विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
ष- या अक्षराच्या पुढील अवस्था दिसतात- पहिली ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकांतील घोसुंडी येथील शिलालेखांत, दुसरी कुशानवंशी राजांच्या वेळच्या (इ.स. पहिलें व दुसरें शतक) मथुरा, सारनाथ वगैरे ठिकाणच्या लेखांत; तिसरी यशोधर्मन् (विष्णुवर्धन) राजाच्या काळांतील मंदसारेच्या लेखांत (इ.स. ५३२); आणि ४ थी तोरमाणच्या लेखांत.