विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिरपुर, तालुका गांव.- मुंबई, पश्चिम खानदेश जिल्हा. क्षेत्रफळ ५९७ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ५६७२३. यांत एक मोठें गांव (शिरपूर) व १०२ खेडीं आहेत. शिरपूर गांव हें धुळयाच्या उत्तरेस ३० मैलांवर सुमारें पांच हजार लोकवस्तीचें आहे. या गांवाचें १८७५ सालीं पुरानें फार नुकसान झालें. पूर्वी हें होळकराच्या ताब्यांत होतें. येथें म्युनिसिपालिटी आहे.