विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शेगांव- वर्हाड, बुलढाणा जिल्हा, खामगांव तालुका. जी.आय.पी. रेल्वेचें स्टेशन. हें भुसावळ-नागपूर फांटयावर आहे. रेल्वे सुरू होण्यापूर्वी यास फारसे महत्व नव्हतें. परंतु हल्ली तें भरभराटीस येत चाललें आहे. लोकसंख्या सुमारें १५०००. येथें कापसाचा व्यापार बराच चालत असून येथें बरेच सरकी काढण्याचे आणि रुई दाबण्याचे कारखाने आहेत. येथें बाजार दर मंगळवारीं भरत असून धान्य व गुरें यांचा व्यापार चालतो. रेल्वेस्टेशन, सराई, डाक बंगला, पोलीस कचेरी, सरकारी मोफत दवाखाना, इंग्रजी मराठी शाळा, हिंदुस्थानी शाळा आणि मुलींची शाळा वगैरे आहेत. येथील म्युनिसिपालिटीची स्थापना १८८१ मध्यें झाली.