विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सप्तशृंगी- मुंबई, नाशिक, जिल्हा. समुद्रसपाटीपासून ४६५९ फूट उंचीवर असलेलें चांदोर पहाडाचें शिखर. दिंडोरीपासून हें १५ मैलांवर आहे. ह्यावर जाण्याचे तीन मार्ग आहेत. पण दक्षिणेकडील ३५० पाय-या असलेला मार्ग यात्रेकरूंच्या विशेष सोईचा आहे. नाशिकचे कोन्हेर, रुद्राजी व कृष्णाजी ह्यांनीं ह्या पाय-या सन १७६८-९९ त बांधल्या असें म्हणतात. येथें मधून मधून दिसणारे, एक संस्कृत व बाकीचे मराठी असे ५ शिलालेख आहेत. वर आणखी ४७२ पाय-या चढून गेलें म्हणजे सप्तशृंग स्वाभिनीचें मंदिर लागतें. खंडेराव दाभाडयाची पत्नी उमाबाई दाभाडे हिनें सन १७१० सालीं या वरील पाय-या बांधल्या. येथें चैत्र शु. १५ पासून एक आठवडाभर मोठी यात्रा भरते.