प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन   

समाजशास्त्र- या शास्त्राचें नांव जरी अलीकडेच विशेष ऐकूं येतें तरी या शास्त्राचा प्रारंभ फार प्राचीनकाळापासून आहे. मनुष्याच्या समुच्चयांचा अभ्यास आज जरी अधिक वाढला आहे तरी मनुष्याच्या प्रवृत्ती, त्यास नियंत्रण करण्याची आवश्यकता इत्यादि गोष्टींचा समाजशासकांस अत्यंत प्राचीन काळापासून विचार करणें अशक्य झालें. आरिस्टाटलचा ''पॉलिटिक्स'' हा ग्रंथ राजकारणावर न समजतां समजाशास्त्रावर आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्याचप्रमाणें धर्मशास्त्रें, कायदेशास्त्रें, अर्थशास्त्रविषयक प्रयत्न हे सर्व समाजशास्त्राचेच विभाग होत. या शास्त्राचा आजाचा विकास पाहिला असतां असें दिसून येईल कीं, गेल्या शंभर वर्षांत हा अभ्यास पुष्कळच वाढला असून या अभ्यासाची अंगेंहि अनेक झालीं आहेत.

शा स्त्रां चें नां व आ णि म र्या दा.- या बाबतींत आज एकवाक्यता नाहीं. ''मानवशास्त्र'' म्हणजे ''आन्थ्रापॉलॉजी'' आणि ''समाजशास्त्र'' उर्फ सोशिआलॉजी यांच्या मर्यादा निश्चित नाहींत. सामान्यतः आज लेखकांची प्रवृत्ति अशी दिसते कीं, आज ज्या समाजांनां अर्वाचीन स्वरूप आलें आहे त्या समाजांतील विषयांच्या अभ्यासास 'सोशिआलॉजी' म्हणतील आणि मागसलेल्या समाजांच्या अभ्यासास आन्थ्रापॉलॉजी म्हणतील. पॅरिसमध्यें किंवा अमेरिकेंत प्रचलित असलेल्या लोकसंख्यानियामकपद्धतींच्या वर्णनास समाजशास्त्रीय लेख म्हणतील आणि निलगिरीकडच्या ''तोडा'' जातींमध्यें चालू असलेल्या लोकसंख्यानियामक पद्धतीच्या वर्णनास मानववंशशास्त्रीय लेख म्हणतील. कांहीं तरी कारणांमुळें दोन नांवें उत्पन्न झालीं तर त्या नांवाखालीं अभ्यासक्षेत्र कोणतें यावें याची भांडाभांड होण्याचे दिवस संपले नाहींत.

मनुष्यप्राण्याच्या विकासकालापासून आजपर्यंतच्या एकंदर आयुष्यक्रमाच्या अभ्यासाला अनेक प्रकारचे लोक लागले. प्राणिशास्त्री जेव्हां मनुष्यप्राण्याच्या अभ्यासाला लागले तेव्हां ते बाह्य म्हणजे शारीरिक गोष्टींकडे लक्ष देऊं लागले. त्या प्रकारच्या प्रयत्नांचें फल पुष्कळच झालें आहे. आणि जगांतील बहुतेक जातींच्या लोकांचे फोटो, त्यांच्या रंगाचें वर्णन, त्यांची नाक, डोकें, इत्यादिकांचीं मापें घेतली गेलीं आहेत. या दृष्टीनें जें साहित्य गोळा झालें त्याचा अभ्यास वगैरे चालू आहे. तो अभ्यास करतांना मनुष्याच्या आद्य कालापासून आजच्या स्थितीपर्यंत निरनिराळ्या जाती पडणें व रक्तें संयुक्त होणें, इत्यादि फरकांचा इतिहास लिहिण्यास प्रयत्न चालू आहे.

जीवोत्पत्तीच्या कालापासून मनुष्यविकासाच्या कालापर्यंत आणि त्यानंतर मनुष्याच्या आजच्या जातींच्या कालापर्यंत जो एकंदर मानवेतिहास झाला आहे त्याचा अभ्यास करण्यास कोणकोणतीं शास्त्रें कशीं उपयोगिलीं जातात याचें स्पष्टीकरण मागें (बुद्धपूर्व जग पृ. १५-२५) केलेंच आहे. मानववंशाचा व्यापक इतिहास लिहिण्याचा काल अजून आला नाहीं. तथापि एकंदर झालेल्या संशोधनानें मानववंशेतिहासाचे बरेच धागे उकलले आहेत असें समजण्यास हरकत नाहीं. 'मानवशास्त्र' पहा.

ऐ ति हा सि क प द्ध ती ची व्या प क ता.- ऐतिहासिक पद्धतीचें सामान्य स्वरूप म्हणजे प्राचीन काळच्या मानवी समाजाचे अवशेष घेऊन त्यांपासून आजच्या मानवी समाजाची संगति जुळविणें. या    त-हेचें काम पुष्कळ झालें आहे. प्राचीन राष्ट्रें व संस्कृती यांचे अभ्यासक बरेच आहेत व त्यांनीं या दिशेनें प्रयत्न करण्यासाठीं प्राचीन स्थितीचें ज्ञान मिळविण्यासाठीं संशोधन केलें आहे. ईजिप्त, बाबिलोनिया, क्रीट, हिंदुस्थान, मेक्सिको हीं त्याचीं आवडतीं अभ्यासस्थानें आहेत. प्राचीन साहित्य गोळा करतांना भूस्तरशास्त्राचीहि मदत पुष्कळच झाली आहे. तथापि ऐतिहासिक पद्धति एवढयावरच थांबली नाहीं. जें आज अप्रगत राष्ट्रांत दिसत आहे तेंच प्रगत राष्ट्रांच्या प्राचीनतम काळीं असावें असें गृहीत धरून आजच्या रानटी लोकांच्या चालीरीती आणि त्यातील संस्था यांची आजच्या सुधारलेल्या राष्ट्रांच्या सद्यस्थितीशीं वैकासिक संगति लावली जात आहे. या प्रकारच्या अभ्यासांतील प्रारंभीचे कार्यकर्ते म्हणजे, बाकोफन, डॉ. मार्गन, स्पेन्सर, इत्यादि होत, आणि डॉ. वेस्टरमार्क वगैरे नंतरची मंडळी होत. सुशिक्षित राष्ट्रांच्या प्राचीन स्थितीविषयीं शोध आणि रानटी राष्ट्रांतील अलीकडची स्थिति यांचीं सादृश्यें दाखविणें व त्यावरून विवाहादि संस्थेचा विकासक्रम कसा झाला असला पाहिजे याविषयी कल्पना बांधणें हा या प्रकारच्या अभ्यासांतील मुख्य भाग आहे.

अप्रगत राष्ट्रांचा अभ्यास हाच ऐतिहासिक किंवा तौलनिक पद्धतींचा मुख्य विषय होतो. सुसंस्कृत राष्ट्रांच्या किंवा लोकांच्या परिस्थितीच्या अभ्यासामध्यें विचारविषय निराळेच होतात. त्या अभ्यासामध्यें आंकडेशास्त्र (पहा) प्राधान्य पावतें. आंकडेशास्त्राच्या योगानें समाजांतील स्थितीचें पृथक्करण केलें असतां जीं अनेक अंगे आढळून येतात त्या अंगाचा वृद्धि-संकोच व अन्योन्याश्रय हीं अभ्यासिलीं जातात. उदाहरणार्थ स्त्रियांचे आंकडे घेऊन त्यांत कोणत्या वयांत स्त्रिया जास्त मरतात हें काढणें, त्याचप्रमाणें अनेक दशकांमधील या बाबतींत फरक काय झाला हें पहाणें, इतर देशांतील स्त्रियांच्या आंकडयांशीं त्या आंकडयांची तुलना करणें, निरनिराळया राष्ट्रांतील फरक काय असेल तो काढणें आणि तो फरक असण्यास कारणें काय आहेत याविषयी विचार करणें आणि त्याप्रमाणेंच स्त्रियांच्या वयोमानाचे व मृत्यूचे आंकडे घेऊन विवाहाच्या आंकडयाशीं तुलना करणें, बालविवाहामुळें अपमृत्यू कितपत होतात याविषयी विचार करणें, आणि बालविवाहाचा आणि स्त्रियांच्या मृत्यूच्या प्रमाणाचा संबंध काय आहे याविषयीं कार्यकारणभाव असला तर तो शोधून काढणें, या प्रकारच्या प्रयत्नांस समाजशास्त्राचा आंकडेशास्त्रीय अभ्यास म्हणतात. हा अभ्यास म्हणजे जनवर्णनशास्त्रविषयक विवेचन ''आंकडे शास्त्र'' या लेखांत आलेंच आहे. समुच्चयविकासविषयक अनेक तत्वें ज्ञानकोशाच्या पहिल्या विभागांत आलींच आहेत.

१८३९ सालीं समाजशास्त्रनिदर्शक 'सोशिआलाजी' हा शब्द फ्रेंच तत्त्ववेत्ता कोंट यानें वापरला. त्यानें ज्ञानाच्या तीन पाय-या ठरविल्या. त्यानें प्रत्येक क्रियेचें स्पष्टीकरण दैवी, विश्वव्यापी तत्त्वाशीं संबंध लावणारें उर्फ मेटयाफिझिकल व शास्त्रीय अशा तीन पाय-यांनीं होतें म्हणून सांगितलें आणि समाजाच्या अभ्यासाला शास्त्रीय पद्धति लावली पाहिजे इत्यादि कल्पना पुढें मांडल्या. स्पेन्सरनें या प्रकारच्या विवेचनाकडे दुर्लक्षच केलें आणि तौलनिक पद्धति वापरून समाजाचा किंवा समाजांगांचा विकासक्रम कसा काय होतो इकडे लक्ष दिलें. सोशिआलाजीवर लेस्टर वार्डनें जीं पुस्तकें लिहिलीं त्यांत सामाजिक सुधारणा कशी होत जाते आणि सोशिआलाजी या शास्त्राच्या ज्ञानानें सामाजिक सुधारणेला कशी काय मदत होईल याविषयीं विवेचन केलें आहे. कोलंबियाचा प्रो. गिडिंग्ज याची समाजशास्त्रज्ञ या नात्यानें बरीच प्रसिद्धि आहे पण त्याच्या एकंदर प्रचंड लेखसमूहांत उपयुक्त भाग बराच आहे असें म्हणण्याकडे प्रस्तुत लेखकाची प्रवृत्ति होत नाहीं. इंग्लंडमध्यें बेंजामिन किडसारख्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यास योग्य परंतु शास्त्रीय दृष्टीनें कुचकामाच्या अशा एका गृहस्थास समाजशास्त्री या नात्यानें प्रामुख्य आलें होतें. पण आतां इंग्लंडमध्यें देखील समाजशास्त्राचा अभ्यास बराच वाढत असल्यामुळें आतां दुसरी अनेक चागली तरुण मंडळी पुढें येऊं लागली आहेत. (श्री. व्यं. केतकर)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .