प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

सच्छिद्रसंघ- या संघातींल प्राणी अनेक - पेशीय असून ते बहुधा समुद्रांत आढळतात व नेहमी एखाद्या वस्तूला चिकटलेले असतात. या वर्गांतील साधे व अनुत्क्रान्त प्राणी आरंभीं वेळूच्या फुंकणीसारखे दिसतात. फुंकणीपेक्षां यांतील विशेष म्हणजे या प्राण्यांच्या बाजूंनां आरपार पुष्कळ छिद्रें असतात व ज्या टोंकानें हा प्राणी वस्तुला चिकटलेला असतो तें नळीचें तोंड बंद असतें. या नळीला बाजूनें अशाच रचनेचा अंकुर फुटून एक दोन इंच उंचीचा वेळूच्या बेटासारखा पुंज तयार होतो. बेटांतील प्रत्येक शाखा अथवा व्यक्ति लवचिक असते व पृष्ठभागावर जिवंतपणीं निरनिराळ्या रंगांची झांक मारते.

या संघांतील कांही उत्क्रान्त प्राणीपुंज पेल्यासारखे किंवा वृक्षासारखेहि दिसतात. आपल्या आश्रयाच्या पृष्ठभागावर पसरून कांहीं संच्छिद्र पुंजांचें त्यांनां मऊ व दाट चिलखत होतें; व आश्रयाच्या पृष्ठभागाच्या निरनिराळ्या आकाराप्रमाणें चिलखताचे आकार बदलतात व एकाच जातीच्या प्राणीपुंजांत आकार वैचित्र्य फार आढळतें. याशिवाय या सजीव चिलखतावर निरनिराळ्या आकाराचे उंचवटयासारखे भाग असतात ते निराळेच. आरंभींच्या साध्या एकमुखी नळीसारख्या सच्छिद्र प्राण्याला फांटे फुटून व त्यांचा व पूर्वीच्या नळीचा निरनिराळ्या रीतीनें संयोग होऊन व ही अपत्यबुद्धी भूमितीश्रेढीनें पिढयानुपिढया चालून वरील निरनिराळे संकीर्ण आकार तयार होतात. या संकीर्ण पूंजांतील फांटयांच्या पूर्वापार संबंध ओळखितां येत नाहीं; व वृक्षासारख्या किंवा पेल्यासारख्या पुंजांतील शास्त्रांची मोजदादहि घेतां येत नाहीं.

यां संघांतील एकादा साधा एकमुखी नळीसारखा प्राणी सूक्ष्मदर्शकाखालीं पाहिला तर पृष्ठभागावर अनेक उंचवटे दिसतात. प्रत्येक उन्नतभाग सर्व बाजूंनी अलग असून त्यासभोंवती एक अरुंद खांचणी असते. या खांचणींत बारीक बारीक छिद्रांचे समूह असतात. शरीरपुटांचे तीन थर असतात. शरीरपुटाचा बाहेरच्या बाजूचा बहिस्थर चपटया पेशींचा झालेला असतो. नळीच्या पोकळीच्या बाजूच्या आंतल्या थरांत अंतस्थरांत चपटया किंवा सप्रणाल व सप्रतोद लांबट पेशी असतात. या दोन थरांच्या मध्यभागीं या पेशींनीं सांधणारें एक जीवजन्य पूरण असतें व त्यांत मधून मधून निरनिराळ्या आकारांच्या पेशी आढळतात.

बाजांरात जे स्पंज मिळतात ते या संघांतील एका वर्गांतील प्राण्यांचे सांगाडे असतात. या प्राण्यांच्या शरीरपुटाला बळकटी येण्यासाठीं बहिस्थरांतल्या कांही पेशी मध्यम थरांत जातात व निरनिराळ्या द्रव्यांचे अतिसूक्ष्म कंटक आपल्यापासून उत्पन्न करतात. कंटक, कर्करीचे, वाळवेचे किंवा रेशमासारख्या मऊ स्पंजीय द्रव्याचे बनलेले असतात या प्राण्यांच्या वर्गीकरणांत वरील फरकाला फार महत्त्व दिलेलें आहे. या संघांतील एकादा प्राणी चिमटींत धरुन दाबला तर शरीर पुटांतील पुरण व चैतन्य द्रव्य बाहेर पडतात व चिमटींत लोंकरीच्या तंतूसारखा थर राहतो. हाच या प्राण्यांचा सांगडा. या थरांत सूक्ष्म दर्शकाखालीं त्रिशूल, षटशूल अथवा प्रमाणरहित आकाराचे असंख्य कंटक दिसतात. कांही कंटक सुईसारखे असतात व शरीराच्या बहिरंगावर जे अनेक उंचवटे दिसतात ते या कंटकाचें बनलेले असतात.

अनुत्क्रान्त स्पंजांच्या मधोमध एक अन्वायाम पोकळी असते व या नळीचें एक तोंड उघडें असतें व यांतून नेहमीं पाणी बाहेर पडतें. याला बहिर्मुख म्हणतात. पोकळीच्या सभोंवतींच्या शरीरपुटाला आरपार बारीक छिद्रें असतात. या छिद्रांतून पाणी पोकळींत शिरतें. व बहिर्मुखानें बाहेर पडतें. हा जो जलप्रवाह या प्राण्यांच्या शरीरांतून चालू असतो तो अंतस्थरांतील सप्रतोद पेशींच्या कशांच्या नियमित व संघटित मागेंपुढें होण्यानें उत्पन्न होतो. या प्रवाहाबरोबर अन्नकण्णांचा प्रवेश शरीराच्या पोकळींत होतो व ते कण अंतस्थरांतील पेशी पचवितात व सर्व शरीराला अन्नरस पुरवितात.

अगदीं साध्या प्राण्यांत शरीरपुटें पातळ असतात व छिद्रें आरपार असतातय पेल्यासारख्या इतर संकीर्ण उत्क्रान्त स्पंजांच्या पृष्ठभागावर जीं छिद्रें दिसतात तीं पृष्ठभागाला पीचणा-या नलिकांचीं बाह्यमुखें होत. या प्राण्यांचीं शरीरपुटें जाड असलीं म्हणजे छिद्रें नलिकासारखीं असतात. अशा पुढे जाड असली म्हणजे छिद्रनलिकेचे तीन भाग पडतात. पहिल्या भागाला अथवा अंर्तवाही नलिकेला पृष्ठभागावरील खांचणींत आरंभ होतो व तेथें असलेल्या सछिद्र पडद्यांतून पाणी मिळतें. परंतु तिच्या बाजूला मधून मधून रंध्रें असतात. या रंध्रांतून पाणी दुस-या भागांत म्हणजे अंतर्मुखांनलिकेंत जातें. या नलिकेच्या पुटाला किंवा बाजूच्या थरांत वर सांगितलेल्या लांबट सप्रजाल व सप्रतोद पेशी असतात व त्यांच्या कशांच्या हालचालीवर पाण्याचा प्रवाह चालू राहातो. या अंतर्मुखी नलिका पृष्ठभागावरील उंचवटयाखालीं असतात व त्यांनां बाहेरच्या बाजूस तोंड नसतें. आंतल्या बाजूनें अंतर्मुखीनलिका तिस-या भागांत म्हणजे बहिर्वाही नलिकेला जोडलेली असते व दोघांमधलें द्वार लहान मोठें करतां येतें. बहिर्वाही नलिका शरीरांतील पोकळीला मिळते व यांतून पाणी पोकळींत शिरतें.  अशा प्राण्यांच्या पोकळींतील व अंतर्वाही व बहिर्वाहि नलिकेंतील अंतस्थर चपटया पेशींचा झालेला असतो. अपत्योत्पादन निर्द्वन्द्वोत्पत्तीनें होतें. निर्द्वन्द्वोत्पत्तीचा एक प्रकार आपण या पूर्वीच अवलोकन केला आहे. वृक्षासारख्या खोडाला शाखा फुटून बेट तयार होणें हा एक अंकुरोत्पत्तीचा प्रकार आहे; कारण बेटांतील प्रत्येक शाखेला स्वतंत्रपणें जीवनयात्रा संपविण्याची शक्ति असते. निर्द्वन्दोत्पत्तीच्या दुस-या प्रकारांत स्पंजाच्या शरीरपुटाला आंतल्या बाजूनें म्हणजे शरीर पोकळींत वाटोळ्या कळ्या फुटतात व तेथें त्यांची कांही वाढ होऊन स्वतंत्र होतात व प्रत्येकापासून अनुकूल परिस्थितींत नवीन स्पंज तयार होतो. या प्रकाराला कंदलोत्पत्ति म्हणतात. गोडया पाण्यांतील स्पंजांचे कंदल शरीरपुटांतच तयार होतात व त्यांच्यावर एक वालुकामय कंटकांचें आवरण तयार होतें. असे हे संवेष्टित कंदल ज्या भागांत तयार होतात तो भाग कुजून हे कंदल आसपासच्या चिखलात पडतात व नंतर कांहीं दिवसांनीं आवरणाला भोंक पडून त्यांतून कंदल बाहेर येतो व त्याची वाढ होऊन नवीन स्पंजप्राणी तयार होतो.

स्पंजामध्ये द्वंद्रोत्पति सार्वत्रिक आहे. हे प्राणी उभयलिंगी असल्यामुळें एकाच प्राण्यांत शुक्रबीज व अंडीं तयार होतात; तथापि तीं एकाच वेळीं तयार होत नाहींत. शरीरपुटाच्या मधल्या सांद्र थरांत ज्या इतस्तत: हिंडणा-या कामरूप पेशी असतात त्यांपैकी कांहीं आंतल्या व मधल्या थरांच्या सांध्यावर जमून त्यांच्यापासून शुक्रबीज व अंडीं तयार होतात व एका कामरूप पेशीपासून पुष्कळ द्विधाकरणांनीं पुष्कळ सपुच्छ शुक्रबीज तयार होतात व एका कामरूपपेशीपासून एकच अंडें तयार होतें. अंडयाचा आकार जन्मदपेशीपेक्षां मोठा असतो. अंडयांत शुक्रबीज शिरून व दोघांचीं केंद्रें एक होऊन गर्भ तयार होतो. आसपासच्या पेशीं या गर्भावर एक कोष तयार करतात, व हा कोषस्थ गर्भ जन्मद प्राण्याच्या शरीरपुटांत वाढतो. त्याच्यापासून अनेक द्विधाकरणांनीं पुष्कळ पेशी तयार होतात व त्यांच्यापासून एक रिक्तमध्य गोल तयार होतो. या गोलाच्या पुटांत एकेरीपेशी एकमेकांनां बाजूनें चिकटून राहतात व त्या प्रत्येकाला बाहेरच्या बाजूनें एकेक कशा असते. वरील रिक्तगर्भ गोलाला आपल्या प्रतोदांच्या साहाय्यानें पोहतां येतें म्हणून त्याला स्वैर डिंब म्हणतात. नंतर कांहीं कालानें कांहीं सप्रतोद पेशी आपले प्रतोद आंत ओढून घेऊन कामरूप बनतात व गोलाच्या आंतील पोकळींत जमून तेथें त्यांची वाढ होते. नंतर या कामरूप पेशींच्यामध्यें एक नवीन पोकळी तयार होते व तिच्यासभोंवर सप्रतोदपेशी जमल्या म्हणजे नवीन स्पंज तयार झाला. पुढें कांहीं कालानें एकाद्या जागीं कायमचा चिकटून त्याला शाखा फुटतात व आनुवंशिक संस्काराप्रमाणें आपला सांगडा तयार करतो.

पूर्वकालीन स्पंजांच्या सांगडयांचे अश्मीभूत अवशेष खडूच्या प्रस्तरांत सांपडतात. मोठ्या प्राण्यांतील स्पंज पृथ्वीच्या पाठीवर कोठेंहि नदीनाल्यांत अथवा तळ्यांत सांपडतात. खा-या पाण्यांतील स्पंजप्राणी किना-यापासून महासागराच्या तळापर्यंत कोठेंहि जमीनीवर अथवा दगडाला चिकटून राहतात. कोणत्याहि जलचर प्राण्याला हा प्राणी गट्ट करावा असें वाटत नसल्यामुळें बरेच निरनिराळे बारीक प्राणी यांच्या शरीरांत शिरून आपलें घर करतात. या संघांतील एकहि प्राणी निव्वळ परान्नपुष्ठ नाहीं; परंतु कांहीं उपजाती, इतर प्राणी अथवा वनस्पतींनां चिकटून त्यांचे भोजनभाऊ बनतात. या साहचर्याचा फायदा दोघानांहि होतो. कारण हे अभक्ष्य प्राणी बाहेरून चिकटलेले असले म्हणजे आंतल्या जीवांचें शत्रूंपासून रक्षण होतें व स्पजंला आपल्या मित्राच्या पाठीवर बसून इकडे तिकडे फेरफटका करतां येतो व निरनिराळ्या ठिकाणच्या अन्नपाण्याची चव घेता येते.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .