प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
 
शेळयामेंढया, मेंढया- शेळयामेंढया हे प्राणी मनुष्यमात्राच्या फार उपयोगाचे आहेत. मेंढीच्या लोंकरीची बनत, ब्ल्यांकेट, सतरंज्या, गालीचे, घोंगडया, बुरणूस (जीन-लहान-बुरणूस, छाप घोडयाच्या पाठीवर घालण्याचा नमदा) वगैरे करतात. या दोन्हीं प्राण्यांचें मांस खाण्यास उपयोगी पडतें. मेंढीचें मांस जास्त चवदार असतें. मेंढया व शेळया यांच्या खतामुताचा शेतें खतविण्याच्या कामीं उपयोग होतों.

मेंढया व शेळया पाळणें व त्यांचें संवर्धन करणें हें हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून चालू आहे. गांधारदेशांतील मेंढयांची लोंकर चांगली असते. साधारण मेंढीची किंमत गाईच्या किंमतीच्या निमी असते. मेंढी व बकरी यांच्या दुधापासून लोणी काढीत असा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशाश्त्रांत आढळतो. त्याचप्रमाणें वेदकाळीं शेळया व मेंढया त्यांच्यापासून मिळणार्‍या लोंकरीकरितां व चामडयाकरितां पाळीत, त्यांनां कुरणांत चारीत वगैरे उल्लेख वेदग्रंथांतून आढळतात. याशिवाय यज्ञयागादि कर्मांत बकरा, मेंढी यांच्या मांसाचा देवतोद्देशानें योग करीत. प्रसिद्ध झालेल्या सरकारी आंकडयांवरून पहातां इ.स. १९१४।१५ सालीं ब्रिटिश हिंदुस्थानांत मेंढया व शेळया सर्व मिळून ५ कोटी ६३ लक्ष होत्या त्यापैकीं २ कोटी ३० लक्ष मेंढरें असून ३ कोटी ३३ लक्ष शेळया मद्रास, मुंबई, संयुक्तप्रांत, बहार, ओरिसा आणि पंजाब या भागांत आहेत.

मेंढया पाळणें आणि लोंकर व लोंकरीच्या कापडाचा व्यापार करणें हें जरी जगांतील सर्व देशांत आढळून येतें तथापि मेंढयांचा भरणा ऑष्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व हिंदुस्थान या देशांत जास्त आहे. याशिवाय चीन, इराण, रशिया, तुर्कस्तान, ईजिप्त, उत्तर अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल वगैरे प्रांतांत मेंढया बर्‍याच पाळितात. या देशांतूनच बहुतेक कच्च्या मालाच पुरवठा होतो. यूरोपांत लोंकरीचा व्यापारधंदा फार पुरातन काळापासून चालत असून त्या धंद्याला अठराव्या शतकाच्या शेवटीं कापसाच्या व्यापारामुळें थोडा धक्का बसला. तथापि कापड विणण्याच्या यंत्रसामुग्रीचा १८ व्या व १९ व्या शतकांत जास्त प्रसार झाल्यानें हा धंदा जास्तच वाढला.

देश व हवामानपरत्वें हिंदुस्थानांत मेंढरांच्या अनेक जाती आढळतात. कांहीं कांहीं जातीचें मांस चवदार असतें व कांहींची लोंकर लांब व तलम असून मांच कमी प्रतीचें गणलें जातें. एकंदरींत पाश्चात्य देशांत मांस व लोंकर सुधारण्याकरितां जसे प्रयत्न करण्यांत आले आहेत तसे प्रयत्न इकडे इंग्रजी राज्य सुरु झाल्यापासून वेळोवेळीं परंतु जुजबी झाले व ते बहुतेक निरर्थक ठरले असें मे. ऑलिव्हर साहेब, सुपरिंटेन्डट पशुवैद्यक खातें संयुक्त प्रांत हे आपल्या सन १९१५ सालीं प्रसिद्ध केलेल्या मेढयांच्या सुधारणेसंबंधीं प्रयोगाच्या हकीकतींत लिहितात. ते म्हणतात 'बिकानेर, बुंदेलखंड, मथुरा वगैरे ठिकाणीं मेढयांच्या उत्पत्तीला हवामान योग्य असून त्यांची लोंकरहि बरी असते. गेल्या १०० वर्षांत ऑष्ट्रेलियन मेंढरांतजी सुधारणा दिसून येते त्यांचे पूर्वज हिंदुस्थानांतील माद्या व केपकॉलनींतील नर होत. व हल्लीची सुधारलेली जातहि ऑस्ट्रेलियांतील मादी व मेरीनो नर यांची संतति आहे' इ.स. १९१२ सालीं संयुक्तप्रांतांत प्रयोगास सुरुवात होऊन न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांतून नर आणविले. देशी माद्य व वरील नर यांच्या अवलादींत लोंकरींतच सुधारणा झाली आङे. पहिल्या कातरणीची २॥ पौंड पर्यंत लोंकरनघते व दुसर्‍या कातरणीची ३॥ पौंड पर्यंत भरते. २ वर्षांच्या मेंढीपासून ५-६ पौंड लोंकर मिळते. देशी मेंढीपासून १॥ ते २ पौंड लोंकर निघते. बांडा, मथुरा, अलहाबाद, मुरादाबाद, मिर्झापूर येथें प्रयोग सुरु आहेत. इकडे ग्रेडिंगची पद्धतच स्वीकारिली पाहिजे. कारण परदेशांतील मेंढे इकडे टिकत नाहींत. वरीलप्रमाणेंच अफगाणिस्तानाकडील डुम्बा मेंढा आणून देशी मेंढयांशीं पुणें फार्मावर संकर करण्याचे प्रयोग करण्यांत आले. त्यांच्या अवलादींत मांस सुधारुन शिवाय कांहीं अंशीं लोंकरहि लांब व तलम झाली होती. अहमदनगर येथें इ.स. १८९३-९४ च्या सुमारास व्हेटरिनरी कॅप्टन मॉर्गन साहेब यांनीं बहुचिस्तान, राजपुताना, उत्तरसिंध व ऑष्ट्रेलियातील मेरिनो जातीच्या मेंढया व नरआणून दक्षिणेंतील मेंढया सुधारण्यासाठीं प्रयत्न केले व ते बरेचसे सफल जाले होते असें सन १८९५ सालच्या ऍग्रिकल्चरलेजर नंबर १८ यांत नमूद केलें आहे.

धनगर लोक मेंढयांचे कळप घेऊन उघाडीच्या दिवसांत पिके निघाल्यावर लागवडीच्या भागांत नेतात. मेंढरांनां दिवसभर इकडे तिकडे फिरून चारितात व रात्रीं तीं शेतकरी लोकांच्या शेतांत जाळयांत (वागरींत) कोंडितात. यानें शेतांनां खत-मुताचा फायदा होतो. व त्याचा मोबदला धनगरांनां शेतकरी लोक धान्याच्या रुपानें देतात.

मेंढी फळल्यापासून पांच महिन्यांनीं विते व तिला एकच कोंकरूं होतें. ओरिसा प्रांतांत कटकच्या आसपास मेंढीची एक जात आहे, तिला मात्र एखाच वेळीं दोन कोकरें होतात.

मेंढींचें वजन सरासरीनें ४० ते ५० पौंड असून त्यांस सुमारें २० ते ३० पौंड मांस असते. साधारण मेंढयाची किंमत ३।४ रुपये असून उत्तम तयार केलेल्या मेंढयाला ५।६ रुपये पडतात. तयार केलेल्या मेंढयाचें वजन ६०।७० पौंड असून त्यांत ३५।४० पौंड मांस असतें. मेंढयाच्या मांसाचा रंग मारबल कागदासारखा असल्यास तें उत्तम व चवदार गणलें जातें. ह्यांत मांस व चरबी समप्रमाणांत असतात.

मेंढरांची लोंकर कापण्यापूर्वी सुमारें ५।६ दिवस त्यांनां चांगलें धुतात. त्यांनां धुतल्यानें लोंकरींतील वाळू, माती, घाण वगैरे निघून जाते. प्रत्येक मेंढीपासून दर वर्षी सरासरीनें १॥ पौंड लोंकर मिळते व ती उत्तरगुजराथेंत काठेवाड व मारवाडांत २ पौंड पर्यंत भरते. वर्षांतून मार्च व आक्टोबरांत अशी दोन वेळां कातरणी करतात. मेंढयांनां पाश्चात्य देशांत अनेक तर्‍हेचे त्वचारोग होऊन त्यांच्या अंगावर उवा, लिखांसारखेहि बारीक कीटक होतात. तितके हिंदुस्थानांत होत नाहींत.

हिंदुस्थानांत डोंगरी व मैदानी अशा दोन्ही भागांत मेंढयाचा पुष्कळ भरणा आहे व त्यांत अनेक जाती आहेत. त्यांपैकीं कांहीं जातींची लोंकर बरीच चांगली असते. उदाहरणार्थ काश्मिरी, डुंबा (काबुली), पंजाबी, राजपुताना, पाटणा, कोइमतूरी, म्हैसुरी इत्यादि.

मेंढयांची उत्तम रीतीनें पैदास व्हावी म्हणूनपुढील गोष्टी लक्षांत ठेवाव्या (१) पैदासीसाठीं निवडक मेंढया व जातवान नर ठेवावेत ४०-५० मेंढ्यांनां एक या प्रमाणांत नर ठेवावे. (२) कळपांत नियमितकाळीं एक महिनाभर नर सोडावा. तो कळपांत नेहमीं राहिल्यास मेंढया सर्व वीत राहातील व कोंकरें अयोग्यकाळीं झाल्यास त्यांनां चारापाण्याची वाण पडेल व त्यांची मृत्युसंख्या वाढेल. नर कळपांत सोडला म्हणजे लहान माद्या वेगळया करुन चाराव्या. (३४) मेंढया पांच महिने गाभण राहतात हें लक्षांत ठेवून त्यांनां नर द्यावा. (४) वीण जाल्यावर सर्व निरुपयोगी व म्हातार्‍या मेंढया काढाव्या व त्यांनां चांगलें खाणें घालून त्या तयार करुन विकून टाकाव्या. त्याचप्रमाणें जे नर विकावयाचे असतील त्यांनां खच्ची करुन तयार करावें म्हणजे चांगली किंमत येईल. (५) मेंढी सुमारें १॥ वर्षाची झाल्यावर तिला नर दाखवावा. पुढें ती ६ वर्षांची होईपर्यंत बच्चे देत राहील. (६) मेंढयांपासून खत, लोंकर व किंमत यांचा फायदा घ्यावयाचा असल्यास त्यांनां चांगले खावयास घातलें पाहिजे. रोज थोडीशी पेंड, हरभरे, मका, गव्हांचा भुसा, कडधान्यांचें भूस व थोडेसें मीठ देत गेल्यास मेंढया लवकर तयार होतील. वरील फायदे त्यांनां नुसतें माळरानांत चारून होणार नाहींत.(७) चांगली लोंकर असलेल्या जातींत (पाटणा, कोइमतूर आणि म्हैसूरी) सुधारणा घडवून आणण्यास पुष्कळ जागा आहे. त्यांची लोंकर व मांसहि सुधारेल. या तिन्ही जातींच्या नरांचा व गांवठी (देशी) माद्यांचा संकर केल्यासहि पुष्कळ खार्यभाग होईल. शंभर मेंढया पाळण्यास चरणावळ व राखणावळ मिळून खर्च सुमारें १६५ रु. येऊन खत, लोकर व मेंढयाविक्री मिळून उत्पन्न ३१५ रु. होतें.

शेळया- शेळी ही गरिबाची गाय होय. तिचें दूध लहान मुलांनां व अशक्त माणसांनां पसंत करितात. शेळी बहुधां दुधासाठीं व तिच्या मांसासाठीं पाळितात. शेळी एक शेरापासून अडीच शेरांपर्यंत दूध देते. शेळींचें दूध औषधी समजलें जाते. क्षयी मनुष्यास तें फार उत्तम कारण शेळी सर्वप्रकारचा झाडपाला खाते. शेळीच्या जातींत क्षयरोग होत नाहीं असें वाग्भटादि आयुर्वेदाचार्यांचें मत आहे व तें अलीकडे पाश्चात्य डॉक्टरहि कबूल करुं लागले आहेत. पंजाबकडे बकर्‍यांच्या केंसाच्या दोर्‍या, बसण्याचीं तरटें, धान्य सांठविण्यासाठीं पिशव्या वगैरे करितात. चामडयाचीं बुकें बांधण्यास, हातमोजे करण्यास, व इतर हरतर्‍हेच्या कामाला त्याचा उपयोग होतो, लेंडया व मूत यांचा खताकडे चांगला उपयोग होतो. शिंगाच्या मुठी वगैरे करतात. बोकड (नर) मुद्दाम चांगलें खावयास घालून तयार केल्यास त्याचें चार महिन्यांत ७० ते ८० पौंड वजन भरतें व त्यापासून ४० ते ५० पौंडपर्यंत मांस मिळतें.

शेळयांचे स्वतंत्र कळप पाळीत नाहींत. शेळीची जात साधारपणें चपळ व तरतरीत असल्यामुळें ती मेंढयांच्या कळपांनां चालना देण्याकरितां १०० मेंढरांमागें सुमारें ८ ते १० शेळया ठेवितात. शेळी पांचसहा महिन्यांनीं फळते व पुढें दहाबारा वर्षेंपर्यंत बच्चे देते. ती पांच महिने गाभण रहाते. ठेंगण्या जातींत बारा महिन्यांत २ पासून ६ पर्यंत बच्चे होतात. उंच जातींत हें प्रमाण कमी असतें. शेळीस दर खेपेस १ ते ३ करडें होतात.

शेळीची किंमत साधारणपणें ३।४ रुपये येते. करडाला आठ-बारा आणे पडतात. चांगल्या दुभत्या शेळीला ८ ते १२ रुपये व कित्येक शेळयांस वीस रुपयेहि पडतात खच्ची केलेल्या बोकडाला ३ ते ५ रुपये किंमत पडते. याच्या चामडयाची किंमत १ ते १॥ रुपया येते. व कमावलेल्या चामडयाची किंमत १॥ ते २ रुपये होते.

मद्रासच्या दक्षिणसेस शेळयांचा रंग तांबूस असून जों जों कर्नाटकांत (दक्षिण महाराष्ट्राकडे) जावें तों तों तो जास्त काळा आढळून येतो व शेळया आकारांत लहान असतात. परंतु जों जों उत्तरेकडे जावें तो तों त्या मोठया, केसाळ, उठावदार, उंच व मोठया कानाच्या असतात. जबलपुराकडील शेळया मोठया व सुंदर असतात. दिल्लीकडील शेळयांचे कान तर फारस लांब व अगदीं लोंबते असतात.

शेळीची जात समुद्रसपाटीपासून तों थेट १३००० फूट उंची पर्यंतच्या भागांत आढळते. रानटी जात आशियामायनर, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान व सिंधप्रांतांत आढळते. ही जात मोकळया व थोडी झाली असलेल्या डोंगरावर कळप करुन रहाते. यांच्या चामडयाचा रानटी लोक पाणी व पीठ ठेवण्याकरितां पिशव्यांसारखा उपयोग करतात.

शेळयांच्या माणसाळलेल्या जातीपैकीं अंगोरा, काश्मिरी आणि सीरिया या मुख्य असून त्या त्यांच्या मऊ केंसाबद्दल प्रसिद्ध आहेत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .