विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शूर्पणखा- रावणाची भगिनी. दंण्डकारण्यांत राम आल्यानंतर त्याचें रूप पाहून ही भाळली व रामास मला आपली भार्या कर असें विनवूं लागली. रामानें नकार दिल्यावर ती सीतेस मारण्यास निघाली. तेव्हां रामाच्या आज्ञेवरुन लक्ष्मणानें तिचें नाक-कान कापून तीस विद्रुप केलें.