प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन   

सम्पत्ति- अर्थशास्त्राचा मुख्य विषय म्हटला म्हणजे ''सम्पत्ति'' हा होय. सम्पत्तीचें विवेचन करावयाचें म्हणजे सम्पत्तीचें स्वरूप ओळखून तिची व्याख्या करावयाची आणि त्या संपत्तीचें उत्पादन आणि वांटणी इत्यादि गोष्टीसंबंधानें विवेचन करावयाचें. जगाची संस्कृति जसजशी वाढत चालली तसतसें या विषयावरचें पूर्वीचें विवेचन उत्तरकालीं निरुपयोगी झालें आहे. सम्पत्तीचें लक्षण करतांना म्यांचेस्टरी अर्थशास्त्राचे प्रवर्तक आणि त्यांचे अनुयायी सम्पत्तीची व्याख्या विक्रेयतेवरून करीत. असल्या त-हेच्या कल्पना असण्याचें कारण अर्थशास्त्र हें मनुष्यसुखाचें शास्त्र न समजतां बणियेगिरीचें शास्त्र अशी कल्पना लोकांची झाली होती. किंबहुना तसल्या वैचारिक परंपरेंतच हें शास्त्र विकसलें होतें हें होय. आणि यामुळें वस्तूच्या नैसर्गिक उपयुक्ततेपेक्षां विक्रेयतेला महत्त्व आलें आणि ''सम्पत्ति'' म्हणजे काय, तर ''जिला बाजारांत किंमत येते ती चीज'' अशी व्याख्या होऊं लागली, सम्पत्तिविषयक जें तत्त्वज्ञान झालें त्यांत उपयुक्ततेला बाजारांत जी क्रयमूल्याची साक्ष मिळते त्या साक्षीवर रचलें गेलें. इंग्रजींत किंमतीस दोन शब्द होतेः ते शब्द म्हटले म्हणजे ''व्हेंल्यू'' आणि ''प्राईस''. या दोन शब्दांतील भेद काढणारें विवेचन अर्थशास्त्राच्या बोकांडीं बसलें. आणि उपयुक्तता आणि किंमत या दोन संज्ञांविषयांच्या मध्यें कोठें तरी ''व्हॅल्यू'' ह्या शब्दाला बैठक देण्यासाठीं प्रयत्न झाले. हवा उपयुक्त आहे पण तिला किंमत नाहीं तर ती सम्पत्ति आहे काय? ''आरोग्य'' या वस्तूला महत्त्व आहे पण आपलें आरोग्य विकतां येत नाहीं म्हणजे ती सम्पत्ति नाहीं. अशा त-हेच्या कल्पना लोकांच्या डोक्यांत घोळत होत्या. आणि जें बाजारांत विकलें जात नाहीं तें संपत्ति नव्हे असें सांगण्याचा प्रयत्न होऊं लागला. विक्रेयता ही किती भ्रामक चीज आहे हें एकदम लक्षांत येत नाहीं. विक्रेयता विशिष्टकालीन द्रव्योत्पत्तीची शक्यता लक्षांत घेते. संस्कृतीच्या वाढीबरोबर असेंहि होणें शक्य आहे कीं मनुष्याच्या शरीरांतील रक्त दुस-यास देण्याचा धंदा सुरू झाला तर आज ज्या आरोग्यास किंमत नाहीं त्या आरोग्यास बाजारांत किंमत येईल. चांगल्या आरोग्याच्या मनुष्यास नोकरी लवकर मिळणें, चांगल्या आरोग्याच्या मंडळीला लग्न लावण्यास सौकर्य उत्पन्न होणें, या गोष्टी आरोग्याचें आर्थिक व्यवहारांत अस्तित्व दाखवितात. पुष्कळदां असें असतें कीं कांहीं ठिकाणीं वस्तूंचा विशिष्ट क्रयविक्रय करण्याचा धंदा असतो आणि कांहीं ठिकाणीं नसतो. ज्या ठिकाणीं तो धंदा नसतो त्या ठिकाणीं त्या वस्तूस किंमत येत नाहीं, पण तो धंदा होऊं लागला म्हणजे त्यास बाजारात किंमत येऊं लागते. विक्रेयता जशी स्थलविशिष्ट तशीच ती कालविशिष्ट आहे. एखाद्या कवीचें काव्य तयार झाल्यानंतर ते विकावयास काढलें तर त्या हस्तलिखितास रद्दीपलीकडे किंमत न येणें देखील शक्य आहे, पण त्या ग्रंथास उपयुक्तता नाहीं किंवा तो ग्रंथ राष्ट्रीय सम्पत्ति नाहीं असें म्हणतां येईल काय?

आमचे संपत्तिविषयक विधान येणेंप्रमाणें. ''सम्पत्तीचें संपत्तित्त्व तीस मिळणा-या बाजारी साक्षीवर म्हणजे किंमतीवर अवलंबून ठेवतां येणार नाहीं. ज्या उपयुक्त गोष्टीला बाजारांत किंमत येणार नाहीं त्या गोष्टीचें संपत्तित्त्व नष्ट होणार नाहीं. जर एखादें एकटेंच कुटुंब जंगलांत रहात असेल आणि त्यानें स्वतःच्या उपयोगासाठीं जर अनेक गोष्टी केल्या असतील तर त्यांचें संपत्तित्त्व नष्ट होऊं शकत नाहीं. त्याचप्रमाणें एखाद्या उपयुक्त गोष्टीस बाजारांत किंमत आली नाहीं तरी त्या गोष्टीचें संपत्तित्त्व नष्ट होत नाहीं. ती वस्तु विकण्यास अशक्य असली तरी ती राष्ट्रीय किंवा जागतिक संपत्तीचा विभाग होय. एखाद्या समाजसत्तावादी राष्ट्रानें क्रयविक्रय बंद केला तर त्या राष्ट्रांत निर्माण झालेल्या उपयुक्त वस्तूंचें महत्त्व नाहींसें होत नाहीं. यासाठी आम्हीं असें म्हणूं शकतों कीं संपत्तीचें संपत्तित्त्व केवळ उपयुक्ततेमुळें येतें आणि त्याच्या संपत्तित्त्वाच्या सिद्धयर्थ किंमतीची बाजारी साक्ष अवश्य नाहीं. या साक्षीचा उपयोग एवढाच कीं बाजारांत वागणा-या आपल्या आजच्या समाजास त्या संपत्तीचें संपतित्त्व मिळण्यासाठीं केवळ साधन म्हणून त्या साक्षीचा उपयोग आहे''. आमचें हें मत दिलेंच आहे. इतर लोकांचीं मतें व संपत्तिविषयक विचाराचा विकास दाखविण्यासाठीं पूर्वगत अर्थशास्त्रांचीं मतें आम्हीं पुढें देतो. तीं मतें देणें म्हणजे ''व्ह्याल्यू'' संबंधानें निरनिराळे विचार देणे होय तें पुढें देतों.

अडाम स्मिथ व मिल्ल यांच्या व्ह्याल्यू (किंमती) च्या व्याख्यांत थोडाबहुत फरक आढळतो. अमुक वस्तूची अमुक किंमत आहे असें आपण म्हणतों, तेव्हां वस्तूच्या उपयुक्ततेप्रमाणें तिच्या दुस-याहि बाजूंचा आपणांस विचार करावा लागतो. अर्थशास्त्रांत वास्तविक उपयुक्ततेकडे जास्त लक्ष द्यावें लागतें. काम भागविणें अथवा हौस फेडणें या अर्थानें उपयुक्तता ही बाब लक्षांत घ्यावी असें मिल्लचें म्हणणें आहे. उदा. बर्फ जितपत उपयुक्त आहे तितकेंच वाफेचें एंजिनहि आहे. परंतु हा उपयुक्ततेचा अर्थ निर्दोष नाहीं व मोठया महत्त्वाचाहि नाहीं. मिल्लच्या मतें राजकीय अर्थशास्त्रांत मूल्य याचा अर्थ क्रयमूल्य असा आहे. अमुक एक पदार्थ आपल्याला विकत घेणें असल्यास किंवा मोबदल्यांत घेणें असल्यास दुसरी एक वस्तु त्या पदार्थाऐवजीं आपण दिली पाहिजे. ही जी मोबदल्याची दुसरी वस्तू तिलाच पैसा किंवा चलन असे म्हणतात. अडामच्या मतें क्रयमूल्य म्हणजेच वस्तूची किंमत (रूपी पैका); मिल्लच्या मतें तें एक सर्वसाधारण साधन आहे, त्याच्यामुळें नानाप्रकारच्या सुखसोई आपणांस लाभतात. सी. एम. वॉल्श यानें मिल्लच्या नंतर या शास्त्रांत झालेल्या प्रगतीचा इतिहास सूक्ष्म दृष्टीनें पृथक्करण करून आपल्या ''मेझरमेंट ऑफ जनरल एक्सचेंज व्ह्याल्यू'' या पुस्तकांत दिला आहे. मोबदल्यासाठीं जी वस्तु खरेदी केली जाते तिच्या क्रयविक्रयाच्या किंमतीविषयीं म्हणजे तिच्या भावाच्या चढउताराविषयींच अर्थशास्त्रज्ञांकडून हल्लीं जास्त विचार करण्यांत येतो. मिल्लच्या मतें निपज करण्यांत जर बरीचशी सुधारणा झाली तर मोबदल्यादाखल देण्यांत येणा-या वस्तूची किंमत उतरते. याप्रमाणेंच दुस-याहि कांहीं कारणांनीं मोबदल्याचा वस्तूची (म्हणजे नाण्याची किंवा पैशाची) किंमत अथवा भाव सर्वसाधारणपणें कमी अथवा जास्ती होतो, म्हणजे नाण्याचा भाव उतरतो किंवा चढतो. परंतु याबद्दल कांहींजण संशय प्रदर्शित करतात. मालाच्या किंमतीवर सर्वसाधारण नाण्याचा भाव घटतो किंवा चढतो हें त्यांस संमत नाहीं. कोणताहि फरक व फरकाचीं कारणें यांत बराच भेद आहे असें यांचें म्हणणें आहे. अनेक वस्तूंच्या किंमतीच्या चढ-उताराचा परिणाम तदंतर्गत एका वस्तूवरहि होतो व त्या एका वस्तूचा विचार करतांना वरील वस्तूंचाहि सामुदायिक रीतीनें विचार करणें प्राप्त आहे असें मिल्लचें म्हणणें आहे. याच्या उलट सर्व वस्तूंच्या किंमती कायम राहिल्या व त्यांपैकीं एका वस्तूची किंमत उतरली किंवा चढली म्हणजे सामुदायिक रीतीनें त्याचा थोडा फार परिणाम सर्व वस्तूंच्या किंमतीवर घडेल. वस्तूंच्या किंमतीच्या परस्परसंबंधाकडे लक्ष देतांना घोटाळा टाळण्यासाठीं किंमतीची वाढघट हा पाया धरून चालणें जास्त सोईचें असतें.

यासाठीं वस्तूच्या मोबदल्यादाखल देण्यांत येणारी दुसरी वस्तु कायमची अशी असली पाहिजे, ती म्हणजे चलन वस्तूची किंमत वाढण्यास तिची उपयुक्तता व थोडीशी दुर्लभता हीं दोन प्रमुख कारणें असतात. मिल्लच्या मतें उपयुक्तता हा गुण कोणत्याहि वस्तूची स्वतःची किंमत वाढविण्याच्या कामांतील प्रवेशपरीक्षा होय. प्रत्येक वस्तूस ही परीक्षा द्यावी लागते. कमी अधिक दुर्लभतेमुळें किंमतीच्या यादीत त्या वस्तूचें स्थान खालींवर होण्याचा संभव असतो. मिल्लच्या नंतरच्या लेखकांनीं उपयुक्तेंतहि तात्पुरती व कायमची उपयुक्तता असे भेद पाडून किंमतीचा विचार केला आहे. विशेषतः आस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनीं याचा जास्त कीस काढला आहे. यासाठीं जें एक उदाहरण देण्यांत येतें, तें असेः - एका अरण्यांत रामा व गोविंदा दोघे रहात आहेत. रामाजवळ फक्त धान्याचा भरपूर सांठा आहे व गोविंदाजवळ फक्त पाण्याचा भरपूर सांठा आहे व गोविंदाजवळ फक्त पाण्याचा भरपूर सांठा आहे. आपल्या आजच्या व भावी गरजेचा विचार करून रामानें आपल्या सांठयाचे कांहीं भाग करून त्यांची उपयुक्तता व तिला अनुसरून किंमत ठरविली. रामाच्या पहिल्या धान्यविभागांचीं उपयुक्तता व किंमत केव्हांहि भारीच होईल. पण जर त्याचा सांठा खूप असेल व अरण्याबाहेरून आणखी धान्य येण्याचा संभव असेल तर रामाच्या पुढील धान्यविभागांची उपयुक्तता कमी कमी होत जाईल व किंमतहि उतरेल. याप्रमाणेंच गोविंदाजवळील पाण्याच्या सांठयाच्या उपयुक्ततेची गत होणार. आपण या दोघांच्या सांठयाच्या उपयुक्ततेचा प्रत्येकाच्या दृष्टीनें विचार केल्यास ती मोठी आहे असें सहज ठरेल. पण या विचारानें प्रत्येकानें आपापल्या सांठयाची अदलाबदल केली तर पूर्वीच्या स्थितींत मोठीशी सुधारणा होणार नाहीं; पूर्वीप्रमाणेंच स्थिति राहील. परंतु जर रामानें प्रथम आपला धान्याचा अर्धा सांठा एकीकडे काढून बाकीच्या अर्ध्याचा हळू हळू गोविंदाच्या पाण्याच्या सांठयाशीं मोबदला देण्याचें सुरू केलें तर रामाला त्या गोष्टींत जास्त फायदा पडेल. याप्रमाणेंच गोविंदानें आपल्या गरजेपुरतें पाणी प्रथम एकीकडे ठेवून बाकीचें पाणी हप्त्याहप्त्यानें रामाच्या धान्याच्या हप्त्याच्या मोबदल्यांत त्याला दिल्यास स्वतःचा फायदा होईल. आपलें भागवून बाकीच्या राहिलेल्या वस्तूंत इतरांचें भागविणें म्हणजे जास्त फायदा मिळविणें होय. रामानें वाजवीपेक्षां जास्त धान्य गोविंदास जर मोबल्यांत दिलें तर त्यांत रामाचा तोटा झाला; म्हणजे त्याला पाणी जितकें मिळालें त्याच्यापेक्षां त्यानें गोविंदास जास्त मोबदला दिला. याकरितां मोबदल्याचें प्रमाण परस्पर पक्षांनां अगदीं शेवटपर्यंत फायदेशीर होईल अशा बेतानें ठरवावें लागतें.

परंतु निरनिराळ्या देशांतील अनेक मोबदल्याचीं साधनें व मोबदल्याचे पदार्थ यांचा परस्पर संबंध अनेक भानगडींचा असल्यानें, फायदा राखण्याच्या कामीं नेहमी ब-याच अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठीं मागणी व पुरवठा या शास्त्राच्या अभ्यासाची विशेष जरूर पडते. पुरवठा कमी असल्यास वस्तूंची किंमत अर्थात वाढते मिल्लच्या मतें या वस्तूंत तसबिरी, चिनी मातीची भांडी यांच्याप्रमाणेंच शेतजमीन व शहरांत घरें बांधण्यास लागणारी जमीन यांचाहि समावेश होतो. बहुतेक वस्तूंची निपज स्थानिक व तात्पुरती (मोसममधील) असल्यानें मागणीपुरवठयाचा नियम त्यांनां लागू पडतो, व त्यांच्या किंमतींत चढउतार होतो. त्यामुळेंच कांडी (कार्नर) करणें किंवा सट्टेबाजी करणें यास वाव सांपडते. कृत्रिमपणें संचयाला मर्यादा घालतां येते; ती म्हणजे मक्ता घेऊन. मागें एकदा डच लोकांनीं आपल्याच मसाल्याच्या मालाचा नाश करून उरलेल्या मालाचा भाव तेज केला. सर्वच्या सर्व माल एकटयानें विकत घेऊन मग तो वाटेल त्या वाढत्या भावानें विकत देणें (कोंडी कार्नर करणें) या कृतीनें फायद्याबरोबर तोटाहि होण्याचा संभव असतो. याशिवाय भांडवल, मजुरांची मजुरी व निरनिराळ्या देशांतील कच्चा माल याहि बाबी पुरवठा आणि मागणी यांच्या बाबतींत पहाव्या लागतात. त्यामुळेंहि मालाची किंमत कमजास्त होते. पुरवठा जास्त करावयाचा असल्यास मालाची निपज वाढवावी लागते, पण त्यासाठी भांडवल विशेष घालावें लागतें. त्यामुळें या वाढलेल्या मालाची जी वाढलेली किंमत येईल ती भांडवलाऐवजीं पदरांत पडली असें होईल. म्हणजे त्यापासून मोठा फायदा झाला असें होत नाहीं.

मागणी म्हणजे जवळ असण्याची इच्छा असा अर्थ नाहीं, कारण प्रत्येक वस्तूची इच्छा मनुष्यमात्रास आहे, पण ती तो घेतोच असें नाहीं. तर इच्छा असून जिला किंमत कमी पडेल म्हणजे जी त्याला देणें जड वाटणार नाहीं अशा वस्तूंची तो मागणी (उर्फ खरेदीविक्री) करतो. किंमतींत फेरफार झाल्यानें मनुष्य ठरलेली वस्तु सोडून दुसरीहि वस्तु घेतो. म्हणजे किंमतीच्या चढउताराचा परिणाम मागणीवर होतो. बाजारांतील इतर वस्तूंचे भाव कायम राहून एकाच वस्तूचा भाव उतरला तर त्या वस्तूला जास्त मागणी येईल. त्याच्या उलट त्या वस्तूचा भाव चढला तर मागणी कमी होईल. करांच्या बाबतींत ही गोष्ट ठळकपणें उघडकीस येते. कर कमी केले म्हणजे वस्तूंची किंमत कमी होते व माल जास्त खपतो. परंतु जास्त उत्पन्नाच्या आशेनें कराच्या रकमेंत वाढावा केल्यास उत्पन्न वाढत नाहीं, कारण त्या वस्तू महाग झाल्यानें मागणी कमी येते. सारांश किंमतीवर मागणी अवलंबून रहाते. निरनिराळ्या वस्तूंच्या किंमतीचें परस्पर प्रमाण निरनिराळे असतें. प्रत्येक वस्तु आपली स्वतंत्र किंमत (म्हणजे एक प्रकारें मागणीं) ठरविते. खेरीज मागणीच्या प्रमाणांत एका वस्तूचे निरनिराळे प्रकार किंवा त-या बनविण्यांत येतात. अशा वेळीं बाजारांतील सर्व प्रकारच्या वस्तूंचे भाव एकसारखें असल्यास काटकसर करणारा माणूस प्रथम आपल्या जरूरीचाच जिन्नस विकत घेईल; म्हणजे मागणीमध्यें गरजेचाहि अंतर्भाव होतो. या ठिकाणीं गरज व चैन यात फरक ताबडतोब दृष्टीस पडतो. मात्र चैनीच्या वस्तूंचा भाव फारच घसरल्यास त्यांचा खूप वाढेल. याप्रमाणें मागणीच्या ''लवचिकपणावर'' वस्तूंचा भाव ठरतो. या मागणीच्या शास्त्राचें पृथक्करण करून सूक्ष्मपणें अभ्यास केल्यास देशाची धनोत्पादक परिस्थिति वाढवितां येण्यासारखी असते. याप्रमाणें पुरवठ्याचीहि स्थिति आहे. इतर वस्तूंचा भाव कायम राहून एकीकाच भव वाढल्यास तिची जास्त निपज होते म्हणजे जास्त पुरवठा करण्यांत येतो; म्हणजे विकणारा व विकत घेणारा यांचा फायदातोटा परस्परांवर अवलंबून असतो. विक्री करतांना स्थानिक बाजार व परदेशाचा बाजार या दोन गोष्टी लक्षांत घेऊन भाव ठरवावा लागतो. अशा वेळीं परदेशाच्या व्यापारांत हुंडणावळीची बाब लक्षांत घेणें अवश्य असतें. शिवाय स्वदेश किंवा परदेश यांमध्यें इतर व्यापा-यांची जी चढाओढ लागते तिच्याकडे सुद्धा जरूर पहावें लागतें. अशा ठिकाणीं कायद्यानें किंमत ठरविणें तोटयाचें होतें; कारण चढाओढीनें भाव कमी होण्याचा विशेष संभव असतो. प्रसंगी याच्या उलटहि परिस्थिति उत्पन्न होते. यालाच मिल्ल मागणीपुरवठ्याचें समीकरण म्हणतो. मागणी व पुरवठा यांतील स्थितिस्थापकत्त्व गणितशास्त्रदृष्टया कोर्नाट यानें उत्तम प्रकारें वर्णन केलें आहे.

मक्त्याचा प्रकार सुरू होण्यास सामान्य कारणहि पुरें पडतें; तें म्हणजे एखादी वस्तु विशेष महत्त्वाची नसणें व त्यामुळें ती एखाद्यानें सर्वच्या सर्व संगृहीत करून ठेवणें. अशा ठिकाणीं मालाची किंमत जबर ठेवल्यास गि-हाईक फार कमी मिळतें व माल कमी उठतो, उलट किंमत कमी केल्यास गि-हाईक पुष्कळ मिळतें व मालहि पुष्कळ उठतो, पण त्यामानानें मालकाच्या पदरांत पैका फारसा पडत नाहीं. त्यासाठीं मालाच्या प्रत्येक मागणीवर जास्तींत जास्त पैका कमावतां येईल व मालहि बराच खपेल अशा प्रकारची योजना त्याला करावी लागेल. अशीच अडचण मालाची निपज करतांना त्याच्या विक्रीच्या रकमेपेक्षां जास्ती खर्च येत असल्यास येऊन पडते. उदाहरणार्थ आगबोट घ्या. सरकारनें कांहीं नियंत्रण न ठेवल्यानें एखाद्याला आगबोट बांधण्यास कायमचा मक्ता मिळाला व त्याप्रमाणें त्यानें ती बांधली. परंतु पुढें जर उतारूंनीं व मालाच्या व्यापा-यांनीं तिचा झालेला खर्च भरून देण्याइतकी रक्कम (भाडयाच्या रूपानें) देऊं केली नाहीं. तर मालक आपली आगबोट सोडणार vनाहीं. परंतु त्या दोघांची मागणी जोराची असल्यास मालक आपल्या खर्च झालेल्या रकमेपेक्षांहि दर वाढवून नफा मिळवील. जर त्यानें दर कमी ठेवले तर त्याला तोटा भरून काढण्यासाठीं दुस-या कांहीं योजना कराव्या लागतील. सारांश मक्तेदाराला कमी दरानें अथवा जास्त दरानें सुरुवात करणें असे दोन्ही मार्ग मोकळे राहतात; मात्र त्यांतील वाढ-घट यांची तोंडमिळवणी त्यानें केली पाहिजे. लोकांचा म्हणजे माल विकत घेणारांचा कल सामान्यपणें कमी किंमतीकडे असतो तर मक्तेदाराचा कल जास्तींत जास्त नफा उकळण्याकडे असतो. अशा प्रसंगीं लोकांच्या सोयीसाठीं या मक्त्याच्या धंद्यांत सरकारला हात घालण्याचा प्रसंग येतो म्हणून हल्लींच्या काळीं बहुधा कोणत्याहि देशांत कायदेशीर व्यापारी मक्तेगिरी फारशी आढळत नाहीं. त्यामुळें अशा प्रकारच्या व्यापा-यांवर सांप्रत कायदेशीर इलाज करतां येतो. मक्ते व पेटंट यात भेद आहे; वरील वर्णन पेटंटला लागू नाहीं. असें आहे तरी दुस-या एका त-हेनें मक्तेगिरी जगांत चालू आहे; ती म्हणजे निरनिराळ्या व्यापा-यांचे संघ, कंपन्या, ट्रस्ट वगैरे; मजुरांचे संघ व भांडवलवाल्यांच्या कंपन्या हीं याचींच दुसरी रूपांतरें आहेत. मार्शलनें ही मक्तेदारीपद्धति व करांची पद्धति सुद्धां गणितशास्त्रदृष्टया सोडवून दाखविली आहे. माल तयार करणा-या एखाद्या माणसास वाजवीपेक्षां जास्त नफा मिळाल्यास तो इतर व्यापा-यांशीं चढाओढीस सुरवात करतो; पण त्यामुळें मालाची किंमत उतरतें. खरें म्हटल्यास एकदा वस्तु तयार झाली म्हणजे तयार करण्यासाठीं लागलेल्या खर्चाचा परिणाम वस्तूच्या किंमतीवर फारसा होत नाहीं, मात्र तसल्या वस्तूच्या भावी निपजीचा विचार लक्षांत घेतला म्हणजे झालें.

हल्लीं कोणत्याहि वस्तूच्या उत्पत्तीस भांडवल, मजुरी, कच्चा माल वगैरे गोष्टी लागतात; त्यांत पहिल्या दोन गोष्टी प्रमुख आहेत. मजुरीपासून भांडवल उत्पन्न होतें. चालू व भावी असा दोन्ही प्रकारचा खर्च भांडवलांत समाविष्ट केलेला असतो. भरपूर माल काढण्यास पोटभर मजुरी व रिकामें भांडवल पडून न राहणें या गोष्टी जरूर असतात. त्यांचा परिणाम अर्थातच पदार्थांच्या किंमतीवर घडतो. मात्र अशा ठिकाणीं चढाओढीशिवाय निर्वाह लागत नाहीं. मात्र पदार्थांची निपज होण्यासाठीं लागणारा खर्च व पदार्थाची किंमत या दोन गोष्टी भिन्न आहेत. तथापि सध्यांच्या व्यापारी चढाओढीच्या सामन्यांत टिकून भरपूर मजुरी व भरपूर नफा पडेल अशीच किंमत होतां होईल तो पदार्थांची ठेवण्याची चाल आहे. अशा स्थितींत मजूर व भांडवलवाले यांच्यांत मजुरी व नफेबाजी यांसाठीं झगडे होणें अनिर्वाह्य आहे. ते समोपचारानें मिटविण्याचें काम वेळोवेळीं चालू असतें. पदार्थाच्या बाजारांतील किंमतीला अनुसरून प्रमाणांत मजुरीचे दर असावेत असें मार्शलचें म्हणणें आहे. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनमिक्स). कांहीचें म्हणणें मजुरीचा दर नेहमीं एकसारखा (नॉर्मल) असावा व काहींचें म्हणणें प्रसंगमान पाहून कमजास्त (मार्जिनल) असावा. कोणतेंहि मत गृहीत धरल्यास बाजारांतील पदार्थाची किंमतहि कमी जास्त होणार.

नफा जास्त झाल्यास त्या धंद्याचें भांडवल फुगून ते ते पदार्थ जास्त निपजतात. व एकच कारखानदार असल्यास मक्तेगिरीला उत्तेजन मिळतें. अथवा नवीन कारखाने निघाल्यास ह्या कारखान्यांचे ट्रस्ट बनून मक्तेगिरीच बोकाळते. या मक्तेगिरीनें थोडयाशा खर्चांत हस्तकौशल्यानें उत्पन्न होणा-या वरील पदार्थांचा धंदाहि हळू हळू बसतो.

निपज करण्याची रीत तीच राहून प्रसंगविशेषीं पदार्थांची निपज वाढते. मिल्लनें या गोष्टीस व्ह्याल्यूची तिसरी बाब म्हटली आहे. याचें उदाहरण शेतकीविषयक व खाणीविषयक पदार्थांत आढळतें. समजा कीं, एखाद्या ओसाड देशांत शेतकीविषयक उत्पन्न म्हणजे धान्य आहे. आतां वस्ती वाढली व देशाची सांपत्तिक स्थिति वाढली तर (धान्य उत्पन्न करण्याची रीत कायम राहून) धान्याची निपज वाढेल. ती नापीक जमीन उपयोगांत आणून अथवा पिकाऊ जमिनींत जास्त सुधारणा करून वाढेल. पण अशा वेळीं जास्त सुधारणा करण्यासाठीं जास्त रक्कम खर्चावी लागेल. ही रक्कम सर्व खर्च भागून त्यावर नफा येईल अशा रीतीनें खर्चावी लागेल. ह्या रकमेला या शास्त्रांत 'भाडें' असें नांव आहे व यालाच वरील मिल्लनें दिलेली तिसरी बाब म्हणतात. हें भाडें किंमतीवर अवलंबून असतें. किंमत कांहीं भाडयावर अवलंबून नसते. गुंतवलेल्या भांडवलाची सर्व रक्कम सुटल्यावर ही भाडयाची पद्धत वाटल्यास बंद करतां येते. यापुढें शेती करणें अथवा न करणें हें शेतक-याच्या मर्जीवर अवलंबून रहातें. एखाद्या वेळेस शेतीस पुष्कळ सुधारणा करूनहि उत्पन्न बेताचेंच येतें. ही गोष्ट जमीनदारी पद्धतीच्या शेतींत विशेष दृष्टीस पडते. जो शेतकरी स्वतः शेत करतो तेथें ती दृष्टीस पडत नाहीं. अशा ठिकाणीं जास्त अथवा कमी जमीन आणि जास्त अथवा कमी पेरा यांचा प्रश्न नसतो. परदेशच्या चढाओढीनें सुद्धा मालाच्या किंमतीचा परिणाम भाडयावर होतो, भाडयाचा मालाच्या किंमतीवर होत नाहीं. या बाबीचा विशेष विचार रिंकार्डो आणि थोरोल्ड रॉजर यांनीं केला आहे. लोकसंख्या वाढली म्हणजे धान्याची मागणी वाढते. मागणीनें धान्य पेरण्याचें क्षेत्र, आणि धान्याची किंमत वाढते आणि किंमतीनें भाडें वाढतें. परंतु खेडयापाडयांतून वस्ती वाढल्यास खेडयापाडयांतील शेतीचें भाडें न वाढतां उलट कमी होतें असें कांहीं लोकांचें म्हणणें आहे. याप्रमाणेंच खनिज पदार्थांच्या उत्पन्नाचीहि स्थिति आहे.

ज्या मानानें बाजारांत त्या पदार्थांनां किंमत येईल त्या मानानें ते पदार्थ खाणींतून जास्त अथवा कमी निघतील. त्यांतहि शेतीप्रमाणें खाणींतील जिन्नस सतत उत्पन्न न होतां हळू हळू कमी होत जातो व त्यामुळें नेहमी त्याच्या भावांत चढउतार होत जातो.

चलनी नाण्याच्या बाबतींत निराळीच गोष्ट प्रत्ययास येते. वास्तविक नाण्यांची किंमत त्या नाण्यांत वापरण्यांत येणा-या धातूच्या बाजारांतील किमतीबरोबर असली पाहिजे. पण तसें घडत नाहीं. नाण्याच्या दर्शनी किंमतीपेक्षां त्यांतील धातूची किंमत नेहमीं कमीच असते. शिवाय जास्त कमी नाणें टांकसाळींतून काढल्यास बाजारांतील इतर पदार्थांच्या किंमतीवर त्याचा परिणाम घडतो. त्यामुळें बाजारांतील पदार्थांच्या बाजारभावावर नाण्यांची किंमत एका दृष्टीनें ठरली जाते. अर्थात नाण्यांचा भाव कमजास्त झाल्यास खाणींतून नाण्यांची धातूहि कमजास्त काढणें भाग पडतें. परंतु नाण्यांच्या वाढघटीचा परिणाम सहसा खाणींतील धातूवर होत नाहीं.

कांही पदार्थांच्या बाबतींत दोन जोड पदार्थांच्या मागणीवर नफानुकसान अवलंबून असतें. उदाहरणार्थ लोंकर आणि सागुती; या दोन पदार्थांनां जर जास्त मागणी आली तर आस्ट्रेलियांतील मेंढपाळ जास्त मेंढया बाळगतील व न आली तर कमी बाळगतील; सागुतीपेक्षां लोंकरीला केव्हांहि जास्त किंमत येते. असें असलें तरी त्या दोहोंच्या विक्रीनें जर नफा होत असेल, तरच मेंढया जास्ती वाढविण्यांत स्वारस्य आहे.

निरनिराळ्या देशांत हुंडणावळीचा भाव काय असावा याबद्दल आतांपर्यंत रिकाडों, मिल्ल, केर्न्स, सेजविक, बॅस्टेबल वगैरे लोकांनीं पुष्कळ चर्चा केली आहे, परंतु त्याचा कायमचा निकाल अद्यापपर्यंत लागला नाहीं. एखाद्या देशांत एखादा पदार्थ ज्या प्रमाणांत उत्पन्न होत असेल त्या प्रमाणांत त्या देशाचा परदेशाच्या हुंडणावळांशीं कमजास्त संबंध येतो. म्हणजे परदेशी आयात अथवा निर्गत व्यापार लक्षांत घेऊन बहुधाः हुंडणावळीचा प्रश्न सोडवावयाचा असतो. अशा वेळीं व्यापारी व औद्योगिक परदेशीय चढाओढीचाहि विचार लक्षांत घ्यावा लागतो. व्यापारी चढाओढ फायद्याची असते. भाडयातोडयाचा खर्च वजा करून एखाद्या पदार्थाला जी किंमत स्वदेशांत पडते तीच या व्यापारी चढाओढीमुळें परदेशांतहि पडते. तशी जर ती पडत नसेल तर ते पदार्थ तयार करण्याच्या कृतींत कांहीतरी दोष राहिले असले पाहिजेत. अशी गोष्ट मजुरी व भांडवल यांच्या बाबतींत होऊं शकते. एखाद्या वेळेला परदेशाहून येणारा जिन्नस त्याच्या किंमतीपेक्षां थोडया किंमतींत स्वदेशांत तयार करतां येतो. या आयात व निर्गतांच्या तुलनात्मक किंमतीवर बराच विचार करतां येण्यासारखा आहे. कांहींच्या मतें परदेशाच्या मालांनीं जर स्वदेशाचे उद्योगधंदे बुडाले तर स्वदेशांतील भांडवलवाल्यांनीं आपलें भांडवल व मजुरी यांचा उपयोग निर्गत माल जास्त उत्पन्न करण्याकडे करावा असें आहे. मात्र अशा वेळीं अतिशय स्वस्त खर्चांत उत्पन्न होणा-या पदार्थांचा व निर्गत मालांत समावेश होईल. देशांतील कच्च्या मालाचे कारखाने काढण्यास व त्यांची निर्गत करण्यास प्रसंगविशेषीं सरकारची मदत लागते.

संपत्तीचा उपयोग अर्थशास्त्रदृष्टया उपयुक्तता वाढविण्याकडे केला पाहिजे. संपत्ति वाढविण्याच्या कामीं मेहनत व उपयुक्त जिनसांची वाढ अथवा नवीन उपयुक्त जिनसा निर्माण करणें या बाबी मुख्य असतात. तसेंच कोणते पदार्थ कोठें किफायतशीर भावानें खपतील याचें ज्ञान अवश्य लागतें. या ठिकाणीं पदार्थांच्या किंमतीचा प्रश्न गौण असतो. किंमतीकडे फारसें लक्ष न देतां भांडवल, मजुरी, श्रमविभागणी, लहानमोठे कारखाने काढणें, गि-हाईकांच्या आवडीच्या विषयांचे अचूक ज्ञान इत्यादि मुद्दयांवर संपत्तीची वाढ करतां येते. सामाजिक व व्यक्तिगत मालमत्तेच्या परस्परसंबंधावर हा प्रश्न विशेष अवलंबून असतो असें मिल्लचें म्हणणें आहे. संपत्तीचा परस्पर विनिमय झाल्याखेरील कोणत्याहि पदार्थांच्या किंमतींना महत्त्व येत नाहीं. मेहनत, उपयुक्तता व घस सोसणें यांचाहि पदार्थांच्या किंमतीशीं विशेष संबंध असतो. जे पदार्थ उत्पन्न करण्यास मेहनत लागते व ज्यांचा परस्पर विनिमय होतो अशा उपयुक्त पदार्थांचा अंतर्भाव संपत्तींत होतो. या उपयुक्त वस्तू दोन प्रकारच्या असतात; एक ''अंतर्वस्तु'' व एक ''बहिर्वस्तु''. अंतर्वस्तूचा उपयोग फक्त ती ज्याच्याजवळ आहे त्यालाच होतो. उदाहरणार्थ, एखाद्याची श्रवणेंद्रियरूप संपत्ति चांगली असल्यास त्याला गायनश्रवणापासून होणारा आनंद अनुभवतां येईल. बहिर्वस्तूंतहि दोन प्रकार आहेत. एक मोफत व दुसरा अर्थविषयक; सूर्य प्रकाश हा मोफत आहे. त्यासाठीं मेहनत पडत नाहीं. अथवा मोबदला द्यावा लागत नाहीं. अर्थविषयक संपत्तींत वर सांगितलेल्या उपयुक्त पदार्थांची निपज व व्यवहार येतो.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .