाच्या मानानें निरक्षरतेचें प्रमाण ह्या समाजांत बरेंच कमी आढळतें. कांहीं विवक्षित उदाहरणें वगळल्यास एकंदर समाजाची अर्थिक स्थिति बरी नाहीं. व्यापार-धंद्यास मदत मिळून त्यांत सुधारणा घडून यावी व सांपत्तिक स्थिति सुधारावी या दृष्टीनें को-ऑपरेटिव्ह सोसायटया स्थापन करण्यांत आलेल्या आहेत. अशा पतपेढया आतांपावेतों सुमारें पंधरा स्थापन झाल्या. त्यांपैकीं पहिली पतपेढी सन १९१५ च्या मे महिन्यांत पुणें येथें सुरु करण्यांत आली. ही पेढी पुढें भरभराटीस येऊन हल्ली ती ''पूना नामदेव को-ऑपरेटिव्ह बँक'' या नांवानें संबोधिली जाते. यानंतर पुणें, मुंबई, लोणावळे, सातारा, अहमदनगर, हुबळी, इसलामपूर, फलटण, वांई, पेठ, येवलें वगैरे ठिकाणीं पतपेढया, स्टोअर्स, एजन्सी असा निरनिराळया संस्था काढल्या गेल्या. धंद्यामुळें वरिष्ठ मानलेल्या (पांढरपेशा) लोकांशीं यांचें दळणवळण विशेष असल्यामुळें या समाजांतील लोकांचा आचारविचार श्रेष्ठ प्रतीचा आहे या समाजांत भागवत धर्मानुयायी-वारकरी सांप्रदायी-माळकरी लोकांचा भरणा विशेष आहे.

या समाजांत मौंजीबंधन वगैरे विधी पूर्वकालीं असल्यास माहीत नाहीं; परंतु दोन तीन शतकांत हे विधी झाल्याचें आढळून येत नाहीं. अलीकडे कांहीं वर्षांपासून कोठें कोठें यज्ञोपत्रीताचा प्रवास सुरु झालेला आहे, व क्वचित् ठिकाणीं मौंजीबंधनविधि सुरु करण्याबद्दल वाटाघाट चालूं आहे. यांचा लग्नविधि सामान्यत: महाराष्ट्रांतील देशस्थ ब्राह्मणपद्धतीप्रमाणें होतो. परंतु पुराणोक्त विधीनें लग्नसोहळे होतात. त्यांत भिन्नप्रांतपरत्वें देशरिवाजाप्रमाणें कोठें कोठें किरकोळ चालीरीतींत फरक असतो, परंतु मुख्य विधी सारखेच असतात. शरीरसंबध जुळवितांना कोठें गोत्र पाहून तर कोठें उपनांवें पाहून जुळविण्यांत येतात. सगोत्र अथवा एका उपनांवाच्या घराण्यांत शरीरसंबध होत नाहींत. बहिणीच्या मुलास मुलगी देण्याचा सामान्यतः प्रघात आहे. कुलदैवतें प्रात्पराचें तुळजापूर भवानी, जेजुरी, पाली, निंबगांव येथील खंडोबा, कोल्हापूर भागांत जोतीबा, बेळगांव धारवाड भागांत यल्लंमा, भवानी अशीं दैवतें आहेत. शमी, अंबा, जांभूळ, वगैरे रुढीपरत्वें दैवकें मानतात. या समाजांत कांही घराण्यांत विधवा स्त्रिया व विधुरपुरुष यांचे पुनर्विवाह होतात; त्यास समाजाचा विरोध नाहीं. तसेंच अपरिहार्य कारणानें आपत्कालीं स्त्रिया नवर्‍यापासून सोडचिठ्ठया घेतात; परंतु त्यांस समाजाची सम्मति लागते. अशी सोडचिठ्ठी घेतलेल्या स्त्रियांचा पुनर्विवाह होऊ शकतो. परंतु समाजास ही चाल सर्रास मान्य नाहीं. (शिंपी समाजांतील बर्‍याच सदगृहस्थांकडून व संस्थांकडून ज्ञानकोशाकडे माहिती आलेली आहे; व तिचा सारांशरूपानें या लेखांत अतंर्भाव केला आहे. नामदेव समाजोन्नति परिषदेनें मुद्दाम एक कमिटी नेमून एकंदर शिंपीसमाजासंबंधानें निर्विकार बुद्धीनें आमच्याकडे जी माहिती पाठविली तिचा बहुतेक उपयोग या लेखांत केला आहे. शिवाय रा. हिरालाल गणपत भावसार (चाळीसगांवः, रा.बा.ना. कोपर्डे (मुंबई), भावसार क्षत्रिय कमिटी (मुंबई), वैष्णव शिंपी समाजोन्नति मंडळी (बर्‍हाणपूरः वगैरेंनीं पाठविलेली माहिती व रिपोर्ट हींहि आमच्या अवलोकनांत आलेलीं आहेतः

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .