प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

संघसत्तावाद (कम्यूनिझम)- खाजगी मालकी हक्क पूर्ण किंवा नष्ट करून सर्व प्रकारचीं मालमत्ता संघाच्या किंवा राष्ट्राच्या मालकीची करणें या अर्थशास्त्रीय योजनेला हें नांव आहे. समाजसत्तावाद (सोशिऑलिझम), उत्पादनाचीं साधनेंच फक्त समाजाच्या किंवा सरकारच्या मालकीचीं करावीं, असें म्हणतो; संघसत्तावाद, देशांतील सर्व प्रकारची सत्ता, सरकारच्या किंवा संघाच्या मालकीची असावी व खाजगी मालकी कशावरहि नसावी, असें म्हणतो. संघसत्तावाद हा समाजसत्तावाद्यांतलाच एक उपपक्ष आहे, त्यामुळें समाजसत्तावादावर जे सामान्य आक्षेप आहेत तेच संघसत्तावादाबद्दल आहेत.

तथापि सामुदायिक मालकीची पद्धति प्राचीन काळापासून कांहीं ठिकाणीं होती. उत्तर अमेरिका, रशिया आणि यूरोप व आशिया यांमधील आणखीं कांहीं देशांत प्राथमिक अवस्थेंतील लोक आपापल्या गांवात सामुदायिक मालकी पद्धतीनें राहत असत. पायथॅगोरस, प्लेटो, ऑरिस्टॉटल व इतर कांही ग्रीक तत्त्ववेत्ते संघसत्तावादाचे पुरस्कर्ते होते. बौद्ध भिक्षू आपल्या विहारांमध्यें या पद्धतीनेंच राहात. निरनिराळ्या ठिकाणीं ख्रिस्तीसमाज प्रथम संघसत्ताक असत. ख्रिस्तीधर्म सुधारणेनेंहि या पद्धतीला नवें चालन दिलें. जर्मनींतील 'शेतक-यांचें युद्ध' याच मताचा परिणाम होय, अठराव्या शतकांत संघसत्तावाद फ्रान्समध्यें प्रसृत झाला.

कम्यूनिझमनें विशेष गोष्ट ही केली कीं, या समाजसत्तावादाचा मजूरवर्गाच्या चळवळीचीं संबंध जुळवून दिला. याचें श्रेय मार्क्स आणि एंजेल्स यांनी १८४७ मध्यें जो महत्त्वाचा 'कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो' काढला त्यालाच दिलें पाहिजे.

कम्यूनिस्ट जाहीरनामा:- कम्यूनिझमचीं मुख्य तत्त्वें यांत विशदपणें सांगितलेलीं आढळतात. या जाहीरनाम्याच्या प्रारंभीच असें विधान करण्यांत आलें आहे कीं, सर्व मानवीसमाजाचा इतिहास म्हणजे कालांतरानें होणा-या मनुष्य वर्गांतील झटापटींचा इतिहास असून या प्रत्येक झटापटीचें पर्ववसान समाजाचें स्थित्यंतर घडवून आणण्यांत झालें आहे. प्राचीन संस्कृतींतील गुलामपद्धतीपासून तों मध्ययुगांतील सरंजाम (फ्यूडल) पद्धतीपर्यंत व तेथून भांडवलशारीपर्यंतच्या इतिहासाचें अवलोकन केल्यास या प्रत्येक स्थित्यंतराच्या अगर परिवर्तनाच्यामुळें एक एक नवीन वर्ग निर्माण झाला आहे. यानंतर या जाहीरनाम्यांत सरदार वर्गाच्या सत्तेमुळें भांडवलवाला वर्ग कसा निर्माण झाला, त्यानें राजशाही व सरदारशाही यांच्या विरुद्ध टक्कर कशी दिली, औद्योगिक शेतकी व दळणवळण या बाबतींत त्यानें कशी क्रांति घडवून आणिली, इत्यादी इतिहासाचें थोडक्यांत चित्र रेखाटलें आहे. त्यानंतर, या भांडवलवाल्या वर्गानें औद्योगिक चळवळीला झटपट व केंद्रीकृत उत्पादनाच्या साहाय्यानें कसें नवीन स्वरूप प्राप्त करुन दिलें व अशा रीतीनें सर्व जग कसें पादाक्रांत करून टाकलें याचेंहि विवेचन या जाहीरनाम्यांत करण्यांत आलें आहे. यानंतर सत्ताधीश असलेल्या भांडवलवाल्या वर्गानें उत्पादनाचीं नवीन नवीन साधनें निर्माण करून त्यामुळें जो मजुरांचा वर्ग अस्तित्त्वांत आणला त्यानेंच भांडवलवाल्यांनां कसा शह देण्यास सुरवात केली आहे याचें वर्णन आहे. भांडवाल्यावर्गानें ज्या शक्ती निर्माण केल्या आहेत त्यांतच त्यांच्या नाशाचें बीज आहे. कारण जसजशीं उत्पादनाचीं साधनें वाढत जातील तसतसा मजूर वर्गहि वाढत जाईल; पुढें हा मजूरवर्ग आपले हक्क प्राप्त करून घेण्याची धडपड करूं लागेल, त्यामुळें संघ होतील, बेकारी वाढेल, असें कम्यूनिस्टमतांच्या पुढा-यांचें म्हणणें आहे. मजूरवर्गाला स्वतःची मालमत्ता नसल्यामुळें व संपत्तीचें उत्पादन तर भयंकर प्रमाणांत वाढत चालल्यानें मजूरवर्ग हा वैयक्तिक मालकीची अपेक्षा न करतां या उत्पन्न झालेल्या व होणा-या संपत्तीवर सामाजिक मालकी असावी असें म्हणणार असें ओधानेंच प्राप्त होतें; तेव्हां सध्यांच्या जगांत जी नवीन क्रांति होण्याचीं चिन्हें दिसत आहेत ती क्रांति भांडवलशाही व मजूरवर्ग यांच्या लढयांत दृग्गोचर होईल असें कम्युनिस्टांचें म्हणणें आहे. पण हा जो भांडवलशाही विरुद्ध मजूरवर्ग यांच्यामध्यें झगडा सुरू आहे. याचें एक मात्र वैशिष्टय आहे व तें हें की पूर्वी प्रत्येक औद्योगिक क्रांतीच्या लाटेबरोबर एक नवीनच वर्ग निर्माण होऊन त्याचा तत्कालीन समाजावर पगडा बसत असे. पण या नवीन क्रांतीनें असा एखादा अल्पसंख्याक वर्ग निर्माण होणार नसून या क्रांतीनें सर्व मजूर म्हणजे सामान्य जनताच सत्ताधीश बनेल व तेणेंकरून मानण्याची उन्नति होईल असें कम्यूनिस्टांचें म्हणणें आहे.

तात्पर्य कम्यूनिझम पंथ मजूरवर्गाच्या हितसंबंधार्थ झटणारा आहे. व मजूरवर्गाच्या उन्नतीसाठीं तो वाटेल तीं साधनें उपयोगांत आणण्याला तयार आहेत. भांडवलशाहीविरुद्ध सशास्त्र बंड केल्याशिवाय भांडवलवाला वर्ग ताळ्यावर येणें अशक्य आहे असें कम्यूनिस्ट उघडपणें प्रतिपादन करतात व या कार्याप्रीत्यर्थ जगांतील सर्व मजुरांनां एकत्र करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो.

द्वितीय परिवर्तनः- या पंथाचीं मुख्यतः तीन मतें आढळतात. (१) जगाच्या इतिहासावरून दिसून येणारें आधिभौतिक प्रगतीचें तत्त्व, (२) वर्गस्पर्धा व (३) भांडवलशाहीच्या हातून प्रतिकारानें मजूरवर्गानें आपल्या ताब्यांत सत्ता आणणें. ही सत्ता कशी क्रमाक्रमानें प्राप्त करून घ्यावयाची यासंबधी मार्क्सनें आपल्या ग्रंथांत उहापोह केला आहे. १८४८ सालीं मजूरवर्गानें फ्रान्समध्यें आपल्या ताब्यांत राष्ट्राची सत्ता आणण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. तथापि १८७१ सालीं सहा आठवडे कां होईना मजूरवर्गानें फ्रान्सवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. या दोन्ही चळवळींच्या अभ्यासावरून मार्क्सला असें आढळून आलें कीं तत्कानीन राष्ट्रांच्या भांडवलशाहीला अनुकूल असलेल्या शासनपद्धतीच्या मुळाशीं हात घालून ती उखडून टाकल्याशिवाय, मजूरवर्गाची खरीखुरी सत्ता प्रस्थापित होणें शक्य नाहीं. यासाठीं त्यानें १८४७ सालीं काढलेल्या जाहीरनाम्याला १८७२ सालीं अनुभवाची अशी पुस्ती जोडली; ती म्हणजे 'प्रचलित राज्यपद्धतीचें उच्चाटण केल्याशिवाय मजुरांची सत्ता अगर हुकमत प्रस्थापित होणें शक्य नाही' ही होय. भांडवलशाही जाऊन तिच्या जागीं मजूरशाही प्रस्थापित होण्याच्या मधली अवस्था म्हणजे मजूरवर्गानें आपल्या ताब्यांत बळजबरीनें सत्ता आणणें होय व अशा रीतीनें कांहीं काल अस्वस्थतेचा गेल्यानंतर मग लोकशाहीला खरा प्रारंभ होईल असें त्याचें म्हणणें आहे. कारण मजूर शाही प्रस्थापित झाली कीं मग तिच्या कारभारांत हळु हळु सर्वांचा योग्य त-हेनें शिरकाव होऊन राज्यपद्धति आपोआपच वर्गसत्तात्मक न राहतां लोकसत्तात्मक बनेल.

अशा रीतीनें मार्क्स व त्याचे सहकारी यांनीं कम्यूनिस्ट पंथाचा प्रसार करण्याची खटपट चालविली असतां १८६४ सालीं सार्वराष्ट्रीय मजूरपरिषद भरली व त्यांत आस्ते आस्ते मार्क्सच्या तत्त्वांची छाप बसत चालली. १८७३ सालच्या परिषदेवरून यूरोपियन मजूरवर्गामध्यें मार्क्सचीं तत्त्वें खोल समजल्याचें निदर्शनास आलें. १८८९ सालीं सार्वराष्ट्रीय परिषदेचें दुसरें अधिवेशन झालें त्यांत मार्क्सनें आंखून दिलेली दिशा परिषदेच्या कार्याचा मूळ पाया म्हणून गृहीत धरण्यांत आली व वर्गकलह व मजूरसत्ता हीं दोन ध्येयें सार्वराष्ट्रीय मजूरपरिषदेनें आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानें ठेविलीं व तीं ध्येयें साध्य करून घेण्यासाठीं जीं साधनें अंमलांत आणावयाचीं त्यांचा उपक्रमहि या परिषदेनें केला. तथापि त्यावेळीं सशस्त्र प्रतिकाराशिवाय समाजसत्ता प्रस्थापित होण्याची आशा ब-याच मजूरसंघांनां वाटत असल्यानें या तीव्र साधनांचा उत्साहानें उपयोग करण्यांत आला नाहीं. पण १९१४ सालीं महायुद्ध सुरू होऊन त्यानें सर्व जगाची शांतता बिघडवून टाकली त्यांमुळें सशस्त्र प्रतिकाराचें साधन उपयोगांत आणण्याची वेळ आलीं असें मजूरवर्गाला दिसून आलें व तेव्हांपासून अर्वाचीन कम्यूनिझमला सुरवात झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं.

तृतीय परिवर्तन किंवा आजचा कम्यूनिझम- महायुद्धाला सुरवात झाल्याबरोबर, तत्पूर्वी वर्गकलहाची व मजुरशाही स्थापन करण्याची जी शांतपणानें चळवळ सुरू होती तिला एकदम गंभीर स्वरूप प्राप्त होऊं लागले. प्रत्येक यूरोपियन राष्ट्रामध्यें पुन्हां झगड्याला सुरवात झाली. या झगडयाचें द्दश्य स्वरूप 'महायुद्धामध्यें पडावें किंवा नाहीं' या संबंधींच्या चर्चेमध्यें द्दष्टीस पडतें. या प्रश्नावर अस्तीपेक्षां उत्तर, राष्ट्रांतील अधिकारी वर्गाकडून येऊं लागलें तर नास्तिपक्षीं उत्तर जनतेकडून येऊं लागलें. विशेषतः इटली व रशिया या राष्ट्रांत तर युद्धाला विरुद्ध असणा-या लोकांचेंच बहुमत होतें. या प्रश्नासंबंधीं जो मतभेद द्दष्टीस पडला त्याचेंच रूपांतर दोन पक्षांमधील विरोध तीव्र करण्यांत झालें. एखाद्या राष्ट्रानें युद्धांत पडावें याला संमति देणें म्हणजे त्यांतील राज्यपद्धतीला पाठिंबा देणे होय असें मत प्रतिपादण्यांत येऊं लागलें. याच्या उलट संमति न देणें म्हणजे चालू राज्यपद्धति मान्य न करणें असा अर्थ होऊं लागला. युद्धविरोधी झिमरवाल्हिन समाजसत्तावादीसंघानें १९१५ सालीं स्वित्झर्लंडमधील झिमरवाल्ड शहरीं मोठी परिषद भरवून तिनें बुद्धाचा तीव्र निषेध केला व त्याच बैठकींत मजूरसंघानें कोणतें धोरण पत्करावें यासंबंधींची दिशा आंखली.

बो ल्शे हि झ म:- पण या वाढत्या मतभेदाला खरें तीव्र स्वरूप रशियन क्रांतीमुळें प्राप्त झालें. तथापि या वेळीं समाजसत्तावाद्यांमध्येंच दोन तट पडले. पहिला तट मार्क्सच्या तत्त्वांनां पाठिंबा देणारा होता, तर दुसरा भांडवलवाल्या वर्गाशीं शांततेनें सहकार्य अगर वेळ पडल्यास विरोध करावा अशा मताचा होता. पहिल्या पक्षाला 'रशियन सोशल डेमो क्रॅटिक पक्ष उर्फ बोल्शेव्हिक असे नांव पडलें होतें. बोल्शेव्हिकी म्हणजे बहुसंख्याक पक्ष. १९०३ सालीं रशियन सोशल डेमोक्रॅटिक पक्षाची ब्रूसेल्स व लंडन येथें जी परिषद भरली होती त्यावेळीं या मार्क्सच्या मतांनां पाठिंबा देणा-यांची संख्या अधिक होती तेव्हां त्यांनां बोल्शेव्हिकी ऊर्फ बहुसंख्याकवाले असें टोपण नांव देण्यात आलें व या शब्दापासूनच यांच्या मतांनां अगर पंथाला बोल्शेव्हिझम हें नांव लोकांत रूढ झालें आहे व क्वचित प्रसंगीं हा शब्द सर्व प्रकारच्या जहाल व अत्याचारी मतांनांच लावण्यांत येतो. या बोल्शेव्हिक लोकांनीं १९१७ सालच्या दुस-या बंडांत रशियामध्यें आपली सत्ता प्रस्थापित करून सोव्हीएट ऊर्फ कामगारमंडळ पद्धतीवर रशियांत राज्यकारभार सुरू केला. त्यांनीं मजूरशाही प्रस्थापित झाल्याचें जाहीर केलें व बाहेरून व आंतून त्यांच्यावर करण्यांत आलेल्या हल्ल्यांनां तोंड दिलें. अशारीतीनें रशियामध्यें बोल्शेव्हिकांचें वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळें, जगांतील, क्रांतिकारक मजूरसंघाचें पुढारीपण आपोआप त्यांच्याकडे आलें. (ज्ञानकोश विभाग पहिला पृष्ठें ६६-७७, व 'रशिया' हा लेख पहा.) पण अशाच प्रकारची क्रांति जसजशी इतर देशांमध्यें घडून येऊं लागली तसतशी समाजसत्तावादीपक्षामध्यें अधिकाधिक फूट पडत चालली. १९१९ मध्यें जी कम्यूनिस्टांची तिसरी सार्वराष्ट्रीय बैठक भरलीं तींत मार्क्सच्या क्रांतिमूलक व क्रांतीला उत्तेजक अशा वर्ग-कलहाच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यांत आला, व लोकशाही व अल्पसत्ताक राज्यपद्धति या दोन्हींविरुद्ध मार्क्स व त्याचे सहकारी यांनीं मजूरशाहीचें तत्त्व प्रस्थापित करण्याची खटपट चालविली होती तिचा पुनरुद्धार करंण्यात आला. १७२० सालीं भरलेल्या कम्यूनिस्टांच्या परिषदेंत कम्यूनिस्टपक्षाचें ध्येय, धोरण व धारणा यांचा सविस्तर उहापोहं करण्यांत आला व अशारीतीनें कम्यूनिझमला एक प्रकारें जागतिक स्वरूप प्राप्त झालें.

या नवीन कम्यूनिस्ट परिषदेनें जो जाहीरनामा काढला आहे त्यामध्यें या पुनरुज्जीवित कम्यूनिझमपंथाचीं तत्त्वें नमूद केलेलीं आढळतात. या पंथाचे मतें महायुद्ध व तदुत्तर प्रस्थापित झालेली शांतता यांच्या भंगानेंच मार्क्सच्या भांडवलशाहीच्या उच्छेदाचें ध्येय परिपूर्ण होणारें आहे. महायुद्ध म्हणजे भांडवलशाहीच्या परस्परविरुद्ध आकांक्षांचा परिणाम होय. तथापि महायुद्धानें भांडवलवाल्यांच्या आकांक्षा सिद्धीस गेल्या नाहींत व युद्धोत्तर शांतता म्हणजे भावी प्रचंड महायुद्धाची निशाणीच होय. व भावी अनर्थ टाळावयाचा असेल तर त्याला सगळ्यांत परिणामकारक मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर मजुरशाहीची प्रस्थापना करणें होय असें कम्यूनिस्टांचें म्हणणें आहे.

कम्यूनिझम व लोकशाही:- कम्यूनिस्टांच्या सिद्धांतावर असा आक्षेप घेण्यांत येतो कीं कम्यूनिस्ट लोक लोकशाहीविरुद्ध आहेत. पण वास्तविक तशी स्थिती नाहीं. त्यांचें म्हणणें एवढेंच कीं सध्यांची यूरोपमधील परिस्थिती ख-या खु-या लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला अनुकूल नाहीं. प्रचलित राज्यपद्धति म्हणजे प्रच्छन्न भांडवलशाहीचें वर्चस्व असलेली राज्यपद्धति होय. व याचीच लोकशाहींत उत्क्रांती करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या लोकशाहींतहि भांडवलवाल्या वर्गाचेंच प्रच्छन्न वर्चस्व राहील.

कम्यूनिझम व इतर समाजसत्तावादीपंथः- कम्यूनिझम व सिंडिकॅलिझम आणि इतर समाजसत्तावादीपंथांत बरेच मतभेद उपस्थित झाले आहेत कांही पंथांच्या व विशेषतः ब्लँकिस्ट पंथाच्यामतें, प्रचलित समाजांत क्रांति घडवून आणण्याची जबाबदारी मुख्यतः क्षात्रप्रधान अल्पसंख्याकांवर आहे पण हें म्हणणें कम्यूनिस्ट पंथीयांनां  मान्य नाहीं. त्यांचें म्हणणें असें कीं, मजूरवर्गानेंच आपला उद्धार करून घेऊन आपलें वर्चस्व स्थापन केलें पहिजे. दुस-या वर्गांनीं या बाबतींत मजुरांनां शक्य तितकें साहाय्य केलें म्हणजे झालें या त्यांच्या मतामुळेंच व्यापारी संघामध्यें व कामगारवर्गामध्यें आपलें बहुमत होई तों म्हणजे १९१७ पावेतो बोल्शेव्हिकांनीं बंडाचें निशाण उभारलें नाहीं. इतर पंथांनां असें वाटतें कीं मजूरवर्गाची संघटना उत्कृष्ट    त-हेनें झाल्यास फारशा रक्तपाताशिवाय मजूरशाही स्थापन होईल. कम्यूनिस्टांच्या मतेम, भयंकर रक्तपात झाल्याशिवाय मजूरशाही स्थापन होऊं शकणार नाहीं. सत्ताधारी वर्ग आपल्या हांतातील, आर्थिक, लष्करी अगर राजकीय अशा सर्व प्रकारचा प्रयत्न केल्यशिवाय रहाणार नाहीं. अशा प्रकारचा प्रयत्न सत्ताधा-यांनीं पूर्वी केलेला आहे असें इतिहासांत दाखले सांपडतात. यासाठीं समाजांत एक बंडखोर क्रांतिकारक पक्ष स्थापन होणें अपरिहार्यच आहे असें कम्यूनिस्टांचें म्हणणें आहे.

(१) काम्युनिस्ट ऑफ जर्मन सेव्हन्थ- डे बॅप्टिस्टसम ही संस्था सुमारें दोनशें वर्षांपूर्वी कानरॅक बीसलने एन्फ्रॅटा येथें स्थापन केली पूर्वी तिचे तीनशें सभासद व बरीच मालमत्ता होती. हल्लीं दोन्हीं बरींच कमी झालीं आहेत. (२) दो शेकर्स स्थापना १७७६ मध्यें वॉटरव्हलीट न्यूयॉर्क येथें झाली. पूर्वी ५००० सभासद व मोठी मालकीची जमीन होती. हल्लीं तिच्या पंधरा निरनिराळ्या संस्था झाल्या आहेत (३) दि पर्फेक्शनिस्ट कम्युनिटी-१८३६ मध्यें स्थापन झाली. हल्लीं तिचें जॉईंट-स्टॉक-कंपनीत रूपांतर झालें आहे. (४) अमाना कम्युनिटी ही आयोवामध्यें जर्मन लोकांनी स्थापली. हींत अदमासें १८०० इसम व २५०० एकर जमीन आहे. (५) दि स्वीडिश कम्युनिटी-एरिक जॅनसननें १८५६ मध्यें बिशप हिल येथें स्थापिली. तिचे हजारावर सभासद आहेत. (६) दी कोरेशन कम्युनिटी ऑफ एस्टेरी-हिचे १६० हून अधिक सभासद आहेत. (७) दि कम्युनिटी ऑफ इस्त्रालाईटस, बेंटन हार्बर येथें असून तिचे सुमारें ७०० सभासद आहेत. (८) दि ब्रूक-फार्म कम्युनिटी-ही १८४२ मध्यें जार्ज रिप्लेने रॉक्सबेरो येथें स्थापन केली. (९) ओनेडा येथील संघ १८४८ त स्थापला १८८० मध्यें त्याला जॉईंट स्टॉक कंपनीचें स्वरूप दिलें गेलें. इत्यादी. शिवाय अगदी अलीकडे स्थापन झालेल्या दि ख्रिश्चियन कॉमन वेल्थ ऑफ जॉर्जिया; दि रस्किन कॉमनवेल्थ ऑफ टेनेसी अँड जार्जिया; दि को-ऑपरेटिव्ह ब्रदर- हुड ऑफ बर्ले (वॉशिग्टन) ; इक्वॅलिटी कॉलनी, इक्वॅलिटी (वॉशिंगटन) ; दि इंडस्ट्रियल सिंगल टॅक्स असोसिएशन, फेअरहोप; दी फ्रीलँड असोसिएशन ऑफ वॉशिंग्टन; दि म्युच्चल होम असोसिएशन ऑफ वाशिंग्टन; दी वूमन्स कॉमनवेल्थ ऑफ वॉशिंग्टन सिटी; इत्यादी. या अलीकडे स्थापन झालेल्या संस्थांच्या यशस्वितेबद्दल व चिरस्थायीपणाबद्दल अद्याप कांहीं मत देतां येत नाहीं. तथापि असल्या संस्थांची संख्या वाढत आहे एवढयावरून इतकें स्पष्ट दिसतें कीं, भांडणतंटे व चढाओढ या कटकटींतून मुक्त होऊन असल्या संस्थांतून शांतपणें जीवितक्रम आक्रमण्याची प्रवृत्ति लोंकामध्ये अधिकाधिक वाढत आहे. (मार्क्स अँड ऐंगेल्स-कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो; मॅक्स बीर लाइफ अँड टीचिंग ऑफ कार्ल मार्क्स (१९२१) ; लेनिन दि स्टेट अँड रेव्होल्यूशन; ट्राट्स्की-दि रशियन रेव्होल्यूशन टु ब्रेस्ट लिटोव्हस्क;, बुखारिन-प्रोग्रॅम ऑफ दि वर्ल्ड रेव्होल्यूशन; पोस्टगेट-दि बोल्शेव्हिक थीयरी (१९२०) ; पॉल-क्रिएटिव्ह रेव्होल्यूशन (१९२०) ; कार्ल कौट्स्की-दि डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटारियर (१९१९) ; बर्ट्र्र्रड रसेल-दि प्रॅक्टिस अँड ऑफ थियरी ऑफ बोल्शेव्हिझम (१९२०).)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .