विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिवदीनबावा- एक मराठी कवि. केसरीनाथाचा शिष्य म्हणून यास शिवदिनकेसरी म्हणतात. हा पैठणचा राहणारा, जातीचा वाजसनेयी ब्राह्मण, आडनांव जोशी. जन्म शके १६२०. शके १६४४-४८ पर्यंत शिवदिनबाबानें हिंदुस्थानभर प्रवास केला. मृत्यु, शके १६९६त पैठण येथें. बाबांचा शिष्यसंप्रदाय फार मोठा असे. नरहरिनाथ हे यांचे पुत्र असून त्यांचीहि कविता उपलब्ध आहे.
ग्रंथ- विवेकदर्पण (१६९३), ज्ञानप्रदीप, व भक्तिरहस्य. शिवाय निरनिराळया देवांवरील बरींचप्रासादिक पदें आहेत.