प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
 
सन्निपातज्वर- हा रोग संसर्गजन्य आहे. याची मुदत साधारणमानानें तीन आठवडे असते क्वचित प्रसंगीं हा उलटतोहि. क्वचित ९, १४, २१ दिवसहि हा ताप असतो. हा रोग स्त्रीपुरुषांत सारख्या प्रमाणांत आढळतो. पण १५ ते पंचवीस वयापर्यंतच्या माणसांतच हा रोग अधिक जडतो. साठपासस्टच्या वृद्धांनांहि जडतो पण प्रमाण कमी असतें. आगस्ट ते नोव्हेंबर व उन्हाळयांत हा रोग होतो. रोगाच्या जंतुप्रसारानें हा रोग फैलावतो; त्याकरिता रोग्याचे कपडे उकडले पाहिजेत व मैला योग्य ठिकाणीं टाकला पाहिजे.

रो ग ल क्ष णें व क्र म- रोगाची गर्भावस्था १० ते १५ दिवस अदमासें असते. ज्वरास सुरवात होतांना विशेष लक्षांत घेण्यासारखें असें कांहीं होत नाहीं. रोग्यास बरें न वाटून मन उदास होतें. पुढें डोकें व हातपाय दुखतात. कमरेंत व पाठींत दुखतें, भूक नाहींशी होऊन मळमळतें. असें होऊन एक दिवस त्यास जबर दुखणें आल्यासारखें बाटतें. कांहीं रोग्यांनां मस्तकशूल अतिशय होतो. प्रथम कांहीं दिवस अतिसार असतो. ताप दररोज संध्याकाळीं दोन डिग्री अधिक चढतो व सकाळीं १ डिग्री उतरतो. याप्रमाणें आठवडा संपण्याच्या सुमारास १०३-४ डिग्रीपर्यंत ताप चढतो. नाडीचा वेग व जोर वाढतो. छातींत कफ सूं सूं वाजून ती घरघरते. थोडासा श्वासनलिकादाह जाहलेला असतो. व खोकला येऊन कफ पडतो. ७ व १० व्या दिवशीं रोग्याचें स्वरूप प्रगट होऊं लागतें. रोगी सुस्त होतो, चेहरा फिकट पडतो, ओठ काळसर व डोळे सतेज दिसतात. जीभ कोरडी पडून वर बुरशी चढते, कधीं घाम सुटतो व घुणाघुणा फुटतो. पहिल्या आठवडयाच्या शेवटी ब-याच रोग्यांवर आढळणारे गुलाबी रंगाचे डाग दिसूं लागतात. ते चपटे, वाटोळे जरा वर उगवलेले, फुगीर, चवलीपेक्षां जरा लहान आकाराने असून बोटानें दाबले असतां नाहींसे होतात. ते प्रथमतः छाती, उदर, पोट या ठिकाणीं दिसतात. प्रत्येक डाग मावळण्यास तीन चार दिवस लागतात. ताप संपेपर्यंत ते येतच असतात. दुस-या आठवडयांत आमांश होऊन पोट नगा-यासारखें फुगतें व दाबलें असतां दुखतें. व रोग्यास अतिसार होतो. प्लीहा वाढते व शक्तिपात होतो, रोगी बडबडतो, तेथून पुढें तापाचा क्रम बदलून सकाळच्या ज्वराचें प्रमाण दररोज झपाटयानें उतरतें व सायंकाळच्या ज्वराचें प्रमाणहि हळू हळू उतरतें. पुढें चारपाच दिवसांनीं सकाळीं बिलकूल ताप नसणें व सायंकाळीं १०१ पर्यंत असणें असें चालू असतें. पुढे रोग्यांचे प्रकृतींत पालट पडून क्षुधा प्रबल होते.

कधीं कधीं मध्यें ८।१० दिवसांचें अंतर पडून हा रोग उलटतो किंवा पहिला ताप संपातच दुसरा ताप सुरूं होतो. व तींच लक्षणें व स्थिति पूर्ववत होते. कधीं कधीं अशा त-हेनें दोनदां तीनदां ताप उलटतो.

या रोगांत शेंकडा ५-२० पर्यंत रोगी दगावतात असा अनुभव आहे. दुस-या आठवडयांत रोग्यास १३० पर्यंत ताप असला व आंतडयास छिद्रें पडून रक्तस्त्राव होऊं लागला तर रोग असाध्य म्हणून समजावें. शस्त्राक्रियेनें हें बरें करतां येतें. पण रोगी बरा होण्यास बराच काळ लागतो. अतिशय कफ खोकला व अनियमित नाडी हीं वाईट चिन्हें होत.

उ प चा र व शु श्रू षा- रोग्यास हवाशीर ठिकाणीं बिछान्यावर अगर पलंगावर ठेवावें. रोग्यास उठूं देऊं नये. मलमूत्रविसर्जनास भांडें द्यावें, कारण आत्रंछिद्र अथवा रक्तस्त्राव होण्याची धास्ती नसावी. खाण्यास मुख्य पदार्थ दिवसां रात्रीं मिळून दोन तीन किंवा जितकें लागेल तितकें शेर दूध द्यावें. मात्र तें थोडें थोडें दर दोन तासांनीं नियमितपणें द्यावें. मल रोज पहावा व त्यांत दह्यासारखे बिन पचलेलें दूध पडत असेल तर दुधांत चुन्याची निवळ घालून मग देत जावें. ताजें ताक घुसळून तें या रोग्यांनां पाजणेंहि चांगलें. कोणी दूध प्रशस्त समजत नाहीं. कारण दुधांत सर्व जंतू उत्तम पोसले जातात. सौम्य ज्वरांत औषध बहुतेक नसलें तरी चालेल. घाम येईल असे औषध द्यावें. मधून मधून अंग कोमट पाण्याच्या बोळयानें पुसून काढावें. कफ झाला असल्यास कफक्षयकारक औषधें द्यावींत. मस्तकशूलसाठीं फिनासिटीन किंवा अॅस्पिरियन (५-१० ग्रेन) द्यावें. तीन चार पेक्षां अधिक जुलाब दिवसांतून होऊन अतिसार झाला असेल तर तो बंद होण्यासाठीं अफूमिश्रित औषध पोटांत देणें किंवा बस्ती दिला असतां अधिक उत्तम. रोग्याचीं वस्त्रें नेहेमीं पाण्यांत उकळून धुवावीं. शौचासच होत नसेल तर २।३ दिवस तिकडे दुर्लक्ष करावें. पुढें उबट पाण्यांत साबू मिसळून त्याचा बस्ती द्यावा. रेचक बहुधां देऊं नये. यांशिवाय दुसरेहि उपाय आहेत.

ज्वर नाहींसा झाल्यावर रोग्यास निदान दहा दिवस नुसत्या पातळ पदार्थावर ठेवलें पाहिजे, अन्न बिलकूल उपयोगी नाहीं. अगदीं सौम्य ताप असला तर ही मुदत थोडी कमी केली तरी चालते. रेचक कधीं देऊं नये. जरूरी भासल्यास बस्ती द्यावा. रोग्यास महिना-दीड महिना कोठल्याहि प्रकारचे शारीरीक अगर मानसिक श्रम देऊं नयेत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .