विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्रीशैलम्- मद्रास, कर्नूळ जिल्हा, नंदीकोटूर तालुक्यांतील एक देवस्थान या देवळाची लांबी ६६० फूट व रुंदी ५१० फूट आहे. सर्वभिंतींवर रामायण व महाभारतांतील प्रेक्षणींय प्रसंग उत्तम रीतीनें रेखाटले आङेत. देवालयाच्या मध्यभागीं मलिज्कार्जुनाची स्थापना केली आहे. या देवालयाची व्यव्सथा पुष्पगिरीचे श्रीशंकराचार्य यांच्याकड आहे. येथें दरवर्षी शिवरात्रीनिमित्त यात्रा भरते.