विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिरोंचा, तालुका- मध्यप्रांत, चांदा जिल्हा. तालुक्याचें क्षेत्रफळ ३६७५ चौरस मैल. अहिरी जमीनदारी याच तालुक्यांत आहे. लोकसंख्या. सुमारें पाऊण लाख असून पिकें भात, ज्वारी, हरभरा, गहूं, जवस, तीळ इत्यादि होतात. गोदावरी व प्राणहिता यांचा संगम शिरोंचा गांवापासून जवळच असल्यामुळें शिरोंचा गांव हिंदूंचें एक पवित्र क्षेत्र बनलें आहे. दर बारा वर्षांनीं एकदां सर्व हिंदुस्थानामधून येथें यात्रेकरु येतात. गांवाचा संस्थापक हैदरशहा वली याची कबर येथें आहे.