विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सत्यवान- शाल्वदेशाचा राजा घुमत्सेन याचा पुत्र. यास बाल्यावस्थेंत अश्वांची फार प्रीति असल्यामुळें यास चित्राश्व असें लोक म्हणत. हा अश्वपति राजाची कन्या सावित्री हिचा पति असून, तिच्या पातिव्रत्यानें हा अल्पायु असतां दीर्घायु झाला.