विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शुनःशेप- अजीगर्ताचा एक पुत्र. हरिश्चंद्र राजाच्या रोहित पुत्राबद्दल याला वरुणाला बळी देण्यास सज्जा केलें असतां विश्वमित्रानें यास वांचविलें म्हणून हा विश्वामित्राचा पुत्र मानला जातो. याची कथा ऐतरेय ब्राह्मणांत (७.१३-१८) आढळते. हापुढें मोठा मंत्रदृष्टा झाला. ('वेदविद्या' पृ. १५९-६० पहा.)