प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन 
 
संयुक्त संस्थानें (अमेरिका)– उत्तर अमेरिकेंत हा सर्व जगांत मोठा असा संस्थानांचा संघ आहे. याच्या उत्तरेस कानडा; पूर्वेस अॅटलांटिक महासागर; दक्षिणेस मेक्सिकोचें आखात व मेक्सिको देश; व पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. याचें एकंदर क्षेत्रफळ ३० लाख चौरस मैल असून लोकसंख्या (१९२४) ११,२८,२६,००० आहे. १९२० च्या शिरोगणतीवरून पहातां ६१,६३९ चिनी, १,१०,०१० जपानी, २,४४,४३७ रेड इंडियन व ९,४८८ इतर लोक आहेत. दर चौरस मैलास लोकसंख्येचें प्रमाण ३१.४ आहे.

घ ट ना व रा ज्य व्य व स्था.- संयुक्त संस्थानांत एकंदर ४८ संस्थानें असून त्यांचें एक संयुक्त सरकार (फेडरल गव्हर्नमेंट) आहे. प्रत्येक संस्थान अंतर्गत कारभारापुरतें स्वतंत्र असून सैन्य, आरमार, परराष्ट्रीयसंबंधाचें इत्यादि खातीं मध्यवर्ती सरकारच्या ताब्यांत आहेत. मध्यवर्ती सरकाराप्रमाणेंच प्रत्येक संस्थानांत कायदेकारी, कार्यकारी व न्यायनिवाडा करणा-या संस्था भिन्न भिन्न आहेत. प्रत्येक संस्थानाची राज्यव्यवस्था स्वतः त्या त्या संस्थाननें ठरविलेली असून ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. संस्थानचा गव्हर्नर हा कार्यकारी मंडळाचा मुख्य असतो. मध्यवर्ती सरकारची घटना अशीः- काँगेसचे दोन विभागः सीनेट व प्रतिनिधि सभा (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) आहेत. सीनेटमध्यें बसण्याकरितां प्रत्येक संस्थानांतून दोन प्रतिनिधी निवडले जातात. सीनेटची मुदत ७ वर्षांची असते. प्रतिनिधिसभेंत २,१०,४१५ लोकांनां एक प्रतिनिधि या प्रमाणांत प्रत्येक संस्थान प्रतिनिधी निवडून देतें. कार्यकारी मंडळाचा मुख्य अध्यक्ष असतो. तो प्रतिनिधींनीं निवडलेला असतो. तो आपल्या पसंतीचे लोक निरनिराळ्या खात्यांवर नेमतो. सदर नेमणुकीस सीनेटची मान्यता घ्यावी लागते. अध्यक्षानें नेमलेल्या प्रधानास पसंत अगर नापसंत करण्याचा व परराष्ट्रांशीं केलेला तह पसंत अगर नापसंत करण्याचा सीनेटला अधिकार आहे. मध्यवर्ती सरकार संस्थानांच्या अंतर्गत व्यवस्थेंत कोणत्याहि प्रकारची घालमेल करीत नाहीं.

न्या य.- प्रत्येक संस्थानचें एक मुख्य न्यायकोर्ट असून शायरकौंटीनिहाय लहान लहान कोर्टें असतात. मध्यवर्ती सरकारचें एक कोर्ट असतें. तें सैन्य, पेटंट बँका, दिवाळखोरी वगैरेंच्या बाबतींत निकाल देतें.

ज मा बं दी.- जमेकडे सर्वांत मोठें उत्पन्न म्हणजे प्राप्तीवरील कर होय. तो १९१४ सालीं १,८४,२१,४४,४१८ डॉलरइतका होता व त्याच्या खालोखाल परकी सरकारास दिलेल्या कर्जावरील व्याज होय. व तें १६,०६,८४,८०८ डॉलर आहे व इतर स्टँप फी, पासपोर्ट फी, जकात, शेतीकरितां दिलेल्या कर्जाऊ रकमेवरील व्याज, पनामाकॅनॉलचा कर वगैरे उत्पन्नाच्या बाबी आहेत. स. १९२६ चें अदमासें उत्पन्न ३,६४,१२,९५,००० डॉलर धरलें आहे. सैन्य व आरमार यांवर अनुक्रमें ३४ व ३३ कोटी डॉलर खर्च केले जातात. या सालचा एकंदर खर्च ३,२६,७७,५१,००० डॉलर होईल.

सै न्य आ र मा र.- अमेरिकेंत खडें सैन्य १,४०,९४३ असून जेव्हां हुकूम येईल तेव्हां कामावर येणारे सैनिक १,२८,२२३ आहेत. आरमारांत बॅटलशिप्स १८, क्रूझरें ३१, विनाशकबोटी २६७  व सब्मरीन ५६ आहेत.

उ द्यो ग धं दे.- संयुक्त संस्थानांत १,९०,३२,१५,३६० एकर जमीन लागवडीखाली आहे. त्यांत मुख्यत्वेंकरून गहूं, इतर धान्य, ओट, कापूस हे जिन्नस पिकातात. जंगलखात्याचें उत्पन्नहि संस्थानला बरेंच येतें. संयुक्त संस्थानांत लोखंड, कोळसा, सोनें, रुपें, तांबें, शिसें, जस्त, अॅल्युमिनियम इत्यादि धातूंच्या खाणी आहेत. १९२३ सालीं ९३ कोटी डॉलरचें लोखंड निघालें. कोळसा १५,४८,७०,७२,००० डॉलरचा निघाला. सर्व प्रकारचा कच्चा व पक्का माल उत्पन्न होतो. समुद्रकिनारा दोन्ही बाजूंस असल्यामुळें ८,७४,०९,१९४ डॉलरचा माशांचा क्रयविक्रय झाला.

व्या पा र- १९२४ सालीं ३,५५,४१,३८,२६८ डॉलर आयात व ४,३१,१२,८३,७४० डॉलरची निर्गत झाली. निर्गतींत मुख्यत्वेंकरून कोळसा, तेल, लोखंड, यंत्रें, कापूस इत्यादि वस्तू आहेत. जगांतील बहुतेक सर्व देशांशी अमेरिकेचा व्यापार चालतो.

शि क्ष ण.- संयुक्त संस्थानांत प्राथमिक शिक्षण मोफत आहे. एकंदर २,१७,२१,२१७ प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत. विद्यापीठें व कॉलेजें मिळून ५,५०,९९६ आहेत. याशिवाय रात्रींच्या शाळा, आंधळे, बहिरे, मुके यांच्या कित्येक शाळा आहेत. १९२० सालच्या आंकडयाप्रमाणें शेंकडा ६० लोक अशिक्षित होते.

ध र्म.- प्राटेस्टंट मताचे अनुयायी सर्वांत जास्त आहेत. रोमनकॅथॉलिक व इतर किरकोळ पंथाचेहि अनुयायी आहेत.

इ ति हा स.- या देशाला अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें असें नांव आहे. परंतु अलीकडे अमेरिका या नांवानेंच संयुक्त संस्थानांस संबोधिलें जातें. सतराव्या शतकांत यूरोपांतील राष्ट्रांत वसाहती वाढविण्याची प्रवृत्ति झाली व त्या प्रवृत्तीचें आजचें अमेरिकन राष्ट्र प्रत्यक्ष निदर्शक आहे. इंग्लंडातून प्युरिटन लोक अन्य धर्मीयांच्या जुलुमाला कंटाळून इंग्लंडबाहेर पडले व अमेरिकेच्या किना-यावर उतरून त्यांनीं इमारती बांधण्यास सुरवात केली. फ्रान्समधूनहि अशाच त-हेनें लोक बाहेर पडले व त्यांनीं कानडांत वसाहत केली. ह्या वसाहती सरकारी पुढाकारानें झाल्या नसून व्यक्तींच्या पुढाकारानें झाल्या आहेत. त्यांत दोन भाग होते; एक मालकी हक्काच्या वसाहतीचा व दुसरा भाग कांहीं माणसांच्या संधीभूत प्रयत्नानें झालेल्या वसाहतींचा होय. संधीभूत वसाहतींचा कारभार एखाद्या कंपनीप्रमाणें म्हणजे लोकसत्ताक पद्धतीनें चालत असे. मालकी हक्काच्या वसाहतींत कार्यकारी मंडळ कायदेमंडळापेक्षां सत्तेंत श्रेष्ठ असे. परंतु पुढें पुढें कायदेमंडळाचा व कार्यकारी मंडळाचा वारंवार खटका उडूं लागला व पुढें त्याहि वसाहती लोकसत्ताक झाल्या.

या वसाहतींवर प्रिव्ही कौन्सिल, सेक्रेटरी ऑफ स्टेट व लंडनचा बिशप यांच्या द्वारें साम्राज्य सरकार ताबा ठेवीत असे. प्रथमतः साम्राज्यसरकारचें या वसाहतींकडे फारसें लक्ष नसे; परंतु पुढें वसाहती जसजशा समृद्ध होऊं लागल्या, तशतशा त्या साम्राज्यसत्तेच्या कह्यांत जास्ती येऊं लागल्या. वसाहतींकरितां ब्रिटिश पार्लमेंट स्वतंत्र कायदे करूं लागलें. वसाहतींच्या कायदेमंडळानें पास केलेले कायदे इंग्लंडच्या राजाकडे मंजुरीला आले पाहिजेत असा वसाहतींवर निर्बंध घालण्यांत आला. वसाहतींचा कारभार पहाण्यासाठीं एक कौन्सिल नेमण्यांत आलें. आगबोटींमध्यें सुधारणा होऊन व्यापारी चढाओढ सुरू झाल्यावर वसाहतींनीं आपल्या पुढें जाऊं नये, म्हणून लोखंड, लोंकर व टोप्या यांच्या कारखान्यांस वसाहतींत प्रतिबंध करण्यांत आला. या कायद्यांच्या अंमलबजावणीकरितां जकातअधिकारी नेमण्यांत आले. व्यापारी कायदे मोडणारांच्या चवकशीकरितां 'व्हॉइस अॅडमिरॅलिटी कोर्ट' स्थापण्यांत आलें. संस्थानांचा राज्यकारभार पहाणारे कार्यकारी मंत्री राजा नेमूं लागला. परंतु त्यांचा पगार मंजूर करणें संस्थानी प्रतिनिधींच्या हातीं असल्यानें कांही काळानें लोकसत्ताच श्रेष्ठ झाली.

सप्तवार्षिक युद्धांत कानडा आदिकरून फ्रेंचांच्या वसाहती इंग्लंडनें काबीज केल्या. या युद्धामुळें वसाहतींची वाढ होऊन खर्च वाढला. ज्या वसाहतींनां या युद्धापासून फायदा झाला त्यांच्यावर कर लादूर खर्चाचा कांहीं बोजा वसाहतींवर लादावा असें ब्रिटिश मुत्सद्दी प्रतिपादूं लागले. व त्यांनीं 'शुगर अॅक्ट' वगैरे कायदे वसाहतींनां लागू केलें. त्यामुळें अमेरिकेंतील वातावरण क्षुब्ध झालें व वसाहतींनीं सदर कायद्यास, मातृभूमीला वसाहतीवर असा कायदा लादतां येत नाहीं म्हणून कायदेशीर प्रतिकार करण्यास सुरवात केली. तेव्हां इंग्लंडनें स्टँप अॅक्ट रद्द केला (१७६५). पण पार्लमेंटला वसाहतीवर कर लादण्याचा हक्क आहे असें डिक्लेरेटरी अॅक्ट करून जाहीर केलें. पुढें थोरल्या पिटचें प्रधानमंडळ अधिकारारूढ झाल्यावर पिटच्या मताविरुद्ध त्यानें कांच, जस्त, रंग, चहा इत्यादि पदार्थांवर कर लादले. तेव्हां अमेरिकन वातावरण फार प्रक्षुब्ध होऊन युद्धाचीं पूर्व चिन्हें दिसूं लागलीं. तेव्हां जरा कचरून चहाखेरीज इतर पदार्थांवरील कर इंग्लंडनें रद्द केले परंतु लढा मिटला नाहीं. संस्थानांची 'खंड- परिषद' (कान्टिनेंटल काँगेस) बोलावण्यांत आली. देशाचें संरक्षण करण्यास एक 'संरक्षक मंडळ' स्थापण्यांत आलें व त्यातर्फे नागरिकांचें सैन्य उभारण्यांत आलें व इंग्लंड-अमेरिका युद्धाच्या हालचालीस सुरवात झाली. पहिली चकमक बोस्टन येथें होऊन इंग्लंडचे १००० सैनिक मारले गेले. अमेरिकेनें तात्पुरती लोकशासित अशी घटना केली. ४ जुलै स. १७७६ रोजीं स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला. स्वातंत्र्यरंक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यास वसहतींनीं जॉर्ज वॉशिंग्टन यास सेनापति नेमलें. नंतर इंग्लंड व अमेरिका यांमध्यें युद्धाच्या झटापटी होऊन शेवटीं इंग्रजांनां माघार घ्यावी लागली. १७८१ सालीं जनरल कॉर्नवॉलिस शरण आला व हें अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध समाप्त झालें, व अमेरिका स्वतंत्र राष्ट्र बनलें.

आतां सर्व संस्थानांनां मिळून एक शासनसंस्था निर्माण करण्याचें बिकट व महत्त्वाचें काम राहिलें. युद्धामुळें कर्ज फार झालें होतें. तें फेडण्याकरितां काँग्रेसनें कांहीं वस्तूंवर कर बसवून त्यांचें उत्पन्न काँग्रेसला द्यावें अशी संस्थानांकडे मागणी केली किंवा १५ वर्षेंपर्यंत व्यापाराचा ताबा काँग्रेसकडे द्या, अशी मागणी केली. परंतु कोणतीच मागणी संस्थानांनीं पसंत केली नाहीं.

राज्यघटना कशी असावी याबद्दल लहान व मोठया संस्थानांमध्यें मतभेद उत्पन्न झाले. परंतु सर्वानुमतें पुढीलप्रमाणें घटना ठरलीः - काँग्रेसमध्यें दोन सभा असाव्यात. एक 'सीनेट' व दुसरी प्रातिनिधिक सभा' ('हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह'); पैकीं सीनेटमध्यें सर्व संस्थानांतून समप्रमाणांत प्रतिनिधी निवडावयाचे. व प्रतिनिधिगृहांत लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रत्येक संस्थाननें प्रतिनिधी निवडावयाचे. अध्यक्ष निवडून त्याला कार्यकारी मंडळाचा मुख्य करावयाचा. त्यानें आपल्या मदतीस इतर मुत्सद्दी घेऊन राज्यकारभार चालवावा. सर्व संस्थानला अंतर्गत कारभाराकरितां वाटेल त्या प्रकारची घटना करण्यास मोकळीक देण्यांत आली. सदर घटनेप्रमाणें पहिला अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन व उपाध्यक्ष अडॅम्स यांस निवडलें. कन्व्हेन्शननें ठरविलेली घटना कॅरोलिना व -होडस आयलंड ह्यांनां पसंत नव्हती. तेव्हां तीं या संघांत सामील होईनात, तेव्हां काँग्रेसनें त्यांच्या मालावर जबरदस्त कर लादून त्यांनां जेरीस आणलें. व त्यांस या संघांत सामील होण्यास भाग पाडलें. पुढें या संयुक्त संस्थानांनीं उद्योगधंद्याची व व्यापाराची वाढ करण्यास सुरवात केली. दक्षिणेकडील संस्थानें शेतकीप्रधान होतीं. तेथें कापसाची लागवड करण्यांत आली. व दिवसेंदिवस तेथील कापसाचें उत्पन्न वाढूं लागलें काँग्रेसमध्यें प्रथमतः व्यक्तिस्वातंत्र्यवादी एक पक्ष होता व दुसरा राष्ट्रीय फायद्याकरितां व्यक्तिस्वातंत्र्याची पर्वा न करणारा होता. परंतु दोघांनांहि कांहीं काल राज्यशकट हाकण्याची संधि मिळाल्यानें पुढें त्या दोघांनां एकमेकांचे दोष कळून त्यांचा सुरेख मिलाफ झाला. १८०४ च्या सुमारास इंग्लंड व अमेरिका यांत मतभेद उत्पन्न झाला. तटस्थ राष्ट्रांच्या जहाजांचा झडती घेणें व जेथें जेथें आपले प्रजानन खलाशी आढळतील तेथून त्यांस आणून आपल्या जहाजांवर नोकरी करण्यास भाग पाडणें हा आपला हक्क आहे असे इंग्लंड प्रतिपादूं लागलें. अमेरिकन लोक पूर्वी इंग्लंडचे रहिवाशी पण सध्यां अमेरिकन नागरिक बनलेले, यामुळें या बाबतींत घोंटाळा होणार हें नक्की होतें व त्याप्रमाणें झालाहि. चार अमेरिकन नागरिक, ब्रिटिशांनीं धरले व त्याकरितां इंग्लंडविरुद्ध युद्धाचें शिंग पुकारण्यांत आलें. परंतु युद्धखात्याच्या हलगर्जीपणामुळें अमेरिकेला अपयश आलें. परंतु युद्धखात्याच्या हलगर्जीपणामुळें अमेरिकेला अपयश आलें व तह करावा लागला. यानंतर काँगेसमध्यें राष्ट्रीय सत्तेचें अभिवर्धन करणारा पक्ष बहुमत पावला. त्यानें राष्ट्रीय पेढी काढून संरक्षित व्यापाराचें तत्त्व अमलांत आणलें. पुढें १८२० ते २५ सालीं मनरो हा अध्यक्ष निवडला गेला. याच्या कारकीर्दीत नवीन ६ संस्थानें संघांत सामील झाली. १८२३ सालीं 'मॅनरो डॉक्टरिन्' ('मॅनरो' ज्ञा. को. वि. १८ पहा.) प्रसिद्धीस आलें.

यापुढें काँग्रेसनें एखादा कायदा पास केला व तो एखाद्या संस्थानला बेकादेशीर वाटला तर काय करावें असा प्रश्न उत्पन्न झाला. व ज्या संस्थानांनां असा एखादा कायदा मान्य असेल त्यांनीं आपल्या संस्थानांत तो रद्द करावा अगर अमलांत आणूं नये असा नियम करण्यांत आला. १८२० सालीं टॅरिफ अॅक्ट कॉग्रेसनें पास केला असतां तो एका संस्थानानें आपल्या हद्दींत रद्द केला. काँग्रेसनें सैन्य व आरमाराच्या जोरावर त्यांस वठणीवर आणलें व त्यामुळें पुन्हां कोणीं काँग्रेसचा कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला नाहीं.

यानंतर गुलामगिरीच्या प्रश्नानें उचल खाल्ली व बरींच वर्षे तो चर्चेचा विषय होऊन त्यावर वादाचीं व शस्त्रास्त्रांचीं रणें झालीं. दक्षिणेंतील मुख्य धंदा शेतीचा. शेतीला काम करण्यास गुलाम मिळाल्यानें बरेच फायदे होतात. म्हणून दक्षिणेंतील संस्थानांनीं गुलामगिरी असली पाहिजे असा आग्रह धरला पण उत्तरेंतील संस्थानें अमेरिकेसारख्या स्वतंत्र राष्ट्रांत गुलामगिरी नसावी. ह्या मताचीं होतीं. एका गुलामानें स्वतंत्र होण्याकरितां वरिष्ठ कोर्टाकडे अर्ज केला पण न्यायाधिशानें विरुद्ध निकाल दिल्यानें या वादास तोंड लागलें व रक्तपात होण्याचींहि चिन्हें दिसूं लागलीं. १८६० सालीं निवडणूक होऊन अब्राहिम लिंकन (पहा) अध्यक्ष झाला. दक्षिणेंतील संस्थानांनीं संघांतून फुटण्याचा निश्चय केला व आपापल्या संस्थानांत तसे ठराव पास करून सात संस्थानें संघांतून फुटलीं पण पुढें या बंडखोरांचा सेनापति शरण येऊन त्यांनीं शस्त्रास्त्रें टाकलीं व या यादवीचा शेवट झाला. परंतु अजून हा वाद कायमचा मिटला अगर मोडला गेला नव्हता. आतां मुख्य प्रश्न असा निघाला कीं, या बंधमुक्त गुलामांचा दर्जा काय असावा. कांहींजण गुलामांनां गो-या लोकांबरोबरीचे हक्क देण्यास तयार होते. दक्षिणेकडील संस्थानांनीं गुलामगिरीची चाल मोडली पण त्यांनां जाचक असे कायदे पास केले. कोणी त्यांनां जमीन बाळगण्याचा हक्क देईना, कोणी शस्त्र बाळगण्याची परवानगी देईना, कोणी गुलामांस कोर्टांत साक्षीदार म्हणून उभे राहण्याची मनाई करूं लागला. असे जाचक कायदे कांहीं संस्थानांत पास झाले. १८६६ सालीं सिव्हिल राईटस् बिल काँग्रेसनें पास केले. या कायद्यान्वयें मुक्त झालेल्या गुलामांनां गौरकाय लोकांच्या बरोबरीचे हक्क देण्यांत आले. व जो कोणी या कायद्यांचा भंग करील त्याला शिक्षा देण्याची व्यवस्था करण्यांत आली. हा कायदा पुढें रद्द केलां जाऊं नये म्हणून काँग्रेसघटनेस अशी दुरुस्ती जोडलीं कीं, २१ वर्षें वयाच्या पुरुष रहिवाशाचा मतदानाचा हक्क जर एखाद्या संस्थाननें नाकारला तर त्या संस्थानाचे प्रतिनिधी काँग्रेसमध्यें तितक्याच प्रमाणांत कमी घ्यावेत. ही दुरुस्ती मान्य केल्यास संस्थानांनां निग्रोंनां मतदानाचे हक्क न देणें अशक्य होऊन बसलें.

१८६७ सालीं अध्यक्षानें सीनेटच्या संमतीशिवाय मुलकी अधिका-यास बडतर्फ करूं नये; सेनापतीच्या द्वारेंच लष्करी हुकूम सोडावे व सेनापतीच्या बडतर्फांसहि सीनेटची संमति घ्यावी अशा अर्थाचा काँग्रेसनें कायदा पास केला. १८६८ सालीं परत आणखी असा एक कायदा पास केला गेला कीं, 'संयुक्त संस्थानांतील मतदानाचा हक्क जात, वर्ण, किंवा गतकालीन दास्यत्व इत्यादि कारणांमुळें नाकारण्यांत येऊं नये.' ही दुरुस्ती काँग्रेसनें मान्य केली व ज्यांनां काँग्रेसमध्यें प्रातिनिधित्व पाहिजे असेल त्यानें ही दुरुस्ती मान्य केली पाहिजे अशी अट घातली.

यानंतर अमेरिकेनें आपले परराष्ट्रीय संबंध नीट केले. देशांत आर्थिक पुनर्घटना सुरू झाली. नवीन कारखाने, व बँका निघाल्या; रॉकी पर्वतांत निरनिराळ्या धातूंच्या खाणी सांपडून त्यांची निर्गत वाढत गेली. व्यापाराच्या व दळणवळणाच्या सोयीकरितां रेल्वे देशभर झाल्या; व देश अधिकाधिक संपन्न होऊं लागला. १८९० च्या सुमारास लोखंडाच्या खाणी सांपडून लोखंडाच्या राशी बाहेरदेशीं रवाना होऊं लागल्या. मोठमोठे कारखाने निघाल्यामुळें लहान धंदे बसले. रेल्वेभाडें फार वाढल्यानें गरीबांचे हाल होऊं लागले. शेतकरी लोकांनीं संघटना करून आपलें सामर्थ्य वाढविलें. त्यांनीं एक स्वतंत्र पक्षच स्थापन केला. मजूरसंघ स्थापन झाले व त्यांतील सभासदांची संख्या वाढत गेली. १९०२ सालीं त्यांनीं मोठा संप केला. त्यावेळीं सरकारनें मजुरांनां जास्तीं पगार दिला व कामाचे तास कमी केले.

दिवसेंदिवस अमेरिकेची उद्योगधंदे व व्यापार यांच्या बाबतींत भरभराटच होत गेली. व आज अमेरिका हें पहिल्या प्रतीचें राष्ट्र आहे व जागतिक राजकारणांत त्याच्याशिवाय शेवटचा निकाल लागत नाहीं हें गेल्या महायुद्धांत दिसून आलेंच.

१९०८ सालीं अमेरिकेच्या इतिहासांत शांतपणाचें गेलें. रूझवेल्टनें आपल्या अलौकिक धडाडीनें अमेरिकेच्या काँग्रेसवर आपलें वर्चस्व स्थापन केलें होतें (रूझवेल्ट पहा). १९०९ सालीं टॅफ्ट हा अध्यक्षपदावर विराजमान झाला. त्यानें रूझवेल्टच्याच धोरणाचें अनुकरण करण्याचें ठरविलें. तथापि थोडक्याच दिवसांत त्याचा काँग्रेसवरील दाब कमी होऊं लागला. भांडवलवाले, पेढीवाले, इत्यादि वजनदार सभासदांनां असें वाटावयाला लागलें कीं, आपल्या हितसंबंधांत टॅफ्ट हा आड येत आहे व त्यामुळें त्यांनीं त्याला पाठिंबा देण्याचें नाकारण्यास आरंभ केला. उलट त्यावेळीं अमेरिकेंत मतदानपद्धतींत सुधारणा करण्याबद्दल जी चळवळ सुरू झाली होती तिला टॅफ्टनें अनुकूलता न दर्शविल्यामुळें तिकडूनहि त्याचें वजन कमी होत चाललें. टॅफ्टच्या कारकीर्दीत 'समान हक्का' या प्रश्नासंबंधीहि जोराची चळवळ सुरू झाली. मादक पेयांच्या प्रश्नांवरहि बरींच रणें माजूं लागलीं. १९०९ च्या सुमारास बहुतेक सर्व संस्थानांमधून मादक पेयासंबंधीं कायदे करण्यांत आले होते, तथापि टॅफ्टच्या कारकीर्दीत त्याला उत्तरोत्तर राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होऊं लागलें. शेवटी काँग्रेसला या बाबतींत कायदा करावा लागला; व या कायद्यानें ज्या संस्थानांनीं आपल्या हद्दींत मद्यपानबंदी केली असेल त्या संस्थानांत मद्याचीं जहाजें नेण्याची बंदी करण्यांत आली. त्याचप्रमाणें १९१२ सालीं ड्रग लॉयबेल नांवाचा अॅक्ट एक कायदा पास करण्यांत आला. 'इमिग्रेशन' उर्फ परदेशस्थाचें अमेरिकेंतील आगमनासंबंधीचा प्रश्नहि टॅफ्टच्या कारकीर्दीत प्रामुख्यानें पुढें आला. यासंबंधी १९०७ मध्यें कायदा करण्यांत आला होता पण त्याची अंमलबजावणी योग्य त-हेनें होत नव्हती. या प्रश्नाचा विचार करण्याकरितां १९११ सालीं एक कमिशन बसविण्यांत आलें. या कमिशननें ज्या सूचना केल्या त्या टॅफ्टनें अंमलांत आणण्याचें नाकारलें. १९१० सालीं पोस्टल डिपॉझिट अॅक्ट पास करण्यांत आला. १९०९ सालीं पेन-आल्ड्रिच टॅरीफ अॅक्ट पास करण्यांत येऊन त्याअन्वयें जकातीसंबंधीच्या प्रश्नावर अपील करण्याकरितां कोटें स्थापन करण्याचें ठरलें व काँग्रेसनें वेळोवेळीं या बाबतींत कोणतें धोरण स्वीकारावें यासंबंधीं सल्ला देण्याकरितां एक टॅरीफ बोर्ड नेमण्यांत आलें. शिवाय 'ट्रस्ट', 'वाहतुकी' यासंबंधातहि कायदे करण्यांत आले. टॅफ्टला आपल्या कारकीर्दीत अंतस्थ प्रश्नाकडेच लक्ष पुरवावें लागल्यामुळें परदेशीय राजकारणाकडे बारकाईनें लक्ष पुरविण्याला त्याला फारसें फावलें नाहीं. तथापि त्याच्या कारकीर्दीत 'न्यूफाउंडलंड मच्छीमारी' संबंधानें जो इंग्लंड-अमेरिकेमध्यें लढा उपस्थित झाला होता त्यावर हेग ट्रायब्यूननें १९१० सालीं निकाल देऊन मिटविला. १९११ सालीं ग्रेटब्रिटन व फ्रान्स यांच्याशीं अमेरिकेनें तह केला. कानडाशींहि १९११ सालीं परस्परसाहाय्याचा तह करण्यांत आला. पनामा कॅनालमधील जहाजांवर जकात लादण्यांत येऊं लागली, त्यासंबंधीं इंग्लंडनें तक्रार केली पण टॅफ्टनें इंग्लंडच्या विरोधाला जुमानलें नाहीं. मेक्सिकोमध्यें जी बेबंदशाही माजली होती तिचा संपर्क अमेरिकेला लागूं नये या दृष्टीनें टॅफ्टनें आपलें सैन्य मेक्सिको व अमेरिका यांच्यामधील सरहद्दीवर ठेविलें पण मनरो - तत्त्वाला अनुसरून त्यानें मेक्सिकोंतील बंडाळी मोडण्यासाठीं आपलें सैन्य पाठविण्याचें नाकारलें. जपानमधील अमेरिकेंत येणा-या माणसांच्या संबंधीचा कायदा १९११ सालीं पुन्हां लांबविण्यांत आला. टॅफ्ट व रूझवेल्ट यांच्यामध्यें कांहीं राजकीय प्रश्नांवर बेबनाव उत्पन्न झाला, त्यामुळें रूझवेल्टनें नवीन निवडणुकीकरितां उभे राहण्याचें ठरविलें. नव्या निवडणुकीच्या वेळीं वुड्रो विल्सन हाहि अध्यक्षपदासाठीं उमेदवार म्हणून उभा राहिला होता. टॅफ्ट हाहि पुन्हां उमेदवार म्हणून उभा राहिला. पण निवडणुकींत टॅफ्ट अगर रूझवेल्ट हे दोघेहि मागें पडून वुड्रो विल्सन (पहा) हा बहुमतानें निवडून आला अध्यक्षपदावर आरूढ होतांच प्रथमतः विल्सननें टॅरीफ अॅक्टामध्यें कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत याची दिशा आंखून दिली व त्याप्रमाणें मसुदा करण्यासाठीं कमिशन नेमलें. तसेंच 'ओवेन ग्लास फेडरल रिझर्व्ह बँकिंग सिस्टीम' नांवाचा कायदा पास करून त्यानें बँकेला राष्ट्रीय संस्थेचें स्वरूप प्राप्त करून दिलें. या कायद्यान्वयें मुख्य बँक वॉशिंग्टन येथें असून तिच्या शाखा म्हणून इतर १२ बँका महत्त्वाच्या बारा ठिकाणीं काढण्यांत आल्या. शेतक-यांनां या बँकांतर्फे मदत करण्यासाठीं 'रूरल क्रेडिट्स अॅक्ट' पास करण्यांत आला. पनामा कालव्यामधून जी अमेरिकेशिवाय इतर देशांचीं जहाजें जात असत त्यांच्यावर टॅफ्टच्या कारकीर्दीत जी जकात बसविण्यांत येत असे ती १९१४ सालीं स्वतंत्र अॅक्ट करून नाहीशीं करण्यांत आली. १९१३-१७ या सालांच्या दरम्यान मजूरवर्गामध्यें फार असंतोष माजला होता. संपावर संप होत होतें. १९१६ सालीं रेल्वेच्या मजुरांनीं प्रचंड संप करण्याचें ठरविलें. तेव्हां विल्सन यानें मध्यस्थी करून 'अॅडॅम्सन अॅक्ट' नांवाचा कायदा पास करून घेतला व मजुरांच्या कामाचे तास आठ ठरविण्यांत आले व अशा रीतीनें मजुरांचा संप आपोआपच मोडला. शिक्षणविषयक सुधारणा कोणत्या पद्धतीनें करण्यांत याव्या यासंबंधीं चौकशी करण्याकरितां त्यानें एक कमिशन नेमलें. विल्सन हा शांततेचा भोक्ता असल्याकारणानें त्यानें परराष्ट्रांशीं शक्य तितके कलह न भाजतील असें आपलें धोरण ठेवले होतें. अवघ्या एका वर्षांत त्यानें शांततेच्या मार्गानें परराष्ट्रांशीं एकंदर तीस तह केले. फिलिपाईनमधील लोकांची स्वातंत्र्यार्थ जी चळवळ चालू होतीं तींबद्दल सहानुभूति बाळगून फिलिपाईनमधील लोकांनां राज्यकारभारांत त्यानें बरेच हक्क दिले. १९१९ सालीं फिलिपाईनला पूर्ण स्वातंत्र्य देण्यास देखील त्यानें संमति दिली होती. पण काँग्रेसनें ती गोष्ट नाकारली. १९१६ सालीं डॅनिश वेस्ट इंडीजमधील बराच मोठा मुलूख अमेरिकेला मिळाला व त्याला व्हर्जिन आयलंड्स असें नांव देण्यांत आलें. विल्सननें मेक्सिकोमध्यें सैन्य व आरमार पाठवून तेथील बंडाळी मोडली. १९१४ मध्यें महायुद्धाला सुरवात झाली. महायुद्धाच्या अमदानींत विल्सननें प्रथमतः कोणतें धोरण ठेविलें व नंतर त्याला दोस्त राष्ट्रांच्या वतीनें महायुद्धांत कसें पडावें लागलें यासंबंधीं 'विल्सन' वरील लेख पहा. १९१६ सालीं विल्सनची पुन्हां अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर स. १९१७ त अमेरिका युद्धांत पडली. लगेच विल्सननें आपलें सैन्य व आरमार यांची जय्यत तयारी करण्याविषयीं व दोस्तराष्ट्रांनां मदत करण्याविषयीं उपाययोजनेस सुरवात केली. महायुद्धाच्या अमदानींत अनेक बोर्डें स्थापन करण्यांत आलीं. महायुद्धाची समाप्ति झाल्यानंतर जगांत शांतता प्रस्थापित व्हावी एतदर्थ विल्सननें बरेच प्रयत्न केले (विल्सन पहा). १९२० सालीं विल्सनची कारकीर्द संपली. नंतर हार्डिज हा अध्यक्ष निवडून आला. हार्डिज हा रिपब्लिकन पक्षाचा होता, म्हणून निवडून येतांच त्यानें फेडरल बजेट सिस्टीम अमलांत आणण्यासाठीं एक बिल पास करून घेतलें. या अगदींच नवीन बिलानें त्या वेळीं अमेरिकेंत मोठी खळबळ उडाली. त्यानंतर हार्डिजनें ऑस्ट्रिया-हंगेरी, जर्मनी इत्यादि राष्ट्रांशीं तह केले व सीनेटनें त्यांनां स. १९२१ सालीं संमति दिली. १९२१ च्या नोव्हेंबरमध्यें पासिफिक महासागरांतील हितसंबंध निश्चित करण्यासाठीं यूरोपियन राष्ट्रांची परिषद हार्डिजनें भरविली व त्या परिषदेला प्रमुख राष्ट्रांचे सभासद हजर होते. शस्त्रसंन्यासासंबंधीहि या परिषदेंत चर्चा झाली.

प र रा ष्ट्री य धो र ण, (अ) यूरोपियनः- सन १९२१ च्या मे मध्यें अमेरिका यूरोपीय राजकारणांत शिरली. अप्पर सायेशियाच्या तहामध्यें तिनें भाग घेतला. लंडन येथें अमेरिकेनें आपला वकील ठेवला, व सुप्रीम कौन्सिलांत त्यास अमेरिकेच्या वतीनें बोलणें करण्याचा अधिकार असल्याबद्दल जाहीर केलें. १९२१ सालच्या आक्टोबरांत यूरोपियन राष्ट्राशी केलेल्या सात मेच्या तहास वॉशिंग्टन येथें कायम स्वरूप देण्यांत आलें. जरी आगस्टमध्यें शांततेचा तह रद्द झाल्यानें फ्रान्स रागावलें होतें, तरी अमेरिकेच्या मार्गांत अडथळा आला नाहीं. एप्रिल स. १९२२ मध्यें अमेरिकेनें राष्ट्रसंघाच्या जिनोवा परिषदेंत भाग घेण्याचें नाकारलें. यूरोपांतील आर्थिक जीविताच्या पुनर्घटनेसंबंधीं अमेरिका मदत करूं इच्छित होती. पण तिला यूरोपीय राजकारणांत आगंतुकपणें सामील व्हावयाचें नव्हतें. दुसरा मुद्दा असा कीं, मार्च १९२१ मध्यें अमेरिकेनें जाहीर केल्याप्रमाणें यूरोपियन राष्ट्रें रशियाचें पराक्रमण करीत होती.

सन १९२३ च्या ऑगस्टमध्यें अमेरिकेनें जर्मनी, इंग्लंडादि करून राष्ट्रांशीं व्यापारी तह केले. १५ जून १९२३ रोजी प्रेसिडेंट हार्डिज यांच्या वतीनें प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकांत असें प्रतिपादलें आहे कीं, जरी अमेरिका राष्ट्रसंघांत शिरली नाहीं, तथापि जागतिक राजकारणाविषयीं तिनें उदासीन वृत्ति स्वीकारली नाहीं. हार्डिजच्या मागून कूलीजकडे अध्यक्षपद आलें. त्यानें असें जाहीर केलें कीं लॉर्ड कर्झनप्रणीत नुकसानभरपाईच्या कार्याच्या योजनेस अमेरिका योग्य व शक्य तितका हातभार लावण्यास तयार आहे. पण जोपर्यंत नुकसानभरपाईच्या प्रश्नाबाबत इंग्लंड व फ्रान्स यांचे दृष्टीकोन परस्परविरुद्ध आहेत तोपर्यंत अमेरिका यूरोपीय राजकारणांत हात घालून अवलक्षण करून घेऊं इच्छीत नव्हती.

(आ) मेक्सिको.- मे सन १९२३ मध्यें मेक्सिकन सरकारशीं प्रे. हार्डिज सहकारिता करूं इच्छित होते. स. १९२१ मध्यें एक तहाचा मसुदा तयार केला गेला आणि त्यांत अमेरिकन मालमत्ता सुरक्षित राहील अशी तजवीज करण्यांत आली. परंतु तो मसुदा मेक्सिकनांकडून झिडकारण्यांत आला व बराच काळपर्यंत 'डेडलॉक' होता. परंतु दोघांनांहि मान्य असलेली एक मधली वाट मिळाली. स. १९२३ मध्यें मेक्सिकन कोर्टाचे अमेरिकनांच्या बाजूनें दिलेले निकाल बरेचसे वॉशिंग्टनला पुराव्यादाखल पाठवून देण्यांत आले. तथापि संयुक्त संस्थानानें इतर हमी मागितल्या व मेक्सिकन सरकारनें तसा आतां कायदा करून टाकला आहे.

(इ) ग्रेटब्रिटनः- अमेरिकेनें युद्धाबाबत दिलेलें कर्ज माफ करावें असे म्हणणारा एक पक्ष होता तथापि अमेरिका कर्जाची सूट घेण्यास तयार नव्हती, व तें कर्ज भरून घेण्याचें तिनें ठरविलें. मात्र ऑगस्ट सन १९२२ मध्यें त्यांस अशी पुरवणी जोडण्यांत आली कीं सदर रकमेवरील व्याज सोल्जर्स बोनस फंडाला देण्यांत यावें. अमेरिकेनें एकंदर १० बिलियन डॉलर कर्ज यूरोपियन राष्ट्रांस दिलें होतें. ता. १ सप्टेंबर १९२२ रोजीं ग्रेटब्रिटननें न्यूकॅसलमधीलं अमेरिकन वकिलाचा पासपोर्टसंबंधाचा कायदेशीर हक्क अमान्य केला व त्यामुळें अमेरिकेचा व इंग्लंडचा खटका उडाला. कांहीं काळानंतर संयुक्त सं. सरकारनें एक चौकशी कमिशन नेमलें, व दोषपरिहारार्थ नोव्हेंबरमध्यें त्या वकिलास दुसरीकडे नेमलें. १ जानेवारी १९२३ रोजीं ब्रिटिश चॅन्सेलर स्टन्ले बाल्डविन, वॉशिंग्टन येथें भरलेल्या कर्जफेडीच्या परिषदेस हजर राहिले. ब्रिटिशांनीं अमेरिकेच्या कर्जफेडीकरितां फंड उभारावयाची सूचना इंग्लंडनें मान्य केली. ही भरीव सवलत होती. प्रथमच्या दहा वर्षेंपर्यंत दरसाल १६१ मिलियन डॉलर व बाकीचे १८४ मिलियन डॉलर पुढील ५२ वर्षांत फेडावयाचे ठरलें. १९२२ मध्यें दर सामाहीस २,३०,००,००० डॉलरप्रमाणें व्याज दिलें. युद्धाच्या काळांत दोस्त सरकारातर्फे ब्रिटिश कर्ज कमी करण्यांत आलें व या कराराला बँकांनीं पाठिंबा दिला. सीनेटनेंहि या कर्जफेड परिषदेचा निर्णय मान्य केला, व इतर राष्ट्रांच्या बाबतींत असेच करार करण्यास कर्जफेड कमिशनला अधिकार देण्यांत आले, परंतु सवलती फार देऊं नयेत असें बजावून ठेविलें. कर्जफेड ही आंतरराष्ट्रीय बाब होती. ९२४ दशलक्ष पौंड युद्धकर्ज होतें. इंग्लंडांत ६२ वर्षे पर्यंत दरसाल प्रत्येक माणसाकडून एक पौंड कर्ज वसूल केलें तर या कर्जाइतकी रक्कम होईल असा हिशोब केला. १९२३ सालच्या मार्च १५ ला पहिला हप्ता फेडला.

(ई) जपानः- १९२१ च्या जूनमध्यें याप बेटावर अमेरिकेस केबलचे हक्क दिले. १९२२ च्या नोव्हेंबरांत जपानी माणसांचा अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार बेकायदेशीर ठरविण्यांत आला. जपानशीं झालेलें राजकारण 'जपान' लेखांत (ज्ञा. को. वि. १३, ज. पृ. ७७ पासून पुढें) पहा.

म जू र- सप्टेंबर स. १९२१ मध्यें ६०,००,००० लोक बेकार होते. वेस्ट व्हर्जीनियाच्या कोळशाच्या खाणींत अपघात झाला व त्यायोगानें हजारों मजुरांनां बेकार व्हावें लागलें व त्यांनीं खाणी मालकांविरुद्ध तक्रारी केल्या. ७,५०,००० लोकांनीं, रेल्वे कंपन्यांनीं १९२० सालीं मजुरींत केलेली वाढ कमी करण्याचें जाहीर केल्यामुळें संप सुरू केला, एप्रिलमध्यें ५,००,००० लोक पगारवाढीकरितां संपांत सामील झाले. सप्टेंबर स. १९२२ मध्यें कोलंबियाच्या डिस्ट्रिक्ट जज्जानें मध्यवर्ती कोर्टाचा हुकूम धाब्यावर बसवून रेल्वे लाईनची नासधूस करणा-या मजुरांनां त्यापासून परावृत्त केलें. अशा त-हेचें हे बहुधा पहिलेंच उदारहण होय. याबद्दल संयुक्त स. सरकारची शिक्षा त्यांस कांही काळ भोगावी लागली. रेल्वेचा संप सप्टेंबरांत संपला, व मजुरांनीं संपापूर्वीच्या जागेवर व मजुरीवर यावें असें ठरलें व ज्या जागा मिळवावयाच्या त्या एका महिन्याच्या आंत मिळतील असें मालकांनीं जाहीर केलें. कोळशाचा संप ४॥ महिन्यांनंतर संपुष्टांत आला. आणि ती वेळ मोठी आणीबाणीची होती. ग्रेटब्रिटनहून बराच कोळसा मागविण्यांत आला व कोळशाच्या भावास तेजी आली. २ सप्टेंबर १९२३ रोजी अनेक तडजोडी नाकारल्या गेल्यानें एका विशिष्ट प्रकारच्या खाणींतील १,५८,००० लोकांनीं संप केला. प्रेसिडेन्ट कुलीज याच्या पुढें मोठा प्रश्न येऊन पडला. कित्येकांकडून असें सुचविण्यांत आलें कीं, सरकारनें आपल्या ताब्यांत खाणी घ्याव्यात, परंतु तरीहि संपाचा प्रश्न सुटणार होता अशांतला भाग नाहीं. खाणीमालकांनीं असें सांगितलें कीं, जर खाणीवाल्यांनीं लष्कराची मदत दिली तर ते मजूरसंघाचे सभासद नसणा-यांस कामावर घेऊन खाणी चालू ठेवतील. या संपानें असें मात्र दिसून आलें कीं, खाणीसारख्या धंद्यांत लवकर मजूरभरती होत नाहीं.

यु ना य टे ड स्टे ट् स ले ब र फे ड रे श न.- सदर संघाची सदस्यसंख्या १०,००,००० नीं कमी झाली होती. ती पुढील चार वर्षांत भरून आली. ही संख्या कमी होण्याचें कारण असें कीं दुस-या एका दिखाऊ संघटित संस्थेनें त्यांची मनें वेधली गेलीं. मुलांनां कामावर ठेवल्यापासून होणारा वाईट परिणाम कसा नाहींसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रापुढें आहे.

अं त र्ग त रा ज का र ण.- प्रतिनिधी-सभेची निवडणूक नोव्हेंबर १९२२ मध्यें झाली. तींत कांहीं थोडया संख्येनें रिपब्लिकन पक्षाचें मताधिक्य होतें. कर, भाडें, जकात, मद्यपानबंदी वगैरे बाबतींत पूर्वीचेंच धोरण ठेवण्यांत आलें. अमेरिकेच्या जहाजांनां पनामांत कर माफ असावा अशा आशयाचें बिल सीनेटनें पास केलें. परंतु शस्त्रसंन्यासपरिपद होईपर्यंत तें तहकूब ठेवण्यांत आलें.

आ ग म ना स बं दी.- मे १९२२ त एक एमिग्रेशन कायदा पास होऊन त्याची मुदत जून १९२५ पर्यंत ठरविली गेली. तो कायदा म्हणजे १९२१ च्या डिलिंगहॅम इमिग्रेशन अॅक्टची सुधारून वाढविलेली आवृत्तीच होय. ता. १३ नोव्हेंबर १९२२ रोजीं अमेरिकेनें जपानी लोक अमेरिकन नागरिक होण्यास अयोग्य होत असें ठरविलें. तो हक्क फक्त 'स्वतंत्र' गो-या माणसांकरितांच राखून ठेवला. याचा परिणाम असा झाला कीं, गतवर्षी ३,००,००० परकी लोकच अमेरिकेंत आले. त्याच्यापूर्वीच्या वर्षी १०,००,००० लोक बाहेरून आले होते. जुलै १९२२ मध्यें ग्रीक लोकांचें अमेरिकेंत जाण्याबाबत औत्सुक्य दिसून आलें.

१९२३ मध्यें फिरून एक कायदा पास करण्यांत येऊन परकी लोकांचें प्रमाण शेंकडा तीन होतें तें दोन वर आणलें व यायोगानें सध्यां ३,५८,००० परकी लोक अमेरिकेंत आहेत, त्यांपैकीं १,८८,००० च फक्त रहातील. मात्र जुन्या नागरिकत्वाचे हक्क असलेल्या इसमांनां त्यांचे आप्तेष्ट आणण्यास परवानगी देण्यांत आली आहे.

दा रू बं दी.- दारूबंदीचा कायदा अमलांत आल्यापासून त्या बाबतींत ब-याच अडचणी भासल्या व फसवणुकीचे प्रकार आढळले. १९२१ च्या सप्टेंबरांत शिकॅगोच्या पोलिसांनीं दारूच्या आयातीची जप्ती केली व ती त्यांनींच खाजगी रीतीनें स्वस्त विकून पैसा मारला. एप्रिल १९२२ मध्यें अशी गरज भांसू लागली कीं, या जप्तीच्या दारूचा नाश केला पाहिजे, म्हणजे विनाकारण आयात होणार नाहीं. व शिकॅगोस नदीमध्यें बरीचशी दारू ओतण्यांत आली तेव्हां लोकांत क्षोभ उत्पन्न झाला. दारूबंदी अमलांत आणण्याकरितां संयुक्त सं. सरकार दरसाल १५ लाख स्टर्लिंग खर्च करतें. तथापि सर्व प्रकारचीं स्पिरिटें नेहमीपेक्षां जास्त प्रमाणांत आयात झालेलीं आढळून येतात. एप्रिल १९२३ मध्यें इंग्लंडनें दारूबंदी करण्यांत अमेरिकेशी सहकार्य अधिकाऱ्यांस समुद्रांत तपासूं देण्याचें मात्र नाकारलें. १९२३ च्या मे-जूनमध्यें कायद्यान्वयें, अमेरिकेंत दारू येण्यास बंदी करण्यांत आली व अमेरिकन समुद्रावरहि दारूची नेआण कायद्यान्वयें बंद केली गेली. त्याविरुद्ध इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, हॉलंड यांनीं मोठा गिल्ला केला. औषधांकरितां मात्र दारूं येऊं देण्यास अमेरिकेनें परवानगी दिली. २१ जून १९२३ रोजीं असें ठरविण्यांत आलें कीं, कोणाचेंहि दारूचें जहाज-मग तें देशी अगर परकी सरकारचें असो - अमेरिकन समुद्रांत म्हणून येऊं द्यावयाचें नाहीं. २८ जूनला असें ठरविण्यांत आलें कीं, जर एखादी बोट अमेरिकन समुद्रांत दारू घेऊन आली तर त्या बोटीस परत अमेरिकन समुद्रांत येण्यास परवानगी मिळणार नाहीं व बोटीच्या कॅप्टनला पकडून शिक्षा दिली जाईल. ता. १ नोव्हेंबर रोजीं ब्रिटननें १२ मैलांच्या आंत जहाज तपासण्यास आपली संमति दिली व इतरांच्या बाबतींत तीन मैलांचा नियम चालू राहिला.

जून १९२३ मध्यें न्यूयॉर्क व विस्कान्सिन संस्थाननें 'प्रोहिबीशन एन्फोर्समेंट अॅक्ट' रद्द केला इतर संस्थानांतहि या कायद्याचें सौम्यीकरण करण्याकडें जनप्रवृत्ति दिसून येत होती. ऑगस्ट १९२३ त अमेरिकेंतील ब्रिटिश वकील सर ऑकलंड गेडीज यांनीं दारूबंदीनें संयुक्त संस्थानावर घडून आलेल्या परिणामाबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मद्यपानप्रतिबंधक संस्थांनीं असें प्रसिद्ध केलें कीं, गतवर्षीच्या खपाच्या शें. २० इतका अल्कोहोल यंदा (१९२६) खपला, उलट मद्यपानप्रसारक संस्थांनीं शें. ६६ खप झाला असें प्रसिद्ध केलें. शेतीच्या प्रांतांत व लहान लहान शहरांत मद्यप्रतिबंधक धोरण यशस्वी झालें. मात्र मोठया शहरांतून व पूर्वकिना-यावर धोरण जरा कमी प्रमाणांत यशस्वी झालें. देशांत मोठया प्रमाणावर दारू करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु त्या प्रयत्नास उतरती कळा लागली आहे. अल्कोहोलच्या सेवनानें माणसाच्या जीविताची होणारी हानि व दारू पिण्याकरितां होणारे अत्याचार यांविषयीं बराच मतभेद आढळून येतो. दारूबंदीनें गुन्हें कमी होतात किंवा नाहीं याबद्दलहि वरीलप्रमाणें मतभेद आढळून येतात. स. १९२० मध्यें मद्यपानबंदी झाल्यापासून संस्थानांच्या तुरुंगांतील व मध्यवर्ती सरकारच्या तुरुंगांतील कैद्यांची संख्या वाढली आहे. सेव्हिंग डिपाझिटची संख्या शें. ४० नें वाढली आहे. परंतु दुस-या कांही बाबी विचार करण्यासारख्या आहेत. एकंदरीनें पाहिलें असतां दारूबंदीनें सुपरिणाम घडून आला कीं दुष्परिणाम घडून आला हें सांगणें दुरापास्त आहे.

श स्त्र सं न्या स व ना वि क घ डा मो डी.- यासंबंधी 'जपान' लेख (ज्ञा. को. वि. १३, ज पृ. ८०) पहा.

१९२१ मध्यें वॉशिंग्टनच्या तहान्वयें ५:५:५ या प्रमाणांत अमेरिकाः इंग्लंडः जपान यांचें आरमार कमी करण्यांत आलें यामुळें अमेरिका व ब्रिटन यांचें आरमार ५२५००० टनपर्यंत वाढणार होतें. फ्रान्सनें १,७५,००० टनेजचें आरमार ठेवण्यास संमति दिली. स. १९२२ च्या अमेरिकन नेव्हल बिलांत गतवर्षीपेक्षां खर्चांत ८१ मिलियन डॉलर कमी केले व त्याचप्रमाणें आरमार - खात्यांतील ३०००० लोक व टॉर्पेडो-विनाशक बोटींची संख्याहि कमी करण्यांत आली.

वा ङ् म य.- अमेरिकन वाङ्मयांतील अगदीं प्रारंभींचीं पुस्तकें इंग्लंडांत जन्म पावलेल्या व शिक्षण मिळालेल्या ग्रंथकारांनीं लिहिलेली आहेत. ती पुस्तकें इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत प्रचलित असलेल्या भाषेंत लिहिलेलीं असून त्यांतील विषय ऐतिहासिक स्वरूपाचे व स्थलवर्णनपर आहेत. सर्वांत प्राचीन पुस्तक जॉन स्मिथ (इ. स. १५७९ ते १६३१) याच्या नांवानें प्रसिद्ध आहे. तें व्हर्जीनियांतील घडलेल्या प्रसंगांविषयीं आहे. त्यानंतर विल्यम स्ट्रॅची नांवाच्या ग्रंथकारानें ज्यांत बरम्यूडा बेटावरील सर थॉमस गेट्स याच्या नौकाभंगाची हकीगत दिली आहे असें एक पुस्तक प्रसिद्ध केलें. इ. स. १६४९ त कर्नल हेन्री नॉरवुड यानें आपल्या व्हर्जीनियाच्या जलप्रवासाची हकीकत प्रसिद्ध केली. याप्रमाणें निरनिराळ्या संस्थानांची निरनिराळ्या लेखकांनीं लिहून ठेवलेली हकीकत सांपडते. या सर्व संस्थानांत न्यू इंग्लंड हें प्रथमपासून सर्व बौद्धिक चळवळीचें केन्द्र असून वाङ्मयाचें मुख्य ठिकाण होतें. तेथेंच पहिला छापखाना स्थापन झाला, पहिलें कॉलेज उघडलें व पुष्कळसें वाङ्मय प्रसिद्ध झालें.

प्यूरिटन लोकांच्या वसाहतींचे मुख्य लक्षण असें होतें कीं, तेथील वाङ्मय प्रमुख नागरिकांच्या हातीं असून त्यांचा तो नित्य विचाराचा मुख्य विषय होता. इतर वसाहतींप्रमाणें या प्यूरिटन वसाहतींत स्थलवर्णनपर व प्रवासवर्णनपर पुस्तकें तर निघत होतींच परंतु त्याशिवाय ऐतिहासिक, चर्चात्मक, उपदेशपर व धर्मसंबंधीं ग्रंथहि प्रसिद्ध होत असत प्लीमथचे गव्हर्नर विल्यम ब्रॅडफर्ड (१५९०-१६५७) व मॅसॅच्यूसेट्सचे ''गव्हर्नर जॉन विन्थ्रॉप'' (१५८८-१६४९) यांनीं तत्कालीन परिस्थितींचें वर्णन लिहून ठेवलें आहे आणि ही इतिहासलेखनाची परंपरा विन्स्लो, नॅथॅनिअल, मॉर्टन, प्रिन्स, ह्युबर्ड व हचिन्सन या इतिहासकारांनीं पुढें चालूं ठेविली. जॉन कॉटन, थॉमस हुकर, नॅथॅनिअल वार्ड, रोअर विल्यम, रिचर्ड मॅथर, जॉन इलिअट इत्यादि धर्मोपदेशकांनीं प्रवचनें, भाषणें, प्रश्नोत्तरें, धार्मिक लेख व सर्व प्रकारचे निबंध प्रसिद्ध केले. याप्रमाणें न्यू इंग्लंडचें वाङ्मय पुष्कळसें धार्मिक स्वरूपाचें आहे व जें धर्मेतर स्वरूपाचें आहे त्यांतहि प्यूरिटन लोकांच्या कल्पना प्रविष्ट झालेल्या आहेत. त्यावेळीं अतिशय लोकप्रिय झालेल्या ''दि वे साम बुक'' (१६४०) ''डे ऑफ डूम'' (१६६२) व ''दि लिटल बायबल'' या तीन पुस्तकांवरून त्या काळीं धार्मिक विचारांचें किती प्राबल्य होतें हें दिसून येतें. त्यावेळच्या ग्रंथसमूहांत अमेरिकेच्या मूळच्या रहिवाशांशीं झालेल्या युद्धांविषयींचे व त्यांच्या इतर बाबीसंबंधाचे ग्रंथ समाविष्ट झालेले आहेत. येणेंप्रमाणें सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाङ्मयाचें कार्य संस्थानांच्या पुढा-यांच्या देखरेखीखालीं चालत असल्याचें दृष्टीस पडतें.

वर नमूद केलेलें वाङ्मय प्युरिटन लोक अमेरिकेंत आल्यानंतर उत्पन्न झालें. त्यावरून प्युरिटन लोकांची तत्कालीन मानसिक, सामाजिक व राजकीय परिस्थिति कशी प्रकारची होती हें कळून येतें. रिचर्ड मॅथर हा मूळ पुरुष अमेरिकेंत आला व त्यानें हा ग्रंथ रचण्याच्या कामीं हातभार लावला. त्याचा नातू विद्वान, मेहनती व संन्यस्तवृत्तीचा असून नेहमी कल्पनासृष्टींत वावरणारा होता. त्याचा मुख्य ग्रंथ म्हटला म्हणजे 'न्यू इंग्लंडचा धार्मिक इतिहास' (१६२०-१६९८) अशा अर्थाच्या नांवाचा होता. हा त्या वेळचा मुख्य ऐतिहासिक ग्रंथ असून त्या वेळपर्यंत झालेल्या अमेरिकन वाङ्मयांतहि त्यास अग्रस्थान दिलें पाहिजे. तो तत्कालीन संस्थानिक चरित्रक्रमाच्या व अवान्तर सर्व परिस्थितीच्या माहितीनें भरलेला आहे. पुढें मॅथर घराण्यांतील जोनॅथर एडवर्ड्स (१७०३-१७५८) यानें ''ट्रीटाइज कन्सरनिंग दि रिलिजिअस अफेक्शन्स'', 'ऑन दि फ्रीडम ऑफ दि मिल'' व ''ट्रीटाइज ऑफ ओरिजिनल सिन्'' हे तीन ग्रंथ लिहिले. त्यांत त्याच्या तर्कशक्तीचा विलक्षण प्रभाव दिसून येतो.

धर्माचें वर्चस्व कमी करणा-या व समाजाची मनोवृत्ति लौकिक व्यवहाराकडे लावणा-या या चळवळीचा पुढाकार प्रसिद्ध बेन्जामिन फ्रँक्लीन (१७०६-१७९०) यानें घेतला. फ्रॅक्लीन हा मुद्रक होता व त्यानें केलेल्या ग्रंथप्रसारावरून त्यावेळीं लोकांमध्यें वाचनाचा कसा उपयोग होऊं लागला होता हें दिसून येतें. अमेरिकेंतील राजकीय चळवळीच्या वाढीबरोबर वकिलीचा धंदा करणारे लोक वादविवाद करण्यास व व्याख्यानें देण्यास पुढें सरसावले. त्यांत जेम्स ओटिस (१७२५-१७८३) व पॅट्रिक हेन्री (१७३६-१७९९) हे प्रख्यात वक्ते झाले व थॉमस जेफरसन (१७४३-१८२६), जेम्स मॅडिसन (१७५१-१८३६) व अलेक्झान्डर हॅमिल्टन (१७५७-१८०४) हे मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध झाले. या वक्त्यांच्या व मुत्सद्दयांच्या भाषणांनीं व लेखांनीं अमेरिकेचें या वेळचें बहुमोल राजकीय वाङ्मय बनलें गेलें. याप्रमाणें प्रथम संशोधनात्मक, नंतर धार्मिक आणि अखेर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत अतिशय महत्त्वाचें असें राजकीय वाङ्मय अमेरिकेंत निर्माण झालें.

अठराव्या शतकांतील काव्य, कादंबरी व नाटयः- फिलिप फ्रेनो (१७५२-१८३२) यानें प्रथम आपल्या ''पोएम्स'' (पद्यें), या नांवाच्या ग्रंथांत राष्ट्रीय भावना व्यक्त करणा-या कविता प्रसिद्ध केल्या. त्यानंतर जॉन ट्रंबुल (१७५०-१८३१), टिमथी ड्रवाइट (१७५२-१८१७) व जोल बार्लो (१७५४-१८९२) या तीन कवींच्या स्वदेशाभिमानपर कविता उदयास आल्या. हे कवी व त्यांच्याहून कमी बुद्धिमान असे त्यांचे अनुयायी ''हार्टफोर्ड वुइट्स'' या नांवानें प्रसिद्ध होतें. त्यांच्यामागून जोसेफ हॉफकिन्सन (१७७०-१८४२) यानें ''हेल कोलंबिया'' हें राष्ट्रीय गीत लिहिलें. मिसेस हॅस्वेल रौसन हिची ''शार्लट टेंपल'', मिसेस हॅना वेब्स्टर फॉस्टर हिची ''दि कॉग्नेटे'' व रॉयल टायलर हिची ''अल्जेरियन कॅप्टिव्ह'' अशा कादंब-या जरी प्रसिद्ध झाल्या होत्या तरी चार्लस ब्रॉकडेन ब्राऊन (१७७१-१८१०) यासच आद्य कादंबरीकार म्हणून अग्रपूजेचा मान दिला पाहिजे. त्यानें एकंदर सहा कादंब-या लिहिल्या असून त्यांत अमेरिकेच्या त्या वेळच्या परिस्थितीचें वर्णन आहे. नाटयलेखनास प्रथम थॉमस ग्रॉडफ्रे (१७३६-१७६३)यानें 'दि प्रिन्स ऑफ पार्थिआ'' या नांवाचें शोकपर्यवसायी नाटक लिहून प्रारंभ केला. तथापि विल्यम डनलॉप (१७६६-१८३९) यास अमेरिकेचा प्रमुख नाटककार म्हणून मान देण्यांत येतो. साधारण इतक्या बेताचेंच वाङ्मय अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत निर्माण झालें.

एकोणिसाव्या शतकांतील वाङ्मयः- एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वभागांत प्रामुख्यानें गणना करण्यासारखे तीन ग्रंथकार झाले. एक वॉशिंग्टन आयर्व्हिंग (१७८५-१८५९), दुसरा जेम्स फेनिमोर कूपर (१७८९-१८५१) व तिसरा विल्यम कलेन वायरंट आयर्व्हिंग हा अमेरिकेंत कायमचा राहाणारा नसून परदेशांत प्रवास करणारा होता. त्यानें आयुष्याचे अखेरचे दिवस आपल्या देशांत घालविले, परंतु ग्रंथकर्तृत्वाची कीर्ति परदेशांतच संपादन केली. त्यानें आपल्या वयाच्या छत्तिसाव्या वर्षी 'स्केचेस' हा नामांकित ग्रंथ लिहून आपल्या स्वतःस वाङ्मयक्षेत्रांत कायमचें स्थान प्राप्त करून घेतले. भावनाप्राधान्य व सफाईदार भाषाशैली हे दोन गुण त्याच्या लेखनांत होते. याबद्दल त्याची त्यास खात्री वाटूं लागली. इतर ग्रंथांबरोबर त्यानें गोल्डस्मिथ व वॉशिंग्टन यांची चरित्रें लिहून प्रसिद्ध केलीं. त्याच्या ग्रंथाचा चांगुलपणा त्यांतील मजकुरापेक्षां त्या मजकुराच्या मांडणीवर विशेष अवलंबून आहे. त्यानें आपली लिहिण्याची धाटणी गोल्डस्मिथपासून घेतली असल्यामुळें ती फारच मोहक आहे व त्यास भावना व विनोद यांची जोड मिळाल्यामुळें त्याचें ग्रंथ लोकप्रिय झाले आहेत.

तीस वर्षांचें वय होईपर्यंत कूपरनें वाङ्मयलेखनास सुरवात केली नाहीं व त्याची सुप्रसिद्ध कादंबरी 'दि स्पाय' हीहि केवळ आकस्मिक रीतीनें लिहिण्यांत आली. त्यानें एकदां वाङ्मयलेखनाचें कार्य हातीं घेतल्यावर तें धडाक्यानें पुढें चालूं ठेवलें. त्याच्या ग्रंथांत एक प्रकारचा भारदस्तपणा, चैतन्य व ओजस्विता दृष्टीस पडतात. तो आपल्या ग्रंथांसाठीं अरण्यांतील किंवा दर्यावरील आपल्या परिचित असलेल्या आयुष्यक्रमाचा विषय पसंत करी. कधीं कधीं देशाभिमानानें प्रेरित होऊन राज्यक्रांतीच्या युद्धांतील एखाद्या प्रसंगाचा आधारहि तो आपल्या ग्रंथास घेत असे. अशा रीतीनें त्याच्या ग्रंथांतील विषयाचा त्याच्या राष्ट्राशीं निकट संबंध असल्यामुळें इतर अमेरिकन ग्रंथकारांपेक्षां त्याला राष्ट्रीय ग्रंथकार म्हणणें अधिक शोभतें.

वरील दोन ग्रंथकारांप्रमाणें ब्रायंट यासहि बेताचेंच शिक्षण मिळालें होतें. परंतु त्याच्या अपरिपक्व वयांतच त्याच्या बुद्धीची परिपक्वता दिसून आली. त्याची काव्यरचनापद्धति अठराव्या शतकांतील काव्यरचनापद्धतीच्या नमुन्यावर बनली असल्यामुळें जरी पुढें त्याचा वर्डस्वर्थच्या अधिक प्रगल्भ अशा काव्यरचनाकल्पनेशीं परिचय झाला तरी त्याच्या मूळच्या कल्पनेंत बदल झाला नाहीं. वर्तमानपत्रकाराचा धंदा चालवीत व सार्वजनिक कामांत भाग घेत असतांहि त्याच्या मनांतून काव्यरचनेची कल्पना दूर झाली नाहीं. त्यानें पुष्कळ कविता लिहिली आहे. त्याची कविता सृष्टिसौंदर्याच्या वर्णनानें ओतप्रोत भरलेली असून तें सौन्दर्यहि अमेरिकेचें विशिष्ट सौन्दर्य आहे. याप्रमाणें अमेरिकेच्या कल्पनाप्रधान वाङ्मयास वरील तीन लेखकांच्या ग्रंथांपासून सुरवात झाली.

आयर्व्हिंग, कूपर व ब्रायंट हे जरी अमेरिकेंतील प्रारंभींचे सुप्रसिद्ध ग्रंथकार होऊन गेले तरी त्यांच्यापासून वाङ्मयाची एखादी परंपरा प्रस्थापित झाली नाहीं. नियतकालिकांचा बराच मोठा भरणा हें एकोणिसाव्या शतकाच्या मध्य काळच्या वाङ्मयाचें विशेष लक्षण होतें. न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया हीं पुस्तकें मिळण्याचीं ठिकाणें होऊन तेथें अनेक छापखाने सुरू झाले व ब-याचशा जुन्या ग्रंथांच्या पुनरावृत्त्या निघूं लागल्या.  विशेषेंकरून फिलाडेल्फिया हें नियतकांलिकरितां फार प्रसिद्ध होतें. त्यांत गोडेच्या ग्रेहॅमच्या नियतकालिकांचा पुढें बराच मोठा प्रसार झाला. १८३३ सालीं न्यूयॉर्कमध्यें निकरबॉकर नांवाच्या नियतकालिकांचा उदय झाला तेव्हांपासून पुढें त्याची बरीच भरभराट झाली. दक्षिण अमेरिकेंत 'दि सदर्न लिटररी मेसेंजर' या नांवाचें नियतकालिक प्रसिद्धीस आलें. इंग्लंडच्या १८ व १९ साव्या शतकांतील वाङ्मयांत जो फरक झाला तोच अमेरिकेच्या वाङ्मयात दिसून येतो. अमेरिकेच्या एकोणिसाव्या शतकांतील कवितेंत कीट्स, शेले, कोलरिज यांची अद्भूतरसात्मक काव्यपद्धति व गद्यांत डिझरायली, बुलवर व डिकन्स यांची लेखनपद्धति दृष्टीस पडते. त्याचप्रमाणें त्या काळच्या अमेरिकन कवयित्रीच्या कवितेंतहि मिसेस हेमन्स व मिसेस ब्राउनिंगची काव्यपद्धति प्रतिबिंबित झालेलीं आहे.

एडगर अॅलन पो (१८०९-१८४९) हा फार लहानपणीं कविता सुरू करू लागला. सन १८३५ सालीं 'दि सदर्न लिटररी मेसेंजर' याचा संपादक या नात्यानें गद्यलेखनांत त्यानें तत्कालीन अमेरिकन गद्यलेखकांत अग्रस्थान मिळविलें. तो प्रथम एखादी गूढ गोष्ट नमूद करी व नंतर, वेडगळ समजुतीचें आश्चर्य वाटूं लागल्यानंतर खरें शास्त्रीय ज्ञान उत्पन्न होतें याप्रमाणें किंवा अज्ञात गोष्टीचा ज्ञान होण्यास तर्कपद्धतीचा उपयोग करावा लागतो, याप्रमाणें ती गूढ गोष्ट उकलण्याचा प्रयत्न करीत असे. अशा गोष्टी लिहिल्यामुळें त्याची कीर्ति अमेरिकाखंडभर पसरली. त्याला कूपरप्रमाणें मानवी स्वभावाचें संपूर्ण ज्ञान असल्यामुळें व आपल्या कथानकाचा विस्तार कसा करावा ही कला पूर्णपणें अवगत असल्यामुळें त्याची इतकी सार्वत्रिक प्रसिद्धी झाली. यावेळीं निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या ग्रंथकारांनीं ग्रंथलेखनाचें कार्य चालूं ठेविलें होतें परंतु त्यांत लॉगफेलो, हॅथोर्न व एमर्सन हे ग्रंथकार उदयास येईपर्यंत नांव घेण्यासारखें कोणी झालें नाहीं.

वरील तीन लेखकांत हेन्री वॅड्स्वर्थ-लाँगफेलो (१८०७-१८८२) हा अमेरिकेचा खरा राष्ट्रीय ग्रंथकार होता. अमेरिकन लोकांस राष्ट्रीय वाङ्मय पाहिजे हें जाणून त्यानें आपल्या ग्रंथांस तसेच विषय पसंत केले. ज्याप्रमाणें कूपरचे ग्रंथ गद्यांत राष्ट्रीय स्वरूपाचे होते त्याचप्रमाणें लाँगफेलोचे ग्रंथ पद्यांत त्यांचे प्रतियोगी होते. ''हिआवाथा'' नांवाच्या काव्यांत त्यानें आपल्या काव्यमय कल्पनांनीं व रसभरित वाणीनें मूळच्या 'इंडियन' रहिवाशांचे आयुष्यक्रम वर्णिले आहेत. त्याचप्रमाणें ''ईव्हान्जेलाईन'', ''दि कोर्टशिप ऑफ माइल्स स्टँडिश'' व ''दि न्यू इंग्लंड ट्रॅजेडीज'' या काव्यांत त्यानें वसाहतींतील आयुष्यक्रमाचें वर्णन केलें आहे. याशिवाय त्यानें दक्षिण व उत्तर यूरोपांतील देशांच्या काव्यग्रंथाचें भाषांतर केलें आहे. डांटेच्या ''डिव्हाईन कॉमेडी'' या महाकाव्याचें भाषांतर करण्याचें श्रेयहि त्याला आहे. त्याच्यांत आयर्व्हिंग व ब्रायंट यांच्या स्वभावाचा शांतपणा असून कलेचा अंश मात्र त्या लेखकांपेक्षां अधिक प्रमाणांत आहे.

हॅथोर्न हा फार गहन विचाराचा ग्रंथकार होता. त्यानें एकान्तांत राहून सफाईदार भाषाशैली संपादन केली आणि कलेचा अंशहि त्याच्या ठिकाणीं ब-याच मोठया प्रमाणांत होता. त्यानें आपल्या ग्रंथांत प्युरिटन लोकांच्या वेळच्या आख्यायिका ग्रंथित केल्या आहेत. त्याचा विशिष्ट गुण म्हटला म्हणजे तो आपल्या आख्यायिकांत नैतिक तत्त्वें प्रतिपादन करतो व अद्भुत स्वरूपाच्या गोष्टींत पारमार्थिक विचारांचें विवेचन करतो.

केवल कल्पनेंत वावरणा-या ग्रंथकारांपेक्षां एमर्सनचा तत्कालिन आयुष्यक्रमाशीं विशेष निकटचा परिचय होता. त्याजमध्यें अतिशय श्रेष्ठ प्रकारचे गुण एकवटले होते. अशा रीतीनें श्रेष्ठपणांत तो जरी समकालीन लोकांच्या फार पुढें गेला होता तरी त्यानें तो श्रेष्ठपणा क्रांतिकारक उपायांनीं प्राप्त करून घेतला नव्हता. मनाचा शांतपणा हा त्याचा विशिष्ट गुण होता. सभोंवार कितीहि खळबळ चालू असली तरी त्याच्या मनाची शांति ढळत नसे. स्वतःची व मानवजातीची उन्नति करण्यांत व ईश्वरचिंतनांत जें आयुष्य तो घालवी त्यांत ठरविलेलीं नैतिक व पारमार्थिक तत्त्वें त्यानें आपल्या 'एसेज' नामक निबंधाच्या पुस्तकांत नमूद करून ठेवलीं आहेत. त्याच्या ग्रंथांच्या वाचनानें वाचकांचीं मनें विकसित होतात. त्याच्या काव्यांतील विषय सर्वसाधारण असून त्यांतील विचार शुद्ध व तात्त्विक स्वरूपाचे व ऐहिक विषयापासून अलिप्त असे आहेत.

यानंतर जॉन ग्रीनलीफ व्हिटीर (१८०७-१८९२), ऑलिव्हर वेन्डेल होम्स (१८०९-९४) व जेम्स रसेल लवेल (१८१९-१८९१) या तीन ग्रंथकारांखेरीज न्यू इंग्लंडमध्यें नांव घेण्यासारखे कोणी ग्रंथकार उरले नाहींत असें म्हणावयास हरकत नाहीं.

या तिन्ही ग्रंथकारांत एमर्सन, हॅथोर्न किंवा लाँगफेलो यांपैकीं एकाच्याहि तोडीचा ग्रंथकार नव्हता. लवेल विद्वान होता, स्वदेशभक्त होता, उत्कृष्ट गद्यपद्याचा लेखक होता, आणि त्याची नीतीवर भिस्त असल्यामुळें त्याचे विचारहि उदात्त स्वरूपाचे होते. व्हिटीर हा धार्मिक वृत्तीचा होता. व कवितेंत शेतांतील शेतक-यांचा व सामान्य लोकांचा आयुष्यक्रम उत्तम रीतीनें रेखाटणारा होता. होम्स हा नागरिक, विनोदी व उत्तम प्रासंगिक कविता रचणारा होता.

प्रत्यक्षातीतवादः- प्रत्यक्षातीत वादाच्या वाङ्मयास एमर्सनपासून सुरवात झाली. त्यानें सदर वादाच्या प्रसारांकरितां 'दि डायल' हें नियतकालिक काढून त्याच्या द्वारें आपला मित्र हेन्री डेव्हिड थोरो व त्याचा सहचर विल्यम एलरी चॅनिंग व अॅमॉस ब्रॉन्सन अल्कॉट यांची समाजास ओळख करून दिली. ''दि डायल'' चालविण्याच्या कामीं एमर्सन यांस सरा मार्गारेट फुल्लर हिची मदत होती. सदर सरा मार्गारेट फुल्लर ही विलक्षण कतृत्वाची बाई होती. 'वूमन ऑफ दि नाइन्टीन्य सेंचरी' या तिच्या ग्रंथावरून तिची प्रसिद्धि आहे. प्रत्याक्षातील वादाचा पुरस्कार करणारांत जोन्स व्हेरी (१८१३-१८८१), खिस्टोफर पिअर्स क्रॅन्च (१८१३-१८९२) व चार्लस टिमथी ब्रुक्स (१८१३-१८८३), हे कमी होते व सिल्व्हेस्टर ज्युड (१८१३-१८५३) हा कादंबरीकार होता.

बोस्टन येथील वाङ्मयाची वाढ केवळ वरील बाबतींतच झाली असें नाहीं. इतिहास, वक्तृत्व, कादंबरी इत्यादि विषयांवरहि तेथें उच्च दर्जाचें वाङ्मय उत्पन्न झालें. गुलामगिरीच्या विरुद्ध लिहिलेली मिसेस हॅरिऐट बीचर स्टोची सुप्रसिद्ध कादंबरी ''अंकल टॉम्स केबिन'' येथेंच उदयास आली. त्याचप्रमाणें मिसेस लिडिया मराया चाइल्ड (१८०२-१८००) हिचा ''फिलोथिआ'' हा ग्रंथहि नमूद करण्यासारखा आहे. एड्विन पर्सी व्हिपल (१८१९-१८८५) व हेन्री थिओडर टकरमन (१८१३-१८७१) यांस टीकात्मक वाङ्मय उत्पन्न करण्याचें श्रेय आहे. परंतु वाङ्मयाचे उच्च ध्येय कायम ठेवण्याचें कार्य हार्वर्ड महाविद्यालयांतील टिक्नार, लाँगफेलो न लवेल यांनीं मुख्यत्वेंकरून केलें.

न्यू इंग्लंड येथील वाङ्मयाचीं विशेष लक्षणेः- न्यू इंग्लंड येथील वाङ्मय विशिष्ट गुणांनीं युक्त असल्यामुळें जरी तें अमेरिकेच्या इतर भागांहून निराळें होतें, तरी तें लोकादरास पात्र झालें. इतकेंच नव्हे तर त्याचा व दक्षिण आणि पश्चिम या बाजूंच्या वाङ्मयाचा मिलाफ होऊन जें वाङ्मय उत्पन्न झालें तेंच अखेर अमेरिकेचें प्रमाणभूत वाङ्मय झालें. जरी हें अमेरिकन वाङ्मय यूरोपच्या संसर्गापासून उत्पन्न झालें होतें, तरी त्यांतील बरेचसे लेखक यूरोपचा प्रवास केलेले होते व त्यांतील ब-याचशा कल्पना परकीयांच्या ग्रंथांतून उतरलेल्या किंवा भाषांतरित केलेल्या होत्या. आणि त्यांतील बरेचसे विषय अमेरिकेशीं अर्थाअर्थी संबंध नाहीं असे होते, तरी इतर वाङ्मयांतून निवडून काढतां येईल इतकें अमेरिकन वाङ्मयाच्या ठिकाणीं वैशिष्टय होतें. इ. स. १७८९-१८४८ या काळांतील फ्रेंच राज्यक्रांति व तदनंतरचे तिचे दुष्परिणाम यांपासून उत्पन्न होणा-या प्रक्षुब्ध मनोविकारांचा त्यांत पूर्ण अभाव आहे. अमेरिकेंत सामाजिक, राजकीय, धार्मिक किंवा वाङ्मयविषयक अशी कोणतीच क्रांति घडून आली नाहीं. त्यामुळें तेथील वाङ्मयांत मनःक्षोभ उत्पन्न करणारें किंवा शांतताभंग करणारे देखावे नजरेस पडत नाहींत. कोठें आवेश दृष्टीस पडला तर तो नीतीच्या, देशाभिमानाच्या व धर्माच्या बाबतींत दिसून येतो. अमेरिकेंतील वाङ्मयलेखकांस ज्या प्रकारच्या आयुष्यक्रमाची ओळख होती तो शुद्ध, सात्त्विक, अद्यापपर्यंत नगरवासीयांच्या कुटिलपणापासून अलिप्त असलेला आणि कायद्यास भिऊन चालणारा अशा प्रकारचा होता. त्या लेखकांपैकीं कोणीहि शोकपर्यवसायी नाटकें किंवा शृंगारिक कविता किंवा विकारविलसित कादंब-या लिहिल्या नाहींत. इतकें शुद्ध व सोवळें वाङ्मय अन्यत्र कोठेंच सांपडणार नाहीं.

अलीकडील लेखकः- बोस्टन येथें वाङ्मयाची परंपरा थॉमस बेली आल्ड्रिख (१८३६-१९०७) यानें चालविली. त्यानें नाटयविषयक व वीणाकाव्यपर असे दोन प्रकारचे ग्रंथ लिहिले. त्यांत नाटयविषयक ग्रंथ प्रयोगाच्या दृष्टीने लिहिण्यामुळें वीणाकाव्यलेखक म्हणूनच त्याची विशेष ख्याति आहे. गद्य लेखनांतहि तो निष्णात होता. त्यानें कादंब-या, प्रवासवर्णनें व गोष्टी चांगल्या व विनोदी भाषेंत लिहिल्या आहेत. न्यूयॉर्क येथें एडमंड क्लॅरेन्स स्टेडमन (१८३३-१९०४) हा लेखक म्हणून प्रसिद्धीस आला. तो कवि व टीकाकार होता. त्याच्याबरोबर त्याचा स्नेही रिचर्ड हेन्री स्टोडार्ड (१८२५-१९०३) याचाहि लेखकांच्या यादींत उल्लेख केला पाहिजे. न्यूयॉर्क येथील शेवटचा सुप्रसिद्ध लेखक म्हटला म्हणजे रिचर्ड वॅटसन गिल्डर (जन्म १८४४) हा होय. अमेरिकेच्या अन्य भागांतूनहि निरनिराळे लेखक उदयास आले. त्यांत चार्लस गॉड फ्रे लीलँड (१८२४-१९०३) यानें निरनिराळ्या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. मॅसॅच्युसेटस येथें विल्यम बेटेमोर स्टोरी (१८१९-१८९५) यानें आपल्या ग्रंथलेखनानें नांव मिळविलें. दक्षिणभागांतूनहि कांही लेखक पुढें आले. त्यांत सिडने लॅनिअर (१८४२-१८८१) याचा उल्लेख केला पाहिजे. त्याच्या लिहिण्यांत कल्पकता व कवि प्रतिभा दिसून येते. पश्चिम भागांत फ्रॅन्सिस ब्रेट हार्टे (१८३९-१९०२) हा विनोदी कवि असून खाणींतील आयुष्यक्रम खुबीदार रीतीनें वर्णन करणा-या अनेक कादंब-या व गोष्टी लिहिण्याबद्दल त्याची ख्याति होती. त्याचप्रमाणें जॉन हे (१८३८-१९०५) हाहि गद्य व पद्य लेखक म्हणून प्रसिद्धीस आला. अशा रीतीनें अमेरिकेच्या सर्व भागांत कमी अधिक योग्यतेचे गद्य व पद्य लिहिणारे अनेक लेखक होऊन गेले.

आधुनिक कादंब-याः- वाङ्मयविषयक चळवळ कादंबरीच्या क्षेत्रांत विशेष जोराची आहे. अद्भुतरसात्मक कादंब-या जाऊन त्यांच्या जागीं प्रचलित सामाजिक चालीरीती व मनोविकारांवर यांचें यथावत्त् वर्णन करणा-या कादंब-यांचा प्रसार होत आहे. या कादंबरी-क्षेत्रांतील क्रांतीचा अध्वर्यु विल्यम डीन हॉवेल्स (जन्म १८३७) हा होय. तो विद्वान निबंधकार, प्रवासाचीं वर्णनें लिहिणारा, काव्यें व नाटकें रचणारा व अनेक प्रकारच्या ग्रंथांचा कर्ता तर आहेच परंतु त्याचें मुख्य वाङ्मयकार्य म्हटलें म्हणजे त्यानें ज्या अनेक म्हणजे जवळ जवळ वर्षास एक याप्रमाणें कादंब-या लिहिल्या तें होय. त्यानें कादंब-या लिहिल्या इतकेंच नव्हें तर रशिया, इटली, स्पेन इत्यादि देशांतील कादंब-या कशा प्रकारच्या असतात हें आपल्या देशबांधवांस समजावून दिलें. असें करण्यांत त्याचा उद्देश असा होता कीं, अमेरिकेचें कादंबरी-वाङ्मय इतर देशाच्या कादंबरीवाङ्मयाच्या तोडीचें असावें. त्याच्यानंतर हेन्री जेम्स (जन्म १८४३) हा टीकाकार, निबंधकार वगैरे म्हणून नांवारूपास आला. परंतु त्याच्या अनेक कादंब-यांमुळेंच त्याची जिकडे तिकडे कीर्ति झाली. त्याची लेखनपद्धति लोकादरास पात्र झाली नाहीं. परंतु कांहीं बाबतींत तो हॉवेल्सपेक्षांहि अधिक बुद्धिवान दिसून येतो. यानंतर प्रसिद्धीस आलेला फ्रॅन्सिस मॅरिअन क्रॉफर्ड (जन्म १८५४) हा तिसरा कादंबरीकार होय. त्याला वृत्तान्तनिरूपणीची कला उत्तम साधलेली आहे. याशिवाय निरनिराळ्या प्रांतांतून प्रांतिक रीतिरिवाजांच्या कल्पना देणा-या कादंब-या निर्माण झाल्या. अशा रीतीनें न्यू इंग्लंड, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील संस्थानें या सर्व ठिकाणीं कादंबरीचें प्रांतिक स्वरूप दृष्टीस पडतें.

निबंधकारः- थॉमस वेन्टवर्थ हिगिन्सन (ज. १८२३) यानें निबंधलेखनाचा प्रघात विशेष प्रमुखपणानें सुरू केला. ''अॅटलान्टिक एसेज'' हा त्याचा सुप्रसिद्ध ग्रंथ होय. त्या ग्रंथावरून तत्कालीन परिस्थितीची वा वाङ्मयाची विपुल व मनोरंजक माहिती जितकी मिळते तितकी दुस-या ग्रंथांतून मिळत नाहीं. चार्लस डड्ले वार्नर (१८२९-१९००) याच्या ठिकाणीं सौम्य विनोद लेखनविषयक पात्रता उत्कृष्ट प्रकारची असल्यामुळें त्याची साहजिक प्रवृत्ति सामाजिक निबंध लिहिण्याकडे झाली. या ग्रंथकारांच्या मागून एडवर्ड एलरेट हेल (जन्म १८२२) व जॉन बरोज हे दोघे निबंधकार प्रसिद्धीस आले.

विनोदी वाङ्मयः- अमेरिकेंतील विनोदी वाङ्मय बहुधा निबंधाच्या स्वरूपाचें आहे. कधीं कधीं तें गोष्टीच्या रूपानें प्रगट होतें तर कधीं कधीं आयुष्यांतील एखाद्या प्रसंगाच्या वर्णनाच्या रूपानें प्रगट होतें. आपआपसांतील युद्धाच्या पूर्वी सेबा स्मिथ (१७९२-१८६८), ऑगस्टस बाल्डि्वन लॉगस्ट्रीट विल्यम टपन थाम्पसन (१८१२-१८८२), जोसेफ जी. बाल्डि्वन (१८१५-१८६४) व बेंजामिन पेनहालो शिलाबेर (१८१४-१८९०) इत्यादि लेखकांनीं विनोदी वाङ्मय निर्माण केलें. तेंच युद्धाच्या काळांत रॉबर्ट हेनरी नेवेल (१८३६-१९०१) व डेव्हिड रॉस लॉक (१८३३-१८८८) यानीं केलें. जॉन गॉडफ्रे सॅक्स (१८१६-१८८७) या कवीनें पद्यांत विनोदी वाङ्मय प्रसिद्ध केलें. यानंतर सर्वांत श्रेष्ठ व जगप्रसिद्ध आणि ''मार्कट्वेन'' या टोपण नांवानें प्रसिद्ध असलेला सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमन्स (जन्म १८३५) हा लेखक उदयास आला व त्यानें आपल्या विनोदी लेखांनीं आपलें नांव अजरामर केलें.

इतिहासः- या काळांतील इतिहासलेखनाचें कार्य प्रथम फ्रॅन्सिस पार्कमन (१८२३-१८६३) यानें केलें. नंतर जेम्स फोर्ड -होडचा ''हिस्टरी ऑफ दि युनायटेड स्टेट्स'' हा ग्रंथ लोकादरास पात्र झाला. जॉन फिस्क्वे (१८४२-१९०१) याच्या अनेक ऐतिहासिक लेखांची विद्वत्तेबद्दल व लेखनकौशल्याबद्दल जिकडे तिकडे ख्याति झाली. यानंतर थिओडोर रूझवेल्ट (पहा) याचा 'दि विकिंग ऑफ दि बेस्ट'' हा ग्रंथ व अनेक चरित्रपर लेख यांचा निर्देश केला पाहिजे.

अर्वाचीन काळः- स. १९१० नंतर अमेरिकन कादंबरी वाङ्मय वस्तुस्थितिदर्शना (रिअॅलिस्टिक)त्मक पद्धतीकडे मुख्यतः वळलें. या अलीकडील कादंब-यांत नायकनायिकेचें सबंध चरित्र दिलेलें असतें. मार्क ट्वेन (मृ. १९१०), हेन्री जेम्स (मृ. १९१६), आणि डब्ल्यू डी. हॉवेल्स (मृ. १९२०) यांच्याहून श्रेष्ठ प्रतीचा कादंबरीलेखक किंवा गोष्टीलेखक अलीकडे कोणी निघाला नाहीं. तथापि नवे महत्त्वाचें लेखक पुढें येत आहेत. बूथ टारकिंग्टन यानें स. १९१४ पूर्वी लिहिलेल्या कादंब-यांपेक्षां त्यानंतर लिहिलेल्या कादंब-या अधिक सरस आहेत. त्याच्या कादंब-यांचे, शहरांविषयींच्या व तरुणांविषयींच्या असे दोन वर्ग आहेत. दि टर्माईल (१९१५) आणि ''दि मॅग्निफिसंट अँबरसन्स'' (१९१८) या दोन कादंब-यांत अमेरिकन शहरांतील राहणीचें; आणि ''पेनरॉड'' (१९१५) मध्यें अमेरिकन मुलाचें, सेव्हन्टीन (१९१६) मध्यें अमेरिकन तरुणाचें व ''अॅलिस'' ''अॅडॅम्स'' (१९२१) मध्यें अमेरिकन तरुण मुलीचें चित्र त्यानें उत्तम रेखाटलें आहे. डोरोथी कॅनफील्डनें (जन्म १८७९) ''दि ब्रिमिंग कप'' (१९२१) मध्यें स्त्रीच्या स्वभावाचें व तिच्या वैवाहिक सुखाच्या आधारांचें विवेचन सुरेख केलें आहे. मिसेस मेरी एस्. वॅटसनें (जन्म १८६८) अमेरिकन जीवनक्रमाविषयक अनेक कादंब-या लिहिल्या असून त्यांत सर्वोत्तम ''राईस ऑफ जेनी कुशिंग'' (१९१४) ही आहे. याशिवाय जोसेफ हेर्गेशिमरच्या (जन्म १८८०) ''दि ब्लॅक पेनीज'' (१९१७), व जाव्हा हेड (१९१९) ह्या; अॅन डग्लस सेजविकच्या (ज. १८७३) ''दि एन्कौंटर'' (१९१४), ''दि थर्ड वुईन्डो'' (१९२०), ''ऑटम क्रॉकुसेस'' (१९१९) वगैरे कादंब-या प्रसिद्ध आहेत.

नाटकेः- अमेरिकन नाट्यवाङ्मय महत्त्वाचें नाहीं. एकहि नाटक सार्वत्रिक मान्यता पावलेलें असें आजपर्यंत अमेरिकेंत लिहिलें गेलें नाहीं. तथापि ऑगस्टस थॉमसचें ''दि बुइचिंग अवर'' (१९०८): बूथ हार्किगटनचें ''क्लेरेन्स' (१९१९); जॉर्ज एम्. कोहनचे ''दि टॅव्हर्न,' लुई के. अॅन्स्पेचरचें ''दि अनचेसन्ड वुमन'' (१९१५); जॉर्ज अॅडेचें ''कॉलेज वुइडो,'' वगैरे नाटकें ब-यापैकीं आहेत.

काव्यः- जागतिक युद्धाचा काव्यवाङ्मयावर मोठा परिणाम झाला. काव्याकडे जनतेचें वेधलेलें लक्ष व पुढें येणारे पुष्कळसे नवेनवे कवी हा गेल्या दहा वर्षांतला विशेष चमत्कार होय. तथापि या नव्या कवींत पो, इमर्सन किंवा व्हिटमन यांच्या तोडीचा एकहि नाहीं. नव्या कवींतील प्रमुख एडविन आरलिंगटन रॉबिन्सन हा असून त्याची ''दि मॅन अगेन्स्ट दी स्काय'' (१९१६) आणि ''दि थ्री टॅव्हर्नस'' हीं काव्यें विचारगांभीर्य व भाषासौंदर्य यांनीं युक्त आहे. वॅचेल लिंडसे हा मध्ययुगांतील भाटकवीचा (मिन्स्ट्रल) आधुनिक नमुना आहे. त्यानें स्वकृतकाव्यगायनावर उदरनिर्वाह चालवींत शेंकडों मैल पायीं प्रवास केला. त्याच्या स्फुट कवितांचे चार भागः जनरल विल्य बूथ एन्टर्स हेव्हन (१९१३) ''दि काँगो'' (१९१४), ''दि चायनीज नाइटिंगेल'' (१९१७) व ''दि गोल्डन व्हेल्स ऑफ कॅलिफोर्निया'' हीं काव्यें मधुर व कल्पनाप्रचुर आहेत. याशिवाय रॉबर्ट फ्रॅस्टचें ''नार्थ ऑफ बोस्टन'' (१९१४), ''अॅमी लोवेलचें होवर्ड ब्लेडस अँड पॉपी सीड'' (१९१४), विल्यम बेनेटचें ''मर्चंट्स फ्रॅय कॅथे'' (१९१८), वगैरे काव्यें ब-यापैकीं आहेत.

संकीर्ण वाङ्ममयः- इतिहासशाखेंत जेम्स फोर्ड-होडसकृत ''हिस्ट्री ऑफ दि युनायटेड स्टेटस'' या ग्रंथाचा पुढीलभाग ही महत्त्वाची भर होय. चरित्रपर ग्रंथांत ''अल्बर्ट बिजेलो'' पेनकृत मार्क ट्वेनचें चरित्र (१९१२); आत्मचरित्रपर ग्रंथांत दि एज्युकेशन ऑफ हेन्री अॅडॅम्स (१९१८) आणि दि अमेरिकनायझेशन ऑफ एडवर्ड बॉक (१९२०); राजकारणपर ग्रंथांत वुइड्रो विल्सन प्रेसिडेंट (१९१३-१९२१) याचीं भाषणें व सरकारी कागदपत्र; जागतिक युद्धविषयक ग्रंथांत जेम्स डब्ल्यू, गेरार्डचीं ''माया फोर इयर्स इन ''जर्मनी'' (१९१७) व ''फेस टु फेस वुइथ केसरिझम'' (१९१८); अॅडमिरल विल्यम एस्. सिम्सचें ''दि व्हिक्टरी अॅट सी; बँड व्हिटलॉकचें ''बेल्जम ए पर्सनल नॅरेटिव्ह;'' वगैरे पुस्तकें महत्त्वाची आहेत.

अ मे रि कें ती ल  का य दे प द्ध ति.- अमेरिकेमध्यें शासननियमन करण्यासंबंधानें सर्वांत उच्च अधिकार अमेरिकेंतील सर्व लोकांचा आहे. अमेरिकेच्या शासनविषयक कल्पनांमध्यें कांहीं गोष्टीं मुख्यत्त्वानें येतात. आपणाकडे जो अधिकार स्थानिक सरकारास शासनकेंद्रानें दिला तेवढाच असतो व दिलेल्या अधिकाराचा अतिक्रम करतां येत नाहीं. अमेरिकेंत संस्थानांनीं जो अधिकार राष्ट्रीय सरकारास दिला तेवढाच राष्ट्राचा अधिकार. जो अधिकार मध्यवर्ती सरकारास दिला नाहीं तो सर्व अधिकार अर्थांत स्थानिक सरकारकडे असतो.

नगरें व ज्ञानपदें जो अधिकार संस्थानास देतील तो अधिकार संस्थानांचा व जो अधिकार सर्व संस्थानांतील लोक राष्ट्रास देतील तोच अधिकार राष्ट्रीय सरकारचा. या कायद्याच्या तत्त्वाचे दोन परिणाम झाले आहेत. अनेक जातींचे लोक निरनिराळ्या संस्थानांत असल्यामुळें आपापल्या चालीरीतींप्रमाणें त्यांस कायदे करतां आले व मुलकी न्यायनिवाड्याचा बोजा बहुतेक अंशीं संस्थानांवर पडल्यामुळें सर्व राष्ट्राला ''कामन लॉ'' उर्फ परंपरागत धर्मशास्त्राची आवश्यकता कमी झाली.

आतां सर्व राष्ट्राचें जें सुप्रीमकोर्ट उर्फ वरिष्ठ न्यायासन आहे तेथें निवाडा करतांना कान्स्टियूशनच्या बाहेर जातां येत नाहीं व त्यावरील निवाडयांच्या आणि कांग्रेसनिर्मित कायद्याच्या मदतीला ''कॉमन लॉ'' घेतां येत नाहीं. कां कीं मुद्दाम बनविलेले कायदे सोडून दिले तर सर्व अमेरिके (संयुक्त संस्थानें) सुद्धां लागू पडणारें धर्मशास्त्र अमेरिकेंत नाहींच. सर्व अमेरिकेसंबंधानें लागू पडणारें कायदा म्हटला म्हणजे प्रथमतः ''कान्स्टिटयूशन'' व नंतर त्या कान्स्टिटयूशनचा अर्थ लावून तयार केलेले सुप्रीम (राष्ट्रीय वरिष्ठ) कोर्टाचे नियम आणि त्याच्या खालोखाल अधिकाराचे म्हटले म्हणजे सर्व राष्ट्राची शासनसभा उर्फ कांग्रेस आहे तिचे नियम होत. प्रत्येक संस्थानच्या शासननियमांचा समुच्चय येणेंप्रमाणें आहेः- प्रथमतः ''कान्स्टिटयूशन'' असते. ही कान्स्टिटयूशन त्या संस्थानाच्या शासनासंबंधानें उच्च नियम होत. जर या कान्स्टिटयूशनचे नियम राष्ट्रीय कान्स्टिटयूशनच्या नियमांच्या आड आले तर मात्र चालावयाचे नाहींत. बाकी संस्थानांतील सर्व बाबींमध्यें मुख्याधार त्या संस्थानाची कान्स्टिटयूशन होय.

प्रतिनिधिसभेस  कान्स्टिटयूशनच्या नियमांचा अतिक्रम करता येत नाहीं. जर काहीं कायदा करतांना अतिक्रम झाला असला तर संस्थानाच्या न्यायाधिशांनीं तो कायदा रद्द ठरवावा. हा नियम जसा संस्थानांनां लागू आहे त्याप्रमाणेंच सर्व संस्थानयुक्त जें राष्ट्र त्याला लागू आहे. सर्व राष्ट्राला लागू असें धर्मशास्त्र जरी नाहीं तरी प्रत्येक संस्थानाला लागू असें परंपरागत धर्मशास्त्र आहेच.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .