प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शुश्रूषा (नर्सिग)- रोग्याची शुश्रूषा करण्यासाठीं त्या कामाचें शिक्षण घेतलेल्या बाया अगर परिचारिका (नर्स).यांचा अलीकडे प्रचार फार झाला आहे व यूरोपमधील ज्या कांहीं चांगल्या गोष्टीचें आपण अनुकरण करतों त्यांपैकीं ही एक आहे. तिकगडे या धंद्याची अलीकडील प्रगति होण्याचें पहिलें कारण हें आहे कीं, ख्रिस्ती धर्मांत रोग शुश्रूषा हें पवित्र कार्य मानलें गेलें आहे, यामुळें हा शुश्रूषासंप्रदाय तिकडे पुरातन आहे. दुसरें कारण क्रिमियन युद्ध व इतर लढायांत रोगी व जखमी सैनिकांचे फार हाल झाले त्यावेळी स्वयंस्फूर्तीनें हें काम परदेशांत, कडक थंडींत बिकट स्थितींत केलेल्या नाइटिंगेल बाईचें शुश्रूषेचें काम इतकें अमोलिक झालें कीं, तिच्या कामाचें अनुकरण इतर यूरोपीय देशांत होऊन रुग्णालयांत परिचारकागणांकडून सशास्त्र शुश्रूषा करण्याच्या अगोदरच्या परिपाठास उत्तेजन मिळालें. तिसरें कारण हें कीं, सर्वत्र स्त्रीस्वभावानुरुप जे दया, कोमलता, वात्सल्यादिगुण असतात, त्यांयोगें शुश्रूषा करावी ही चाल व स्फूषर्त स्त्री जातींत व विशेषतः वृद्ध व अनुभविक बायांत सहजमत्या असते खरी परंतु आधुनिक शास्त्रीय शोध व त्यांच्या ठरीव अशास्त्रीय व कोत्या समजुती यांचा मेळ बसून रोग्याचा फायदा होतोच असें नाहीं. म्हणून आधुनिक शोधांस अनुसरून या परिचारिकांनां शिक्षण दिल्यानें फार बहुमोल फायदा होतो. हें शिक्षण घेण्याचें व देण्याचें उत्तम स्थान म्हणजे आतुरालय होय. यूरोपांत या परिचारिकांचा संप्रदाय प्रचलित असून त्यांच्यावरील मुख्य बाईस 'सिस्टर' अथवा भगिनी म्हणतात. हा भगिनीसंप्रदाय रोमन क्याथॉलिक पंथापैकीं असून बराच जुनाट आहे. (ख्रिस्ती शकापूर्वी सुमारें ३९५ वर्षें) व यांत राजकुलांतील स्त्रियांहि सामील होत. परंतु तो सर्व इतिहास येथें देणें शक्य नाहीं. लंडन येथील जुनीं आतुरालयें जीं सेंट थामस व सेंट बार्थोलोम्यू,येथील परिचारिकासंप्रदाय अत्यंत जुन्यांपैकीं होय. पूर्वी या सिस्टर क्याथोलिक पंथांतील असत व हल्लीहि आहेत. परंतु पुढें इंग्लंडात क्याथोलिक मताचा पाडाव होऊन इंग्लंड प्रॉटेस्टंट म्हणजे धर्मसुधारक मताचें बनलें; तथापि या पुराणमताच्या परोपकारी व उपयोगी बायांविषयीं पूज्यभाव कोणाचाच व कधीहि कमी झाला नाहीं. पुढे प्रोटेस्टंट मताच्याहि परिचारिका तयार होऊं लागल्या. त्यांनां रोगशुश्रुषेचें काम नसलें म्हणजे मोलकरणींप्रमाणे राबावें लागे; परंतु १९ व्या शतकाच्या अखेरीपासून या बायांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा वाढला. याचें कारण या धंद्यांत ठरीव मर्यादेपर्यंत लिहिणें, वाचणें व इतर शिक्षण घेतलेल्या व शीलवान् बाया पसंत करून आतुरालयांत त्यांस व्याख्यानें व व्यावहारिक स्वरुपाचें, भिषग्वर्य व शस्त्रवैद्य यांच्या खास देखरेखीखालीं अत्यंत आधुनिक पद्धतीचें शशास्त्र व व्यावहारिक शिक्षण मिळाल्यामुळें त्याचें कामहि सरस प्रतीचें ठरून त्यांचा दर्जा व भाव आपोआप वाढला. या कामीं अमेरिकेंतील प्यूरिटनपंथांतील बायांचें, तसेंच इंग्लंडांत एलिझाबेथ फ्राय व नाइटिंगेल बाईच्या प्रचंड प्रयत्नांचा उल्लेख करणें जरुर आहे. नाईटिंगेल बाईनें तर आतुरालयांतील आरोग्यविषयक व्यवस्थेंत जबर क्रांतीच घडवून आणली. तेथील परिचर्येच्या शिक्षणाचा विशेष हा आहे कीं, तें स्वयंस्फूर्तीनें वाढत गेलें असून विशेष त्रासदायक व भानगडीचे कायदेकानून केल्याशिवाय त्याची एकसारखी प्रगति होत आहे. शिक्षणेच्छु उमेदवारिणीचें वय ३१ ते ३५ च्या दरम्यास असावें लागतें व शील, शिक्षण व शरीरप्रकृति चांगल्या प्रकारची असल्याविषयीं दाखले हजर केल्यावर या विषयाचें सोपपत्तिक व व्यावहारिक शिक्षण पुष्कळ ठिकाणच्या आतुरालयांत देण्यांत येतें. तीन वर्षांनंतर त्यांच्या वेळोवेळीं परीक्षा घेऊन त्यांनां पहिल्या वर्षी शुश्रूषानैपुण्यदर्शक दाखला देण्यांत येतो. या शिक्षणासाठीं त्यांनां फीचा खर्च वगैरे कांहीं पडत नसून उलट आठ ते बारा पौंड पगार पहिल्या वर्षी मिळून पुढें दरवर्षी वाढतो दुय्यम परिचारिकेचा वर्षिक पगार तीस ते पसतीस पौंड असतो व 'भगिनी' अथवा श्रेष्ट परिचारिकांचा पगार चालीस ते पन्नास पौंड असतो. कपडालत्ता, दिवाबत्ती, परीटधोबी व राहण्यास जागा वगैरे फुकट असते. वसतिगृहावर देखरेख करणारी एखादी पोक्त बाई असते व तेथें व्यायाम व करमणुकीचीं साधनें असतात. प्रतिवर्षी नव्या उमदवारिणी येत असतात व जुन्या पास होऊन जात असतात. आतुलरायाखेरीज गांवांतील व शहरांतील खाजगी रोग्यास परिचारिकेची गरज लागल्यास मोबदला घेऊन परिचारिकासंस्थेकडून त्यांनां धाडण्यांत येतें. ग्रेटब्रिटन देशांतील अनेक शहरांतील परिचारिकांची संख्या मोठी वाढल्यामुळें सोयीसाठीं पास झालेल्यापरिचारिकांचीं नांवें नोंदून त्यांचे प्रांतवार संघ केले आहेत. त्यामुळें सुशिक्षित परिचारिका कोणती व नामधारी परिचारिका कोणती हें कळून येतें.

ही हकिगत देण्याचें कारण शिक्षणाचा इतिहास व प्रगति कळावी व त्याच धरोणावर या देशांत या शिक्षणाचा पाया कसा घातला जात आहे, याचें ज्ञान व्हावें. या देशांतहि हल्ली इलाखानुसार परिचारिकांचे संघ तयार केले आहेत. निरनिराळया शहरीं तथील सिव्हिल सर्जन, इतर अधिकारी, व एखाद-दुसरा खाजगी गृहस्थ यांच्या स्थानिक कमिटया नेमिल्या आहेत. या कमिटया त्या त्या शहरांतील आतुरालयांमध्यें शिकत असलेल्या व शिक्षणेच्छु परिचारिकांच्या सुखसोयी व शिक्षणसाधनसामुग्रीवर देखरेख ठेवितात. व यासाठीं त्यांच्या वेळोवेळीं सभा भरतात. अशा कमिटया मुंबईस अहमदाबाद, विजापूर, नाशिक, अहमदनगर, पुणें या शहरीं स्थापन झाल्या आहेत व त्यांच्या विद्यमानें असणार्‍या आतुरालयांत परिचारिकांनां शिक्षण देण्यांत येतें. येथें पास झालेल्या व नोंदलेल्या परिचारिकांचे उपरनिर्दिष्ट शहरीं स्थापित झालेले संघ आहेत.

वरील परिचारिकांचे अनेक संघ व कमिटयांपैकीं पुणें येथील सेवासदन या संस्थेच्या विद्यामानें १९११ सालीं स्थापित झालेला एक परिचारिकासंघ व कमिटी आहे. हिच्या मार्फत शिक्षणेच्छु परिचारिकांनां (१) रुग्णशुश्रूषा (२) सूतिकाशास्त्राचा लहान अभ्यासक्रम (३) व सूतिकाशास्त्राचा दीर्घ अभ्यासक्रम येणेंप्रमाणें परिचारिका व सुईणी तयार करण्याचा उपक्रम सुरुं होऊन, त्याची बरीच प्रगति होत आहे. १९२३ सालापासून या बायांनां सार्वजनिक आरोग्य व विषयावरहि शिक्षण देण्यांत येतें.

रुग्णशुश्रूषेच्या वरील तीनचार विद्याशास्त्रशाखांखेरीज ग्रेटब्रिटन देशामध्यें आणखी किती शाखांतर्गत शुश्रूषेचें शिक्षण दिलें जातें याचें थोडें दिग्दर्शन येथें करितों, तें यासाठीं कीं, त्याचेंहि अनुकरण ह्या व इतर प्रातांत व्हावें. केवळ सूतिकाशास्त्राचें शिक्षण घेतलेली परिचारिका वाटेल त्या रोग्यास उपयोगीस पडते असें नाहीं, म्हणून जितकें अधिक विशिष्टीकरण या धंद्यांत व विद्येंत असेल तितकी या परिचारिकांची उपयुक्तता वाढेल, असा भरंवसा आहे.

(१) ज्वरशुश्रूषा- निवळ ज्वराच्या रोग्यासाठींच वेगळें आतुरालय असणें उत्तम आहे. येथें शिक्षण घेतलेल्या परिचारिका शुश्रूषेंत अनुभावामुळें अधिक तरबेज होतात. (२) वेडयाचें आतुरालय - येथें वेडयाच्या शुश्रूषेचें काम शिकविण्यास ३ वर्षांचा अभ्यासक्रम व व्यवस्था असते. वेडया माणसाची सुश्रूषा करणें किती अवघड आहे याची कल्पना विचारांतीं होईलच (३) खेडेगांवातीलपरिचर्या - येथें झोपडयांतून रहाणार्‍या गरीब जनतेमध्यें खेडेगांवांतील मध्यम पण अशिक्षित लोकांमध्यें शहरांत सहज मिळणार्‍या (बर्फ, बर्फाची पिशवी, बेडपॅन, थर्मामिटर कोलनवॉटर, इतर औषधें इत्यादि) रोग निवारक साधनांच्या अभावीं कसें काम करावें त्याची माहिती देण्यांत येते. (४) सूतिकारुग्णशुश्रूषा - याचेंच नेहमीं कारण पडत असल्यामुळेंव साडेतीन वर्षें शिकलेल्या सुशिक्षित सुईणींची संख्या गरजेपेक्षां अल्प असल्यामुळें तीन व सहा महिन्याचे छोटे अभ्यासक्रम ठेविले आहेत. (५) पुरुषपरिचारक - अनेक दृष्टींनीं विचार केला असतां पुरुषपरिचारकहि तयार करणें या देशांतील परिस्थितीस बरेच फायदेशीर व इष्ट आहे असें वाटतें. यूरोपांत मात्र याचा प्रघात कमी आहे. सैन्य, आरमार, व इतर अनेक ठिकाणीं पुरेशा स्त्रीपरिचारिकांच्या अभावीं याचा प्रयोग करुन पहाणें इष्ट आहे. (६) अंग रगडणें, चेपणें, चोळणें व चंपी करण्याचि शुश्रूषा - या इलाजांनीं कांहीं प्रकारचा रोगपरिहार होतो; परंतु हें चोळणें, चेंपणें सशास्त्र व तें शिक्षण घेतलेल्या माणसांकडून झालें पाहिजे. यासाठीं स्त्री अगर पुरुष परिचारक तयार करावेत. (७) बालशुश्रूषा हेंहि एक स्वतंत्र शिक्षण मानून एक अगर दोन वर्षांमध्यें तें दिलें जातें. तें घेण्यासाठीं निवडलेल्या परिचारिका वर सांगितलेल्या किमान कमी वयोमर्यादेपेक्षांहि अंमळ लहान असल्या तरी घेण्यांत येतात. यांच्या पगाराचें मानहि अंमळ कमी असतें.

परिचारिकांनीं १० वर्षें आतुरालयांत चांगलें काम केल्यावर त्यांनां धंदा सोडून घरीं स्वस्थ बसावें असें वाटल्यास त्यांनां थोडें पेन्शन इंग्लंडादि देशांत देण्यांत येतें; परंतु पेन्शन न घेतां काम करीत राहिल्यास ५५ वयापर्यंत त्यांनां काम करूं देतात. या वयानंतर मात्र त्यांनीं हें काम करूं नये असा नियम आहे. दहा वर्षें कामानंतर या ५५ वयापर्यंत मध्यें केव्हांहि काम सोडलें तरी चाकरीच्या जुनाटपणाच्या मानानें पेन्शची रक्कम वाढत जाते. हिहि सुधारणा आपल्याकडील संस्थांनीं अनुकरणीय आहे व त्यामुळें परिचारिकांनां आपल्या एकाच धंद्यास चिकटून रहाण्यास उत्तेजन मिळेल. इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि बेलजियम या देशांत आतुरालयांत धार्मिक पंथानुवर्ती परिचारिकागण असतो व तो आपलीं कामें आस्थेनें व प्रेमानें करीत असला तरी त्यांचें शिक्षण आधुनिक पद्धतीचें नसल्यामुळें त्या परिचारिका बर्‍याच अडाणी असतात व म्हणून तेथील सधन वर्ग जरुर पडल्यास इंग्लंड व इतर देशांतून परिचारिका आणवितात. ऑस्ट्रिया देशांतील वैद्यक ज्ञानाची व प्रख्यात आतुरालयांची ख्याति आहे पण परिचारिकागण अशिक्षित व गचाळ असतो. रशिया, प्रान्स, जर्मनी, हालंड, बेलजियम, येथें हुषार आधुनिक शिक्षित परिचारिका आहेत. या धंद्यासंबंधीं इंग्लंडसारख्या पुढारलेल्या देशांतहि अद्याप जरुर वाटत, असलेल्या गरजांचा व त्यांनां भासत असलेल्या दोषांचा उल्लेख मार्गदर्शनासाठीं पुढें करीत आहो. या धंध्यांत पडणार्‍यांनां प्रथम त्यांतील कष्टांची व जिकीरीची कल्पना नसते व त्यामुळें रोग्याचें व आतुरालयाचें नुकसान होतें. परिचारिकेची प्रकृति दगदग सोसण्यासारखी उत्तम व सुदृढ असावी. स्वच्छपणाची खरीखुरी आवड असून स्वभाव मनमिळाऊ व शांत असावा, चिडखोर नसावा. तिच्या अंगी आत्मसंयमन चांगलें असून ती बुद्धिमान, चलाख व कर्तव्यनिष्टेची उत्तम जाणीव असलेली अशी पाहिजे. कारण आतुरालयामुळें घरगुती ठिकाणीं व खेडेंगांवीं रोगशुश्रूषा करणें झाल्यास नेहमींच्या साधनांच्या अभावीं काम चालवून घेतलें पाहिजे. उत्तम खेळती हवा, उजेड व स्वच्छता हीं अशा ठिकाणीं नसलीं किंवा कमी असलीं तरी हरप्रयत्नानें आपलें काम लोकांचीं मनें वळवून साध्य करणें यांत व्यवहारचातुर्य व वैद्यकशास्त्राचीं खरीं तत्वें जाणणारी परिचारिका असावी. पढतमूर्ख, व्यवहारशून्य व पोशाखी अशी परिचारिका, डॉक्टर अगर वैद्य कोणीच नसावें. जें जें त्या वेळेस साध्य व अनुकूल आहे, त्याचाच उपयोग करुन काम शास्त्रशुद्ध रीतीनें पार पाडण्यास या पायांची आरंभीची व नंतरची शैक्षणकि पात्रता जितकी उत्तम असेल तितकी चांगली. उत्तम शिक्षण याचा अर्थ अयोग्य व भरतें पोशाखी शिक्षण असा होऊं नये व तसा अर्थ होण्याची भीति इंग्लंडादि देशांतहि वाटत आहे. वर पुरुष परिचारिकांचा उल्लेख करण्यांत आला आहेत. जर्मनी देशांतील प्रोफेसर व्हिरचो याचें मत पुरुष परिचारिकांस अनुकूल असेंच आहे. ते म्हणतात, 'पुरुष रोग्यांची शुश्रूषा पुरुषान करणें उत्तम व खरोखर फायदेशीर आहे. एखादा पुरुष रोगी बेशुद्ध होऊन पडला असतां तो स्त्री परिचारिकेस प्रांय: उचलून बिछान्यावर ठेवितां येत नाहीं व जरी त्यास उचलतां आलें तरी तिनें तसें करणें व्यवहारदृष्टया गैर आहे.' अशा प्रसंगीं व मलमूत्रविसर्जनाच्या प्रसंगीं पुरुष रोग्यास संकोच झाल्यास नवल नाहीं. मूत्रपात्र व मलपात्र परिचारिकेनें आणून हे विधी करण्यापेक्षां आम्हांस ते करण्याची इच्छा नाहीं असें संकोचामुळें सांगून बरेचसे पुरुषरोगी आपल्या प्रकृतीस अपाय करुन घेतात असा इंग्लंड व यूरोपांतहि अनुभव आहे. व स्त्रीरोग्यास परिचारिका व पुरुषास परिचारक असावेत असें तिकडे जबाबदार लोक म्हणतात. परंतु तें कृतींत येत नाहीं म्हणून या संप्रदायाचें वरच्याप्रमाणें केवळ एकांगीं अनुकरण न होतां स्त्री व पुरुष परिचारक तयार करणें इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे हें आपला अफाट देश, नाना पंथ, नाना जाती, नाना धर्म, नाना प्रांत, नाना समजुती व गोषा इत्यादि चाली ध्यानांत आणू तारतम्य मानानें जरुर ठरवावें. शिवाय, वरील कारणांमुळें रोग्यांच्या मोठया संख्येस स्त्रीपरिचारिकांचा योग्य पुरवठा कधींहि पुरा पडणार नाहीं हेंहि एक पुरुषपरिचारिकांच्या तर्फें सबळ कारण आहे.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .