विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सगर- इक्ष्वाकु वंशातील एक राजा. याला प्रभा व भानुमती अशा दोन स्त्रिया असून प्रभेला साठ हजार व भानुमतीला एक (असमंजा) पुत्र होता. हा मोठा पराक्रमी राजा असून यानें बरेच यज्ञ केले होते.
(२) गुजराथेतील एक जात. लोकसंख्या सुमारें दहा हजार. हे आपली उत्पत्ति सगर राजापासूनची म्हणून सांगतात. यांचा धंदा शेतकीचा असून हे शाखाहारी आहेत.