प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शीख- हिंदुस्थानांतील एक धर्मपंथ व त्या पंथाचे अनुयायी. या धर्माचे अनुयायी मुख्यतः पंजाब, संयुक्तप्रांत, सिंध,जम्मू, काश्मीर इत्यादि प्रांतांत आढळतात. १९२१ सालीं या पंथाच्या अनुयायांची संख्या सुमारें २९ लक्ष होती. शीख या शब्दाचा मूळ अर्थ शिष्य असा आहे. शीखपंथाना उत्पादक नानक (पहा) यानें या पंथाला शीख असें नांव दिलें. शीखांचे मुख्यतः दोन वर्ग आहेत. (१) सहजधारी, व (२) केशधारी. यांनांच अनुक्रमें नानकपंथी व गोविंदसिंधी अशी नांवें आहेत. गोविंद सिंधी शीख हे आपल्याला अस्सल शीख असें समजतात. केश धारण करण्याची चाल यांच्यामध्यें आहे म्हणून त्यांनां केशधारी असें नांव आहे. सहजधारी शीख हे गुरु नानकानें सांगितलेल्या धर्माप्रमाणें आपलें वर्तन ठेवतात. गोविंदसिंघानें घालून दिलेल्या आज्ञा हे पाळत नाहींत; व गोविंदसिंधी शीखांप्रमाणें यांनीं दीक्षाहि घेतलेली नसते. शीख शब्द संप्रदायकवाचक आहे म्हणजे कोणाहि माणसाला या संप्रदायाची दीक्षा घेतांच शीख होतां येतें. पंजाबमध्यें कित्येक लोक या संप्रदायाची दीक्षा घेऊन आपल्याला हिंदू असेंच मानतात व हिंदूंच्या देवतांची पूजाहि करतात. शीखांमधील सहजधारी पंथाचे नानकपंथी, उदासी (पहा). दंडली, मिना, रामरंज, सेवापंथी, असे पोटभेद आहेत. गोविंदसिंधी पंताचे खालसा, निर्मळ, अकाली (पहा) इत्यादि पोटभेद आहेत. याशिवायनिरंकारी, धीरमाली, इत्यादि पोटभेद आहेतच. शीख लोक जात्या अंगानें धिप्पाड व लढाऊ वृत्तीचे असतात. शीख लोकांत पुर्नविवाहाची चाल आहे. पुरुषांपेक्षां बायकांचें प्रमाण कमी आहे. शीखांमध्यें सर्वसाधारणतः हिंदूंतल्या प्रमाणेंच विवाह होतात. तथापि कट्टे शीख 'आनंद' नांवाच्या विधीनें लग्नें लावतात. ग्रंथ साहेबाच्याभोंवतीं वधुवरांनीं चार प्रदक्षिणा घालणें व त्यावेळीं स्त्रियांनीं लावान उर्फ गाणीं गाणें व नंतर प्रसाद वाटणें हे आनंदपद्धतीच्या विवाहाचे विशेष, होत. शीखांमध्यें शिक्षणाचें प्रमाण बरेंच कमी आहे, तथापि साक्षरता वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक प्रमुख शहरांत शीखांची गुरुद्वारें आहेत व त्या ठिकाणीं सार्वजनिक पूजा करण्यांत येते.

शीख संप्रदाय- गुरु नानक यानें स्थापन केलेल्या धर्मपंथाला शीखसंप्रदाय असें नांव आहे. आचार प्रधान धर्माविरुद्ध मध्ययुगांत जी लाट उसळली होती त्या लाटेंतच नानकाच्या शीख धर्माचें मूळ दिसून येतें नानकानें आचारापेक्षां अंतःकरणाच्या शुद्धीवर अधिक भर दिला आहे, अनन्त व अनादि असा एकच देव असून हिंदूंचा देव निराळा, मुसुलमानांचा देव निराळा हें म्हणणें खोटें आहे असें त्यानें प्रतिपादन केलें. मूर्तिपूजा त्यानें गर्ह्य मानिली. तसेंच परमेश्वरप्राप्तीला जातिभेद आड येत नाहीं अशीहि शिकवण त्यानें लोकांनां दिली. ('आदिग्रंथ' पहा). नानकाच्या मागून शीख धर्माचे एकंदर नऊ गुरु झाले. यापैकीं अंगड (पहा) हा दुसरा गुरु होय. यानें गुरुमुखी लिपि तयार केली. १५५२ सालीं अंगड मरण पावल्यानंतर अमरदास (पहा) हा तिसरा गुरु गादीवर बसला.त्याच्यानंतर गुरु रामदास हा शीखांचा चौथा गुरु झाला. त्यानें आपल्या कारकीर्दीत १५७७ सालीं अमृतसर येथें प्रसिद्ध सुवर्णमंदिर बांधलें. अद्यापपावेतों हें शीखांचें धर्मक्षेत्र आहे. गुरु रामदासाच्या मरणानंतर त्याचा कनिष्ट मुलगा अर्जुनमलज् (पहा) हा गादीवर बसला. या वेळेपासून शीखांच्या धर्मगुरुंचीं गादी आनुवंशिक झाली असें म्हणावयास हरकत नाहीं. गुरु अर्जुनानें नानकाचीं व आपल्या मागील धर्मगुरुंची सर्ववचनें एकत्र करून ग्रंथसाहेब उर्फ शिख धर्माची गीता तयार केली. जहांगिरच्या विरुद्ध त्याच्या मुलांच्या बाजूनें अर्जुनानें मदत दिल्यामुळें, त्याला कैदेंत टाकण्यांत आलें. तेव्हां शीखधर्माचें अस्तित्व कायम राखावयाचें असल्यास शीखांच्या धर्मगुरुपाशीं सैन्यबळ असल्याशिवाय गत्यंतर नाहीं असें त्याला आढळून आलें व मरतांना त्यानें आपल्या मुलाला धर्मगुरुच्या गादीवर सशस्त्र बसविण्यास सांगितलें व पदरीं भरपूर सैन्य बाळगण्याचा उपदेश केला. त्याप्रमाणें हरगोविंदनें केलें व त्या वेळेपासून शीख धर्माला नवीनच वळण लागलें असें म्हणावयास हरकत नाहीं. हरगोविंदानें आपल्याभोंवतीं प्राणाची पर्वा न करणारे असे अनेक शीख अनुयायी गोळा केले. अंगामध्यें जोर येण्यासाठीं त्यानें आपल्या अनुयायांनां मांस खाण्यास परवानगी दिली. जहांगी व शहाजहान यांच्या विरुद्ध हरगोविंदानें मोठया धैर्यानें टक्कर दिली. हरगोविंदानंतर हरराय व हरकिशन हे गादीवर बसले. त्यानंतर तेघबहादुर हा गादीवर बसला. यानें औरंगझेबाशीं हाडवैर संपादन केल्यामुळें औरंगझेबानें त्याला तुरुंगांत टाकलें. यूरोपीयन लोक हिंदुस्थानावर सत्ता गाजविणार हें भविष्य औरंगझेबाला त्यानें सांगितल्यामुळें त्याला ठार मारण्यांत आलें. तेघनंतर त्याचा मुलगा गुरुगोविंद सिंघ (पहा) गादीवर आला. शीख धर्म क्षात्रप्रधान करण्याचें सर्व श्रेय यालाच दिलें पाहिजे. शीख धर्माचा, शीखांची राजकीय सत्ता वाढविण्याच्या कामीं यानें उपयोग करावयाच्या हेतूनें 'खालसा' संप्रदाय काढला. खालसा म्हणजे 'शुद्ध'. या नवीन शुद्ध शीख संप्रदायाचीं तत्वें त्यानें आंखून दिलीं. या संप्रदायामध्यें अतंर्भूत होऊं इच्छिणार्‍याला केश, कच्छ, कर (लोखंडी बांगडी), खंड (खंजीर) व खंज (फणी) हीं धारण करावीं लागत व आपल्या नांवापुढें सिंघ (सिंह) हें शौर्यदर्शक उपपद लावावें लागत असे. निर्गुण ईश्वर, गुरु नानक आणि नंतरचे गुरु व ग्रंथसाहेब या तीन्हींवर श्रद्धा ठेवणें, हें त्याच्या संप्रदायाचें मुख्य तत्व असून अमृतसिंचनानें व तलवारीनें (खंड का पहुल) दीक्षा घेणें हा आचार होता. या बाबींखेरीज नानकानें प्रतिपादन केलेलींच तत्वें गोविंदसिंगानेंहि प्रतिपादन केलीं. अशा रीतीनें आपल्या हातांखालीं शीखांनां त्यानें वीर वृत्तीचे बनविलें. तो नांदेड येथें एका पठाणाकडून मारला गेला. त्याच्यानंतर शीख धर्मगुरुंची परंपरा लयास गेली. तथापि गोविंदसिंघानंतर बंदा बैरागी यानें आपल्याला अकरावा गुरु म्हणून घेतलें व सैन्याच्या जोरावर बरीच सत्ता स्थापन केली. त्याच्या सत्तेला विरोध करण्याकरितां तत्खालसा नांवाचा एक संप्रदाय निर्माण झाला व त्यानें बंदाला यशस्वी रीतीनें विरोध केला. बंदाच्या मरणानंतर शीख संप्रदायांत बरेच तट पडले; व या दुफळीचा फायदा घेऊन नादिरशहानें पंजाबची धूळधाण उडविली. १७५७ नंतर शीखांनीं पंजाबमध्यें पुन्हां आपली सत्ता कशी बशी स्थापन केली. पुढें सतलज नदीच्या दक्षिणेकडील टापूंत शीखांचीं स्वतंत्र छोटीं छोटीं संस्थानें उदयास आलीं. उत्तरेकडे मात्र धर्मसत्ताक राजशाही स्थापन झाली. १७६७ च्या सुमारास यमुना ते सिंधु या दुआबावर शीखांची सत्ता पसरली होती. १७६७ नंतर शीखांच्या धार्मिक सत्तेचा शेंवट होऊन, राजसत्तेला प्रारंभ झाला असें म्हणावयास हरकत नाहीं. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत शीखांच्या राजसत्तेचा कळस झाला. पण तदनंतर ब्रिटिशांचें वर्चस्व स्थापन झालें. १८५७ सालच्या बंडांत शीखांनीं ब्रिटिशांनां महत्वाची मदत केली, व अद्यापीहि हिंदुस्थानांतील ब्रिटिश सैन्यांत शीखांचा भरणा अधिक आढळून येतो. हल्ली, पत्याळा, नाभा, झिंद इत्यादि बरींच संस्थानें शीखांची आहेत.

शीख धर्म एकेश्वरी मताचा असून मूर्तिपूजेच्या विरुद्ध आहे तथापि सर्व शीख ग्रंथसाहेबाची मात्र अनन्य भावानें पूजा करतात. शीख धर्म जातिभेदाचें तत्व मानीत नाहीं हें वर सांगितलेंच आहे. हिंदु धर्मांतील अवतारतत्वहि त्याला संमत नाहीं. दैववाद व पुनर्जन्माचें तत्व मात्र त्याला मान्य आहे. गोविंद सिंघाच्या अमदानीत शीख धर्मांत आचारांचा शिरकाव झाला, तथापि तो कांहीं विशिष्ट बाबींतच झाला. शीख लोकांचे धर्मग्रंथ दोन आहेत (१) आदिग्रंथ (पहा), व (२) दसवे पादशहाका ग्रथ. शीख धर्म जरी मुळांत जातिभेदनिषेधपर व मूर्तिपूजेविरुद्ध असा असला तरी हिंदु धर्माचा शीख पंथावर परिणाम होऊन शीख धर्मामध्यें जातिभेद व मूर्तिपूजेचा शिरकाव झालेला आढळतो खुद्द गोविंदसिंघाच्या वेळीं शीख धर्मांत मूर्तिपूजेचें तत्व शिरूं लागलें होतें असें दिसतें. तात्पर्य हिंदुधर्मामध्यें जीं व्यंगें होतीं त्यांचा नायनाट करण्याच्या हेतूनें निघालेल्या चळवळींत जरी शीख धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून अस्तित्वांत आला तरी हल्ली तो हिंदुधर्मातींलच एक पंथ झाल्यासारखा आहे. तथापि शीख धर्म हा हिंदुधर्माहून निराळा आहे अशें म्हणणार्‍यांनीं एतद्विषयक एकचळवळ चालविली आहे पण ती यशस्वी होण्याचा रंग दिसत नाहीं. खालसा दीवाण ही शिखांची अमृतसर येथें एक मध्यवर्ती संस्था असून तिच्या शाखा (सिंघ सभा) सर्व पंजाबभर पसरल्या आहेत. अमृतसर येथें शिखांचें 'खालसा कॉलेज' असून तरणतारण व गुजराणवाला या ठिकाणीं धार्मिक विद्यापीठें आहेत. उपवर मुलींच्या शाळा, अनाथगृहें, खालसा यंग मेन्स असोसिएशन, शीख बँक, खालसा ऍडव्होकेट नांवाचें वर्तमान पत्र इत्यादि शीख समाजसुधारणेचीं साधनें आढळून येतात.

(संदर्भग्रंथ - विविधज्ञानविस्तार-शीखांविषयीं कांहीं माहिती; फर्कुआर-औट लाईन ऑफ दि रिलिजस लिटरेचर ऑफ इंडिया; मॉक्लिफ-दि शीख रिलिजन.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .