विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सदानंद- एक महाराष्ट्रीय संत कवि. यानें आपल्या ग्रंथांत आत्मचरित्र थोडेसें दिलें आहे. खानदेशांत धरणगांवी मधुसूदन चिंतामणी धर्माधिकारी होते. त्यांचा पुत्र सदाशिव, हाच पुढें गुरुकृपेनें सदानंद नांवानें प्रसिद्धीस आला. याचे ग्रंथ आनंदबोध, पराविद्या, आनंदप्रकाश, (र.श. १६३२ आश्विन), भूगोलवर्णन, आत्मसारप्रकाश, संतमालिका, षड्रसादि प्रकरण, आनंदसार, वेदान्तसार (सं. ले १६८८) इत्यादी.