प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शिक्षणशास्त्र- शिक्षण हा शब्द संस्कृत धातु शिक्षशिकणें यापासून बनला आहे. इं. एज्युकेशन (शिक्षण) या शब्दाच्या मूळ लॅटिन धातुचा अर्थ वाढविणें किंवा बाहेर काढणें असा आहे. शिक्षणाचा दर्जा पुष्कळ अंशीं तें देणार्‍या शिक्षकांवर अवलंबून असतो आणि शिक्षकाची लायकी तो ज्या सामाजिक परिस्थितींत वाढलेला असतो त्यावर अवलंबून असते. म्हणून शिक्षण बरें वाईट मिळणें ही गोष्ट त्या त्या समाजाला शिक्षणासंबंधानें ज्या कल्पना व जी किंमत वाटत असेल त्यांवर अवलंबून आहे. शिक्षण याच्या शास्त्रज्ञांनीं अनेक व्याख्या केल्या आहेत. (१) शांततेच्या व धामधुमीच्या काळांत आपलें खाजगी व सार्वजनिक कर्तव्य नेकीनें, हुषारीनें व उदात्त रीतीनें पार पडण्याचें सामर्थ्य ज्या योगानें प्राप्त होतें तें शिक्षण होय (मिल्टन). (२) मनुष्यजातीच्या उन्नतीकरितां करावयाची तरतूद तें शिक्षण होय (फिंडले).(३) मुलांच्या मनाची प्रवृत्ति प्रथमतः सद्गुणांकडे नंतर सततोद्योगाकडे, नंतर ज्ञानाकडे वळविणें हें शिक्षणाचें काम होय (लॉक). (४) मनुष्याच्या स्वाभाविक शाक्तिंचा पूर्ण विकास म्हणजे शिक्षण होय.

निरनिराळया कालांचा व देशांचा विचार करतां उत्तम शिक्षण कोठलें होतें हें सांगणें कठिण आहे. कारण सामान्यतः शिक्षण याची व्याख्या अशी करतां येईल कीं, शिक्षण म्हणजे समाजानें स्वतःचें ज्ञान किंवा विद्या (बौद्धिक विकास कल्चर) तरुण पिढीला देण्याकरितां केलेले प्रयत्न. हे प्रयत्न जिनें यशस्वी होतील ती शिक्षणपदधति उत्तम असें म्हणतां येईल. पण जेव्हां दोन किंवा अधिक प्रगत देशांचा परस्पर संबंध येतो तेव्हां कोणत्या विद्या व कला शिकवाव्या ह्याबद्दल मतभेद उत्पन्न होतो. आणि उत्तम शिक्षणपद्धत बनविण्याकरितां परंपरागत पद्धतींत फरक करावा लागतो. पण पाठशाळा व विद्यापीठें पुराणमताभिमानी बहुधां असल्यामुळें नवी पद्धत अंगिकारली जात नाहीं. म्हणून शिक्षणाचा उद्दिष्ट हेतु साध्य होत नाहीं म्हणून चालू काळांत अत्यंत फलदायी होईल असें शिक्षण देण्याच्या नव्या नव्या योजना अंमलांत आणण्याचें काम सरकारनें किंवा लोकपुढार्‍यांनीं केलें पाहिजे. यासंबंधीं दुसरा महत्वाचा प्रश्न हा कीं, शिक्षणक्रम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक हिताच्या दृष्टीनें ठरवावा कीं समाजहिताच्या दृष्टीनें ठरवावा. यांपैकीं कोणतीहि एक दृष्टि एकांगीं असल्यामुळें दोन्हींच्या मिलाफानें जी शिक्षण पद्धत ठरते ती उत्तम होय. हल्ली पाश्चात्य देशांत राष्ट्रीय शिक्षणपद्धतींत पुढील तत्वें येतात (१) शिक्षण हें सरकारचें काम आहे, (२) प्राथमिक शिक्षण सर्वांनां मोफत व सक्तीनें मिळावें, (३) धार्मिक शिक्षण सक्तीचें असूं नये, (४) दुय्यम व उच्च शिक्षणाच्या संस्था चालू राहतील अशी तजवीज सरकारनें करावी, (५) अशा संस्थांवर राष्ट्रहितदृष्टया जरुर तेवढेंच नियंत्रण ठेवावें.

अध्यायनपद्धति- आपल्याकडे सर्वसाधारण अशी समजूत आहे कीं, शिक्षकाला विषयांची माहिती असली म्हणजे पुरे. पण मुलांनां कोणते विषय शिकवावे, ते कोणत्या क्रमानें शिकवावे, प्रत्येक विषयाचा भाग किती शिकवावा, निरनिराळया इयत्तांतून त्यांची वांटणी कशी करावी, व ते सहज समजण्याकरितां कोणत्या युक्त्याप्रयुक्त्या योजाव्या यांबद्दलचें ज्ञान शिक्षकाला असणें फार जरुर आहे. शिक्षणानें संस्कार करण्याचीं क्षेत्रें मुख्यतः शरीर, बुद्धि व मन हीं तीन असल्यामुळें शिक्षणाचे शारीरिक, बौद्धिक व मानसिक शिक्षण असे तीन प्रकार होतात. (१) शारीरिक शिक्षण-सामर्थ्य, आरोग्य आणि इंद्रियांची चपलता व कुशलता हे शारीरिक शिक्षणाचे हेतू होत. (२) बौद्धिक शिक्षण-निरीक्षण, कल्पना व विचार हे व्यापार वरचेवर केले तरच बुद्धीला शिक्षण मिळतें. अभ्यासक्रमांत निरीक्षणाचे, कल्पनेचे व विचाराचे विषय पाहिजेत. (३) नैतिक शिक्षण-बौद्धिक व नैतिक शिक्षण कोणत्या प्रकारचें पाहिजे याविषयीं अधिक स्पष्ट कल्पना आपल्या मनाचे व्यापार कोणते आणि ते कोणत्या क्रमानें होतात हें जाणल्यानें होईल.

मनोव्यापाराच्या दृष्टीनें शिक्षणाचे उद्देश पुढें लिहिल्याप्रमाणें होतील. (१) जरुरीचें प्रत्यक्ष ज्ञान मुलांस होईल अशा परिस्थितींत त्यांस ठवणें. (२) तुलनात्मक बोध घ्यावयास लावणें (३) साहचर्यानें व उत्तम प्रत्यक्षबोधानें त्यांची स्मृति दृढ करणें. (४) सामान्य बोधाचें काम मुलांस शिकवून त्यांजकडून अनुमानाचें काम करुन घेणें. (५) कल्पनेला आपलें काम करण्यास जरुर तो आधार प्रत्यक्ष बोधानें पुरविणें. (६) साहजिक वासना कोणत्या विषयासंबंधीं ठेवाव्या त्याबद्दल मुलांचें मत अप्रत्यक्ष रीतीनें तयार करणें. (७) अनुकरणानें साध्यच होणार्‍या कृती वर्णन करुन शिकवावयाच्या असा अयोग्य प्रयत्न न करितां त्या प्रत्यक्ष करुन दाखविणें. (८) चांगल्या संवयी मुलांस लावणें. (९) शाळेंत वर्णन व स्पष्टीकरण फक्त तोंडीं होत असतें. ती वहिवाट सोडून वर्णन व स्पष्टीकरण समजण्यास जरुर ते निरीक्षण करवून घेणें व प्रयोग करुन दाखविणें.

अध्यापन पद्धतीचें सार- शिक्षणाचे उद्देश, शिक्षण देण्याचें धोरण, मनाचा विकास, बालस्वभाव व मुलांनां वळण लावण्याची योग्य दिशा यांबद्दल विचार करुन या विचारांनां अनुसरुन शिक्षणशास्त्रविशारदांनीं शिक्षणाकरितां विशिष्ट पद्धती योजल्या. बालोद्यानपद्धत, माँटेसरीपद्धत, हेतुपद्धत (प्रॉजेक्ट मेथड), विद्याशोधनपद्धत (डाल्टन प्लॅन) या मुख्य पद्धती होत. या पद्धतींतील मुख्य तत्वें जाणल्यानें आपल्या कार्याची जाणीव आपणांस अधिक होईल.

फ्रोबेलच्या बालोद्यान पद्धतीचीं मुख्य तत्वें- (१) लहान मुलांनां शाळा हें ठिकाण रम्य वाटतें. (२) शिक्षकानें मुलांची सुकुमार झाडांसारखी जोपासना करावी. (३) लहान मुलांचा स्वभाव त्यांच्या मनाचा विकास यांचा विचार करुन शिक्षकानें शिक्षण द्यावें. (४) मुलांनीं स्वतःच्या अनुभवानें ज्ञान मिळवावें. (५) त्यांनां शाळेंतील साहित्य देणगीप्रमाणें प्रिय वाटावें. देणगीमुळें आपणांला आनंद वाटतो, देणाराबद्दल प्रेम वाटतें व देणगी पुष्कळ दिवस असावी असें वाटतें. ज्ञान घेतांना विद्यार्थ्यांच्या मनांत या भावना उत्पन्न झाल्या पाहिजेत. (६) ज्ञान हें खेळतां खेळतां म्हणजे करमणुकीचा विषय म्हणून मिळावें. मुलां-मुलांत प्रेम वाढण्याकरितां खेळ व गाणीं ही अभ्यासक्रमांत असावीं. मुलांच्या मगदुराप्रमाणें सर्व प्रकारचें शिक्षण असावें.

माँटेसरीबाईनें या पद्धतींत ज्ञानेंद्रिय शिक्षणाची भर घातली. पूर्वीच्या पद्धतींत ज्ञानेंद्रिय शिक्षण होतें, पण मॉटेसरीबाईनें शिक्षणाचें तेंच खरें साधन होय असें ठरविलें. (१) स्पर्शेन्द्रियाचा ज्ञान मिळविण्याच्या कामांत फारच उपयोग होतो. म्हणून अक्षरांचें, अंकांचे, आकृतीचें, रंगांचें व आकारमानाचें ज्ञान त्वचा व डोळे यांच्या साहाय्यानें द्यावयाचें अशी त्यांनीं योजना केली. (२) आपण चुकत आहोंत असा अनुभव सहज येऊन मुलांनां आपोआप ज्ञान व्हावें असा त्यांच्या शिक्षणपद्धतीचा दुसरा विशेष होय. या पद्धतीच्या शिक्षणसाहित्याची रचना, हा अनुभव आपोआप मिळेल अशी आहे (३) मुलांनीं स्वेच्छेनें व अनुकरणानें ज्ञान मिळवावें हा त्यांच्या पद्धतीचा तिसरा विशेष होय (४) त्यांच्या पद्धतीच्या बालगृहांत (शाळांत) मार्गदर्शक (शिक्षक) कोणता तरी उद्योग करीत बसतो व मुलें त्याजजवळ जाऊन त्या उद्योगांत मन रमल्यास तो करावयास लागतात.

हेतुपद्धतीचे उत्पादक डयूई यांचे मत असें कीं, शाळेंतील कामाचा समाजाची परिस्थिति व मुलांची परिस्थिति, व मुलांचे आवडते उद्योग यांशीं विरोध नसावा. मुलांनां खेळावयास खेळणीं लागतात तीं त्यांनीं तयार करावीं. त्यांनीं घराचे नमुने करावे. कापड विणण्याची योजना कशी असते ती पहावी. त्यांनीं विटा पाडाव्या, बागकाम करावें, व घरांत जे उद्योग करावे लागतात ते लहान प्रमाणावर शाळांत करावे. फ्रोबेल व माँटेसरी यांचीं बहुतेक तत्वें डयूईस मान्य आहेतच.

विद्याशोधनपद्धतीचा उत्पादक डाल्टन याचें मत असें कीं, शाळेंतील शिक्षणानें मुलें फार परावलंबी बनतात. तीं स्वावलंबी व्हावींत म्हणून शाळेंतील धोपट शिकविणें बंद केलें पाहिजे; आणि मुलांनां काम नेमून देऊन व त्याकरितां त्यांजकडून प्रयत्न करवून तें मुदतींत पुरें करुन घेतलें पाहिजे. त्यांच्या पद्धतीच्या शाळांत मुलें निरनिराळया विषयांच्या दालनांत त्यांच्या इच्छेस येईल तेव्हां ठरीव मुदतीच्या आंत जातात; व तेथें पुस्तकें, नकाशे इत्यादि साहित्याच्या व सहाय्यांच्या मदतीनें आपला अभ्यास मुदतींत पुरा करितात, आणि जे विषय कच्चे असतील त्यांस अधिक वेळ देतात.

या विचारी माणसांच्या योजनांत एकेकश: थोडा एकांगीपणा असल्यामुळें शिक्षकांनीं त्या सर्वांचें उपयुक्त संमेलन आपल्या कामांत केलें पाहिजे.

अध्यापनाचे नियम- अध्यापनकलेचा मुख्य हेतु हा कीं, शिकवावयाचा विषय मुलांनां सहज समजावा व तो चित्ताकर्षक व्हावा. हे हेतु साध्य व्हावा या धोरणानें पुढील नियम दिले आहेत. (१) झालेल्या माहितीशीं जोडून नवीन माहिती सांगावी. (२) माहिती व्याख्यानरुपानें सांगू नये. शिक्षकाच्या प्रश्नामुळें बरीचशी माहिती मुलांनीं मिळवावी. प्रश्न निरीक्षण, कल्पना व विचार करावयास लावणारे असावे. (३) शक्यतोंवर ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन ज्ञान द्यावें. (४) ज्ञान देतांना क्रम लावून ज्ञान द्यावें. क्रम लावण्याबद्दल पुढील नियम तज्ज्ञांनीं ठरविले आहेत. (अ) परिचयांतील गोष्टींवरून अपरिचित गोष्टींकडे जावें. उ. अगोदर परिचयाच्या प्रांतांचा इतिहास व नंतर दूरच्या प्रांतांचा इतिहास. अगोदर परिचित ठिकाणाचा उल्लेख, नंतर दुसर्‍या ठिकाणा उल्लेख. (आ) प्रथम सोपी माहिती व नंतर क्रमानें अवघड माहिती सांगावी. (इ) प्रथम प्रत्यक्षावगम गोष्टी घ्याव्याव नंतर कल्पनावगम घ्याव्या. (ई) प्रथम साध्या गोष्टींबद्दलव नंतर संमिश्र गोष्टींबद्दल विवेचन करावें. (उ) प्रथम विशेष गोष्टी सांगून नंतर सामान्य नियम काढून घ्यावा; उदा. विशिष्ट झाडांची तुलना प्रथम व नंतर एकदल, द्विदल व सपुष्प-अपुष्प, असें वर्गीकरण. (ऊ) प्रथम विषयाची स्थूल कल्पना देऊन नंतर कठिण व सविस्तर मुद्दे सांगावे. (ॠ) प्रथम व्यक्त गुण पाहून नंतर अव्यक्त गुणांकडे लक्ष द्यावें. (५) स्पष्टीकरणार्थ साहित्याचा उपयोग भरपूर करावा. (६) विषयाची समजूत करुन दिल्याशिवाय तो विषय मुलांनां पाठ करण्यास लावूं नये. (७) पाठ देतांना मुलांचें चित्त आकर्षून घ्यावें. (८) मुलांचें लक्ष उडण्याची जीं कारणेंं- बसण्याची गैरसोय, प्रकाश व हवा यांसंबंधीं गैरव्यवस्था, बाहेरील गोंगाट वैगेरे असतींल ती नाहींशीं करावीं.

शिस्त- अध्यापनाचा परिणाम चांगला होण्याकरितां मुलांचे चाळे बंद झाले पाहिजेत, आपसांत बोलणें, दुसर्‍याच्या वहीवरुन चोरून नक्कल करणें, खोडया करणें, उशीरां येणें, हुकूम न मानणें, वर्गांत कट करणें, शिक्षकास शिक्षणाबाहेरचे प्रश्न विचारणें, घरचा अभ्यास न करणें वगैरे दुर्वर्तनानें मुलें शिक्षकास त्रास देतात, व त्यामुळें शिक्षणांचें काम व्यवस्थित होत नाहीं. हें दुर्वर्तन थांबण्यास शाळेंत शिस्त पाहिजे. शाळेंत शिस्त नसली तर अभ्यास नीट चालत नाहींच; मुलांच्या अंगीं ज्ञानापेक्षां नैतिक गुण अधिक पाहिजेत ते येत नाहींत, आणि मुलांनां व शिक्षकांनां शाळेच्या कामाचा त्रास वाटूं लागतो. ज्या शाळेंत शिस्त असते त्या शाळेंतील मुलें शांत, व्यवस्थित, आज्ञाधारक व अभ्यासाकडे लक्ष देणारीं असतात.

मुलांनां शिस्त लावण्याकरितां शाळेंतील प्रत्येक कामासंबंधीं व वर्तनांसंबधीं ठराविक नियम असावे (१) नियम थोडे व महत्वाचे असावे. (२) ते स्पष्ट असावे. (३) ते सूज्ञपणाचे असावे. (४) ते सर्व मुलांनां माहीत असावे. (५) त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित असावी. नियम मोडल्यास शिक्षा अवश्य करावी. शिक्षा किरकोळ चुकांकरितां करु नये. विद्यार्थी जाणून बुजून अपराध करितो अशी खात्री झाल्याशिवाय ती करूं नये. शिक्षा अपराध शाबीत झाल्याबरोबर करावी. मार्क कमी करणें, अपमानाची जागा देणें, बोलणें किंवा रागें भरणें, काम करूं न देणं, अधिक अभ्यास देणें, शाळेंत जास्त वेळ ठेवणें, दंड करणें, शारीरिक शिक्षा करणें; शाळेंतील नांव काढून टाकणें वगैरे क्रमानें अधिक कडक असे शिक्षेचे प्रकार आहेत. शिक्षेपेक्षां बक्षिसांचा उपयोग अधिक होतो. मार्क देणें, स्तुति करणें, मानाची जागा देणें, पदकें, बिल्ले, वगैरे मानाचींभूषणें देणें, चांगल्या कामाचें प्रदर्शन करणें, मानाचें काम घेणें, प्रशंसापत्रकें, बक्षीसें पुस्तकें, पैसे देणें, वगैरे बक्षिसांचे प्रकार होत.

पाठाची रचना- नवीन पाठ समजण्यास जी माहिती जरुरीची ती मुलांस आहे किंवा नाहीं हें प्रथम पाहिलें पाहिजे. पाठाच्या या प्रथम विभागास उपोदघात, विषयारंभ किंवा विषयप्रस्तावना म्हणतात. जुन्यामाहितीची स्मृति जागृत केल्यावर नवीन माहिती देण्याचा क्रम निश्चित केला पाहिजे. क्रम निश्चित करुन नवीन माहिती क्रमवार सांगण्याच्या कामास प्रतिपादन म्हणतात. हा पाठाचा दुसरा विभाग होय. सांगितलेली माहिती चांगली समजली किंवा नाहीं हें पाहाण्याच्या कामास आवृत्ति किंवा उपसंहार म्हणतात. पाठांचें टांचण विभाग पाडून लिहावयाचें कसें तें पुढें टांचण दिलें आहे, त्यावरून कळेल. उपोदघात, प्रतिपादन व उपसंहार असे पाठाचे तीन विभाग होतात व या प्रत्येक विभागाकरितां टांचणाचे विषय, पद्धत व फळा असे तीन विभाग करणें सोईचें असतें.

पाठाची रनचा निरनिराळया विषयांचे पाठ कसे घ्यावेत हे पुढील कांहीं पाठांच्या मुदयांवरुन समजून येईल. पाठांचे मुद्दे गद्य - प्रस्तावना-धडयाचा संक्षिप्त गोषवारा सांगणें. प्रतिपाद-परिच्छेदाचें मनांतील वाचन, व त्याचा सारांश विचारणें, शब्दाचें किंवा शब्दसमूहाचें स्पष्टीकरण. आवृत्ति झालेल्या भागासंबंधीं प्रश्न (खालच्या इयत्तांतील मुलांचें मनांतील वाचन घेऊं नये; शिक्षकानें स्वतः वाचून दाखवावें किंवा मुलांनां वाचण्यास सांगावें). पद्य - प्रस्तावना-पद्यांतील मुख्य कल्पना प्रश्न विचारून लक्षांत आणून देणें. प्रतिपादन - शिक्षकानें कविता म्हणून दाखविणें, ती अर्थवेध होईल अशी वाचून दाखविणें, संकलित अर्थ विचारणे, शब्दांचा किंवा शब्दसमूहांचा अर्थ समजावून सांगणें, सविस्तर अर्थ, प्रश्न विचारून अन्वय, कविता चालीवर म्हणावयास शिकविणें, एकेकाकडून म्हणून घेणें. आवृत्ति-कवितेंतील कल्पनेविषयीं प्रश्न विचारणें; (केव्हां केव्हां मुलांकडून कविता मनांत वाचून घेतां येईल).

व्याकरण- प्रस्तावना-जो विषय शिकवावयाचा त्यास उपयोग अशी झालेली माहिती विचारणें; प्रतिपादन-जो नियम शिकवावयाचा त्यास उपयोगी असे शब्द किंवा वाक्यें फळयावर लिहिणें, नियम समजावून सांगणें मुलांस उदाहरणें विचारणें, तुलना करुन घेणें; आवृत्ति-पुस्तकांतील उदाहरणें निवडावयास सांगणें.

अंकगणित- (शिकविलेल्या विषयांचीं उदाहरणें करुन घेण्याचा पाठ) प्रस्तावना - त्या विषयांतील सोपीं उदाहरणें तोंडी करून घेणें किंवा सोपें उदाहरण पाटीवर करण्यास सांगणें; प्रतिपाद-उदाहरण सांगणें, दिलेल्या गोष्टी व काढावयाचें उत्तर विचारणें, कोणतीं कृत्यें केलीं पाहिजेत तें विचारणें (उ.बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केला पाहिजे किंवा वेग, काम काढलें पाहिजे, किंवा नफा, खरेदीची किंमत काढली पाहिजे किंवा रास तयार केली पाहिजे वगैरे); मुलांनां उदाहरण करावयास सांगणें. आवृत्ति-त्याच जातीचें दुसरें उदाहरण सांगणें.

टांचणांचा नमुना
इयत्ता - ४ थी.
विषय - इतिहास-बाजी प्रभूचें चरित्र.
उद्देश -शौर्य, कर्तव्यनिष्टा व स्वाभिनिष्ठा हे गुण बिंबविणें.
साहित्य - पन्हाळगडचें चित्र; बाजी प्रभू घायाळ झाला असतांहि शत्रूस अटकाव करतो असा देखावा; नकाशा.
विषय        पद्धत        फळा
प्रस्तावना -

विद्यालयांची व्यवस्था- शाळेच्या इमारतींत ४० ते ६० विद्यार्थी मावतील असा निरनिराळया आकाराच्या व भरपूर हवा व प्रकाशाच्या खोल्या असाव्या व सर्व विद्यार्थी मावतील असा एक मोठा हॉल असून शिवाय ऑफीस, इतर सामान, सायन्स, शिक्षक, वगैरेकरितां स्वतंत्र्य खोल्या असाव्या. तसेंच मुतारी, शौचकूप, पाणीपुरवठा, वगैरे सोयी असल्या पाहिजेत. शक्य तर क्रीडांगणहि शाळेला लागूनच असावें. वर्गांमध्यें सिंगल किंवा डबल डेस्कें, पुस्तकें, दौती, चित्रें व नकाशे वगैरेकरितां कपाटें, खुर्ची टेबल, वेळापत्रक, अभ्यासपत्रक, फळा, घडयाळ, थर्मामीटर वगैरे सोयी असाव्या. शिवाय शाळेला अटेंडन्स बोर्ड, की-बोर्ड, नोटिस बोर्ड, अपघातांवर तात्कालिक उपायाकरितां वैद्यकीयसाधनें, आग विझविण्याचें साहित्य, वगैरे साधनें असावीं.

मुख्य शिक्षकानें देखरेखीचें व तपासणीचें काम स्वतःकडे ठेवून बाकीच्या शिक्षकांनां खालच्या वर्गांत वर्गपद्धतीनें (क्लास-सिस्टिम - बहुतेक विषय एकाच शिक्षकाकडे देणें) आणि वरच्या वर्गांत विषय-पद्धतीचें (सब्जेक्ट-सिस्टिमनें एकेका विषयाच्या शिक्षकाकडे अनेक वर्गांचा विशिष्ट विषय.देणें) काम वांटून द्यावें अगदीं खालच्या व अगदीं वरच्या वर्गाला चांगले लायक व अनुभवी शिक्षक नेमावे. प्रत्येक विषयाची वार्षिक अभ्यासक्रमांपैकीं दरमहा प्रगति किती होते त्याची नोंद ठेवून त्यावर मुख्य शिक्षकानें बारकाईनें लक्ष ठेवून कोणताहि विषय फार भरभर किंवा फार मंद चालणार नाहीं अशी काळजी घ्यावी. शिक्षकांच्या नियतकालिक सभा भरवून अभ्यासप्रगति व अध्यापनपद्धतीबद्दल चर्चा करावी. वेळापत्रकांतगणित, व्याकरण वगैरे बौद्धिक श्रमाचे विषय प्रथम आणि हस्तव्यवसायाचे शेवटीं ठेवावे.

शाळेच्या दप्तरांत स्कूल फोलिओ, स्टॉकबुक, लॉक बुक, ऍडमिशनरजिस्टर, फीबुक, अटेंडन्स रजिस्टर, मार्कबुक, पनिशमेंटबुक व्हिजिटर्सबुक, वगैरे ग्रंथ-टांचणें लागतात.

(संदर्भग्रंथ-ग्रेव्हज-ए स्टूडंट्स हिस्ट्री ऑफ एज्युकेशन; क्विक-एज्युकेशनल रिफॉर्मस्; रस्क-डॉक्ट्रिन्स ऑफ ग्रेट एज्युकेटर्स; ऍडॅम्स-मॉडर्न डेव्हलपमेंट इन एज्युकेशनल प्रॅक्टिस; कोलर व व्रूच्क-मॅनेजमेंट ऍंड मेथड ऑफ इंस्ट्रक्शन; म.गो. मोडक-शिक्षणशास्त्र व अद्यापनकला; एन्सा. ब्रिटानिका.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .