प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
 
सकंटकतनु- पृष्ठवंश प्राण्यांच्या विभागाच्या संघांपैकीं संकटकतनु प्राण्यांचा एक संघ आहे. या संघांतील सर्व प्राणी समुद्रांत राहणारे असून त्यांची हालचाल मंद गतीनें होत असते. बहुतेक प्राणी मोकळे असे वावरणारे असतात परंतु कांहीं प्राण्यांत देंठाप्रमाणें वाढलेल्या एका शरीराच्या भागानें ते बाह्य वस्तूला चिकटून राहतात. या संघांतील प्रत्येक प्राणी व्यक्तिश: निराळा असतो. यांची वाढ शाखा फोडून झालेल्या संयुक्त प्राण्यांप्रमाणें कधींच होत नाहीं. या संघांतील निरनिराळया वर्गांत प्राण्याच्या शरीराची आकृति भिन्न भिन्न असते व ती तशी असली तरी या प्राण्यांच्या शरीराचे भाग तारकित (रेडिअल) असे झालेले दिसतात व त्यामुळें त्यांचें अगंसादृश्य किंवा शरीराची आकारशुद्धता (सिमेट्री) बाह्यतः तारकित अशी दिसते. परंतु सूक्ष्म रीतीनें निरीक्षण केलें असतां असें आढळून येईल कीं, त्यांचया शरीराची ठेवण प्रथमतः पार्श्वभागीं आकारशुद्ध अथवा उभयांगसदृश अशी झालेली असते. ह्या तारकिंत अंगसादृश्यामुळेंप्राचीन प्राणीशास्त्रज्ञांनीं या संघाचा शरीरात्रेकगूहकांच्या संघांशीं जवळचा अन्योन्य संबंध आहे असें प्रतिपादन केलें होतें. वास्तविक पाहतां या दोन संघांमध्यें शरीररचनेसंबंधीं फारच थोडें साम्य आहे. तशांतून या संकटकतनु प्राण्यांच्या प्रजेंत ती विकास पावत असताना त्यांची परिपूरार्तावस्थेंतील शरीराकृति उभयांगसदृश अशी झालेली असते तशी ती शरीरांत्रैक गृहकांमध्यें नसतें.

या संघांतील प्राण्यांत चुनखडीक्षाराचीं अनंत तगटें बनवून त्याचें एक कवच तयार करण्याकडे व तें धारण करण्याकडे बहुधा प्रवृत्ति दिसून येते व या कवचाच्या तगटानां हालणारे किंवा अचल असे कंटक बनून राहिलेले असतात. या लाक्षणिक चिन्हांमुळें या संघांतील प्राण्यांनां संकटकतनु हें नांव पडलें आहे.

या सकंटकतनु प्राण्यांत शरीरगुहा, तसेंचपचनेंद्रियव्यूह व ज्ञानेंद्रियसमूह हीं चांगल्यारीतीनें विकास पावलेलीं असतात. या संघांतील प्राण्यांत एक विशिष्ट तर्‍हेचा नलिकासमूह ज्याला पादनलिकासमूह म्हणतात आणि ज्याच्यामुळें शरीराची हालचाल घडून येते व दुसर्‍या कांहीं व्यापारांत ज्याचा उपयोग होतो तो झालेला अशतो. या पादनलिकासमूहांतील मुख्य अवयव ज्यांच्यामुळें शरीराची हालचाल घडून येते ते संकोचन व स्थितिस्थापक असा रीतीच्या नलिकांचे झालेले असतात व त्यांनां पादनलिका म्हणतात. या पादनलिकांच्या रचनेप्रमाणें शरीराची साधारण ठेवण व आकृति झालेली असते. या संघांतील बहुतेक प्राण्यांच्या प्रत्येक पादनलिकेच्या अंतिम टोंकाला एकेक चोषणचकती लागलेली असते; तिच्या साहाय्यानें या प्राण्याला बाह्यवस्तूला चिकटतां येतें. अंतरिंद्रियांचीहि रचना बहुतेक तारकित अशा रीतीनेंच झालेली असते. प्रजाजनकत्वासंबंधीं पाहिलें असतां या संघांतील प्राण्यांत लिंगभेद झालेला असतो व त्याअन्वयें प्रजोत्पत्ति होते. मादी अंडीं घालते व तीं फलद्रूप होऊन विकास पावतांना वर सांगितल्याप्रमाणें त्यांपासून प्रथमतः उभयांगसदृश अशी प्रजा निपजते व नंतर त्यांचें रुपांतर होतें.

या संघांतील प्राण्यांचें वर्गीकरण करण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या रचनेसंबंधीं व अंतरिंद्रियांच्या रचनेंसंबंधीं थोडीशी साधारणतः माहिती होण्यास स्टारफिश या प्राण्याचें संक्षिप्त वर्णन दिलें असतां चालेल म्हणून तें पुढें दिलें आहे.

स्टारफिश- स्टारफिश प्राण्याच्या शरीराची रचना तारकित असून त्याच्या शरीराचा मध्यभाग गोल-चपटा असतो व त्या भागापासून त्रिकोनी दलरुपी पांच गात्रें आकारशुद्ध किंवा अंगसदृश अशा रीतीनें वाढलेलीं असतात. याच्या शरीराची त्वचा जाड व कठिण असते व तिला चुनखडीक्षाराचीं तगटें पुष्कळ लागलेलीं असतात. हीं तगटें म्हणजे एकप्रकारचें शरीरावर असलेलें कवचच होय व हें कवच अगदीं ताठ असें बनलेलें नसून प्राण्याच्या जिंवतपणीं शरीराला हालचाल करतां येईल अशा तर्‍हेनें त्यामध्यें बराच लवचिकपणा असतो. शरीराचे पृष्ठ व उदरतल असे दोन भाग चांगले व्यक्त झालेले असून हे प्राणी पाण्यांत इतस्ततः वावरत असतांनां त्यांचा पृष्ठभाग वरची दिशा दाखवितो व उदरतलभाग कालची दिशा दाखवितो. पृष्ठभाग थोडासा बाह्यगोल असतो तर उदरतलभाग सपाट असतो. उदरतल भागाच्या मधोमध एक पंचकोणाकृति छिद्र असतें व त्याच्या पांच कोणांपासून समोर तारकित अशा रीतीं उभ्या पांच अरुंद खांचण्या-ज्यांना पादनलिकाखांचणी म्हणतात त्या निघतात. ही प्रत्येक उभी पादनलिकाखांचणी प्रत्येक गात्राच्या उदरतलाच्या मध्यभागीं त्याच्या शेवटापर्यंत पसरलेली असते. या पादनलिकाखांचणीच्या प्रत्येक कांठाला हालणार्‍या अशा दोन तीन रांगा चुनखडीक्षाराच्या कंटकांच्या लागलेल्या असतात. या हालणार्‍या कंटकांच्या बहिर्भागीं आणखी तीन रांगा अचल अशा कंटकांच्या लागलेल्या असतात व त्यांच्याहि बहिर्भागीं म्हणजे गात्रांच्या कांठालाहि कंटक लागलेले असतात. बाह्यगोल अशा शरीराच्या पृष्ठभागाला आंखूड व जाड असे पुष्कळ कंटक क्रमरहित अशा रीतीनें लागलेले असतात व ते गात्रांच्या सबंध लांबीपर्यंत पसरलेले असतात. हे शवेटचे कंटक त्वचेमध्यें जीं अव्यवस्थित रीतीनें झालेलीं तगटें असतात त्यांच्यावर बसलेले असतात. या तगटांच्यां मध्यंतरांतील साधारण मृदु अशा त्वचेच्या भागांत सूक्ष्मदर्शकांच्या साहाय्यानें दिसणारीं अशीं अगदीं सूक्ष्म रंध्रें असतात. या प्रत्येक रंध्रांतून श्वेतत्वचेचीं झालेलीं, अगदीं सूक्ष्ममृदुतंतुवत् जलश्वसेंद्रियें बाहेर येऊन लोंबकळत असतात व तीं प्राण्याला आंत ओढून घेतां येतात. यांनां त्वकजलश्वसेंद्रियें म्हणतात.

शरीराच्या पृष्ठभागावर बहुतेक मधोमध मलद्वार झालेलें असते. त्याच भागावर एकमेकांच्या बाजूंनां असलेल्या दोन गात्रांच्या आरंभींच्या भागांच्या अगदीं मध्यंतरांतील मध्य भागावर एक साधारण गोलाकार चपटी चाळणीसारखी चकती बसलेली असते ती पादनलिकासमूहांच्या ऊर्ध्वनलिकेचें बाह्य छिद्र होय. शरीराच्या एका बाजूस हे चकतीप्रमाणें अवयव लागलेले असल्यामुळें स्टारफिश प्राण्याच्या शरीराचें तारकितांगसादृश्य बिघडून जाऊन त्याला उभयांगसादृश्य रुप आलेलें आहे. कारण एखा ऊर्ध्वक्षेत्रापेक्षां जास्त क्षेत्रांनीं या प्राण्याच्या शरीराच्या दोहोंबाजूंस सारखे असे विभाग या चाळणीसम चकतीमुळें पडणें अशक्य होतें.

उदरतलावरील मुखाच्या भागावरच्या कंटकांनां, तसेंच त्यांच्या मध्यंतरांतील भागावर व पृष्ठभागाच्या कटंकांच्या मध्यंतरांतील भागांवर एक प्रकारचे फार सूक्ष्म व चमत्कारिक तर्‍हेचे कंटक लागलेले असतात त्यांनां ''पेडीसिलेरिया'' महणतात. या पेडीसिलेरिया कंटकांनां लांब किंवा आंखूड असा लवचिक दांडा असतो व या दांडयाच्या टोंकाला एक वाटोळें तळ तगट झालेलें असून त्याला जोडून पुढें लांब जबडयासारखीं हालणारीं अशीं दोन तगटें लागलेलीं असतात. ह्या दोन तगटांची हालचाल पक्ष्यांच्या चोंचीप्रमाणें होत असते व ती त्यांनां लागलेल्या मांसपेशींनीं अथवा स्नायुपेशींनीं घडवून आणली जाते.

गात्रांच्या उदरतलाच्या मध्यभागावरील प्रत्येक पादखांचण्यांत दोन दुहेरी पादनलिकांच्या ओळी झालेल्या असतात. या पादनलिकांच्या बाहेरच्या शेवटांनां चोषणचकत्या लागलेल्या असतात. शरीराची हालचाल घडवून आणणारे हे अवयव होत. हालचाल करतांना हा प्राणी त्या नलिका आंत ओढून घेऊं शकतो. ज्या दिशेस प्राण्यास जावयाचें असेल त्या दिशेस ह्या पादनलिका क्रमाक्रमानें बाहेर पसरत जातात व त्यांचीं टोंकें बाह्यवस्तूला चिकटल्यावर पुन्हां तीं क्रमानें आंत ओढून घेतलीं जातात. एकंदरींत आळीपाळीनें होत असलेल्या या पादनलिकांच्या संकोचविकासामुळें प्राणी पुढेंमागें जाऊं शकतो. ह्या प्राण्याला उलटा करुन पृष्ठभागावर टेंकून ठेविलें असतां तो ह्या पादनलिकांच्या साहाय्यानें परत सुलटा होऊं शकतो. गात्रांतील पादखांचणीच्या शेवटल्या अंतिम टोंकाला एक लहान लाल भडक ठिपका असतो तो या स्टारफिश प्राण्याचा नेत्ररूपी अवयव होय. व या लाल ठिपक्याच्या वरच्या बाजूस मध्याला पादनलिकेप्रमाणें एक लहान नलिका परंतु चोषणचकतीशिवाय लागलेली असते तिचा घाणेंद्रियाप्रमाणें उपयोग होतो. डोळयांपेक्षां या घ्राणेंद्रियांचाच या प्राण्याला बहुतेक जास्त उपयोग होतो व त्यांच्या इंद्रियगोचरतेनें हा प्राणी आपलें भक्ष्य मिळवूं शकतो. कडेकडेनें कापून व पृष्ठभागावरील मलद्वाराजवळचा आंत्राचा शेवट कापून या प्राण्याचीं दोन शकलें केलीं असतां व वरचें शकल अलगत उचलून घेतलें असतां पचनेंद्रियव्यूहाची रचना व अंतरिंद्रियें ह्यांविषयीं चांगला बोध होतो व तीं बरोबर दिसतात. पचनेंद्रियव्यूहाचे अनेक निरनिराळे भाग आहेत ते येणेंप्रमाणें- उदरतलभागावर मुखद्वार असून त्यापासून अगदीं आंखूड असा अन्ननलिकेचा भाग झालेला असतो. तो वरच्या अंगाला पूर्व आमाशयामध्यें उघडतो. हा आमाशयाचा भाग पातळ परंतु विपुल व गड्डेदार अशा एका शिथिल पोत्याप्रमाणें झालेला असून तो प्राण्याला मुखद्वारावाटें शरीराच्या बाहेर काढतां येतो.

या पूर्व आभाशयाच्या पुढचा वरला भाग पंचकोणाकृति पोकळ चपटा असा असतो, त्याला पश्चिम आमाशय म्हणतात. याच्या पोकळीच्या प्रत्येक कोनापासून प्रत्येक गात्रास झाणारी एक नलिका निघते. ह्या नलिकेचे गात्रांत दोन भाग होऊन ते संबंध गात्रभर पसरलेले असतात. या प्रत्येक भागाला अनेक लहानलहान अंधभाग पिशव्यांप्रमाणें लागलेले असतात. या अंध पिशव्यांनां आंतून रसपेशी लागलेल्या असतात व त्यांच्यापासून एक पाचक रस उत्पन्न होतो. तेव्हां या पिशव्यांनां पचनपिंड म्हणण्यास हरकत नाहीं. हे वर सांगितलेले सर्व भाग शरीरगुहेमध्यें तिच्या पृष्ठाला आंत्रकलेनं लागलेले असतात. पंचकोणाकृति पश्चिम आमाशयाच्या मध्यभागापासून अगदीं थोडा असलेला असा आंत्रांचा भाग निघतो व तो शरीराच्या पृष्ठभागावर मलद्वारानें बाहेर उघडतो. या आंत्राच्या भागालाहि पिशव्या लागलेल्या असतात. स्टारफिश प्राणी बहुतकरुन आपली उपजीविका द्विपुटकवचमृदुकायांवर करीत असतात तरी ते दुसरे प्राणी सुद्धं भक्षण करितात. स्टारफिश प्राणी आपल्या भक्ष्यासभोंवतीं गात्रांचें वेष्टन देतो व तें दिल्यावर पूर्वआमाशयाचा भाग मुखद्वारावाटे बाहेर काढून तो सभोवतीं वेटाळतो व नंतर लगेच पश्चिम आमाशयांतून पाचकरस त्यांत बाहेर येऊं लागतो व त्याच्या पोंकळींत सांचतो. या पाचकरसाच्या क्रियेनें भक्ष्याच्या पचनीय भागांचें पचन होण्यास सुरुवात होऊन ते पचले जातात व तसें झाल्यावर तो सर्व रस आंत शोषून घेतला जातो आणि राहिलेले अपचनीय भाग मलद्वारानें बाहेर टाकले जातात. अशा चमत्कारिक रीतीनें अन्नपचनाची क्रिया या प्राण्यांत होत असते. अन्नाचा भाग पश्चिम आमाशयाच्या पिशव्यांमध्यें केव्हांहि जात नाहीं.

ज्ञानेंद्रियासमूहाची रचना शुद्ध चमत्कारिक रीतीची झालेली आङे. बाह्यत्वचेखालीं ज्ञानतंतूंचें जाळें पसरलेलें असून त्यांत कांही ज्ञानपेशीहि असतात. एकंदरींत म्हणावयाचें हें कीं सर्व शरीराला जणू कांहीं ज्ञानतंतूंचें आच्छादनें झालेलें असतें. या पसरलेल्या ज्ञानपेशी व ज्ञानतंतूंचें जाळें यांपैकीं कांहीं शरीराच्या अंतर्भागांत एकवटून जाता व त्यांचा एक समूह बनल्यासारखा दिसतो व यालाच या प्राण्याचा मध्यवर्तीज्ञानेंद्रियसमूह म्हणतात.

हा समूह एक पंचकोनाकृति वर्तुलाकार वलय व त्याच्या कोनापासून निघालेल्या तारकित गात्ररज्जू यांचा झालेला असतो. हया सर्व ज्ञानपेशी व सर्व ज्ञानतंतू हीं हा प्राणी विकास पावत असतांना त्याच्या बाह्यास्तराच्या पेशींचें रुपांतर होऊन झालेलीं असतात. प्रत्येक गात्रांत पादनलिकाखांचणीच्यावर परंतु तारकित उदकनलिकेच्या खालीं एक ज्ञानरज्जू गेलेली असते तिला तारकित ज्ञानरज्जू असें म्हणतात. या सर्व गात्रज्ञानरज्जू शरीराच्या अंतर्भागांत एका पंचकोणाकृति ज्ञानरज्जूच्या वर्तुलकार बनलेल्या वलयाच्या प्रत्येक कोनापासून निघालेल्या असतात. हें ज्ञानरज्जूंचें वर्तुळाकार पंचकोणाकृति वलय उदकनलिकावलयाच्या आंतल्या बाजूला परंतु मुखक्रोडकोशाच्या बाह्याभागीं झालेलें असतें. याशिवाय शरीरगुहेचया अंतःपृष्ठाला ठिकठिकाणीं ज्ञानपेशी व ज्ञानतंतू लागलेले असतात.

या प्राण्यांत एक उदकपादनलिकाव्यूह असतो. या प्राण्याची हालचाल पादनलिकांच्या योगानें होते हें वर सांगितलेंच आहे व ह्या पादनलिका प्रत्येक गात्राला त्याच्या खांचणीच्या कांठाला लागलेल्या असतात. गात्राची ही खांचणी नीट तपासून पाहिली असतां असें आढळून येईल कीं, खांचणीचें छत दोन आडव्या रांगांनां लागलेल्या तगटांच्या ओळींचें झालेलें असतें. हीं आडवीं तगटें घराच्या आढयावरील वाश्यांप्रमाणें एकमेकांनां जोडलेलीं असतात. या तगटांनां पादनलिकातगटें असें म्हणतात. ज्या आंतल्या टोंकानें हीं एकमेकांनां जुळलीं जातात त्या कोनाच्या खालच्या बाजूस या तगटांनां मांसपेशी किंवा स्नायुपेशी लागलेल्या असतात. या स्नायुपेशींच्या संकोच पावण्यानें हा कोन अरुंद होतो म्हणजे तगटें एकमेकांजवळ येऊं शकतात. असें झालें असतां खांचणीच्या दोन्ही कडांचे कंटक एखमेकांनां भिडतात व अशा रीतीनें कंटकांचें एक जाळें पादनलिकासभोंवतीं तयार होतें व त्यामुळें त्यांचें रक्षण होतें. या पादनलिकावरच्या अंगाला गात्रांच्या पोकळींत तपासून पाहिल्या असतां असें आढळून येईल कीं, प्रत्येक पादनलिकेच्या पोकळींतलें शेवट एका गोल फुग्याप्रमाणें फुगलेलें असून ते पाण्यानें गच्च भरलेलें असतें. या फुग्याला पादनलिकाचंबू म्हणतात. या चंबूमध्यें नलिकेच्या खालच्या भागांतलें पाणी सांठतें. पादनलिकेच्या खालच्या भागाला उभ्या मांसपेशी लागून राहिलेल्या असतात, व चंबूच्या भागाला वर्तुलाकार स्नायुपेशी लागलेल्या असतात. जेव्हां चंबूच्या वर्तुलाकार स्नायुपेशी संकोच पावतात तेव्हां पाणी खालच्या नलिकांमध्यें उतरून त्यांचा विस्तार करतें व अशा रीतीनें पादनलिका बाहेर येऊं शकतात. जेव्हां खालच्या नलिकांच्या ऊर्ध्वस्नायुपेशी संकोच पावतात तेव्हां पेणी वर चडून चंबूमध्यें सांठतें व नलिका पूर्ववत रुप पावतात. या सर्व पादनलिका जरी दिसण्यांत स्वंतत्र दिसतात तरी ह्या सर्व गात्रांतील आडव्या व उभ्या उदकनलिकाव्यूहाच्या भागांपैकींच एक भाग होत. प्रत्येक गात्राच्या खांचणींत गात्राच्या लांबीपर्यंत जाणारी एक एक उभी तारकित उदकनलिका असते व तिच्यापासून दोहों बाजूंवर आडवे फांटे फुटून ते फांटे पादनलिकांनां जोडले जातात. ज्या ठिकाणी ही गात्रांतील तारकित उदकनलिका दोहों बाजूंस आडवे फांटे फोडते त्या ठिकाणीं आंत पडदे झालेले असतात व हे पडदे पादनलिकांच्या दिशेसच फक्त उघडतात. यामुळें पादनलिकांतलें पाणी गात्रांतील तारकित उदकनलिकेंत येऊं शकत नाहीं. ह्या सर्व गात्रांतील तारकित उदकनलिका एका मध्यवर्ती उदकनलिकावलयाला संयोजित झालेल्या असतात. हें मध्यवर्ती उदकनलिकावलय पंचकोणाकृति ज्ञानरज्जूवलयाच्या बहिर्भागीं झालेलें असतें;  या मध्यवर्ती उदकनलिकावलयाला नऊ लहान पिशव्यांप्रमाणें (पोकळ अंध) बाग प्रत्येक गात्रांत दोन ह्याप्रमाणें लागलेले असतात. यांनां ''टीडमन बाडीज'' असें म्हणतात. दहाव्या पिशवीच्या ठिकाणीं अथवा टीडमन बाडीच्याऐवजीं एक अति अरुंद अशी ऊर्ध्वनलिका झालेली असते व ती तेथून निघून शरीराच्या गोल भागाच्या पृष्ठावर उघडते व हें तिचें मुख चाळणीप्रमाणें सूक्ष्मरंध्रयुक्त बनलेलें असून तें एका लहान चकतीसारखें दिसतें हें वर सांगितलेंच आहे. या ऊर्ध्वनलिकेवर चुनखडीक्षाराचीं पुटें लागलेलीं असल्यामुळें ती ताठर झालेली असते म्हणून तिला पाषाणनलिका संज्ञा आहे. हिच्या आंतील पोकळी फारच अरुंद असते तरी त्या पोकळीच्या पृष्ठावर मजबूत केश असलेल्या पेशी लागलेल्या असतात. ह्याप्रमाणें पाषाणनलिका ही चाळणसमचकतीच्या योगें बाहेर पृष्ठावर उघडत असल्याकारणानें बाहेरील पाणी तिच्या पोंकळींत येऊं शकतें व तिच्या पोकळीच्या आंतील पेशींच्या केशांच्या हालचालीमुळें तें पाणी मध्यवर्ती उदकनलिकावलयांत लोटलें जातें. मध्यवर्ती उदकनलिकावलयांतून पाणी गात्रांतील तारकित उदक नलिकांत जातें व त्यांच्यांतून त्यांच्या आडव्या फांटयांनीं पादनलिकांमध्यें जातें. पादनलिकांतलें पाणी आडव्या नलिकांतून उलट फिरून गात्रनलिकांत येऊं शकत नाहीं. कारण त्या ठिकाणीं वर सांगितलेले पडदे असतात. अशा रीतीनें हा उदकनलिकाव्यूह पाण्यानें भरून राहण्याची सोय झालेली असते व त्यामुळें पादनलिकांनां ताठरपणा व जडत्व येतें.

सर्व शरीराला त्वचेचें वेष्टन झालेलें असतें. बाह्यत्वचा व श्वेतत्वचा मिळून ही त्वचा झालेली असते. बाह्यत्वचा केशयुक्त असून शरीराच्या सबंध बाह्य पृष्ठावर पसरलेली असते. म्हणजे सर्व प्रकारचे कंटक पेडीसिलेरिया, त्वश्वसेंद्रियें व पादनलिका यांवर तिचें आच्छादन झालेलें असतें. बाह्यत्वचेखालीं ज्ञानपेशीयुक्त ज्ञानतंतूंचें जाळें वर सांगितल्याप्रमाणें झालेलेलं असतें व तिच्या खालीं श्वेतत्वचेचे दोन थर झालेले असतात. शरीराच्या पुष्कळ भागांत हे दोन थर एकमेकांपासून अलग राहून त्यांत पोकळया झालेल्या असतात. श्वेतत्वचेच्या बाहेरच्या थरांतून पादनलिकातगटांच्या शिवाय कवचाचीं बहुतेक सर्व तगटें झालेली असतात. प्रत्येक तगट म्हणजे चुनखडीक्षाराचें तंतुमय जाळेंच असें बनलेलें असतें व एकमेकालगत असलेल्या तगटांनां स्नायुपेशी लागलेल्या असतात. शरीरगुहा आंतून एका केशयुक्तपेशीय शरीरगुहाकलेच्या योगानें आच्छादित झालेली असते व हे केशयुक्त पेशींचें आच्छादन सर्व अंतरिंद्रियांवर पसरलेलें असतें. पाण्याप्रमाणें एका प्रवाही द्रवानें शरीरगुहा भरलेली असते त्याला शरीरगुहाद्रव असें म्हणतात व बहुतेक तो द्रव म्हणजे क्षारोदकच असून त्यांत पुष्कळ तपकिरी रंगाच्या कामरूप पेशी झालेल्या असतात व दुसर्‍या रक्षक श्वेतपेशीहि असतात.

या प्राण्यांत श्वासोच्छवासाची क्रिया वर सांगितल्याप्रमाणें अति सूक्ष्म त्वक्जलश्वासेंद्रियें यांच्या साहाय्यानें होते. हीं श्वासेंद्रियें पोकळ असून प्रत्येकाची पोकळी म्हटलीं म्हणजे केवळ शरीरगुहेचा बाहेर आलेला भाग होय. तेव्हां त्यांच्या आंतील द्रवांत असलेले्या रंगपेशी ह्या उच्च दर्जाच्या सपृष्ठवंश प्राण्यांच्या रुधिररक्तपेशींप्रमाणें प्राणवायु शोषून घेत असाव्यात. शिवाय उदकनलिकाव्यूहामध्यें समुद्राचें पाणी खेळत असतें तेव्हां त्या व्यूहाचा दुसरा उपयोग म्हटला म्हणजे श्वासोच्छवासाच्या क्रियेला मदत करणें हा होय. तशांतून ह्या प्राण्यांच्या सर्वांगावरून समुद्राचें पाणी नित्य वहात असल्यामुळें थोडीशी श्वासोच्छवासाची क्रियाहि घडत असावी.

हृदय व रुधिरवाहिन्या अशा खास या प्राण्यांत बनलेल्या नसतात. परंतु मध्यवर्ती ज्ञानेंद्रियसमूहाच्या लगत असलेल्या शरीरगुहेच्या भागांपैकीं कांहीं भाग थोडासा अलग पडतो व त्याला अंतरकलेचें आच्छादन मिळून त्याचा जो एक थोडासा निराळा समूह बनतो त्याला परिगामीरुधिरामार्गसमूह असें म्हणतात. यांत संकोच-विकासक्रिया होत नाहीं व यांतील द्रवाचें अभिसरणहि नियामक रीत्या होत नाहीं. या समूहांतील एक वर्तुलाकार रुधिरामार्ग मुखक्रोडकोशासभोंवतीं परंतु पंचकोमाकृति ज्ञानवलयाच्या आंतल्या बाजूस झालेला असतो व त्यापासून प्रत्येक गात्राच्या पोकळींत तारकित रीतीनें एक एक रुधिरमार्ग झालेला असतो. वर्तुळाकार रुधिरमार्गापासून एक ऊर्ध्वअक्षवर्ती रुधिरमार्ग पाषाणनलिकेभोंवतीं झालेला असतो व पृष्ठभागीं शेवटचें टोंक कांहीं रंध्रांच्या योगें करुन पाषाणनलिकेच्या शेवटाच्या चाळणीसारख्या मुखांतील छिद्रांशीं संयुक्त झालेलें असतें. या समूहांतील द्रवामध्यें फिरत्या कामरुप पेशी पुष्कळ झालेल्या असतात.

प्रजाजनकत्वासंबंधीं पाहतां या प्राण्यांत लिंगभेद झालेला असून नर व मादी अशा स्वतंत्र व्यक्ती असतात. परंतु त्यांची बाह्यरुपें व जननेंद्रियांची रचना हीं सारखींच असतात, त्यामुळें सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यावांचून नर किंवा मादी हें ओळखतां येत नाहीं. जननेंद्रियें शरीराच्या गोलांत एकमेकांलगत असलेल्या दोन गात्रांच्या प्रत्येक मध्यंतरांतील भागांत जोडीजोडीनें अशीं लागलेलीं असतात व प्रत्येक जोडीचे भाग एकवटलेले सूक्ष्म गोलाकार फुग्याचे बनलेले असतात; त्यामुळें ते द्राक्षांच्या लांबट घडांप्रमाणें दिसतात. प्रत्येक जननेंद्रियाच्या जोडीला एक निराळें स्त्रोतस असतें व तें स्वतंत्रतेनें शरीराच्या पृष्ठभागावर बाहेर लगतच्या दोन गात्रांच्या उगमाच्या मध्यंतरी एका जाळीदार तगटाच्या छिद्रांत उघडतें. या जननेंद्रियाच्याभोंवतीं रुधिरमार्गाचें वेष्ठन झालेलें असतें.

अंडीं पाण्यांत बाहेर आल्यावर फलद्रूप होतात व त्यांपासून निर्माण झालेली प्रजा बाह्यांगीं केशयुक्त व मोकळी तरंगणारी अशी असते. त्यांनां बैपिनेरीओ अथवा ब्रयाची ओलेरीया ही संज्ञा आहे.

या संघांतील प्राण्यांचें पुढें दिल्याप्रमाणें वर्ग केले जातात (१) तारकित तनुविशिष्ट वर्ग; (२) तारकित शाखाविशिष्ट वर्ग; (३) शल्यकवचवर्ग; (४) तारकित कर्कटिकाकृति वर्ग; (५) तारकित पिच्छदल वर्ग इत्यादि.

तारकित तनुविशिष्ट वर्ग- या वर्गांत मोकळे वावरत असलेले सकंटकतनु प्राणी मोडतात, व त्यांचें शरीर तारकित अथवा पंचकोणाकृति असें झालेलें असतें. यांच्या शरीराचा भाग मधोमध गोलाकार चकतीप्रमाणें असून त्याला बहुधा पांच गात्ररुपी त्यापासून पुढें वाढलेले असे पोकळ त्रिकोणाकृति भाग लागलेले असतात. या प्रत्येक त्रिकोणाकृति पोकळ गात्ररूपी भागांत शरीरगुहेचा भाग आलेला असतो व त्याच्यांत अंतरिंद्रियांचेहि भाग वाढलेले असतात. शरीराला पृष्ठभाग व उदरतलभाग हे स्पष्टपणें व्यक्त झालेले असतात. पृष्ठभागावर मलद्वार व पादनलिकाव्यूहाच्या ऊर्ध्वनलिकेचें चाळणीसारखें बहिर्मुख हीं झालेलीं असतात. उदरतलभागावर मुखद्वार आणि पांच अरुंद खांचण्या असतात. या वर्गांतील प्राण्यांच्या अर्भकाला ''बेपिनेरीआ'' किंवा ''कयाचीओलेरीआ'' असें म्हणतात व त्यांच्या शरीराला दोहोंबाजूस केसाळ शेव असतात. या वर्गांत स्टारफिश प्राणी येतात.

तारकितशाखा विशिष्ट वर्ग- या वर्गांतील सकंटकतनु प्राणी तारकित असून मोकळे वावरणारे असे असतात व त्यांच्या शरीराचा मध्यभाग एखाद्या गोलाकार चकतीप्रमामें स्पष्टपणें व्यक्त झालेला असून त्याला पांचच गात्रें त्यापासून वाढून झालेलीं असतात, परंतु तीं निराळीं त्याला लागलेलीं दिसण्यांत दिसतात. या गात्रांत शरीरगुहेचा भाग अंतर्भूत झालेला नसतो. शरीराचे पृष्ठभाग व उदरतलभाग हे स्पष्टपणें व्यक्त झालेले असतात. या वर्गांतील प्राण्यांत मलद्वार झालेलें नसतें. मुखद्वार हें उदरतलभागीं झालेलें असतें. तसेंच पादनलिकाव्यूहाच्या ऊर्ध्वनलिकेचें चाळणीसारखें बहिर्मुख सुद्धं उदरतलभागींच झालेलें असतें. तसेंच पादनलिकाखांचण्या झालेल्या नसतात. या वर्गांतील प्राण्यांच्या अर्भकाला ''प्यूटीअस'' अशी संज्ञा आहे. या वर्गांत ''स्यांडस्टार्स'', ''ब्रिटलस्टार्स'' इत्यादि मोडतात.

सशल्यकवचवर्ग- या वर्गांतील सकंटतनु प्राणी मोकळे वावरणारे असून त्यांच्या शरीराची रचना गोल हृत् पिंडाच्या आकाराची अथवा चपटी अशी झालेली असते. याचें शरीर शिंपल्याप्रमाणें बाह्यकवचानें वेष्ठित असतें. हें कवच चुनखडीक्षाराच्या तगटांचें बनलेलें असून हीं तगटें एकमेकांनां बरोबर लागलेलीं असून घट्ट रीतीनें जुळलेलीं असतात. कवचाला निरनिराळया तर्‍हेचे लांब, रुंद, जाड, बारीक असे कंटक लागलेले असतात. या प्राण्यात उदरतलभागीं मुखद्वार शरीरगोलाच्या ध्रुवाच्या शेवटल्या टोंकाला झालेलें असतें व त्याच्या उलट दुसर्‍या टोंकाला पृष्ठावर मलद्वार झालेलें असतें. या मलद्वाराजवळ पादनलिकाव्यूहाच्या ऊर्ध्वनलिकेचें चाळणीसारखें बहिर्मुख झालेलें असतें. या प्राण्यांत पादनलिकाखांचण्या अशा झालेल्या नसतात; तरी पादनलिका शरीराच्या ध्रुवाच्या एका टोंकापासून दुसर्‍या टोंकापर्यंत आळीपाळीनें पृष्ठावर पसरलेल्या असतात. व त्या अशा रीतीनें पृष्ठावर रचल्या गेल्या असल्यामुळें शरीराचा पृष्ठभाग स्पष्टपणें आळीपाळीनें विभागला गेल्यासारखा दिसतो. तेव्हां ज्या भागांवर पादनलिका आहेत त्यांनां पादनलिकायुक्तखंड व ज्या भागांवर त्या नाहींत त्यांनां पादनलिकाविहीनखंड असें म्हणतात. या प्राण्यांच्या अर्भकाला प्यूटीअस ही संज्ञा आहे. या वर्गांत सीअषर्चन, हार्टअषर्चन व केकअषर्चन हे प्राणी येतात.

तारकितकर्कटिकाकृति वर्ग- या वर्गांतील सकंटतनु प्राण्यांचें शरीर पूर्वपश्चिम रीत्या लांबट गोलाकार किंवा त्याला पांच फळया पडलेलें असें झालेलें असून व त्याला पूर्व शेवटीं मुखद्वार व पश्चिम शेवटीं मलद्वार हीं झालेलीं असतात. त्वचेमध्यें चुनखडीक्षाराची तगटें किंवा सूक्ष्म कंटक त्वचेला बळकटी येण्यास क्वचितच मधून मधून झालेले असतात. पादनलिकाव्यूहाच्या ऊर्ध्वनलिकेचें चाळणीसारखें बहिर्मुख बहुधा झालेलें असतें. शरीराच्या पृष्ठभागावर पांच पादनलिकायुक्तखंड झालेले दिसतात. परंतु कित्येक वेळां ते आढळून येत नाहींत. मुखद्वारासभोंवतीं एक नलिकासम गात्रांचें वर्तुळ किंवा वलय झालेलें असतें. या प्राण्यांच्या अर्भकाला ''ऑरिक्युलेरिया'' असें म्हणतात. या वर्गांत सीकुकुंबर, ट्रिफांग किंवा बेशेडमेर इत्यादि प्राणी मोडतात.

तारकितपिच्छदलवर्ग- या वर्गांतील सकंटकतनु प्राण्यांच्या शरीराला क्षणिक किंवा नित्याचा लागलेला असा एक देंठासारखा भाग शरीराच्या पृष्ठभागी झालेला असतो व यांचें शरीरहि तारकित असें बनलेलें असतें. या वर्गांतील ज्या प्राण्यांमध्यें हा देंठासारखा भाग नित्याचा झालेला असतो ते प्राणी खोल पाण्यांत तळाला या देंठानें बाह्य वस्तूंनां चिकटून राहिलेले असतात. उदाहरणार्थ ''पेठयाक्वीन्स''. जे प्राणी मोकळे वावरणारे आहेत त्यांच्या परिपूर्ततावस्थेंत हा देंठ झालेला असतो परंतु तो पूर्ण विकास पावलेल्या प्राण्याच्या स्थितींत नाहींसा होतो व त्याच्या ठिकाणीं अति सूक्ष्म नलिकासम कमानदार केशशुंडिकांचें वर्तुळ झालेलें अशतें. उदाहरणार्थ ''कोम्यापुला'' अथाव ''ऍन्टीडॉन''. या केशशुंडिकांच्या योगानें हा प्राणी बाह्यवस्तूला क्षणिककाल चिकटून राहूं शकतो.

शरीराचा भाग मधोमध वाटोळया चकतीप्रमाणें झालेला असून त्यापासून तारकित रीत्या वाढलेले पांच गात्ररुपी भाग त्याला लागलेले असतात. या शरीराच्या मध्यगोलाला वरच्या भागास पांच तारकित अशीं बनलेलीं तगटें लागलेलीं असतात व गोलाच्या खालच्या बाजूला दुसरीं पांच आळीपाळीनें झालेलीं तगटें लागलेलीं असतात. प्रत्येक गात्ररुपी भागाला पुढच्या बाजूस क्वचित दोन फांटे फुटलेले असतात किंवा त्यांनां पुष्कळ शाखा झालेल्या असतात व या सर्वांनां पाकळया लागलेल्या असतात. हे गात्ररुपी भाग क्षणोक्षणीं आळीपाळीनें नमविले जातात व पुन्हां सारखे सरळ केले जातात व अशा रीतीनें हा प्राणी पाण्यावर फार सुबक रीत्या तरंगत असतो. शरीराचे पृष्ठभाग व उदरतलभाग हे स्पष्टपमें व्यक्त झालेले असतात. उदरतलभागावर मुखद्वार व मलद्वार हीं झालेलीं असतात. परंतु हा शरीराचा भाग प्राणी पाण्यांत वावरत असतांना वरच्या दिशेस वळलेला असतो व त्यामुळें तो पृष्ठभाग असावा असा भास होतो व खरा पृष्ठभाग खालच्या दिशेस वळलेला असल्यामुळें उदरतलभागाप्रमाणें दिसतो. उदरतलभागावर अरुंद अशा पादनलिकाखांचण्यांच्या रांगांचे आदिम शेवटले भाग फक्त मुखाभोंवती झालेले दिसतात. सारांश येथें पादखांचण्या म्हणजे अन्नमार्गाला मदत या अर्थानेंच आहेत. सकंटकतनु संघाच्या इतर वर्गांतील प्राण्यांप्रमामें या पादनलिकाखांचण्यांत पादनलिका झालेल्या नसतात. यांतील कांहीं प्राण्यांत त्या झालेल्या असल्यास तया चोषणचकतिविहीन असून केशयुक्त अति सूक्ष्म नलिकाप्रमाणें असतात. ह्यांचा उपयोग शरीराची हालचाल घडवून आणण्यास होत नसून स्पर्शेद्रियांप्रमाणें होतो व श्वासोच्छवासाच्या क्रियेंत होत असावा.

अंतरिंद्रियांची रचना साधारणतः इतर वर्गांतील प्राण्यांच्याप्रमाणेंच असते. या वर्गांतील प्राणी परिपूर्ततास्थेंतून पूर्णावस्थेंत जात असतांना रुपांतरें पावतात. या वर्गांत ''फेदरस्टार्स'', ''सी लिलीज'' वैगरे प्राणी मोडतात. यांच्यांतील कांही''फेदरस्टार्स'' प्राण्यांच्या अंगावर ''मैझोस्टोमा'' नांवाचे परान्नपुष्ट जंतू लागून वाढतात. ह्यामुळें या फेदरस्टार्स प्राण्यांच्या गात्रांवर गांठींसारखा रोग होतो व वेळेवर गात्रें तुटून पडतात. गात्रें तुटून पडल्यास नवीन गात्रें त्या ठिकाणीं बनण्याची शक्ति या प्राण्यांत असते.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .