प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन 
 
सपृष्ठवंश- एकंदर प्राणिकोटीचा विचार केला असतां असें आढळून येईल कीं, पुष्कळ प्राण्यांनां पाठीला पृष्ठवंश म्हणजे कणा असतो. तेव्हां प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक भाग जो पडतो तो हा कीं पाठीला कणा आहे असें प्राणी. परंतु थोडा विचार केला असतां व ह्या प्राण्यांची उत्पति सपृष्ठ प्राण्यामध्यें कशी होते हें समजून घेतलें असतां असे आढळून येईल कीं या कण्याच्याऐवजीं परंतु त्याच ठिकणीं प्रत्येक सपृष्ठवंश प्राण्य मध्यें तो विकास पावतांना किंवा परिपूर्तता वस्थेंत असतांना एक गोल दांडयाप्रमाणें भाग अगोदर तयार होतो. त्याला आदिवंश असें म्हणतात. नंतर त्या आदिवंशाच्या ठिकाणीं पाठीचा कणा उत्पन्न होतो कांही प्राण्यांमध्यें आदिवंश शेवटपर्यंत तसाच रहातो व त्याचें कण्यांत रूपांतर होत नाहीं तेव्हां पाठीला कणा आहे असे प्राणी किंवा कण्याच्याऐवजीं परंतु त्याच ठिकाणीं एक गोल दांडयाप्रमाणें ज्याला ह्यांना आदिवंश म्हणतात तो ज्याच्या शरीरांत असतो तो प्राणी ह्यांना सपृष्ठवंश प्राणी म्हणतात या सर्व प्राण्यांची मूळाची उपपत्ति लावूं पहात असतांना असें आढळून येतें कीं त्यांच्यामध्यें पुष्कळ गोष्टींत साम्य द्दष्टोत्पत्तीस येतें. म्हणून त्यांचा एक अनुवर्धित संघ याच नांवाचा बनविला आहे. हें खालीं दिलेल्या वर्गीकरणाच्या कोष्ठकावरून दिसून येईल. या संघामध्यें मासे द्विधागतिक किंवा जलस्थलचर बेडूक व त्यांच्यासारखे प्राणी, उरोगामी किंवा सर्पटणारे सर्प व तसे प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी हे सर्व मोडताता. तसेच निगूढवंश म्हणजे ज्या प्राण्यांत हा आदिवंश असतो परंतु स्पष्टपणें व्यक्त झालेला नाहीं असे प्राणी व पुच्छवंश म्हणजे ज्यांच्या शरीराच्या पुच्छभागीं आदिवंश असतो, असे प्राणी यांचाहि त्यांत समावेश होतो. या संघाला सपृष्ठवंश हेंच नांव आहे व तें असण्याचें कारण पण हेंच आहे कीं या मोठया संघांतील सर्व प्राण्यामध्यें जें एक महत्त्वाचें सर्व साधारणलक्षण आढळून येतें व ज्याच्यामुळें या संघांतील सर्व प्राण्यांचा एकमेकांशीं संबंध असलेला दिसतों तें हेंच कीं परिपूर्तितावस्थेंत किंवा बाल्यावस्थेंत किंवा सबंध आयुष्यभर या प्राण्याच्या शरीरात आदिवंश असतो. हा आदिवंश पेशींचा झालेला असून तो एखाद्या गोल दांडयाप्रमाणें दिसतो. शरीरांत आंत्राच्या पृष्ठावर व मुख्य मध्यवर्ती ज्ञानेंद्रियव्यूहाच्या अधोभागीं हा झालेला असतो. व त्याच्यासभोवतीं त्याला मध्यम त्वेचेचें एक नलिकासम वेष्टण झालेलें असतें. या आदिवंशाच्या शरीराला एक प्रकारें आधार होतो. सपृष्ठवंश सशीर्षामध्यें व बहुतकरून याच्या ठिकाणीं व याच्याऐवजीं एक पुष्कळ भाग मिळून झालेला अस्थिमय किंवा तरुणास्थींचा बनलेला पाठीचा कणा तयार होतो. दुसरें या प्राण्यांत मुखक्रोडाच्या मागच्या पश्चिम शेंवटाला गलविवर म्हणतात. या गलविचाराच्या भागाला या संघांतील प्राण्यांच्या दोहों बाजूंस जोडीनें कांहीं वलयें लागलेलीं असतात. व त्या वलयाच्या मध्यंतरी भेगा दिसून येतात. यांनां श्वासेंद्रियवलयें व श्वासेंद्रियभेगा असें अनुक्रमें म्हणतात. या भेगा कांहीं प्राण्यामध्यें सबंध आयुष्यभर असतात; जसें मासे. दुस-यामध्यें बाल्यावस्थेंतच असतात; जसें बेडूक. ह्याशिवाय व इतरांमध्यें परिपूर्तितावस्थेंत अस्पष्टपणें नुसतीं श्वासेंद्रियवलयें फक्त थोडा वेळ दिसतात. तिसरें सर्व साधारण लक्षण या संघांतील प्राण्यांमध्यें आढळून येतें तें हें कीं शरीराच्या अगदीं पृष्ठभागावर मध्यवर्ति असा मुख्य ज्ञानेंद्रियव्यूह तयार होतो व तो एखाद्या नलिकेप्रमाणें झालेला असतो. या संघांतील प्राण्यांचें वर्गीकरण पुढें दिल्या प्रमाणें आहे.

प्राणीकोटींत अपृष्ठवंश व सपृष्ठवंश असे मुख्य दोन भेद असून सपृष्ठवंशाचे (१) पूर्णवशं, (२) पुच्छवंश व (३) निगूढवंश असे तीन पोटसंघ आहेत. पूर्णवंशाचे आणखी (१) निःषीर्श व (२) सशीर्ष असे दोन भेद असून सशीर्षाचे पुन्हां (१) हनुरहित अथवा वर्तुलमुखी, (२) मीन अथाव मासे, (३) द्विधागतिक किंवा स्थलजलचर, (४) उरोगामी अथवा सरपटणारे प्राणी, (५) पक्षी किंवा विहंग, व (६) सस्तन असे सहा वर्ग केले जातात.

पू र्ण वं श- सपृष्ठवंश प्राण्यांच्या संघांतील पूर्णवशं हा एक पोटसंघ आहे. सपृष्ठवंशांतील प्राण्यांचीं जीं तीन लक्षणें सांगितलीं तीं या समुदायामध्यें स्पष्टपणें व्यक्त झालेलीं असतात ती येणेंप्रमाणें:-(१) आदिवंश पृष्ठावर संबंध शरीरभर असतो (२) शरीराच्या अगदीं पृष्ठभागावर मध्यवर्ती असा मुख्य ज्ञानेंद्रियव्यूह झालेला असतो व तो नलिकासम पोकळ असून विवरयुक्त असतो. (३) श्वासेंद्रियवलयें व श्वासेंद्रियभेगा असतात. कमी दर्जाच्या निगूढवंश व पुच्छवंश ह्यांच्याखेरीजकरून सर्व उच्च दर्जाच्या पूर्णवंशांतील प्राण्यांत हीं तिन्हीं लक्षणें पूर्णत्वानें विकास पावलेलीं आढळून येतात. याशिवाय मुखद्वार शरीराच्या पूर्व शेवटीं झालेलें असतें. व गुदद्वार पश्चिमशेवटीं झालेलें असते ह्या पोटसंघातील प्राण्यांत पचनेंद्रियव्यूहांपैकी एक भाग ज्याला यकृत म्हणतात तो-बराच विकास पावलेला असतो. प्रथमतः यकृत आद्यांत्रापासून फांटयाप्रमाणें उगम पावतो व नंतर तो अलग होऊन वाढतो. या समूहांतील प्राण्यांत हृदय शरीराच्या उदरतलभागीं झालेलें असते. रुधिराभिसरणासंबंधी एक गोष्ट विशेषतः आढळून येते ती ही कीं, जठर, आंत्र आणि प्लीहा यांच्यापासून परत फिरलेलें रक्त ह्दयांत दाखल होण्यापूर्वी अगोदर यकृतांत यकृतोन्मुखी रक्तवाहिनीनें अभिसरण पावून मग हृदयांत जातें.

निःशीर्ष सपृष्ठवंश- सपृष्ठवंश प्राण्यांच्या संघातील पूर्णवंश प्राण्यांचे जे दोन भेद आहेत त्यांपैकीं निःशीर्ष प्राण्यांचा एक भेद होय. हिंदुस्थानच्या सिंहलद्वीपाच्या व अंदमान बेटाच्या आसपास समुद्रांत हे प्राणी सांपडतात. या समूहांतील प्राण्यांची संख्या थोडी असून त्यांचें मुख्य लाक्षणिक चिन्ह म्हटलें म्हणजे शरीराच्या पूर्णशेवटला शीर्षाचा स्पष्टपणें व्यक्त झालेला असा भाग नसतो. या समूहाचा प्रतिरूपप्राणी अॅफी   ऑक्ससल्यान्सिओलेटस होय हे प्राणी बहुधा थोडयाशा खोल पाण्यांत तळाला तोंडाचा भाग वर ठेवून रेतीमध्यें रुतून बसलेले असतात. लहान माशांप्रमाणें दिसून यांचें शरीर दोन्ही शेवटाला निमुळतें व फार तर सुमारें दोन इंच लांब असतें. तें कबंधाच्या पृष्ठावर दोन्ही बाजूनें चपटलेलें असून अधोभागीं सपाट असतें. त्यामुळें कबंधाचा  भाग त्रिकोनाकृति बनला जातो. व या कारणानें पृष्ठभागावर मधोमध एक संबध धार बनते व ह्या धारेला त्वचेचेंच बनलेलें असे एक संबंध पर लागलेलें असतें. तसेंच उदरतलभागीं दोन बाजूंनां दोन धारी बनून त्यांनांहि तसेच पर लागलेले असतात. शेपटाकडला भाग दोहों बाजूंनीं दडपलेला असतो. त्यामुळें त्याच्या पृष्ठावर व अधोभागीं एक एक धार झालेली असते. व त्या प्रत्येक धारेला एक त्वचेचा पर झालेला असतो. कबंधाचा पृष्ठपर या पुच्छपराशीं जुळून अखंड झालेला दिसतो. शरीरालाहि गात्रें नसतात हें एक या समूहाचें लाक्षणिक चिन्ह होय. बाह्य त्वचाहि एकेरी पेशींच्या थरानें झालेली असते व तिला हालणारे केश लागलेले असतात. शरीराच्या निमुळत्या पूर्वशेवटाला अधोभागीं एक मधोमध गोलाकार खांचणीसारखें विवर असतें. व या विवराच्या थोडयाशा आंतल्या बाजूस त्याला लागलेली एक झालरीप्रमाणें फडा झालेली असते. व तिच्यामध्यें मुखछिद्र बनलेलें असतें. या झालरीच्या कांठाला पुष्कळ संकोचक ताठर केस बसलेले असतात. कबंधाच्या व शेंपटाच्या संयोगाच्या ठिकाणीं उदरतलावर एक मोठें छिद्र थोडेसे पश्चिमभागी डाव्या बाजूवर गुदद्वार असते. ते एका बाजूवर असल्याकारणाने आकारशुध्द बनलेले नसते. या गुदद्वारापासून शेपटाचा भाग सुरु होतो. शरीराचे मास अथवा स्नायू गुच्छमय असून ते मासंगुच्छ क्रमबंध असे शरीराच्या दोहो बाजूवर एकमेकास कळाशीत जोडलेले असे बनून येतात. दोन मांस गुच्छांमध्ये संयोजक धातूंचा एक पडदा असतो.

पृष्ठवंश आदिवंशाच्या रूपांतच शेवटपर्यंत कायम राहतो व या आदिवंशाचा शेवट पूर्वभागीं ज्ञानेद्रिंयव्यूहाच्या शेवटाच्या थोडा पलीकडे होतो. हें एक या समूहाचें लाक्षणिक चिन्ह होय. आदिवंश पेशीमय धातूंचा बनलेला असतो. आदिवंशाशिवाय सांपळ्याचा कोणताहि भाग झालेला नसतो. मुखापासून गलविवाराचा भाग झालेला असतो. तो बहुतेक अधिकाधिक शरीरभर पोहोंचलेला असतो. गलविवराच्या दोन बाजूंवर अनेक सूक्ष्म भेगा असतात. त्यांना श्वासेंद्रीयभेगा म्हणतात. व त्यांना आंतून केशयुक्तपेशीचें आच्छादन असतें. गलविवराच्या संबंध भागाला बाह्यतः शरीरांतल्या एका कलेचें वेष्टण झालेलें असतें. व त्यामुळें गलविवर या कलागृहेमध्यें स्थापित झालेलें असतें. ही कलागुहा वर सांगितल्याप्रमाणें एका छिद्रानें पश्चिमभागीं बाहेर उघडते हें या समूहांतील प्राण्यांचें एक लाक्षणीक चिन्ह होय.

गलविवराच्या श्वासेंद्रिय भेगांनां आंतून साधीं (केवळ नांवाचीं) श्वासेंद्रीयें लागलेलीं असतात. गलविवराची पोकळी अर्थात या भेगांच्या द्वारें कलागुहेमध्यें उघडते. गलविवराला आंतून केशयुक्तपेशीचें आच्छादन असल्यामुळें त्या केशांच्या हालचालीनें श्वसनक्रियेंत पाणी मुखद्वारें गलविवरांत येतें व गलविवराच्या भेगांतून त्यांच्या कांठाला लागलेल्या श्वासेंद्रियावरून कलागुहेंत जातें व त्यानंतर कलागुहेच्छिद्रानें बाहेर पडतें. श्वासेंद्रियांतून वहात जाणारें रक्त ह्या पाण्याच्या प्रवाहानें त्यांतील प्राणवायूमुळें शुद्ध होतें. गलविवर पश्चिम शेवटीं निमुळतें होतें. व त्यापासून आंत्राचा भाग निघतो तो एकसारखा गुदद्वारापर्यंत जाऊन त्यांत शेवट पावतो. गलविवराला आंतून मध्यउदर तलभागीं एक संबंध लांब-अरुंद खांचणी असते. व ती खांचणी केशयुक्तपिंडरूपी अशा पेशींनीं आच्छादित असते. तशीच दुसरी एक खांचणी गलविवराला मध्यपृष्ठभागीं असते. या दोन्ही खांचण्या पूर्वभागीं मुखफडाच्या बाजूवर अर्धचंद्राकृति दोन खांचण्यामुळें जोडल्या जातात. आंत्राच्या सुरवातीला अर्धाभागीं आत्राची एक लहान नलिकारूप अर्धपोकळी बनून आंत्राच्या उजव्या बाजूस पूर्वदिशेस पसरलेली असते. तिच्या आत पिंडपेशी लागलेल्या असतात व त्या पाचक द्रव्यें उत्पन्न करतात. म्हणून या नलिकेसारख्या आंत्राच्या भागाला यकृत म्हणतात. तेव्हां या समूहांत यकृत हें आंत्राचाच एक अंधनलिकारूप भाग होय. गलविवराच्या खांचण्यांतील पिंडपेशीमुळें श्लेष्मा तयार होतो, व तो श्वास क्रियेंत घेतलेल्या पाण्यांत टाकिला जातो व त्यामुळें पाण्याच्या प्रावाहांत तरंगत असलेले सूक्ष्म अन्नरूपी कण त्याला चिकटून एकवटतात व हा असा एकवटलेला आंत्राचा गोळा गलविवराच्या पश्चिमशेवटीं आल्यावर आंत्रामध्यें शिरतो. याप्रमाणें अन्नाचा पुरवठा होतो व तें अन्न आत्रांमध्यें पचन पावतें.

रक्ताला रंग नसतो व हृदय बनलेलें नसतें. रक्तवाहिन्यांचा सर्व शरीरभर एक प्रकारचा व्यूह झालेला असतो. हृदयाच्या ऐवजीं कांहीं रक्तवाहिन्या संकोच-विकास पावतात व त्यामुळें या रंगरहित रक्ताचें रुधिराभिसरण होतें. पश्चिम उदरतलभागांतून पूर्वभागीं रक्त वहात येतें व हें वहात आलेलें रक्त यकृताच्या भागांत अगोदर जाऊन मग पुढें श्वासेंद्रियांतून शुद्ध होऊन वर पृष्ठभागीं येतें आणि नंतर पश्चिमभागीं पृष्ठतलांतून वहात जातें. यकृतोन्मुखी रक्तवाहिन्यांची रचना जी सर्व सपृष्ठवंशांत दिसून येते तीच इकडे पण दिसते. ज्ञानेंद्रिये नलिकामयच राहून त्याच्यापासून पूर्वशेवटीं मस्तिष्क असें बरोबर बनलेलें नसतें. त्याच्यासारख्या भागातून मस्तिष्करज्जूंच्या दोनच जोडया निघालेल्या असतात. सुपुष्णारज्जुचे पृष्ठ व उदरतलभागाकडचे मूळरज्जू जोडले जाऊन प्रत्येक सुपुष्णा रज्जू झालेली नसते. विशिष्ट प्रकारचीं ज्ञानेंद्रियें झालेलीं नसतात. गलविवराच्या बहिर्भागीं अनेक वांकडया वृक्कनलिका स्वतंत्र रीतीनें व जोडीनें पसरलेल्या असतात. या प्रत्येक वृक्कनलिकेला कलागुहेमध्यें उघडणांरें एक छिद्र असतें, त्यांतून मूळ बाहेर पडतें.

जनकत्वासंबंधी म्हटलें तर नर आणि मादी असे भेद आहेत. तरीं जननेंद्रियें दोहोंमध्यें बाह्यस्वरूपानें एकसारखींच असतात व त्यांना स्त्रोतस नसतात. मादीमध्यें अंडी प्रथमतः कलागुहेंत  येऊन पडतात. व तेथून मग कलागुहाछिद्रानें बाहेर पडतात. नराचें शुक्रबीज सुद्धा असेंच बाहेर पडतें. शरीराच्या बाहेर आल्यावर अंडीं पाण्यात शुक्रबीजांशीं संभोग पावतात व फलद्रूप होऊनं विकास पावतात.

सशीर्ष सपृष्ठवंश- सपृष्ठवंशप्राण्याच्या संघांतील पूर्णवंशप्राण्यांचे दोन भेद आहेत. त्यांपैकीं सशीर्ष प्राण्यांचा एक भेद होय. या समूहांत पाठीला कणा असलेले आणि शरीराच्या पूर्वभागीं र्शीर्षाचा भाग स्पष्टपणें व्यक्त झालेला आहे असे प्राणी मोडतात. म्हणजे हनुरहित, मत्स्यवत् प्राणी अथवा वर्तुलमुखी मासे, बेडूक वगैरे, सर्प, पक्षी आणि सस्तन या प्राण्यांचे वर्ग होत. सपृष्ठवंश सशीर्षाच्या निरनिराळ्या वर्गांतील प्राण्यांमध्यें शारीरिक रचनेसंबंधी ठळक व साहजिकच भिन्नता जरी दिसून आली तरी त्या सर्व वर्गांमध्यें प्राण्यांच्या निरनिराळ्या अवयवांच्या साधारण रचनेसंबंधी व अवयवांच्या घटकधातूसंबंधी विचार केला असतां असें आढळून येईल कीं त्यामध्यें एक मूलभूत कल्पना असून तिची त्या सर्वांमध्यें एकता दिसून येते. ती इतकी कीं, अपृष्ठवंश प्राण्यांच्या एखाद्या ठळक संघातील प्राणिसमूहामध्यें इतकें ऐक्य दिसून येत नाहीं. सशीर्षातील एकंदर सहा वर्गांमध्यें इतके फेरबद्दल होत नाहींत व झाले तरी त्यांची मर्यादा इतकी नसते. इतके फेरबदल एखाद्या अपृष्ठवंशातील वर्गांच्या प्राण्यांत होत असतात. उदाहरणार्थ जलस्थ कीटक. तेव्हां साधारणरीत्या या वर्गांतील प्राण्यांच्या निरनिराळ्या इंद्रियांसंबंधी सविस्तर विवेचन करणें या ठिकाणीं इष्ट आहे म्हणजे पुन्हां पुन्हां प्रत्येक वर्गांत या बाबींसंबंधी पुनरुक्ति करण्याची जरूरी रहाणार नाहीं.

सशीर्षांमध्यें शरीर साधारणतः गोलाकर बनून पूर्वपश्चिमरीत्या लांबट असें झालेलें असतें. शरीराच्या दोहोंबाजूंवर अवयव अगदीं सारखे झालेले असतात. त्यामुळें पार्श्वभागीं शरीर अगदीं आकारशुद्ध बनलेलें असतें. शरीराचे तीन भाग ओळखतां येतात ते येणेंप्रमाणें:- पूर्वभागीं एक शीर्ष असतें. याच्यामध्यें मुख्य ज्ञानेंद्रिय मेंदु किंवा मस्तिष्क झालेला असतो. व या शीर्षाला मुखद्वार लागलेलें असतें. तोंडांतील पोकळीला मुखक्रोड म्हणतात. व त्याचा पश्चिम शेवट गलविवर होय. दुसरा शरीराचा भाग म्हटला म्हणजे कबंध होय. याच्या आंतील पोकळीला शरीरगुहा असें म्हणतात. व या शरीरगुहेंत पचनेंद्रियव्यूहाचे भाग, हृदय व मुख्य रक्तवाहिन्या, मलोत्सर्गाची मुख्य इंद्रियें व जननेंद्रिये असतात. तिसरा शरीराचा भाग म्हटला म्हणजे शेंपटाचा होय. या भागांत शरीरगुहा नसून ती शरीरगुहा व गुदद्वार यांच्या पश्चिमभागीं झालेला असेतो व यांत मुख अंतरिंद्रियें कांहींच नसतात. शीर्ष आणि कबंधाच्या दरम्यान एक आवळलेला शरीराचा भाग ज्याला मान किंवा ग्रीवा असें म्हणतात. तो- पुष्कळ प्राण्यांत असतो. त्यांत शरीरगुहेचा भाग अंतर्भूत झालेला नसतो. जलचर प्राण्यांमध्यें शेंपटाचा भाग बराच वाढत असून मोठया आकाराचा असतो. तो कबंधापासून निराळा झालेला दिसत नाहीं व पाण्यांत तरंगणारा मुख्य अवयव किंवा साधन तो होय. स्थलचरांमध्यें शेंपटाचा भाग बारीक असतो. व तो शरीराला जोडलेल्या एखाद्या गात्राप्रमाणें दिसतो.

त्वचाः- शरीराला त्वचेचें पूर्ण आच्छादन झालेलें असतें व या त्वचेच्या योगानें शरीराच्या सर्व धातूंचें संरक्षण होतें. बेडुक व कांहीं इतर प्राण्यांमध्यें या त्वेचचा उपयोग श्वासोच्छवासक्रियेमध्यें होतो. त्वेचेचे दोन भाग असतात. एक बाहेरच्या अंगाचा भाग; याला बाह्यत्वचा म्हणतात. बाह्यत्वचा कांही थरांची झालेली असते व हे थर पेशीमय  असतात. हिच्यामध्यें केंस, पंखे व कांहीं प्रकारचे खवले उत्पन्न होतात. बाह्यत्वचेच्या आंतील व खालीं असलेल्या दुस-या भागाला श्वेतत्वचा म्हणतात. श्वेतत्वचेमध्यें रक्तवाहिन्या झालेल्या असतात व त्यामुळें त्यांतून रक्तरस पाझरून निघून बाह्यत्वचेमध्यें भिनतो व या रीतीनें बाह्यत्वचेचें पोषण होतें. श्वेतत्वचेमध्यें माशांचे खवले, सुसरीचे खवले इत्यादी उत्पन्न होतात, सपृष्ठवंशांमध्यें दंताचा उगम श्वेतत्वचेपासून होतो व नंतर त्याला बाहेरून बाह्यत्वचेंतून तयार झालेलें एनेमल धातूंचें आच्छादन झालेलें असतें.

अस्थिपंजरः- खवले वगैरे त्वचेमध्यें झालेले शरीराचे कठिण भाग यांच्या शरीराला एक प्रकारचें आच्छादनरूपी बाह्यकवच झालेलें असतें. तथापि याखेरीजकरून शरीरांत कठीण भागांचा एक समूह झालेला असतो त्याला अस्थिपंजर म्हणतात. अस्थिपंजराचे दोन भाग ओळखतां येतात. एक अक्षवर्ती अस्थिपंजराचा भाग व दुसरा संयोजित अथवा शाखागत अस्थिपंजराचा भाग. अक्षवर्ती अस्थिपंजराचा भाग हा करोटी पृष्ठवंश व त्याला जोडलेल्या परशुका यांचा झालेला असतो.

संयोजित अथवा शाखागत अस्थिपंजराचा भाग गात्रमंडलें व त्यांनां जोडलेलीं गात्रांचीं हाडें यांचा झालेला असतो. गात्रमंडलें दोन असतात. पूर्वभागीं एक अंसमंडल असून त्याला जोडलेलीं हाडें असतात. व पश्चिमभागीं दुसरें श्रेणिमंडळ असून त्याला जोडलेलीं हाडें असतात. अस्थिपंजराचा परिपूर्तितावस्थेंत बनलेला अगदीं पहिला भाग म्हटला म्हणजे आदिवंश होय. हा पेशीमय असून एक गोल दांडयाप्रमाणें शरीराच्या मध्यवतीं पृष्ठभागावर मुख्य ज्ञानेंद्रिव्यूहाच्या खालीं तयार होतो. त्याला नंतर एक तरुणास्थीचें नलिकेसारखें वेष्टण होतें व त्या नलिकेचे भाग पडून त्या भागांपासून पाठीच्या कण्याचे मणके अथवा कशेरू आदिवंशाभोंवती तयार होतात. या सर्व एकाला एक जोडलेल्या कशेरूंनां पाठीचा कणा अथवा पृष्ठवंश असें म्हणतात. पाठीच्या कण्याच्या पूर्वशेवटीं करोटी तयार होते. करोटी ही प्रथमतः तरुणास्थीची बनून मग तिला पुष्कळ कलास्थी जोडल्या जाऊन ती पूर्णस्वानें तयार होते हनुरहित मत्स्यवत् प्राणी व तरुणास्थिमत्स्य यांच्यामध्यें करोटी तरुणास्थीचीच बनलेली राहते. त्यांच्यावरच्या दर्जाच्या म्हणजे अस्थिमय मासे, बेडूक इत्यादी प्राण्यांमध्यें ती अस्थिमय बनते. तिच्या पश्चिमशेवटीं एक विचार झालेले असतें. त्याला कपालमहाविवर म्हणतात. मुख्य ज्ञानेंद्रियाचा पश्चिम भाग सुषुम्णा या विवरापासून उगम पावून कशेरू विवरामध्यें स्थापित झालेला असतो. या विवराच्या भागाला बाजूला एक किंवा दोन संध्यर्बुंद झालेले असतात.त्यांच्यामुळें करोटी पहिल्या कशेरूशीं जुळून राहते. ही करोटी पूर्णत्वानें विकास पावत असतां तिला गलविवराच्या दोहोंबाजूंस तयार झालेल्या वलयांपैकीं कांही पूर्णवलयें जोडलीं जातात.

सर्वांत पहिल्या पूर्वभागीं असलेलें वलय हनुवलय होय. तें मुखद्वाराभोंवतीं जडले जाऊन त्याच्यापासून तोंडाचे जबडे तयार होतात. दुसरें जिव्हावलय होय. हीं दोन्हीं वलयें महत्वाचीं असून करोटीला जोडलीं जातात व त्यामुळें करोटी पूर्णत्वास येतें. या दोन वलयांखेरीजकरून इतर वलयें म्हणजे श्वासेंद्रियवलयें हीं होत. तीं माशांमध्यें पूर्णत्वानें बनून कायम राहतात. व त्यांच्यामध्यें श्वासेंद्रीयभेगा तयार झालेल्या असतात. द्विधागतिक, बेडूक वगैरे प्राण्यांतहि हीं कांहीं कालपर्यंत झालेलीं असतात व नंतर तीं दिसेनाशीं होतात. त्यांच्यावरच्या दर्जाच्या वर्गांतील प्राण्यांत ही श्वासेंद्रियवलयें चांगलीं स्पष्टपणें बनत नाहींत.

पाठीचा कणा किंवा पृष्ठवंश यांच्यामुळें शरीराला एक प्रकारची बळकटी आलेली असते. पृष्ठवंशाला मांसगुच्छ अथवा स्नायू लागलेले असतात. कण्याचे भाग म्हटले म्हणजे मणके किंवा कशेरू होत. प्रत्येक कशेरू कांहीं भाग मिळून झालेला असतो. ते भाग येणेंप्रमाणें:-(१) कशेरूघन म्हणजे ज्या भागावर सुषुम्णा अधारभूत झालेली असते तो भाग (२) कशेरूघनापासून दोहोंबाजूंस पृष्ठावर गेलेलीं वलयें जीं सुषुम्णेला वेष्टण करतात तीं कशेरूवलयें होत. (३) पृष्ठावर कशेरूवलयें संयोग पावून त्या संयोगापासून एक कंटकासारखा भाग निघतो, त्याला कशेरूकंटक म्हणतात. (४) कशेरूघनापासून जेथें कशेरूवलय उगम पावतें तेथून बहिर्भागीं सारखा वाढलेला एक भाग प्रत्येक बाजूला असतो त्याला कशेरूसमप्रसर अथवा कशेरूबाहु म्हणतात. याला परशुका बहुतकरून जोडलेल्या असतात सर्व कशेरूंची वलयें एकसारखीं क्रमानें जोडलीं गेल्यामुळें जी एक नलिकासम पोकळी तयार होते तींत सुषुम्णा स्थापित झालेली असते व तिला कशेरूविवर असें म्हणतात.

असंमंडल हें पृष्ठवंशाला जोडलेलें नसतें. तें मासंगुच्छानें आच्छादित असून त्यांत रुतून राहिलेलें असतें. त्याच्या पृष्ठावरील भाग म्हटला म्हणजे असंफलक होय. उदरतलाचा भाग अंसचंचू होय. यालाचा जत्रू जोडलेले असतात. अंसमंडलाच्या एका भागाला अंसकूट असें म्हणतात.

पूर्व गात्राचे भाग तीन असतात:- (१) प्रगंड, (२) प्रकोष्ठ व (३) हस्त. प्रगंडाला एकच हाड असतें त्याला प्रगंडस्थि म्हणतात. त्याचा आदिम शेवट अंसमंडालाच्या बरोबर संयोजित झालेला असतो व अंतिम शेवट प्रकोष्ठाच्या हाडांशीं जोडलेला असतो. प्रकोष्ठामध्यें दोन हाडें असतात. त्यांतील अंतस्थ असलेले कर्पूरास्थि होत व बहिर्भागी असलेले भक्षक होत. ह्यांचे अंतिमशेवट हस्तांतील आदिम हाडांच्या बरोबर जोडलेले असतात. हस्तांच्या ठिकाणीं लहान हाडांच्या तीन रांगा असतात. आदिम रांगेंतील हाडांनां कूर्चास्थि म्हणतात. व हीं कर्पूरास्थि व अक्षक यांच्या अंतिम शेवटीं जोडलेलीं असतात. यांच्यापुढची मध्यम रांग म्हटली म्हणजे करतलांतलीं हाडें होत त्यांनां करभास्थि म्हणतात. व त्यांच्या पुढची अंतिम रांग म्हटली म्हणजे शेवटच्या अंगुलास्थि होत.

श्रोणिमंडल हें पृष्ठवंशाला जोडलें जातें. त्याच्या प्रत्येक बाजूचा मुख्य भाग म्हटला म्हणजे श्रोणिफलक किंवा कटिफलक होय. या कटिफलकाचे तीन विभाग ओळखितां येतात ते असेः- श्रोणिफलकाच्या पृष्ठावरील असलेला भाग; याला कटिकपाल म्हणतात. त्याच्या अधस्तलीं असून पश्चिम भागीं झालेल्या भागास ककुंदास्थि म्हणतात. व अधस्तलीं असून थोडासा पूर्वभागीं झालेल्या भागांस भगास्थि म्हणतात.

पश्चिमगात्राला सुद्धां तीन भाग असतात ते (१) ऊरु, (२) जंघा व (३) पाद हे होत. ऊरूमध्यें एक हाड असतें त्याला ऊर्वस्थि म्हणतात. त्याचा आदिम शेवट श्रोणिमंडलाच्याबरोबर संयोजित झालेला असतो व अंतिम शेवट जंघेच्या हाडाशीं जोडलेला असतो. जंघेमध्यें दोन हाडें असतातः मुख्य जंघास्थि-जे ऊर्वस्थींशीं जोडलेले असतात-व दुसरे बर्हिर्जघास्थि होत. पादांमध्यें सुद्धां हाडांच्या तीन रांगा असतात. आदिम रांगेंतील हाडें दोन कूर्चशीर्ष व पार्श्व जंघास्थि व बहिर्जघास्थि यांच्याबरोबर जोडलेलीं असतात. यांना पादकूर्चास्थि म्हणावें. यांच्यापुढें असलेल्या मध्यम रांगेतील हाडांनां पादानुकूर्चास्थि म्हणतात. व त्यांच्या शेवटीं पुढें अंतिम रांगेतील हाडें यांना पादांगुलास्थि म्हणतात.

माशामध्ये गात्रेंहि अंगुलिविहीन परांच्या रूपानें असतात. त्यांच्या वरच्या दर्जाच्या सर्व प्राण्यांमध्यें गात्रें जेव्हां झालेलीं असतात, तेव्हां ती अंगुलीयुक्त अशींच असतात.

ज्ञानेंद्रिय व्यूहः- याच्यामध्यें दोन प्रकार आहेत: एक मध्यवर्ती मुख्य ज्ञानेंद्रिय समूह होय. हा मेंदु किंवा मास्तिष्क आणि सुषुम्णा व त्या दोहों मधून निघणा-या ज्ञानरज्जू यांचा झालेला असतो. ह्याच्याशिवाय शरीरांतील सर्व अंतरिंद्रियांचा बोध ज्याच्यामुळें होतो असा दुसरा ज्ञानसमूह शरीरांत असतो. त्याला ज्ञानकंदसमूह म्हणतात. मध्यवर्ती मुख्य ज्ञानकंदसमूह पहिल्या प्रथम बाह्यत्वचेंतून शरीराच्या पृष्ठभागावर एक नलिकारूपानें उगम पावतो. या नलिकेचें पूर्व शेवट मोठें वाढून नंतर तें विभाग पावतें. हा विभाग पावलेला भाग करोटीनें आच्छादिला जातो. व त्यापासून मेंदू अथवा मस्तिष्क तयार होतो . बाकी राहिलेल्या नलिकेच्या भागांतून सुषुम्णा तयार होतो. मस्तिष्काचे तीन भाग असतात. ते असे पूर्वमस्तिष्क, मध्यममस्तिष्क, व पश्चिम मस्तिष्क. हे मस्तिष्काचे भाग पूर्णपणें वाढत असतां त्यांच्यात उपभाग पडतात व प्रत्येक उपभाग बहुतेक दोन शकलांचा झालेला असतो. हीं पोकळ शकलें जोडीनें दोहों बाजूंवर पसरलीं जाऊन मधोमध जोडलेलीं असतात. तेव्हां पूर्वमस्तिष्काचे साधारणतः भाग म्हटले म्हणजे पूर्वभागीं असलेली घ्राणमस्तिष्कशकलांची जोडी होय. घ्राणमस्तिष्कापासून घ्राणरज्जू निघून त्या नासिकेमध्यें शेवट पावतात. गुरुमस्तिष्क शकलें फार महत्वाचीं असतात. कारण यांत प्राण्यांच्या बुद्धीचा उद्रव होत असतो. तेव्हां ज्या प्रमाणावर प्राण्यांचे बुद्धि वैभव वाढलेलें असेल त्या  प्रमाणावर त्यांची वाढ झालेली असते. साधारणतः उच्च दर्जाच्या प्राण्यांत यांचा विस्तार जास्त झालेला असतो. पूर्वमस्तिष्काचा विकास होत असतांना कांहीं खालच्या दर्जाच्या प्राण्यांत गुरुमस्तिष्काच्या पश्चिमभागीं ह्यांतला थोडासा भाग तसाच राहतो. त्याला पूर्वमस्तिष्कपश्चिमशेषखंड असें म्हणतात. त्यांत जी पोकळी राहते तिला तिसरें मस्तिष्कविवर असें म्हणतात. मध्यमस्तिषकचा विकास द्दष्टि अथवा चक्षुमस्तिष्कांच्या जोडींत झालेला असतो. पूर्व मस्तिष्क व पश्चिम मस्तिष्क ह्यांचा संयोग झालेल्या ठिकाणीं पृष्ठावर एक लहानसा भाग असतो. त्याला मस्तिष्कनेत्रछाया असें म्हणतात. अधस्तलभागीं दुसरा एक लहानसा भाग असतो. त्याला मस्तिष्कमुखक्रोडसंधिशेष असें म्हणतात. पश्चिममस्तिष्काचा भाग विकास पावल्यावर त्यांत दोन उपभाग झालेले असतात. पहिला पूर्वभागीं असलेला भाग अनुमस्तिष्क होय. हा निरनिराळ्या वर्गातील प्राण्यांत कमीजास्त प्रमाणानें वाढलेला असतो. याच्या पश्चिमभागीं असलेला दुसरा उपभाग म्हटला म्हणजे सुषुम्णाशीर्ष होय. या सुषुम्णाशीर्षापासून बहुतेक मस्तिष्करज्जू निघालेल्या असतात. याचा आकार त्रिकोणाकृति असून त्याच्या शिखराचा भाग सुषुम्णाशीं संलग्न झालेला असतो. यांच्यातील पोकळीला चवथे मस्तिष्कविवर असें म्हणतात. व तें सुषुम्णा विवरांत अंतर्भूत होतें. मांसे, बेडूक, व सर्प यांच्या वर्गांतील प्राण्यांत मस्तिष्करज्जूंच्या दहा जोड्या असतात. त्यांचीं नावें उपक्रमानें येणेंप्रमाणें:- (१) घाणरज्जू (२) द्दष्टिरज्जू किंवा आलोचकरज्जू, (३) नेत्रचेष्टारज्जू, (४) नेत्रोर्ध्वस्नायुगामीरज्जू, (५) त्रिमुखगामीरज्जू, (६) पृष्ठमरज्जू, (७) मुखरज्जु, (८) कर्णरज्जू, अथवा श्रावकरज्जू, (९) जिव्हारज्जू, (१०) क्लोमजठरगामीरज्जू. पक्षी आणि सस्तन ह्या वर्गांतील प्राण्यांमध्यें आणखी दोन रज्जूंच्या जोडया जास्त झालेल्या असतात. त्यांचीं नांवें (११) साहाय्यकपृष्ठवंशरज्जू व (१२) आधिजिव्हाचालकरज्जू. सुषुम्णा गोलाकार असून तिच्या पृष्ठावर व अधस्तलावर मधोमध तिच्या सबंध लांबीपर्यंत एक एक खांचणी असते. सुषुम्णारज्जू या सुषुम्णेच्या दोहों बाजूवर जोडानें उगम पावलेल्या असतात. प्रत्येक सुषुम्णारज्जू प्रत्येक बाजूवर दोन मूलरज्जूनीं उगम पावून त्यांच्या संयोगानें झालेली असते. पृष्ठावरील मूलरज्जूवर एक ज्ञानपेशींचा कंद झालेला असतो.

विशिष्ट ज्ञानेंद्रियें म्हटलीं म्हणजे एक नासिकांची जोडी, एक चक्षूंची जोडी व एक कर्णेंद्रियांची जोडी झालेली असते.

पचनेंद्रियव्यूहः- ज्या इंद्रियामध्यें अन्नपचन होतें तें नलिकेप्रमाणें असून त्याला जोडलेले असे कांहीं पिंड असतात. जसें लालापिंड, यकृत आणि पक्वपिंड. या नलिकेसम पचनेंद्रियांचे निरनिराळे भाग ओळखतां येतात ते अनुक्रमें पुढील होत. (१) मुखक्रोड, (२) गलविवर, (३) अन्ननलिका, (४) जठर अथवा आमाशय व (५) आंत्र मुखक्रोडामध्यें दांत झालेले असतात. प्रत्येक दांत तीन धातूंचा झालेला असतो. त्याचा बहुतेक वरचा भाग डेंटिन किंवा दंतधातूंचा झालेला असतो. आणि त्याच्या पृष्ठावर एनेमल नांवाच्या धातूचें आच्छादन झालेलें असून त्यांत एक लहानशी पोकळी असते. तींत रक्तवाहिन्या व ज्ञानरज्जू शिरलेले असतात. मुख क्रोडाचा अधस्तल भाग मांसमय होऊन थोडासा वरच्या अंगाला वाढून त्याची जिव्हा बनलेली असते. उच्च दर्जाच्या प्राण्यांत मुखक्रोडामध्यें लालापिंड झालेले असतात. त्यांतून पाचकरस म्हणजे लाळ निघून अन्नाशीं मिसळते व त्यामुळें अन्नांतील खळमय द्रव्यांचें साखरेमध्यें रूपांतर होऊं शकतें.

गलविवर हें मांसामध्यें श्वासेंद्रिय भेगायुक्त असून एक प्रकारें बाहेर उघडतें व दुस-या प्रकारें अन्ननलिकेमध्यें शेवट पावतें. बेडकांच्या वर्गांतील प्राण्यांत ह्या भेगा प्राणी जन्म पावल्यावर त्याच्या बाल्यावस्थेंत थोडयाबहुत प्रमाणांवर असतात परंतु त्याच्या वरच्या दर्जाच्या प्राण्यांत परिपूर्तितावस्थेंत स्पष्टपणें झालेल्या अशा क्वचितच आढळतात. अन्ननलिका एखाद्या अरुंद नलिकेप्रमाणें असून ती जठरामध्यें शेवट पावते. जठर हें बहुधा अर्धचंद्राकार असून त्याच्या आंत अन्नांतील मांसोत्पादक द्रव्यें पचन पावतात. अन्ननलिका, जठर व आंत्र ही पापुद्रयाप्रमाणें तीन आवरणांची झालेलीं असतात. पहिलें बाह्य आवरण हें ततूंमय संयोजक धातूंचें झालेलें असतें. दुसरें मध्यम आवरण हें मांसमय असून तें बिन पट्टयांच्या मांसपेशींचें झालेलें असतें. यांच्या संकोचविकासानें अन्नाला गति मिळून तें पुढें पुढें ढकललें जातें. त्यांच्या आंतील तिसरें अंतरावरण हें श्लेष्माकलेचें झालेलें असून त्याला अंतर्भागीं पेशीचें आच्छादन असतें. या पेशींत पिंडपेशी असतात, व त्यांतून पाचकरस बाहेर पडून अन्नाशीं मिसळत असतो व त्यामुळें अन्नांचे पचन होतें. जठरामध्यें आमरस होतो. आंत्राचे बहुतकरून तीन भाग ओळखतां येतात. ते - पूर्वांत्र, तन्वांत्र व बृहदांत्र हे होत. पूर्वांत्रामध्यें पित्तस्त्रोतस आणि पक्वस्त्रोतस उघडतात. आंत्रांमध्यें व विशेषतः तन्वांत्रामध्यें फिक्का पक्वरस तयार होतो. त्याच्यामुळें अन्नांतील सर्वद्रव्यें - म्हणजे मांसोत्पादक, खळमय व मेदवर्धक - यांचें पचन होण्यास साहाय्य होतें. यकृत हें घनरूपी काळसर लाल असून बरेंच विकास पावलेलें असतें याला स्त्रोतस असून त्याच्या मूळाशीं एक पोकळ पिशवी - जिला पित्ताशय म्हणतात ती - बहुतकरून जोडलेली असते. तिच्यापासून पित्तस्त्रोतस निघून पूर्वांत्रांत उघडतें. यकृतामध्यें पित्त तयार होऊन तें पित्ताशयांत सांचून राहातें. त्याचा उपयोग आमरसाचा अम्लपणा नाहींसा करण्यांत व मेदवर्धक द्रव्यांचें पचन होण्यास होतो. यकृताचा दुसरा मोठा उपयोग हा आहे कीं, पचलेल्या अन्नांतील शर्करामय द्रव्यें रत्तचमध्यें मिसळून गेल्यावर त्यांतून तीं शोषून घेऊन आपल्या पेशींमध्यें त्यांचा सांठा करण्याची शक्ति आहे. यामुळें रुधिराभिसरणांत रुधिराचें विशिष्ट गुरूत्वाचें एकच प्रमाण सारखें राहूं शकतें.

पक्वपिंड हे पसरट असून त्यांत पक्वरस तयार होतो व तो त्यांच्या पक्वस्त्रोतमार्गानें पूर्वात्रांत येऊन दाखल होतो पक्वरस सर्व प्रकारच्या अन्नांतील द्रव्यांचें पचन करतो व पचनक्रियेंत त्या रसाला प्राधान्य दिलें जातें सशीर्षांच्या उदरामध्यें एक नेहमीं आढळणारें व विशिष्ट लाक्षणिक अंतरिंद्रिय प्लीहा हें होय. सर्व प्राण्यामध्यें तिचा आकार सारखा नसतो. तिचा पचनेंद्रियाशीं संबंध नाहीं व तिला स्त्रोतस नसतें. परंतु आंत्रकलेच्या योगानें जठराच्या पश्चिमकमानीला ती बहुतकरून लागलेली असते. ती पिंडरूपी दिसते व तिच्या आंत रुधिरांतील रत्तरुधिरपेशी खंडन झालेल्या आढळून येतात व श्वेतरुधिरपेशींची वाढ होत असलेली दिसते.

याशिवाय दोन स्त्रोतसें नसलेलीं पिंडरूपी अंतरिंद्रियें शरीरांत असतात. उदरकला उदरगुहेला आच्छादन करते व नंतर पृष्ठवंशापासून परावर्तन पावून पचनेंद्रियव्यूह व इतर इंद्रियें ह्या सर्वांनां सभोंवतीं वेष्टण करते. या वेष्टणामुळें आंत्राच्या पेचांना आधार झालेला असतो. आंत्राशीं संबंध असलेल्या या उदरकलेच्या भागाला आंत्रकला असें म्हणतात.

रुधिराभिसरणः- रुधिराभिसरणासंबंधीं योजना सशीर्षांत जास्त विकास पावलेली असते. यांत मुख्य इंद्रिय हृदय असून त्याला जोडलेल्या रुधिरवाहिन्यांचा समूह असतो. रुधिरवाहिन्यांचे तीन प्रकार आहेत ते धमन्या, शिरा व केशवाहिन्या हे होत. धमन्या व शिरा ह्या एका शेवटानें हृदयाला जोडलेल्या असतात व दुस-या शेवटीं त्या केशवाहिन्यांनां जोडलेल्या असतात. या प्राण्यांत रुधिर लाल रंगाचें असून त्याला रुधिररक्तपेशीमुळें रंग आलेला असतो. रुधिराच्या पातळ रंगरहित द्रव्याला रुधिररस असें म्हणतात. या रुधिररसांत घनरूपी दोन त-हेच्या रुधिरपेशी तरंगत असतातः एक रक्तपेशी व दुस-या श्वेतपेशी होत. रक्तपेशीमध्यें हिमोग्लॉबिन नांवाचा एक लाल रंगाचा पदार्थ असतो. तो प्राणवायूशीं फार जलदी संलग्न होऊं शकतो व तसाच सुलभ रीतीनें त्याच्यापासून प्राणवायु अलग होऊं शकतो. श्वासेंद्रियामधून अभिसरण पावून आलेल्या रुधिरामध्यें प्राणवायूचें प्रमाण जास्त असतें तेव्हां त्याचा रंग लालभडक असतो व त्या रुधिराला शुद्ध रक्त म्हणतात. तसेंच सर्व शरीरभर अभिसरण पावून आलेल्या रक्तांत प्राणवायूचें प्रमाण कमी झाल्यानें रुधिराचा रंग काळसर-लाल होतो तेव्हां त्याला अशुद्ध रक्त असें म्हणतात. श्वासेंद्रियामध्यें प्राणवायु रक्तपेशींच्या हिमोग्लाबिन बरोबर संलग्न होतो व जेव्हां रुधिर इंद्रियांत अभिसरण पावतें तेव्हां त्यापासून इंद्रियें प्राणवायु शोषून घेतात. सस्तन प्राण्यांखेरीजकरून इतर प्राण्यांत या रक्तपेशींचा आकार अंडाकृति असून त्या प्रत्येक पेशींत एक चैतन्यकेंद्राचा भाग असतो. सस्तन प्राण्यांमध्यें बहुतकरून रक्तपेशी वर्तुळाकृति असून चैतन्यकेंद्ररहित अशा असतात. रुधिरामध्यें यांची संख्या जास्त असते. श्वेतपेशी चैतन्यकेंद्रसहित असून थोडयाशा कामरूप असतात. यांचें कांहीं प्रकार आहेत. त्यांपैकीं शरीररक्षक म्हणून ज्या पेशी असतात त्या शरीरांत अति सूक्ष्म जंतूंचा प्रवेश झाल्यास त्यांवर हल्ला करतात व त्यांचा त्या नाश करूं शकतात.

रुधिररस उघडा ठेविला असतां ताबडतोब गोठतो व पुष्कळ वेळ तसाच ठेविला असतांना त्याचे दोन भाग पडतात. त्यांतून एक पातळ प्रवाही द्रव्य निराळें होतें. त्याला रुधिरलसीका म्हणता व दुसरा तंतुभूत पदार्थ रुधिरतंतू या नांवाचा तयार होऊन तो त्या रुधिरलसीकेमध्यें तरंगत असलेला दिसतो.

हृदय संकोच पावतांना तें धमन्यावाटे रुधिर बाहेर काढून टाकतें व पुन्हां विकास पावतांना शिरांतून शोषून घेतें. तसेंच धमन्यांच्या अंगीं स्थितिस्थापकताधर्म असल्याकारणानें त्या जास्त रुधिर आंत आल्याकारणानें फुगतात व पुन्हां आकुंचन पावतांना रुधिर केशवाहिन्यांमध्यें ढकलतात. रुधिर धमन्यांतून पुन्हां हृदयांत जाऊं शकत नाहीं. कारण त्यांत पडद्यांची रचनाच त्याप्रमाणें झालेली असते. हृदयाचें संकोच विकास पावणें व धमन्यांचा स्थितिस्थापकताधर्म ह्या दोन कारणामुळें रक्ताचें अभिरसण सारखें शरीरांत चालू राहतें. हृदयाला कप्पे अथवा कर्ण झालेले असतात. हृदयाच्या ज्या कप्पयांत रक्त सांचतें त्याला संचयकर्ण म्हणतात. माशामध्यें एक संचयकर्ण असतो व दुस-या सर्व वर्गांत दोन असतात. संचयकर्णांतून रक्त निःसारकर्णांत जातें. मासे, बेडूक व सर्प यांच्या वर्गांत एकच निःसारकर्ण असतो. सर्पाच्या वर्गांतील सुसरीमध्यें व पक्षी व सस्तन ह्या वर्गांतील प्राण्यांमध्यें दोन निःसारकर्ण असतात. माशांपैकीं पूर्णास्थिगणाखेरीजकरून इतर सर्व मासे व द्विधागतिक बेडून वगैरे ह्यांच्यामधील निःसारकर्णाचाच जणूं एक निमुळता पूर्वभागीं वाढलेला व पडद्यासहित असा कप्पा असतो. तो संकोच-विकास पावतो. पूर्णास्थिमाशांमध्यें त्याच्या सारखाच एक पडद्याशिवाय कप्पा झालेला असतो. परंतु तो संकोच-विकास पावत नाहीं म्हणून निःसारकर्णापासून झालेला अनसावा. सर्व पक्षी व सस्तन ह्यांच्या वर्गांतील प्राण्यांमध्यें निःसारकर्णापुढें कोणताच कप्पा नसतो. हनुरहित मत्स्यवत् प्राण्यांत व फक्त फुप्फुसाधिक खेरीज करून सर्व माशां हृदयाला एक संचयकर्ण व एक निःसारकर्ण असे दोन कप्पे असतात व शरीरांत अभिसरण पावलेलें अशुद्ध रक्त संचयकर्णांत येऊन निःसारकर्णांत जातें व नंतर निःसारकर्णद्वारां तें श्वासेंद्रियांकडे जाऊन शुद्ध होऊन मग सर्व शरीरभर पसरतें. द्विधागतिक बेडून ह्यांच्यांत हृदयाला दोन संचयकर्ण व एक निःसारकर्ण असे कप्पे असतात. उजवीकडील संचयकर्णांत शरीरांतून आलेले शुद्ध रक्त सांचतें व डावीकडील संचयकर्णांत फुप्फुसांतून आलेलें शुद्ध रक्त सांचतें. दोन्ही संचयकर्णां एकाच निःसारकर्णांत उघडतात. निःसारकर्ण जरी एक असला तरी त्यांत पडद्यांची रचना असल्याकारणानें उजवीकडील अशुद्ध रक्त निःसारकर्णाच्या बाजूनें फुप्फुसांत जातें व त्याच्या अगदीं डावीकडील शुद्ध रक्त शीर्षांत अभिसरण पावतें व भेसळ झालेलें रक्त त्याच्या मधल्या भागांतून सर्व शरीरभर पसरतें.

सर्प इत्यादि प्राण्यांच्या वर्गांत सुसरीशिवाय बहुतेक बेडकाप्रमाणें रुधिराभिसरणाची रचना असते. सुसरीमध्यें निःसारकर्णाला दोन कप्पे असतात. पक्षी व सस्तन प्राणी ह्यांमध्यें हृदयाला दोन संचयकर्ण व दोन निःसारकर्ण झालेले असतात. उजवीकडील निःसारकर्ण फुप्फुसामध्यें अशुद्ध रक्त पाठवितें व तें शुद्ध होऊन डाव्या संचयकर्णांतून डाव्या निःसारकर्णांत आल्यावर एकाच महाधमनीवाटे सर्व शरीरभर अभिसरण पावतें.

शिरांच्या रचनेसंबंधीं मुख्य गोष्ट ही आहे कीं, मासे, बेडूक व सर्प यांच्या वर्गांतील प्राण्यांमध्यें शरीराच्या पश्चिम शेवटाच्या म्हणजे शेंपूट वगैरे भागांतून रक्त शरीरगुहेंत आल्यावर तें दोन ओहोळांनीं दोन वृक्कांमध्यें वृक्कोन्मुखी शिरांच्या योगेकरून जातें व नंतर वर हृदयाकडे फिरतें. पक्ष्यांमध्यें या वृक्कोन्मुखी शिरा झालेल्या नसतात व हें रक्त बहुतेक एकदम हृदयाकडे फिरतें. सस्तन प्राण्यांत या वृक्कोन्मुखी शिरांचा मागमूसहि दिसत नसून हें सर्व रक्त एका अधोमहाशिरेच्या वाटे हृदयाकडे सारखे वहात जातें.

दुसरी विशेष गोष्ट ही आहे कीं, सर्व सपृष्ठवंशांमध्यें जठर, आंत्र व प्लीहा यांच्यामध्यें जें रक्त अभिसरण पावतें तें या इंद्रियांतून बाहेर निघाल्यावर एका मुख्य यकृतोन्मुखी शिरेच्या योगेंकरून पहिल्याप्रथम यकृतांत अभिसरण पावतें व मग यकृतांतून बाहेर निघून यकृतशिरांच्या वाटे हृदयाकडे वळतें.

रुधिराभिसरणाच्या या योजनेला लागूनच दुसरी एक जोड योजना लसीकावाहिन्यांची शरीरांत निर्माण झालेली असते. तिच्यामुळें केशवाहिन्यांतून पाझरून जें रक्त बाहेर येतें तें एकवटून या शिरांप्रमाणें असलेल्या लसीकावाहिन्यांच्या वाटे मोठया शिरांमध्यें पुन्हां ओतलें जातें. कारण त्या लसीकावाहिन्यां शिरांमध्यें उघडतात. केशवाहिन्यांतून पाझरून बाहेर पडलेलें रक्त रंगविहीन असतें. कारण त्यांत रक्तपेशी नसतात व त्यालाच लसीका म्हणतात. यांच्यांत श्वेतपेशी असतात व या लसीकावाहिन्यांनां जोडलेले कांहीं लसीकापिंड असतात. त्यांत या श्वेतपेशींची वाढ होत असते. या लसीकावाहिन्यांचा उपयोग शरीरांत पन्हळ किंवा गटर यांसारखा होतो.
 
श्वासेंद्रिय व्यूहः- सशीर्षांमध्यें श्वासेंद्रियें दोन प्रकारचीं असतातः एक पाण्यांत मिसळलेला किंवा विरघळलेला प्राण वायु ज्यांनां शोषून घेतां येतो अशीं कल्ले वगैरे व दुसरीं हवेंतील प्राणवायु ज्यांनां शोषून घेतां येतो अशीं फुप्फुस वगैरे. हनुरहित मत्स्यवत् प्राणी व मासे यांच्यामध्यें कल्ले असतात ते गलविवरांच्या श्वासेंद्रियवलयांनां लागलेले असतात. श्वासेंद्रियवलयांच्या मध्यंतरी भेगा असतात.

तोंडावाटे मुखक्रोडांत घेतलेलें पाणी या भेगांतून निघून कल्ल्यांवरून वहात जाऊन बाहेर पडतें त्यामुळें कल्ल्यांमध्यें अभिसरण पावत असलेलें रक्त शुद्ध होतें. बेडकाच्या वर्गांतील कांहीं प्राण्यांत या भेगा फक्त बाल्यावस्थेंतच तो प्राणी रूपांतर पावत असतांना दिसतात व नंतर त्या नाहीशा होऊन फुप्फुसावाटेच रक्त शुद्ध होत असतें तर काहींत त्या आयुष्यभर तशाच कायम राहतात. सर्प, पक्षी व सस्तन यांच्या वर्गांतील कांहीं प्राण्यांत श्वासेंद्रियभेगा परिपूर्तितावस्थेंत जरी अस्पष्ट रीतीनें झालेल्या अशा दिसतात तरी त्यांमध्यें कल्ले कधींच झालेले नसतात व या भेगांचा उपयोग श्वासोच्छ्वास क्रियेंत कधींच होण्यासारखा नसतो.

मलोत्सर्जन व तत्संबंधी इंद्रियें:- जीव क्रियेमध्यें चैतन्यद्रव्यापासून कांहीं मलोत्पादक द्रव्यें शरीरांत उत्पन्न होतात व तीं रक्तांत मिसळून जातात. या कारणानें रक्त दूषित होतें. तेव्हां हीं द्रव्यें शरीरातून बाहेर काढून टाकण्यास कांहीं इंद्रियांची योजना झालेली असते. या द्रव्यापैकीं एक कॅर्बानिक अॅसिड वायु होय. तो श्वासेंद्रियावाटे श्वासोच्छ्वासाच्या क्रियेंत बाहेर टाकण्यांत येतो. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेंत रक्तांतील कॅर्बानिक अॅसिड वायु बाहेर जातो व हवेंतील प्राणवायु रक्तांत मिसळतो. तेव्हां श्वासेंद्रियें हीं एक प्रकारानें मलोत्सर्गक इंद्रियें होत. त्वचेचाहि थोडासा उपयोग या प्रकारें होतो. शरीरांत झालेलें दुसरें निरुपयोगी द्रव्य नायट्रोजनमीलित बनलेलें असतें तें मूत्रद्वारां बाहेर टाकण्यांत येतें. मूत्र वृक्कामध्यें तयार होतें तेव्हां वृक्क हें दुसरें मलोत्सर्गक इंद्रिय होय. शरीरांत वृक्कांची एक जोडी असून या वृक्कांचा जननेंद्रियांशीं थोडासा संबंध जुळलेला असतो. साधारणतः म्हटलें म्हणजे परिपूर्तितावस्था पूर्ण होण्याच्या कालापर्यंत सशीर्ष प्राण्यांच्या शरीरांत उदरगुहेंत पृष्ठावर एकामागून एक असे तीन वृक्कनलिकांचे जोड समूह तयार होतात व या तिन्ही जोडसमूहांशी संबंध असलेले जोडीनें तीन स्त्रोतस प्रत्येक बाजूस तयार होतात व ते बाहेर बाह्यांगी उघडतात. या समूहांना पूर्व, मध्यम व पश्चिमवृक्कनलिकासमूह म्हणतात.

पूर्ववृक्कनलिकासमूह फार वेळ टिकत नाहीं; तो लवकरच नाहींसा होतो व त्याचा नंतर शरीरांत मागमूसहि रहात नाहीं. त्याच्या नंतरचा मध्यमवृक्कनलिकासमूह; यापासून मासे व जलस्थलचर प्राणी यांमध्यें कायमचें वृक्क बनलेलें असतें. उच्च दर्जाचे प्राणी जसे - उरोगामी पक्षी व सस्तन याच्यामध्यें पश्चिमवृक्कनलिकासमूह तयार होऊन त्यापासून कायमचें वृक्क बनत असतें. मासे व जलस्थलचरामध्यें पश्चिमवृक्कवाहिन्यांचा समूह बनतच नाहीं. प्रत्येक कायमच्या वृक्काला एक स्त्रोतस असतें. या स्त्रोतसाची उत्पत्ति कशी होते याबद्दल एकमत नाहीं. सर्वांत उच्च दर्जाच्या सस्तन प्राण्यांत हीं स्त्रोतसें एका मूत्राशयांत उघडतात. या मूत्राशयापासून बस्तिस्त्रोतस निघून बाहेर उघडतें. नरामध्यें हे बस्तिस्त्रोतस शिश्नद्वारां बाहेर उघडतें.

जननेंद्रियव्यूहः- जननेंद्रियें हीं उदरगुहेंत तयार होतात व त्याच्याशीं संबंध असलेले स्तोत्रस त्यांनाच बहुतकरून लागलेले असतात. मादी व नर या निराळ्या व्यक्ता असतात. क्वचितच उभयलिंगी अशा व्यक्ती आढळतात. मादीमध्यें जननेंद्रिय अंडकोश असून त्यात अंडी किंवा शोणितबीज हीं तयार होतात. हीं अंडीं बहुतकरून अंडस्त्रोतसांच्या द्वारां बाहेर पडतात. नरामध्यें जननेंद्रिय असून त्यात शुक्रबीज तयार होतें. व तें शुक्रबीज शुक्ररूपानें शुक्रस्त्रोतसाच वाटें बाहेर पडतें.

अंडें शुक्रबीजाशीं संयोग पावलें म्हणजे फलद्रूप होतें व त्यानंतर त्याचे विभाग होऊन ते सर्व विभाग संयोजित रीतीनें वाढ पावून त्याच्यापासून शरीराची रचना घडून येते. बहुतेक प्राण्यामध्यें मादी अंडी घालते व तीं अंडीं मादीच्या शरीराच्या बाहेर विकास पावतात. अशा सर्व प्राण्यानां अंडज असें म्हणतात. सस्तन प्राण्यांमध्यें अंडस्त्रोतसांच्या पश्चिम शेवटाचा भाग फुगीर असा वाढलेला असतो. व त्याला गर्भाशय म्हणतात. या गर्भाशयांत फलद्रूप झालेलीं अंडीं राहून विकास पावतात व त्या विकास पावलेल्या अंडयांनां गर्भ म्हणतात. गर्भाची वाढ होऊन गर्भ पूर्ण झाल्यावर जिवंत प्राणी जन्मास येतो. म्हणून अशा प्राण्यांनां जरायुज म्हणतात. गर्भाचें पोषण होऊन त्याची पूर्ण वाढ होण्यास गर्भाचा गर्भाशयाशीं निकट संबंध असावा लागतो व तो जुळवून आणणारे एक साधन - ज्याला वार म्हणतात तें - गर्भाशयांत तयार होतें व त्याच्या द्वारें गर्भांचें पोषण होतें व गर्भाच्या रक्ताची शुद्धि होऊं शकते.

मीन, मत्स्य अथवा मासेः- संबंध पाठीचा कणा असेला व शीर्षाचा भाग स्पष्टपणें व्यक्त झालेला आहे अशा जलस्थ प्राण्यांमध्यें मासे येतात या भूतलावर मासे विपुलतेनें आढळतात व त्यांच्या पुष्कळ जाती आहेत. ते सांपडत नाहींत असें ठिकाण विरळच होय. पूर्णवंश प्राण्यांमध्यें जीवनार्थ चढाओढींत शारीरिक गुणधर्मासंबंधीं प्रथमतः विजयी झालेले प्राणी म्हटले म्हणजे मासे होत हें म्हणणें सयुक्तिक आहे हें पुढें दिलेल्या कारणांवरून सहज लक्षांत येण्यासारखें आहे. ती कारणें येणें प्रमाणें:- पुच्छवंश अथवा पुच्छभागीं कणा असलेले टयुनिकेटा नांवाचे प्राणी-ज्यांनां समुद्रांतील पिचकारी उडविणारें प्राणी अशी संज्ञा देतां येईल ते-संख्येनें पुष्कळ आहेत तरी ते आपले बहुतेक गुण गमावून कमजास्त झालेले आहेत. तेव्हां सपृष्ठवंश प्राण्यांच्या संघाच्या कांही पोटसंघांतील प्राण्यांची संख्या जास्त असूं शकेल. परंतु संपूर्ण गुणांच्या आभावीं ते यशस्वी प्राणी झाले असें मानतां येणार नाहीं. तसेंच अॅम्फी ऑक्स सलान्सिओलैटस यांच्या समूहाची पण हीच स्थिति आहे. त्यांचा वर्ग निःशीर्ष प्राण्यांचा असल्यामुळें पायरी वर आहे. पुन्हां हनुरहित मस्यवत् प्राणी यांनां तोंडाला जभडे नाहींत व त्यांची संख्याहि थोडी आहे. माशांनां पाठीला कणा असल्यामुळें त्यांचें शरीर बांधेसूद झालेलें आहे. अति विपुल प्रजाजनकत्व व मुख्य ज्ञानेंद्रियव्यूहाच्या दर्जामुळें माशांनां असंख्यात अपृष्ठवंश प्राण्यावर सुद्धां वर्चस्व सहजरीत्या स्थापितां आलें. दोन्ही शेवटाला शरीर निमुळतें असल्याकारणानें, तसेंच लवचित मांसल शेंपूट, गात्ररूपी पर वगैरे कारणांमुळें मासे ज्या वातावरणांत वावरतात त्यांत वावरण्यास ते अगदीं योग्य बनलेले आहेत.

माशांनां श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्याचे व स्थानांतर किंवा हालचाल करण्याचे अवयव जलस्थ प्राण्यांच्या आयुष्यक्रमाला योग्य असे बनलेले आहेत. बहुतेक माशांनां श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्याचे मुख्य अवयव म्हटले म्हणजे अधोगंड अथवा कल्ले होत. हे कल्ले म्हणजे श्वासेंद्रिय वलयांनां लागलेल्या एक त-हेच्या रक्तवाहिन्यांच्या रांगाच होत व त्या आयुष्यभर तशाच राहतात. माशांच्या शरीरात एक वायूनें भरलेली व आंत्रापासून उगम पावलेली पिशवी बहुधा असते. कांहीं जातींच्या माशांमध्यें तिचा उपयोग श्वासोच्छ्वासक्रियेमध्यें फुप्फुसाप्रमाणें होतो किंवा हवेचा सांठा करून ठेवण्याकडे होती. परंतु साधारणतः तिचा उपयोग माशाला पाण्यावर तरंगता यावें ह्या बाबतींत विशेष होतो. हालचाल किंवा स्थानांतर करण्याचे अवयव म्हटले म्हणजे स्कंधासारख्या शरीराच्या भागाला जोडलेली स्कंधपरांची एक जोडी व श्रोणिप्रदेशाखालच्या भागाला जोडलेली श्रोणिपरांची एक जोडी, तसेंच पाठीवरचे व शेंपटी वरचे मध्यवर्ती एकेरी पर हीं होत तेव्हां गात्रें म्हटलीं म्हणजे अंगुलिविहीन असून वर सांगितलेल्या परांच्या दोन जोडयांच्या रूपांत बहुधा असतात. मध्यवर्ती एकेरी परांनां श्वेतत्वचेच्या दांडयाचा आधार असतो. श्वेतत्वचेमध्यें उत्पन्न झालेल्या खवल्यांचें कवचासारखें सर्वांगाला आच्छादन असतें व या खवल्यांवर बाह्यत्वचेचा एक पातळ थर असतो. त्वचेमध्यें रसोत्पादक पेशी पुष्कळ असतात. परंतु त्या कांहीं विशेष जातीच्या माशांखेरीजकरून पिंडरूपानें एकवटलेल्या नसतात. त्वचेचे कांही भाग इंद्रियबोध करून देणारे असे असतात व ते विशेषेंकरून शीर्षांवर आणि शरीराच्या दोहोंबाजूवर ओळीनें पसरलेलें असतात. त्यांनां बाह्यरेषा ही संज्ञा आहे.

शरीरांतील सांपळ्याच्या भागापैकीं आदिवंशाच्या जागीं बहुतेक पूर्णत्वानें मणके अथवा कशेरू बनलेले असतात. शीर्षाच्या भागाची करोटी हींत तयार झालेली असते. परिपूर्तितावस्थेंतील वलयें पूर्णत्वानें बनलीं जाऊन त्यापैकीं पहिल्या वलयांच्या जोडीच्या तोंडाला जबडे बनतात. जबडे बहुधा दंतयुक्त असतात. व खालचा जबडा वर खालीं हलूं शकेल अशा रीतीनें करोटीला जोडलेला असतो.

माशांनां दोन नाकपुडया असतात. परंतु त्या कांहीं अपवादाखेरीजकरून मुखक्रोडांत आंतून अशा उघडलेल्या नसतात. कर्णेंद्रियाचा फक्त आंतील अंतस्थ प्रदेश बनलेला असतो व त्याच्या लाक्षणिक तीन अर्धवर्तुळाकृति नलिका प्रत्येकाला जोडलेल्या असतात.

पुष्कळ माशांमध्यें आंत्राचा शेवट पश्चिमभागीं एका बाह्यांगीं त्वचेच्या विवरामध्यें झालेला असतो. तर कित्येक माशांमध्यें एक स्वतंत्र गुद द्वाररूपानें झालेलें असतें हें मलद्वार जननेंद्रिय व मूत्रद्वार किंवा द्वारें ह्यांच्या पूर्वभागाला असतें. हृदय हें दोन कप्प्यांचें बनलेलें असतें व त्यांत अशुद्ध रक्ताचा संचय होतो. परंतु फुप्फुसाधिक माशांमध्यें हृदय तीन कप्प्यांचे बनलेलें असतें व त्यांत फुप्फुसांतून वाहून शुद्ध झालेले रक्त व सर्व शरीरांतून वाहून आलेलें अशुद्ध रक्त या दोहोंचा संचय होतो.

फुप्फुसाधिक माशांखेरीजकरून सर्व माशांमध्यें हृदयाला एक संचयकर्ण अथवा ऑरिकल नांवाचा कप्पा असतो व त्यांत सर्व शरीरांतून वहात आलेलें अशुद्ध रक्त सांठतें व तें लगेच दुसरा निःसारकर्ण अथवा व्हेन्ट्रीकल नांवाचा कप्पा असतो त्याच्यांत शिरतें. हा निःसारकर्णकप्पा उदरतलाकडच्या एका मोठया धमनीवाटे सर्व रक्त श्वासेंद्रियाकडे काढून टाकतो. श्वासेंद्रियामध्यें तें रक्त शुद्ध होऊन एका पूर्व धमनीच्या जोडीनें शिरोभागीं वाहात जातें व दुस-या पृष्ठतर अशा महाधमनीवाटे व तिच्या शाखांतून पश्चिमभागीं सर्व शरीरभर अभिसरण पावतें. हृदयाच्या दोन आवश्यक कप्पयांशिवाय शिरापान्न अथवा सायनस व्हिनोसस् नांवाचा एक जास्त कप्पा माशांमध्यें असतो. ह्याचा संबंध संचय कर्णाशीं असून महाशिरांतून प्रथमतः रक्त यांच्यांत येते व नंतर ते संचयकर्णामध्यें सांठतें. तसेंच निःसारकर्ण अथवा व्हेंट्रीकल याच्या पूर्वभागीं एक लहानसा मांसल संकोचविकासक कप्पा ''कोनस आरटेरीओसस'' नांवाचा बहुतकरून असतो. किंवा त्याच्या ऐवजीं मोठया धमनीच्या सुरवातीला एक लहानसा फुगीर भाग ''बलबस आरटेरी ओसस'' नांवाचा असतो. फुप्फुसाधिक माशांखेरीजकरून इतर सर्व माशांमध्यें पूर्णवंशीय प्राण्याप्रमाणें हृदयगामी एकच अधोमहाशिरा नसते. तिच्या ऐवजीं माशांमध्यें महाशिरेसारख्या पसरट मार्गांची एक जोडी असते. परिपूर्तितावस्थेंतील मध्यम वृक्कनलिकासंचयापासून पूर्णावस्थेंतील वृक्क बनलेला असतो. माशांमध्यें मूत्राशय झालेलें नसतें. एकंदरींत पाहतां हनुरहित मत्स्यवत् प्राणी म्हणजे सायक्लोस्टीम नांवाचे यांच्यापेक्षां खरे मासे पुढील गोष्टींमुळें उच्च दर्जा पावले आहेतः (१) परिपूर्तितावस्थेंतील शारीरिक वलयांपासून तोंडाचे जबडे झालेले असतात. (२) गात्रें झालेलीं असतात (३) श्वेतत्वचेपासून खवल्यांचें शरीराला आच्छादन झालेलें असतें. (४) पुष्कळ माशांमध्यें शरीर अस्थिमय बनतें (५) खरे दांत झालेले असतात. (६) नाकपुडयांची जोडी असते. (७) कर्णेद्रियांनां अर्धवर्तुळाकार तीन नलिका असतात. (८) वृक्कोन्मुखी शिरांची रचना असते. (९) प्लीहा झालेली असते. (१०) जननेंद्रियांनां स्त्रोतस असतात. माशांचें थोडेसें वर्गीकरण पुढें दिलें आहेः -

माशांचे (१) तरुणास्थिवंश, (२) स्थूलशीर्ष, (३) पूर्णास्थि, व (४) फुप्फुसाधिक असे चार पोटवर्ग आहेत. पैकीं तरुणास्थिवंशाचा विस्तार पुढीलप्रमाणें:- (१) निःकुल अथवा नमोश व (२) सत्कुल हे दोन भेद; सत्कुलांत पूर्वकालीन सिलेकै अनुप्रस्त अधोमुख हा मुख्य गण व आधुनिक यूसिलेकै अनुप्रस्त अधोमुख हा उपगण आहे व याचेच मुशी समुदाय व गीनगीनासमुदाय असे दोन भेद आहेत. पूर्णास्थि या ३ -या पोटवर्गांत संपूर्णास्थि हा गण व (१) फैलोस्टोमाय, (२) अक्यान्थोटेरिजिआ, (३) फ्लेक्टोग्नेथै व (४) लोफोब्राकाय हे चार उपगण आहेत.

तरुणास्थिवंश:- हा माशांच्या वर्गांतील एक पोटवर्ग आहे ह्याच्या उपवर्गामध्यें तक्रमासा, मुशी, गीनगीना वगैरे जातीचे मासे मोडतात. या जातीच्या माशांचा अस्थिपंजर तरुणास्थीचाच बनलेला असतो. जरी एखादे वेळीं तरुणास्थीमध्यें चुनखडीक्षार सांठले गेले तरी त्यांचें या उपवर्गांतील माशांमध्यें पक्क्या अस्थीमध्यें रूपांतर होत नाहीं. इतर सर्व उच्च वर्गांतील प्राण्यांमध्यें अस्थिपंजर पूर्णत्वानें अस्थिमय झालेला सांपडतो. शरीराला श्वेतत्वचेंतून बनलेले पर लागलेले असतात व त्यांनां बाह्यभागीं कांटे असतात. हे कांटे शृंगमय पदार्थांचे बनलेले असतात व त्यांनां परांच्या आंतील तरुणास्थीनें बनलेल्या सांगाडयांचा आधार असतो. 'आधुनिक काळांतील' ह्या वर्गांतील माशांमध्यें श्वासेंद्रियांवर बाह्यतः आच्छादनरूपी एक सबंध पडदा ऑपरक्युलम नांवाचा नसतो. परंतु हीं श्वासेंद्रियें बाह्यतः दोहों बाजूंवर जोडांनें निरनिराळ्या भेगांच्या योगेंकरून उघडतात. मलमूत्रद्वारें व जननेंद्रियस्त्रोतसांची बाह्य छिद्रे हीं शरीराच्या पश्चिमभागीं एक बाह्यांगी त्वचाविवरामध्यें उघडतात; तेणेंकरून ह्या विवराचें बाह्यछिद्र हें त्या सर्वांचें सर्वसाधारण असें द्वार बनतें. ह्या वर्गांतील शिलाजात प्रतिरूपांमध्यें कांहीं रूपें अशी आहेत कीं, ते अगदीं प्राथमिक कालीन मत्स्य होत. ह्या वर्गांतील एक साधारण प्रतिरूप म्हणजे मुशी किंवा डॉगफिश होय. या उपवर्गांतील नेहमी आढळणारे मासे वर्गीकरणाच्या रूपानें पुढें दिले आहेत.

मुख्य गण-सिलेकै, अनुप्रस्त अधोमुखः शरीराच्या अधस्तलभागीं अनुप्रस्त असें मुख असतें व मुखाच्या पुढें पूर्वभागीं मुसकटाचा भाग असतो. जोडीचे पर एकाच हारीनें शरीराला लागलेले असतात. पुंजननेंद्रियाचा दांडयाप्रमाणें असणारा भाग श्रोणिपरांनां लागलेला असतो. शेंपूट विषमच्छेद असें असतें. श्वासेंद्रियविवराच्या बाह्यतः उघडणा-या शरीराच्या भेगा जोडीनें अशा पांच असतात.

उपगणः- यूसिलेकै आधुनिक अनुप्रस्त अधोमुख, भेद पहिला, मुशीसमुदाय:- शरीर गोलाकार असून दोन्हीं शेवटांनां निमुळतें असतें व पुच्छपर ठळक असें बनलेलें असतें. स्पायरेकल छिद्रें व श्वासेंद्रियविवरबहिर्मेगा शरीराच्या दोहोंबाजूवर उभ्या जोडलेल्या अशा असतात.

भेद दुसरा, गीनगीनासमुदाय:- शरीर एकंदर चपटलेलें असून श्वासेंद्रियविवरबहिर्भेगा उदरतलभागावर असतात व स्पायरेकल छिद्रें पृष्ठावर असतात. स्कंधपर शीर्षाच्या भागाला जोडलेले असतात. पुच्छपर बहुतकरून झालेलें असतें. या भेदाचीं उदा. गीनगीना, गोवालपाकट, पाकट, राजा, शिंगपाकट. इ.

डॉगफिश किंवा मुशीः- हा मासा तरुणास्थि पोटवर्गाचा एक प्रतिरूप आहे. या माशाच्या शरीराचा आकार साधारणतः दोन्ही शेवटांनां निमुळता असा असतो. पूर्वशेवटाला आणि शिरोभागीं शरीर जास्त रुंद असून चपटलेलें असतें. पूर्वभागीं शीर्षाचा शेवट आंखूड, बोथट अशा मुस्कटामध्यें होतो. शेंपूट अरुंद असून शेवटाला वरच्या बाजूस कललेलें असतें. शरीराच्या पृष्ठभागीं कातडीचा रंग करडा असतो. कित्येकवेळां त्यावर उदी किंवा काळसर डाग किंवा पट्टे असतात. उदरतलभागीं कातडीचा रंग फिक्कट असतो. प्ल्याकॉईड नांवाच्या दंतसम अति सूक्ष्म खवल्यांनीं सर्वांग आच्छादिलेलें असतें. हे खवले श्वेतत्वचेमध्यें बनतात व पृष्ठभागावर उदरतलभागापेक्षां जरा जास्त मोठे असतात. खवले अणकुचीदार असून त्यांचीं टोकें पश्चिमभागीं वळलेलीं असतात. या कारणानें या माशांच्या अंगावरून हात जर पूर्व शेवटाकडे फिरवीत नेला तर त्याची कातडी हाताला खडबडीत लागते व तोच हात उलट फिरविला तर चामडी इतकी खडबडीत लागत नाहीं. शीर्षाच्या व शरीराच्या बहिर्भागावर एक फिकट झालेली रेषा किंवा खांचणी असते तिला बाह्य रेषा म्हणतात.

सर्व माशांप्रमाणें इकडेहि दोन प्रकारचे पर असतात. मध्यवर्ती असलेले एकेरी पर व शरीराच्या दोहोंबाजूंनां जोडीनें लागलेले दुसरे पद हे पदराप्रमाणें त्वचेंतून वाढतात. मध्यवर्ती पर लांबवर उभे वाढलेले असतात. जोडपर आडवे वाढलेले असतात. ते लवचिक असून तळाला ताठर असतात. मध्यवर्ती परांपैकीं दोन पर शरीराच्या पृष्ठभागावर असतात त्यांनां पृष्ठपर म्हणतात. त्यांचा आकार त्रिकोणी असतो. शेंपटाच्या भागाला वेष्टण देऊन असलेला पर पुच्छपर होय. त्याचे दोन भाग झालेले दिसतात: एक अरुंद भाग पृष्ठावरचा व दुसरा रुंद खालच्या बाजूचा होय. हे दोन्ही शेंपटाच्या टोंकाशीं अरुंद असून एकसारखे झालेले असतात. शेंपटाच्या कात्र्यामुळें त्याचे लहानमोठे असे दोन भाग झालेले असतात त्यामुळें शेंपूट विषमच्छेद गणलें जातें. उदरतलभागीं मलद्वाराजवळ उदरतलपर लागलेलें असतें. शरीराच्या बाह्यभागीं लागलेंल्या परांच्या दोन जोडया असतात त्यांतील एक स्कंधपरांची जोडी व दुसरी श्रोणिपरांची जोडी होय. स्कंधपरांची जोडी शीर्षाच्या पश्चिम भागालगत बाह्यांगी अशी लागलेली असते. श्रोणिप्रदेशावरील परांच्या जोडीला श्रोणिपर म्हणतात. ते आकारांत लहान असून उदरतलभागीं एकमेकांशीं लागून झालेले असतात. नरमाशामध्यें हे श्रोणिपर तळाला एकमेकांशीं जोडलेले असतात व त्या प्रत्येकाला एक जननेंद्रियाचा भाग संयोजित झालेला असतो. हा जननेंद्रियाचा भाग दांडयासारखा ताठ असून त्या दांडयाच्या अंतःकांठावर एक सबंध लांबवर खांचणी असते व ती पराच्या तळाशीं असलेल्या विवंरासारख्या खळगींत मिळून जाते.

शीर्षाच्या उदरतलभागीं व कांहींसें पूर्व टोंकाजवळ मुखाचें द्वार आडवें-थोडसें चंद्रकलेसारखें झालेलें असतें. त्या मुखद्वाराच्या पूर्व व पश्चिम भागीं वरचा आणि खालचा असे अनुक्रमें दोन जबडे बसलेले असतात व त्या प्रत्येकाला पुष्कळ अणकुचीदार दंतपंक्ती लागलेल्या असतात. तोंडाच्या प्रत्येक कोंप-यावर पूर्वभागीं एक नाकपुडी असते. नासाद्वारापासून मुखक्रोडापर्यंत प्रत्येक बाजूला एक खांचणी असते व तिच्यामुळें नाकपुडया मुखाशीं जोडल्या जातात. कांहीं जातींमध्यें ह्या खांचणीच्या बहिकांठाला एक गोलदार कुसळ जोडलेलें असतें, स्पायरेकल नांवाचें एक वर्तुळाकर छिद्र प्रत्येक डोळ्याच्या लगत पश्चिमभागीं असतें व त्या छिद्राचा मुखक्रोडाशीं किंवा गलविवराशीं संबंध असतो. स्थानिक मुशीमध्यें स्पायरेकल छिद्र झालेलें नसतें. शीर्षाच्या पश्चिमभागा शरीराच्या दोहोंबाजूंवर जोडीनें पांच उभ्या भेगा जोडलेल्या असतात. या पांच भेगांच्या जोडयांनां श्वासेंद्रियबहिर्भेगा असें म्हणतात. व त्या श्वासेंद्रियविवराच्या आंतून मुखक्रोडांत श्वासेंद्रिय भेगांनीं उघडतात. शेंपटाच्या आरंभीं उदरतलभागीं व श्रोणिपरांच्या दरम्यान मध्यभागीं एक मोठें छिद्र दिसतें तें बाह्यांगी त्वचाविवराचे द्वार होय. या द्वारामुळें आंत्रवृक्क व जननेंद्रियें ह्यांनां सर्वसाधारण असा एकच बहिर्भाग झालेला असतो. असल्या या त्वचाविवराच्या बाह्यांगीं छिद्राच्या पश्चिमभागीं प्रत्येक बाजूला एक लहानशी खांच असते तींतून एक अरुंद मार्ग उदरगुहेमध्यें उघडतो.

अस्थिपंजर:- ह्या माशांत अस्थिपंजर संपूर्ण तरुणास्थीचाच बनलेला असतो व कांहीं ठिकाणीं त्याच्याशी चुनखडी क्षाराचें मिश्रण होतें. पृष्ठवंश प्राण्यांच्या प्रमाणें साधारणतः अस्थिपंजराचे दोन विभाग करतां येतातः एक अक्षवर्ती विभाग व दुसरा संयोजित अथवा शाखागत विभाग पहिल्या विभागामध्यें कोटी व पृष्ठवंश हीं येतात व दुस-यामध्यें गात्रमंडलें व गात्रांचीं हाडें यांचा समावेश होतो. पृष्ठवंशाचे दोन भाग ओळखतां येतात ते असे - एक कबंधाचा भाग व दुसरा शेंपटाचा भाग. कबंधाच्या भागांतील प्रत्येक कशेरू अथवा मणक्याचे तीन भाग असतात. एक कशेरू घन, दुसरा कशेरूबलय व तिसरा कशेरूबाहू शेंपटाच्या भागापैकीं कशेरूंनां कशेरूबाहू नसतात. त्यांच्या ऐवजीं त्या भागांच्या कशेरूंनां अधस्तलभागीं दुसरें एक लहान वलय प्रत्येक बाजूस जोडलेलें असतें त्याला कशेरूघनांचे पूर्व व पश्चिम शेवटांचे भाग बाह्यगोल असल्यामुळें त्या प्रत्येकाच्या शेवटीं एक निमुळती खोलगट पोकळी झालेली असते. म्हणून या कशेरूंनां द्विधाघातकशेरू असें म्हणतात. उच्च दर्जाच्या पृष्ठवंशप्राण्यांमध्यें जशी करोटी अनेक कपालास्थी संयोजित होऊन झालेली असते तशी या माशांमध्यें ती झालेली नसते. ती एका पेटीप्रमाणें सबंध तरुणास्थीची बनलेली असून तिच्या सर्व बाजू अखंड झालेल्या असतात. या पेटीसारख्या करोटीच्या पश्चिमशेवटाला कपालमहाविवर असतें व याच्यांतून सुषुम्णारज्जू पृष्ठवंशाच्या कशेरूवलयविवरांत उतरते. या महाविवराच्या प्रत्येक बाजूवर पृष्ठवंशाच्या पहिल्या कशेरूबरोबर संयोग पावण्यास एक एक संध्यर्बुद असतो.

करोटीशीं निकट संबंध असलेलीं कांहीं इंद्रियवलयें असतात. हीं अनेक तुकडयांचीं बनलेली व अर्धचंद्राकार असून मुखक्रोडाच्या किंवा गलविवराच्या तल व बहिर्भागी जोडलेलीं असतात यापैकीं पहिलें वलय म्हटलें म्हणजे वरचा व खालचा मिळून दोन जबडे होत. खालच्या जबडयाच्या पश्चिमभागीं असलेलें दुसरें जिव्हावलय होय. वरचा व खालचा जबडा यांच्याशीं जोडलेला असतो व याचा एक ऊर्ध्व भाग करोटीशीं जोडलेला असतो. त्याच्या ऊर्ध्व व अधोभागांत कांटे असतात त्यांनां श्वासेंद्रियांतील कांटे असें म्हणतात. या जिव्हावलयाच्या पश्चिमभागीं गलविवराला जोडीनें लागलेलीं पांच श्वासेंद्रियवलयें झालेलीं असतात. प्रत्येक श्वासेंद्रियवलय पुष्कळ तुकडयांचें बनलेलें असतें.

पचनेंद्रियव्यूहः- मुखक्रोड पश्चिमभागीं गलविवर नांवाच्या एका मोठया रुंद पोकळीमध्यें उघडतें. या गलविवराच्या दोहों बाजूंनां श्वासेंद्रियभेगा असतात व स्पायरेकल अंतच्छिद्रें त्यांत उघडतात. या गलविवरापासून पुढें पश्चिमभागीं एक रुंद नलिका - जिला अन्ननलिका म्हणतात. ती - निघते व ती पश्चिमशेवटीं जठरामध्यें अंतर्भूत होतें. हें जठर नालाच्या आकृतीचें असून त्याच्या डावीकडला अन्ननलिकेपासून निघालेला भाग लांब व रुंद असतो व उजवीकडला भाग लहान व अरुंद असतो. या उजवीकडच्या भागाच्या शेवटापासून आंत्र सुरू होतें व त्या ठिकाणीं त्याचें शेवट आकुंचन पावलेलें असतें. आंत्राचे दोन भाग आहेत. एक तन्वांत्र व दुसरा बृहदांत्र. तन्वांत्राची लांबी थोडी असते. बृहदांत्राचा भाग लांब व पुष्कळ रुंद असा असतो. त्याच्या अंतिम भागाला ॠज्वांत्र म्हणतात. खरा बृहदांत्राचा भाग फार रुंद असतो व त्याच्या आंतील पोकळींत त्याची श्लेष्मकला लंबित होऊन नागमोडी रीतीनें वेटाळली गेली असते. यामुळें श्लेमकलेचा एक नागमोडी पडदाच त्यांत झालेला असतो. या पडद्याच्या योगानें खाल्लेलें अन्न एकदम जलद पुढें निघून जाऊं शकत नाहीं व दुसरें आंत्रांत पचन झालेल्या अन्नरसाचें शोषण होण्यास एक जास्त विस्तार पावलेला अंतःकलेचा प्रदेश तयार झालेला असतो. ॠज्वांत्राचा शेवट पश्चिमभागीं बाह्यत्वचाविवरांत होतो. यकृत बरेंच मोठें असून त्याचे दोन लांब भाग असतात. एक गोल पिशवी - जिला पित्ताशय म्हणतात ती - यकृताच्या डावीकडच्या भागाच्या पूर्वटोकांत गुरफटलेली असते. पित्तस्त्रोतस यकृतापासून निघून आंत्राच्या आरंभाच्या भागांत उघडतें. तें पित्ताशयाला स्त्रोतसशाखांच्यामुळें जोडलेलें असतें. स्थानिक मुशी माशांमध्यें पित्ताशय यकृताहून वेगळें असें आढळून येत नाहीं.

पक्वपिंड हें फिक्क्या रंगाचें दपटलेलें व दोन भाग झालेलें असें असतें. तें जठराच्या उजवीकडला भाग व तन्वांत्र यांच्यामधील कोनाच्या भागांत राहतें. त्याचें स्त्रोतस तन्वांत्राला टोंचून त्याच्या आंतल्या पोकळींत उघडतें. ॠज्वांत्राच्या पृष्ठावरच्या भागीं एक लांब अंडाकृति पिंड त्याला जोडलेलें असतें त्याला ॠज्वांत्रपिंड असें म्हणतात.

प्लीहा ही काळसर, लाल किंवा जांभळी अशी असून जठराच्या बाह्यगोलतेवर लागलेली असते. ती जठराच्या उजवीकडल्या भागावर अरुंद होऊन पसरलेली असते. डोंगफिश माशामध्यें श्वासेंद्रियें अधोगंड किंवा कल्ले ह्यांच्या रूपानें दोहोंबाजूंवर जोडीनें पांच श्वासेंद्रियविवरामध्यें श्वासेंद्रियवलयांना जडलेलीं असतात.

प्रत्येक श्वासेंद्रियविवर एखाद्या पोकळीसारखें पूर्वपश्चिम रीत्या दपटलेलें असतें. तें अंतर्भागीं गलविवरांत गलविवराला लागलेल्या श्वासेंद्रियभेगेमुळें उघडतें व बहिर्भागीं शरीराला लागलेल्या श्वासेंद्रियबहिर्भेगेच्या रूपानें बाहेर उघडतें. या श्वासेंद्रियवलयांनां श्वासेंद्रियवलय, जिव्हावलय व त्यांचे कांटे यांचा आधार झालेला असतो. विवराच्या पोकळींत कल्ले असलेले असतात. प्रत्येक कल्ला म्हटला म्हणजे रुधिरमय श्लेष्मत्वचेच्या निकट दुमटलेल्या एकसारख्या नि-यांची एक रांग होय.

रुधिराभिसरणः- अंसमंडलाच्या पूर्वभागीं शरीराच्या अधस्तलावर दोन्ही बाजूंच्या श्वासेंद्रियविवरांच्यामध्यें एका हृत्कलागुहेंत हृदयाची स्थापना झालेली असते. हृत्कलागुहा ही उदरगुहेशीं जोडलेली असते. हृदयाला चार कप्पे असतात ते येणेंप्रमाणें:- शिरापात्र, संचयकर्ण, निःसारकर्ण व संकोचक उदरतलधमनी. यांतून निर्दिष्ट केलेल्या नांवांच्या अनुक्रमानें रुधिर बाहेर पडतें. शिरापात्र ही एक पातळ आडवी नलिकाकृति पोकळी असते व तिच्या शेवटच्या टोंकामध्यें महाशिरा उघडतात. हें शिरापात्र संचयकर्णामध्यें एक लहानशा छिद्रानें उघडतें. संचयकर्ण एक मोठ्या तिकोनी पिशवीप्रमाणें असून शिरापात्राच्या पूर्वभागीं व निःसारकर्णाच्या पृष्ठावर जडलेलें असतें. संचयकर्ण निःसारकर्णामध्यें एका भेगेसम छिद्रानें उघडलें जातें व त्या छिद्राला दोन झापडांचें दार बसलेलें असतें. निःसारकर्ण जाड वर्तुळाकार असून उदरतलभागीं स्पष्टपणें दिसणारा हृदयाचा भाग होय. याच्यापासून संकोचक उदरतलधमनी मध्वर्ती नलिकेप्रमाणें आरंभ पावून हृत्कलागुहेच्या पूर्व शेवटापर्यंत जाते व तेथें तिचा शेवट होऊन तिजपासून पुढें उदरतलधमनीचा आरंभ होतो. हिच्यामध्यें पडदे असतात. हिच्यापासून जोडीनें दोहोंबाजूस श्वासेंद्रियमुखी धमन्या श्वासेंद्रियामध्यें रक्त नेतात. श्वासेंद्रियांत रक्त शुद्ध होऊन तें पुन्हां जोडीनें असलेल्या श्वासेंद्रियनिःसरण धमन्यांवाटे बाहेर पडतें. पहिल्या निःसरणधमनीच्या जोडीपासून ग्रीवाधमनीची जोडी उगम पावून प्रत्येक ग्रीवाधमनी त्या बाजूनें शीर्षाकडे शुद्ध रक्त नेते. बाकीच्या निःसरणधमन्या एकवटून त्यांच्यापासून पृष्ठमहाधमनी उगम पावते व ती शरीराच्या पश्चिम भागाकडे गति घेत सबंध शरीरभर शाखा फोडीत शेवटीं शेंपटाच्या भागांत शेवट पावते. या शेंपटाच्या भागांत पुच्छकशेरूंच्या अधस्तलवलयांतून ती गेलेली असते. याप्रमाणें सर्व शरीराला शुद्ध रक्त हिच्या शाखांतून पोहोंचविलें जातें. शिरा अतिशय पातळ बनलेल्या असतात व विशेषेंकरून मोठया शिरा पसरट असतात या कारणानें त्यांनां नेहमीप्रमाणें रक्तवाहिन्या म्हणण्यापेक्षां रक्तमार्ग असें म्हणणें संयुक्तिक दिसतें. तथापि अपृष्ठवंश प्राण्यांच्या शरीरांतील रक्तमार्गांच्यासारखे हे मार्ग नसून ह्या पसरट शिराच आहेत. परंतु पसरट असल्यामुळें त्यांनां शिरामार्ग म्हणतात. शीर्षांत अभिसरण पावलेलें अशुद्ध रक्त एका जोडीच्या शिरामार्गानें परत हृदयाकडे येतें. त्या मार्गाला ग्रीवा किंवा पूर्वशिरामार्ग म्हणतात. तसेंच कबंधापासून वहात आलेलें रक्त एका जोडीच्या शिरामार्गानें हृदयाकडे येतें. त्याला पश्चिमशिरामार्ग म्हणतात. शिरापात्र नांवाच्या हृदयाच्या कप्प्याबरोबर त्याच्या प्रत्येक बाजूवर पूर्व आणि पश्चिम शिरामार्ग संयोग पावतात व त्यामुळें शिरापात्राच्या प्रत्येक बाजूवर एक आंखूड आडवा शिरामार्ग बनतो व तो शिरापात्राच्या प्रत्येक बाजूच्या कोनांत उघडतो. या आडव्या शिरामार्गाला क्युव्हेरियनमार्ग असें म्हणतात. पुच्छाच्या भागांत अभिसरण पावलेलें रक्त पुच्छशिरावाटे पूर्वभागीं येतें. ही पृच्छशिरा पुच्छधमनीप्रमाणें पुच्छकशेरूरुधिरवलयांत स्थापित झालेली असते. ती शरीरगुहेच्या भागांत आल्यावर दुतर्फा विभागली जाऊन प्रत्येक बाजूच्या वृक्काकडे गति घेत वृक्कोन्मुखीशिरा या नांवानें ओळखली जाऊन व तिच्या पुष्कळ शाखा होऊन वृक्कामध्यें रक्त नेते. नंतर प्रत्येक बाजूस त्या बाजूच्या वृक्कामधून पुष्कळ शिरा निघून व त्या एकवटून त्यांचा पश्चिमशिरामार्ग वृक्कामधून बनतो व तो पूर्वभागीं फार पसरट असतो तेव्हां शरीराच्या पश्चिमभागांतील रक्त वृक्कांत अभिसरण पावून नंतर हृदयाकडे जातें.

यकृतोन्मुखी शिरा ही आंत्रजठरप्लीहा व पक्वाशय ह्यांपासून निघालेल्या शिरा एकवटून झालेली असते व ती यकृतांत रक्त पोहोंचविते. यकृतांतून बाहेर पडलेलें रक्त दोन यकृतशिरांवाटे शिरापात्रांत जातें. या दोन यकृतशिरा अगदीं एकमेकीला लागून अशा शिरापात्रांत उघडतात. ह्याप्रमाणें सर्व शरीरभर अभिसरण पावलेलें रक्त हृदयाच्या शिरापात्र नांवाच्या कप्प्यांत प्रथमतः येतें व लगेच संचयकर्णांत सांचतें. तेथून निःसारकर्णांत जाऊन उदरतलधमनीवाटे वर सांगितल्याप्रमाणें बाहरे पडतें.

ज्ञानेंद्रियव्यूहः- सशीर्षसपृष्ठवंश प्राण्यांच्या विवरणांत सांगितल्याप्रमाणें मतिष्क व सषुम्णा हीं झालेलीं असतात. पूर्वमस्तिष्क, मध्यममस्तिष्क व पश्चिममस्तिष्क असे मस्तिष्काचे नेहमीप्रमाणें झालेले तीन भाग इकडेहि असतात. घ्राणमस्तिष्क थोडें अलग झालेलें असतें. अनुमस्तिष्क हें पसरलेलें असल्यामुळें पूर्वभागीं चक्षुमस्तिष्क त्याच्यामुळें झांकले जातात व पश्चिमभागीं सुषुम्णाशीर्ष झांकलें जातें. मस्तिष्कापासून मस्तिष्करज्जूंच्या दहा जोड्या निघालेल्या असतात. सुषुम्णा कशेरूवलयांनीं झांकली जाऊन पृष्ठवंशाच्या शेवटापर्यंत पोहोंचलेली असते. सुषुम्णेपासून दोन बाजूंनां सुषुम्णारज्जू निघतात व प्रत्येक सुषुम्णारज्जूला मूळाशी दोन फांद्या असतात.

वृक्कजननेंद्रियव्यूहः- मादीमध्यें अंडकोश लांबलचक व पुष्कळ विभागलेलें असें एकच असतें व तें उदरगुहेमध्यें उजवीकडल्या भागांत आंत्रकलेच्या एका पडद्यानें आधारभूत झालेलें असतें. अंडकोशांत अंडीं तयार होतात. शरीरगुहेमध्यें प्रत्येक बाजूस तिच्या लांबीइतकें लांब एक स्त्रोतस झालेलें असतें त्याला म्यूलेरियन स्त्रोतस असें म्हणतात. त्याचा अंडकोशाशीं कांहीहि संबंध नसतो.

हीं दोन्हीं म्युलेरियन स्त्रोतसें हृत्कलाविवराच्या पाठीमागें एकमेकांशीं संयोग पावून एका मध्यवर्ती छिद्रानें शरीरगुहेंत उघडतात. पक्व अंडी कोशांतून मुक्त झाल्यावर शरीरगुहेंत पडतात व नंतर ह्या मध्यवर्ती छिद्रावाटे स्त्रोतसामध्यें शिरतात. प्रत्येक स्त्रोतस त्याच्या पूर्व व मध्यमतृतीयांशाच्या संयोगाच्या भागाजवळ थोडेसें फुगीर बनलेलें असतें हा फुगीर भाग पिंडाप्रमाणें असतो व त्याला कोशपिंड म्हणतात. या कोशपिंडामुळें फलद्रूप झालेलीं अंडीं बाहेर पडतांना शृंगमय पदार्थानें आच्छादिलेलीं असतात. स्त्रोतसांची पश्चिम टोकें बाह्यांगीं पश्चिमत्वचाविवरामध्यें उघडतात.

नरामध्यें दोन मुष्क- प्रत्येक बाजूला एक असे असतात. प्रत्येक मुष्क लांबवर व पुष्कळ विभागलेला असून उदरगुहेमध्यें शिरामार्गाच्या बाजूस आंत्रकलेनें वेष्टित असतो. प्रत्येक मुष्कापासून सूक्ष्मशुक्रवाहिन्या निघून मुष्कशीर्षामध्यें जातात व त्यांतून शुक्रस्त्रोतस बाहेर पडतें. हें शुक्रस्त्रोतस पश्चिम शेवटाला जरासें फुगीर होतें. त्या भागाला शुक्राशय म्हणतात. नंतर ते दोन्ही स्त्रोतस शेवटीं संयोग पावून एका छिद्रानें बाह्यांगीं व पश्चिमत्वचाविवरामध्यें उघडतात. संभोगकालीं नराला या त्वचाविवरांतून बाहेर निघालेलें आपलें शुक्र श्रोणिपरांनां दांडयाप्रमाणें लागलेल्या जननेंद्रियाच्या भागामुळें मादीच्या बाह्यांगीं पश्चिमत्वचाविवरांत प्रविष्ट करतां येतें. अंडीं मादीच्या अंडस्त्रोतसांत असतांना फलद्रूप होतात व नंतर एका कोशानें आच्छादित होऊन बाहेर घातलीं जातात.

मुशी मासा जरायुज आहे. मादीमध्यें अंडी स्त्रोतसांत फलद्रूप झाल्यावर त्याच्या पश्चिमशेवटाच्या गर्भाशयाप्रमाणें असलेल्या फुगीर भागांत विकास पावतात. या गर्भाला एक प्रकारचें नाळ बनलेलें असतें. काळसर लाल असा वृक्क पृष्ठवंशाच्या प्रत्येक बाजूवर लांबवर पसरलेला असतो व प्रत्येक बाजूस वृक्काच्या वृक्कनलिका एका स्त्रोतसामध्यें उघडतात व हे दोन बाजूचे दोन स्त्रोतस शेवटीं संयोग पावून बाह्यांगीं त्वचाविरांमध्यें एकाच छिद्रानें उघडतात.

पोटवर्ग, २ रा, पूर्णास्थिः- पूर्णास्थि हा एक माशांच्या वर्गांतील पोटवर्ग आहे. या पोटवर्गामध्यें नेहमीं आढळणारे सर्व मासे बहुधा मोडतात. पूर्णावस्थेंत या माशांच्या करोटीच्या भागाला पुष्कळ कलास्थी जोडल्या गेल्यामुळें या माशांची करोटी अस्थिमय बनलेली असून बरीच गुंतागुंतीची झालेली असते. तसेंच पृष्ठवंश, जबडे, अंतमंडल हीं पूर्णास्थीचीं बनलेलीं असतात. या माशांमध्यें श्वासेंद्रियें किंवा कल्ले यांच्या मध्यंतरी पडदे झालेले नसतात. किंवा ते झालेले असले तरी अगदीच कमी वाढलेले असतात. त्यामुळें हे कल्ले प्रत्येक बाजूस एकाच श्वासेंद्रियविवरामध्यें मोकळे असलेले असे दिसतात व हें श्वासेंद्रियविवर प्रत्येक बाजूला एका सर्वसाधारण द्वारानें बाहेर उघडतें. या द्वारावर ऑपरक्युलम नांवाचा, पुष्कळ कलास्थींचा झालेला एक झांकणरूपी पडदा असतो. तोंडाचे दोन्ही जबडे करोटीस हनुजिव्हास्थीच्या साहाय्यानें जोडलेले असतात. या माशांत मुखद्वार पूर्वभागीं शेवटाला असतें. श्रोणिपर हे फारसे वाढलेले नसतात व झालेले असले तरी बरेच पूर्वभागीं जोडलेले असतात व त्यांनां तरुणास्थिवंशमाशांप्रमाणें दांडयासारखे पुंजननेंद्रियाचे भान नसतात. शरीराला खवले बहुधा लागलेले असून ते वाटोळे किंवा अंडाकृति असतात. पूर्वमस्तिष्काच्या पृष्ठावरचा मेंदूचा भाग झालेला नसतो व तो पृष्ठभाग मस्तिष्ककलेच्या योगानें आच्छादलेला असतो. वायुकोश अथवा तरणपिशवी म्हणजे एक पोकळ हवेनें भरलेली पिशवी शरीरगुहेंत आंत्राच्या ऊर्ध्वभागीं झालेली असते. पश्चिमभागीं एक पश्चिमद्वार असें त्वचा विवराचें झालेलें असून ॠज्वांत्र हें स्वतंत्रपणें निराळेंच मलद्वारानें बाहेर उघडतें व त्याच्या पश्चिमभागीं मूत्रद्वारें व जननेंद्रियश्रोतसांची छिद्रें झालेलीं असतात. या माशांमध्यें अंडी आकारानें फार लहान असून संख्येनें विपुल असतात व तीं बाहेर पाण्यांत टाकिल्यावर फलद्रुप केली जातात.

आद्यकालीन माशांपैकीं बहुतेक मासे या पोटवर्गांत मोडतात. त्यांतील कांहीं नेहमीं आढळणारे मासे वर्गीकरणाच्या रूपानें पुढें दिले आहेतः -

मुख्यगण, संपूर्णास्थिः- या गणांतील माशांचा पृष्ठवंश पूर्णास्थीचा झालेला असतो. करोटी पूर्णास्थि व कलास्थि ह्यांच्या संयोगानें पूर्णत्वानें बनलेली असते. यांच्या जोडीपरांच्या तळाला फांद्या झालेल्या नसतात. यांच्या श्वासेंद्रियविवरांतले कांटे झालेले असतात. यांच्या चक्षुरज्जू करोटीच्या बाहेर पडण्यापूर्वी त्यांचे ज्ञानतंतू एकमेकांत मिसळत नाहींत. पुच्छ हें बाह्यतः समच्छेद किंवा द्विच्छेद असें असतें.

उपगण १ ला, फायजोस्टोमाः- हिंदुस्थानांतील गोडया पाण्यांतले मासे बहुतांशी या उपगणांत मोडतात. या उपगणांतील माशांत वायुकोश जेव्हां झालेला असतो तेव्हां त्याला आंत्रामध्यें उघडणारी एक नलिका असते. याच्यांत परांचे दांडे संधियुक्त असतात व श्रोणिपर जेव्हां लागलेले असतात तेव्हां ते उदरतलभागीं लागलेले असतात. या वर्गांतील उदाहरणें राऊ, पाडी, शिंगाला इत्यादि.

उपगण २ रा, अक्यान्थोटे रिजिआयः- या उपगणांत समुद्रांतील खा-या पाण्यांत आढळणारे मासे जास्त प्रमाणांत मोडतात. या उपगणांतील माशांत वायुकोशाला नलिका नसते व वायुकोश झालेला असतो किंवा नसतो. यांच्यांत परांचे दांडे बहुधा संधियुक्त नसतात व ते सबंध कांटयाप्रमाणें असतात. पांचव्या श्वासेंद्रियवलयाचे दोहों बाजूंचे भाग एकत्र जुळलेले नसतात. या वर्गांतील उदाहरणें बोंबील, सरंगा, भादवी, खरवड, चांदवा, वाकटी, सुरमई, घोळ, बांगडा, निवटा इत्यादी.

घोळः- हा मासा पूर्णास्थि पोटवर्गांत मोडत असून त्यांतील संपूर्णास्थि या गणांत येतो तेव्हां तो पूर्णास्थि पोटवर्गाचा प्रतिरूप असा कल्पून त्या पोटवर्गाचें लाक्षणिक वर्णन येथें दिलें आहे; विशेषतः घोळ या माशाचींच चिन्हें येथें दिलीं नाहींत. या पोटवर्गांतील माशाचें शरीर साधारणतः रुंद असून दोहों शेवटाला निमुळतें असतें व दोन नासाद्वारें मुस्कटाच्या शेवटीं असतात. चक्षू पापण्यारहित असतात. तरी त्यांवर एक पारदर्शक सूक्ष्म बाह्यत्वचेचा पडदा असतो. यांच्यात श्वासेंद्रियें प्रत्येक बाजूला एकाच पोकळीमध्यें असून त्या पोकळीच्या बाह्यद्वारावर एक पुष्कळ कलास्थींनीं बनलेला ऑपरक्युलम नांवाचा झांकणरूपी पडदा झालेला असतो. शरीराच्या दोहोंबाजूवर इंद्रियबोध करणा-या दोन बाह्यरेषा असतात. पृष्ठपर, पुच्छपर, व उदरतलपर हे झालेले असतात. पुच्छपर बाह्यतः आकारशुद्ध असे झालेले दिसतात.

श्वेतत्वचेमध्यें खवले झालेले असतात व त्यांचे पश्चिम कांठ सरळ सारखे असतात किंवा फणीच्या कांठाप्रमाणें कातरलेले असतात. पहिल्या जातीच्या खवल्यांनां सैक्लॉईड हें नांव आहे व दुस-या जातीच्यांनां टीनाईड असें म्हणतात. सर्व खवल्यांवर बाह्य त्वचेचें सूक्ष्म आच्छादन असतें व तें कित्येक वेळां रंगमिश्रित असतें.

स्कंधपरांची जोडी अंसमंडलाला श्वासेंद्रियविवराच्या बाह्यद्वाराच्या लगत पश्चिमभागीं दोंहोंबाजूंवर लागलेली असते. श्रोणिपरांची जोडी त्यांच्या जागेवरून निघून स्कंधपरांच्या खालच्या बाजूस नामशेष अशा श्रोणिमंडळाला लागलेली असते.

शरीराच मांस हें मांसमय गुच्छांचें बनलेलें असून ते गुच्छ एकमेकांपासून संयोजक धातूच्या पडद्यानें वेगवेगळाले झालेले असतात. शरीराचा पश्चिम शेवटाचा मांसल भाग व पुच्छ हीं विशेषतः पाण्यावर तरंगण्याचीं साधनें होत.

पृष्ठवंश हा पूर्णास्थीचा बनलेला असून त्याचे कशेरूघन द्विधाघात असतात व त्याचे सर्व भाग मुशी माशांप्रमाणें झालेले असतात. करोटी ही पुष्कळ अस्थी मिळून बनलेली असल्यामुळें फार गुंतागुंतीची झालेली असते.

ज्ञानेंद्रियव्यूह बहुतेक मुशी माशाप्रमाणें झालेला असतो. परंतु पूर्वमस्तिष्काचा पृष्ठभाग मेंदूचा झालेला नसून नुस्ता मस्तिष्ककलेच्यायोगेंकरून झांकलेला असतो. मुखक्रोडाच्या भागांत निरनिराळ्या अस्थींनां दंतपंक्ती लागलेल्या असतात. लालापिंड झालेले नसतात व पश्चिमनासाद्वारेंहि नसतात. मांसरहित अशी लहान जिव्हा असते. गलविवराला दोहों बाजूंनीं असलेलीं श्वासेंद्रियविवरांचीं अंतःछिद्रें शृंगमय कांटयांनीं युक्त असतात. त्यामुळें तोंडांत घेतलेल्या अन्नाचा भाग श्वासेंद्रियविवरांत जाऊं शकत नाहीं. गलविवर एका कमानदार जठरांत अंतर्भूत होतें. त्याच्या शेवटास आंत्र निघतें. आंत्राच्या उगमाजवळ त्याला लागलेले अनेक लहान अंध नलिकेसारखे भाग असतात ते पक्वपिंडाच्या ऐवजी असतात. कारण पक्वपिंड या माशांत झालेलें नसतें. बाकीच्या पचनेंद्रियव्यूहाची रचना मुशी माशाप्रमाणेंच असते. फक्त बृहदांत्राला आंतील नागमोडी पडदा नसतो. श्वासेंद्रियें श्वासेंद्रियविवरात प्रत्येक बाजूस मोकळीं लोंबत असतात. कारण त्यांच्यामधील पडदे झालेले नसतात व त्यामुळें श्वासेंद्रियविवर हें प्रत्येक बाजूस एक मोठया पोकळीप्रमाणें बनतें. श्वासक्रियेंत पाणी तोंडांतून गलविवरांत येतें व नंतर त्याच्या श्वासेंद्रियभेगावाटे श्वासेंद्रियविवरांत जातें. तेथें श्वासेंद्रियावरून वहात जाऊन ऑपरक्युलम पडद्यावाटे प्रत्येक बाजूस बाहेर पडतें. अशा प्रकारें श्वासेंद्रियांत अभिसरण पावणारें रक्त पाण्यांतील प्राणवायूच्यामुळें शुद्ध होतें. उदरगुहेच्या पृष्ठावर वायुकोश अथवा तरणपिशवी असते व तिच्यांत रक्ताचें अभिसरण व्हावें अशी योजना झालेली असते. रुधिराभिसरणासंबंधी हृदय व त्याचे भाग व रक्तवाहिन्यांची रचना हीं सर्व मुशी माशाप्रमाणेंच बहुतेक असतात. वृक्क व त्याचे स्त्रोतस मुशीमाशाप्रमाणेंच असतात. जननेंद्रियव्यूहांतील मुष्कस्त्रोतसें हीं पश्चिमशेवटीं एकवटून एकाच छिद्रानें बाहेर उघडतात. अंडकोश दोन असून त्यांचे स्त्रोतस जेव्हां झालेले असतात तेव्हां ते एकवटून एकाच छिद्रानें बाहेर उघडतात स्त्रोतस झालेले नसेल तर नुसतीं छिद्रें झालेलीं असतात व त्यांतून अंडी बाहेर पडतात. मादीनें अंडीं पाण्यांत टाकल्याबरोबर नर त्यावर शुक्राचा स्त्राव करतो व त्यामुळें अंडी फलद्रूप होतात.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .