विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्रीविल्लीपुत्तूर- मद्रास, रामनाद जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ४४० चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) २२१०७७. यांत ४गांवें व ९४ खेडीं आहेत. पूर्वभागांत कापूस पिकणारी जमीन आहे. श्रीविल्लीपुत्तूर हें मुख्य ठिकाण असून त्याची लोकसंख्या (१९२१) ६२३९०) आहे.