विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सरहिंद- पंजाब, पतियाळा संस्थान, फत्तेगड तहशिलीमधील एक गांव. हें गांव मोंगल साम्राज्यांतील भरभराटीच्या गांवापैकीं एक होतें. सन १७०४ मध्यें बाजीदखानानें गुरुगोविंदच्या फत्तेसिंग व झोखालसिंग या दोन मुलांस येथें भिंतींत चिणून मारिलें, म्हणून तेव्हांपासून शीख लोक या गांवाला अपवित्र मानतात.