विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिवाजी- (१६३०-१६८०) मराठा साम्राज्याचा संस्थापक. महाराष्ट्राला वंद्य अशा या थोर विभूतीचें चरित्र व त्याचा पार्श्वभाग 'बुद्धेत्तर जग' या विभागांत (ज्ञा.को.वि. ४, पृ ४२६-४३५) सविस्तर दिला आङे. त्याच ठिकाणीं शिव जन्मकालाचा थोडा उहापोह केलेला आढळेल. १६३०-३८ बालपण; १६३८-४६ स्वतंत्र राज्याची स्थापना; १६४६-५४ राज्याचा बंदोबस्त; १६५४-६२ विजापुरकरांशीं युद्ध, १६६२-७६ औरंगझेबाशीं युद्ध; व शेवटीं दक्षिण दिग्विजय असें शिवाजीच्या कारकीर्दीचें स्थूल मानानें सहा भाग पाडतां येतात. शिवाजीचें साम्राज्य केवढें मोटें होतें व त्याचा विसतार कसा होत गेला हें 'महाराष्ट्रीय ऊर्फ मराठी साम्राज्य' या लेखावरून (ज्ञा.को.वि. १९) समजेल. शिवाजीचा किंवा एकंदर मराठयांचा राज्यकारभार कसा होता, त्यांत गुणदोष कोणते होते यासंबंधीं विवेचन पुरवणीखंडांतील महाराष्ट्र विभागांत येईल. शारीर खंडांतील 'अठरा कारखाने' व प्रत्चेक कारखान्यावरील स्वंतत्र लेख, तसेंच 'अष्टप्रधान' व प्रत्येक प्रधानाच्या घराण्यासंबंधीं लेख यांवरूनहि शिवाजीच्या राजनीतिनैपुण्याविषयीं चांगली कल्पना होईल. मराठयांच्या इतिहासासंबंधीं बहुतेक लेखांतून शिवाजीच्या वेळची एथद्विषयक स्थिति वर्णन केलेली दिसेल; उदा. आबकारी, आरमार, जमीनमहसूल, इत्यादि. शिवाजीच्या समकालीन पुरुषांच्या चरित्रांतूनहि शिवाजीविषयीं बरीच माहिती होईल; उदा. औरंगजेब, तानाजी मालुसरे, जिजाबाई वगैरे.
(संद्रर्भ ग्रंथ - मराठी-सभासदाचें 'शिव छत्रपतीचें चरित्र' (रचनाकाल १६९४) ; साने संपादित चित्रगुप्ताची बखर (सुमारें १७६०); मल्हार रामराव चिटणीसकृत 'शिवछत्रपतीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र' (साने संपादित (१९२४); शिवदिग्विजय (नंदुरबारकर-दांडेकर संपादित); रायरीची बखर; शिवप्रताप; शेडगांवकर कृत श्रीमंत महाराज भोंसले यांची बखर (भावे संपादित); मोरे यांची छोटी बखर; महाबळेश्वरची जुनी माहिती; जेधे शकावली; दिवेकर संपादित शिवभारत; पर्णालवपर्णवत ग्रहणाख्यान; सनदा प पत्रें; मराटयांच्या इतिहासाचीं साधनें; पोवाडे (ऍकवर्थ-शाळिग्राम संपादित); सरदेसाई-मराठी रियासत, १; इतिहास संग्रह मासिक; आपटे व दिवेकर-शिवचरित्रप्रदीप; केळुसकर-छत्रपति शिवाजी महाराज; भारत-इतिहास संशोधक मंडळाचीं संमेलनवृत्तें व वार्षिक इतिवृत्तें.
हिंदी- भूषणाची ग्रंथावलि (श्यामबिहारी व सुखदेव बिहारी मिश्र यांनीं संपादिलेली, बनारस १९०७); लालकविकृत छत्रपरकाश (नागरी प्रचारिणी सभा). फारशी अबदुल हमीद लाहोरी-पादिशहानामा; कंबु-अमलइसलि; काझीम-अलमगीरनामा; मुस्तैदखान-मसिर-इ-अलमगिरि; खाफीखान-मंतखाब-उल्-लुबाब; भीमसेन बुऱ्हाणपुरी-नुस्खा-इ-दिलकष; ईश्वरदास नागर-फतु हात-इ-अलम-गिरि; अखबरत-इ-दरबार-इ-मौला; झहुर-महम्मद-नामा; सय्यद नुरुलज-तारिख-इ-अलिआदिल शहा (दुसरा); झुबैरी-बुसातिन-इ-सलातिन; तारिख-इ-शिवाजी; काबिल खान-आदब-इ-अलमगिरि; तळयार-हफ्त अंजुमान; अहकम-इ-अलमगिरि; रुख्त्-इृअलमगिरि; इत्यादि पोर्तुगीज-व्हिडा एक ऍकोएन्स डो फासोसो ए फेलि सिसिमो शिवाजी (लिसबन १७३०); डा ज्ञाु्च्हा रिव्हारा-अर्चिव्हो पोर्तुगीज ओरिएंटल. इंग्रजी - ओरिजनिल कॉरेस्पाँडन्स, फॅक्टरी रेकॉर्डस, सुरत लेटर्स, डच फॅक्टरी रेकॉर्डस (इंडिया ऑफिस हस्तलिखित दप्तरें); रेकॉर्डस् ऑफ फोर्ट सेंट जॉर्ज (मद्रास येथें १९१०-११ सालीं मुद्रित झालेले); लव्ह-व्हेस्टिजेस् ऑफ ओल्ड मद्रास, तीन भाग; आर्मचीं हस्तलिखितें (इंडिया ऑफिस); यूल संपादित डायरी ऑफ डब्ल्यू. हेजेस; आयर्व्हिन-स्टोरिआ डो मोगोर, ४ था भाग; कॉन्स्टेबल-बन्रियर्स ट्रव्हेल्स; बाल-टॅव्हषर्नयर्स ट्रॅव्हेल्स; फ्रायर-न्यू अकाऊंट ऑफ ईस्ट इंडिया; आर्म हिस्टॉरिकल फ्रॅग्मेट्स ऑफ दि मोगल एंपायर (लंडन १८०५); ग्रेंट डफ-हिस्टरी ऑफ दि मराठाज; जदुनाथ सरकार-शिवाज, औरंगजेब; ताकखाब-दि लाईफ ऑफ शिवाजी महाराज; किंकेड व पारसनीस-हिस्टरी ऑफ दि मराठा पीपल; रानडे-राईज ऑफ दि मराठा पावर. जर्मन-स्पिंजेल-हिस्टरी ऑफ दि मराठाज).