विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संगड- पंजाब डेरागाझीखान जिल्ह्याची उत्तरेकडील तहसिल १०६५ चौरसमैल. ह्या तहसिलीचा पुष्कळसा भाग रेताड व ओसाड असून पुष्कळ ठिकाणी पाण्याची मोठी मारामार असते. लहान लहान नद्या व कालवे पुष्कळ आहेत. लोकसंख्या (१९०१) ८६५८२ हींत १६८ खेडीं आहेत.