प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन    
 
सर्व्हिया- आज या माजी यूरोपियन राष्ट्राचा समावेश सर्ब, क्रोट व स्लोव्हेन संस्थान मिळून बनलेल्या (१९१८) जुगोस्लाव्हियांत होतो. म्हणजे सर्व्हिया हें सध्यां स्वतंत्र राष्ट्र नाहीं, तर एका राष्ट्रसमुच्चयाचा एक घटक आहे. जुगोस्लाव्हिया या प्रदेशाची माहिती स्वतंत्र लेखांत (ज्ञा. को. वि. १४) दिलीच आहे. येथें सर्व्हियाचा स्वतंत्र राष्ट्र असतांना बनलेला इतिहास थोडक्यांत दिला आहे.

जुगोस्लाव्हिायांत समाविष्ट झालेल्या सर्व्हियाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडले आहेत. उत्तर सर्व्हियाचें क्षेत्रफळ १९२८६ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२०) २६५५०७८ आहे; व दक्षिण सर्व्हियाचें क्षेत्रफळ १७६५१ चौरस मैल आणि लोकसंख्या (त्याच सालची) १४७४५६० आहे.

सर्व लोक हे स्लाव्ह महावंशांतील होत. ते पूर्वी व्हिश्चुला व नीस्टर या नद्यांच्या उगमाजवळील गॅलिशिया नांवाच्या देशांत रहात होते. तेथून ते बाल्कन द्वीपकल्पांत आले. बाल्कन राष्ट्र या नात्यानें त्यांच्या इतिहासाला इ. सनाच्या ७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरवात होते. बाल्कन द्वीपकल्पांत रहावयास आल्यानंतर सर्व्हियाचा सुमारें ५०० वर्षांचा इतिहास म्हटला म्हणजे निरनिराळे झुपे (लोकसमूह) एक करून एक मध्यवर्ती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न हा होय. असे प्रयत्न कांहीं काळपर्यंत यशस्वी होत. परंतु पुन्हां मध्यवर्ती सत्ता जाऊन तिच्या जागीं निरनिराळें झुपे होत. निरनिराळे झुपे एक करून कांही काळ मध्यवर्ती सत्ता स्थापन करण्यांत विशस्लाव्ह घराण्यांतील राजांनां बरेंच यश आलें. झ्युपन विशस्लाव्ह हा इ. स. च्या ९ व्या शतकाच्या आरंभीं होऊन गेला. त्याचा मुलगा रॅडोस्लाव्ह व नातू प्रिसेग्रॉय यांनीं झ्युपननें सुरू केलेलें काम पुढें चालविलें. झ्यूपनचा पणतू व्हलॉसटिमिर यानें बल्गेरियाच्या हल्ल्यापासून सर्व्हियाच्या पश्चिमेकडील प्रांतांचा बचाव केला. परंतु एकीकडे बल्गेरिया व दुसरीकडे ग्रीक बादशहा बेसिल या दोघांपासूनहि सव्हियाला धोका असल्यामुळें सर्व्हियानें भिऊन ग्रीक सम्राटाचें सार्वभौमत्व स्वीकारलें. याचा परिणाम असा झाला कीं, सर्व सर्व्हियन राष्ट्रानें ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुढें बल्गेरियानें सर्व्हियास जिंकलें. परंतु त्यांतील कांहीं भाग सर्व्हियाच्या विशस्लाव्ह घराण्याच्या राजानें बल्गेरियापासून सोडवून घेतला; पण मिळविलेलें स्वातंत्र्य कायम राखण्याकरितां त्यांस बायझन्टाईन बादशहांचें वर्चस्व कबूल करावें लागलें.

प हि लें स र्व्हि य न रा ज्य.- इ. स. च्या नवव्या शतकाच्या अखेरीस झेट्टा हें सर्व लोकांच्या राजकीय सत्तेचें केंद्र झालें. झेट्टाच्या राजानें बल्गेरियन राजा सॅम्युअल याला मागें हटविलें. परंतु नंतर त्याचा पराभव होऊन सर्व्हिया सॅम्युअल बादशहाच्या ताब्यांत आला. परंतु सॅम्युअलच्या मरणानंतर सर्व्हिया हळू हळू ग्रीक सम्राटाच्या मदतीनें स्वतंत्र झाला. परंतु इ. स. १०४२ या वर्षी व्हायिस्लाव्ह नांवाच्या राजपुत्रानें ग्रीक सत्तेच्या विरुद्ध उठून कांहीं झुपे आपल्या ताब्यांत घेतले. त्याचा मुलगा बोडीन यानें बापानें आरंभिलेलें कार्य पुढें चालविलें. त्यानें ग्रीक बादशहापासून कांहीं प्रदेश जिंकून घेतला. परंतु त्याच्या मरणानंतर आपसांत भांडणें सुरू होऊन पुन्हां एक झालेल्या राष्ट्रांत दुफळी झाली व सर्वांनां ग्रीक सम्राटाचें वर्चस्व कबूल करावें लागलें.

ने मा नि च रा ज घ रा णें व स र्व्हि या चें सा म्रा ज्य.- इ. स. ११६९ या सालापासून सर्व्हियाला चांगले दिवस येऊं लागले. रास्का येथील झ्युपन स्टीफन नेमानिया यानें सर्व सर्व लोकांनां आपल्या सत्तेखालीं आणिलें. आणि जरी त्यानें राजा हें पद धारण केलें नाहीं तरी सर्व्हियन राज्याचा पाया त्यानें घातला. त्याच्यानंतर त्याच्या घराण्यांतील पुरुषांनीं सर्व्हियावर २०० वर्षें राज्य केलें. स्टीफन नेमानियाचा सर्वांत धाकटा मुलगा जो रास्त्‍को हा राज्य सोडून यति बनला. त्याला सर्व्हियन लोक एक मोठा साधु, शिक्षणाचा पुरस्कर्ता व मुत्सद्दी म्हणून मान देतात. त्याच्यानंतर नेमानिच घराण्यांतील मोठे पुरुष म्हटले म्हणजे पहिला यूरोप (१२४२-७६), त्याचा मुलगा मिल्युटिन (१२८२-१३२१) व स्टीफन द्युशन (१३३१-१३५५) हे होत. इ. स. १३४५ या वर्षी स्टीफन द्युशननें ''सर्व व ग्रीक लोकांचा बादशहा'' हें पद धारण करून आपणांस यूसकब् येथें राज्याभिषेक करविला. त्यानें सर्व्हियाच्या प्रिमेटला पॅट्रिआर्केट केलें, व एक मंडळ नेमून त्यांच्याकडून कायदे करविले. ह्या कायद्यांवरून सर्व्हिया हा सुधारणेंत यूरोपियन प्रमुख राष्ट्रांच्या बिलकुल मागें नव्हता असें दिसून येतें.

इ. स. १३५५ या वर्षी द्युशननें ग्रीक लोकांविरुद्ध नवीन युद्ध सुरू केलें. तसें करण्यांत त्याचा हेतु ग्रीक, सर्व, व बल्गर लोकांचें एक मोठें साम्राज्य स्थापून, त्या साम्राज्याच्या बळावर तुर्की सत्तेला यूरोपांतून हांकलून देणें हा होता. परंतु तो स्वारी करण्याच्या तयारींत गुंतला असतां एकाएकीं मृत्यु पावला (१३५५). त्याचा एकुलता एक मुलगा यूरोष ह्याच्या अंगीं एवढें मोठें साम्राज्य कायम ठेवून त्यावर राज्य करण्याची कर्तबगारी नव्हती. म्हणून साम्राज्याचे तुकडे होऊन लहान लहान स्वतंत्र राज्यें निर्माण झालीं. स्वतंत्र झालेल्या सुभेदारांपैकीं व्हॉकशीन यानें द्युशनेंच धोरण पुढें चालू ठेवलें. परंतु इ. स. १३७१ या वर्षी टेनेरिया येथें त्याचा पराभव होऊन तो मारला गेला. यायोगें सर्व्हियाची साम्राज्यइमारत पायापासून ढांसळून पडली. नंतर लवकरच झार यूरोष हा मरण पावला; व नेमानिच घराण्याचा अंत झाला.

तुर्क लोकांच्या स्वा-या:- पुढें यूरोष बादशहाचा नातेवाईक लाझर हा बादशहा झाला. यानें कांहीं दिवस मर्व्हियन साम्राज्याचे तुकडे होऊं दिले नाहीं. तुर्कस्तानाविरुद्ध सर्व ख्रिस्ती राष्ट्रांचा एक संघ निर्माण करण्याचा त्यानें प्रयत्न केला. हें वर्तमान ऐकून तुर्क लोकांनीं असला संघ न होऊं देण्याचा निश्चय केला. हेंच तुर्कांच्या स्वा-याचें मुख्य कारण होय. सन १३८९ या वर्षी तुर्क लोकांनीं सर्व्हियावर स्वारी करून सर्व्हियन लोकांचा कोसोव्ह येथें पूर्ण पराजय केला.

अनियंत्रित राजसत्तेचा कालः- कोसोव्होच्या लढाईनंतर इ. स. १३८९-१५५९ पर्यंत सर्व्हिया तुर्कस्तानचा मांडलीक होता. त्या कालांत सर्व्हियाचे राजे ''डेसपॉट्'' होते. यांपैकीं कांहीं राजांनीं यूरोपियन राष्ट्रांशीं जूट करून तुर्कांचें वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुलतान महंमद यानें ज्यावेळेस सर्व्हियावर स्वारी केली त्यावेळेस सर्व यूरोपियन राष्ट्रें तटस्थ राहिलीं व सर्व्हिया तुर्की अंमलाखालीं गेला. यापुढें ३४५ वर्षें सर्व्हिया हा तुर्कस्तानचा एक प्रांत होता.

स्वातंत्र्याचें युद्ध:- १९ व्या शतकाच्या आरंभी तुर्कस्तानामध्यें अंदाधुंदी माजली. आणि या अव्यवस्थेचा सर्व्हियन लोकांना फायदा घेतां आला. सर्व सर्व्हियन राष्ट्र इ. स. १८०४ मध्यें तुर्कस्तानच्या विरुद्ध उठलें. व तुर्कस्तानापासून सर्व्हिया जिंकून घेतला.

इ. स. १८०४ पासून तों १८१० पर्यंत सर्व्हियानें स्वतः राज्यकारभार पाहिला. यावेळीं सर्व्हियास रशियाचें पाठबळ होतें. परंतु इ. स. १८१२ मध्यें रशिया नेपोलियनच्या युद्धांत गुंतल्यामुळें त्याला तुर्कस्तानशीं कसाबसा तह करून घेणें भाग पडलें. त्या तहांत रशिया सर्व्हियाच्या सुरक्षिततेची तजवीज करण्यास विसरला. इकडे तुर्कस्ताननें सर्व्हियाचा पराभव करून सर्व्हियांतील महत्त्वाचीं ठाणीं काबीज केलीं व सर्व्हिया पुन्हां परतंत्र झाला. पुढें सर्व्हियन देशभत्तांनीं स्वराज्यप्रीत्यर्थ चळवळ सुरू केली. इ. स. १८१७ या वर्षी सर्व्हियास साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळालें. व इ. स. १८२९ मध्यें रशिया व तुर्कस्तान यांमध्यें आड्रिआचोपल येथें झालेल्या तहानें सर्व्हियाचें स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय पायावर स्थापन झालें.

सर्व्हिया-स्वतंत्र राष्ट्र (१८३०-१८७९):- सर्व्हियाची गादी मिलोश याला वंशपरंपरागत मिळाली. त्यानें सर्व्हियांत औद्योगिक व शिक्षणविषयक पुष्कळ सुधारणा केल्या. त्यानें सर्व्हियावर असलेला रशियाचा ताबा नाहींसा करण्याचा प्रयत्न केला. यायोगानें त्याचें रशियाशीं भांडण सुरू झालें. इकडे त्याच्या राज्य चालविण्याच्या अनियंत्रित पद्धतीनें राज्यांतील सर्व लोक त्यांच्या विरुद्ध उठले. यामुळें मिलोश याला थोडयाच दिवसांनीं राज्य सोडावें लागलें. नंतर त्याच्या वडील मुलाच्या मरणामुळें त्याचा धाकटा मुलगा मायकेल तिसरा ओब्रोनोव्हिच् हा गादीवर बसला; परंतु त्याच्याविरुद्ध बंड होऊन मायकेलला हद्दपार व्हावें लागलें. नंतर करागेरोचा धाकटा मुलगा राजा झाला. त्याच्या कारकीर्दीत देशांत शांतता राहून (सन १८४२-१८५८) संपत्ति व संस्कृति यांत बरीच प्रगति झाली. परंतु तो भ्याड व अनिश्चयी होता. राष्ट्रीय सभेनें त्यास पदच्युत करून पहिल्या ओब्रोनिव्हिच् यास गादीवर बसविलें. मिलोश हा इ. स. १८६० त वारला. त्याचा मुलगा मायकेल हा पुन्हां गादीवर बसला. त्यानें राज्यकारभारांत पुष्कळ सुधारणा केल्या व जुनी राज्यघटना काढून दुसरी एक नवी राज्यघटना निर्माण केली. मायकेलनें राष्ट्रीय सैन्य तयार करून मॉन्टेनिग्रो, ग्रीस, बल्गेरिया, अल्बेनिया यांच्या मदतीनें तुर्कस्तानविरुद्ध उठण्याची तयारी केली. इ. स. १८६७ या वर्षी त्यानें तुर्की शिबंदी सर्व्हियांतून काढावी अशी पुन्हां मागणी केली व शेवटीं सर्व्हियाची तयारी पाहून तुर्कस्ताननें तें म्हणणें कबूल केलें. यामुळें प्रिन्स मायकेल हा फार लोकप्रिय झाला. स. १८६८ या वर्षी भर रस्त्यांत त्याचा खून झाला. नंतर मायकेलच्या मुलाला गादी मिळाली. राजपुत्र मिलननें बापाचें धोरण पुढें चालविलें व तुर्कस्तानविरुद्ध इ. स. १८७६ या वर्षी लढाई सुरू केली.तींत त्याचा पराभव झाला. परंतु त्यास रशिया येऊन मिळाला. पण सॅन स्टेफानेच्या तहानें रशिया व सर्व्हिया यांत वितुष्ट आलें. कारण रशियानें सर्व्हियाच्या इच्छेविरुद्ध सर्व लोक रहात असलेला बल्गेरियाचा काहीं भाग आपल्या राज्यास जोडिला.

याचा परिणाम झाला कीं राजपुत्र मिलन यानें पिढीजाद राजधोरण सोडून देऊन तो ऑस्ट्रिया-हंगरीला जाऊन मिळाला. इ. स. १८७९ पासून तों इ. स. १८८९ पर्यंत, सर्व्हियाचा राजकीय इतिहास म्हटला म्हणजे, मिलन राजा व उदारमतपोषक लोक हे एकीकडे व रशिया आणि रॅडिकल (जहाल उदारमतवादी) हे दुसरीकडे यांमधील भांडण हें होय. बर्लिनच्या तहाप्रमाणें राज्यांत सुधारणा व तुर्की सरदारांनां त्यांच्या जमीनीबद्दल भरपाई करण्यासाठीं मिलनला जमाबंदींत कांहीं फेरफार करावे लागले पण ते लोकांनां न पटून राजाविरुद्ध कट सुरू झाले.

बल्गेरियाशीं युद्ध:- बल्गेरियाचें पूर्वरुमालियाशीं एकीकरण होण्याच्या प्रश्नावर बल्गेरिया व सर्व्हिया यांचें वितुष्ट आलें व युद्ध सुरू झालें. या युद्धांत सर्व्हियाचा पराभव झाला परंतु ऑस्ट्रिया मध्यें पडल्यामुळें लढाई थांबून, त्या दोघांमध्यें कोणालाहि कमीपणा वाटणार नाहीं असा तह झाला. स. १८८९ त मिलननें गादी सोडली. पुढें मिलनचा मुलगा अलेक्‍झांडर हा राजा झाला. याच्या वेळीं राज्यप्रतिनिधिमंडळ पुराणमतवादी, राष्ट्रीयसभा जहाल उदारमतवादी व सरकार प्रागतिक अशी स्थिति झाली होती. याचा परिणाम असा झाला कीं, राज्यांत घोटाळा होऊन राज्यकारभार जवळजवळ बंदच पडला. राजघराणें सर्व्हियांतून काढून दिलें पाहिजे असें म्हणणारा एक पक्ष निघून तो प्रबळ झाला. अशा स्थितींत अलेक्झान्डर यानें आपल्या बापास परत बोलाविलें. पण जहाज उदारमतवादी लोकांनीं राजिनामे दिले. राष्ट्रांतील लोकांनां या बेफाम राजकीय चळवळीचा वीट येऊन त्यांचीं मनें आपोआपच राजकीय चळवळीपासून निघून शेतकी व व्यापार यांकडे लागलीं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत सर्व्हियाच्या परराष्ट्रीय धोरणांत महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे रशिया-मॉन्टेनिग्रो यांच्याशीं वितुष्ट, व ऑस्टिया-हंगेरीशीं सलोखा ही होय.

अलेक्‍झान्डर राजाचें लग्न राजमातेच्या तैनातींत असलेल्या एक स्त्रीशीं झाल्यामुळें व राजा रशियाला मिळाल्यामुळें पुन्हां भयंकर लोकक्षोम उत्पन्न झाला व शेवटीं १९०३ सालीं भर राजवाडयांत राजा व राणी या दोघांचाहि खून झाला. राजवध करणा-या लोकांनीं पीटर कारागेओरगेविच् यास राजा नेमिलें व १८८९ या सालची राज्यघटना पुन्हां सुरू केली. प्रथम सर्व सत्ता मारेकरी लोकांच्या हातीं होती. हळू हळू सर्व राष्ट्रांनीं पीटर यास सर्व्हियाचा राजा म्हणून कबूल केलें. याच वर्षी सर्व्हिया व बल्गेरिया या दोन राष्ट्रांची एक सभा भरून या दोन राष्ट्रांमध्यें जकातसंघ निर्माण करण्याचा विचार होऊं लागला. तसें होणें ऑस्ट्रिया-हंगेरीच्या हितास विघातक असल्यामुळें, आस्ट्रियानें युध्द सुरू केलें. इ. स. १९०८ या वर्षी, ऑस्ट्रिया-हंगेरीनें बॉसनिया व हरझेगोव्हिना हे प्रांत खालसा करून आपल्या राज्यास जोडले व त्याच वर्षी तुर्कस्तानांत राज्यक्रांति झाली. यामुळें सर्व्हियावर मोठा आणीबाणीचा प्रसंग आला. शेवटीं युद्ध अगदीं सुरू होण्याच्या बेतांत होतें; इतक्यांत ऑस्ट्रिया हंगेरी आपणांहून प्रबल आहे हें जाणून रशियाच्या म्हणण्याप्रमाणें या तंटयाचा यूरोपियन राष्ट्रांच्या मार्फत निकाल लावून घेण्यास सर्व्हिया तयार झाला व हें युद्ध थांबलें.

१९०८ सालीं ऑस्ट्रिया- हंगेरीनें बोस्निया आपल्या साम्राज्यांत अंतर्भूत केल्यामुळें सर्व्हियाच्या इतिहासाला नवीनच स्वरूप प्राप्त झालें. ए-हेंथालच्या सर्व्हियासंबंधींच्या जुलमी  धोरणामुळें सर्व्हियाचा कोंडमारा होऊं लागल्यामुळें, सर्व्हियाला इतर बाल्कन राष्ट्रांशीं संगनमत करण्याची आवश्यकता भासूं लागली व त्यांतच तरुण तुर्कांच्या बंडानें जी बाल्कन राष्ट्रांत अस्वस्थता उत्पन्न झाली तिची भर पडली. बाल्कन लीगची कल्पना वास्तविक १८४४ सालींच निघाली होती. तथापि ती अद्यापि फलद्रूप झाली नव्हती. पण सर्व्हिया पेचांत सांपडल्यामुळें १९०८ सालीं ही कल्पना फलद्रूप होण्याच्या मार्गाला लागली. १९१२ सालीं सर्व्हियानें माँटेनिग्रो व बल्गेरियाशीं गुप्त तह केले. या तहनाम्यांन्वयें, परस्परांनीं परस्परांनां साहाय्य करणें व मतभेद झाल्यास रशियाच्या झारकडून त्याचा निवाडा करून घेणें या दोन गोष्टी प्रमुख होत्या. थोडक्याच काळानंतर बाल्कन युद्धाला सुरवात झाली. या युद्धांत तुर्कांचा पराजय होऊन बाल्कन राष्ट्रें विजयी झालीं. विशेषतः सर्व्हियानें या युद्धांत चांगला पराक्रम गाजविला. १९१३ सालीं लंडन येथें तह झाला, त्या अन्वयें सर्व्हिया, बल्गेरियाप्रभृति बाल्कन राष्ट्रांनां बराचसा मुलूख मिळाला. पण पुढें या मुलुखाची परस्परांमध्यें वाटणी करण्याच्या बाबतींत सर्व्हिया व बल्गेरियामध्यें युद्ध उपस्थित झालें त्यांत सर्व्हियाचा जय झाला व सर्व्हियाला मॅसेडोनियांतील बराचसा मुलूख मिळाला. थोडक्याच दिवसांत सर्व्हिया व अल्बेनिया यांच्यामध्यें कलागत उपस्थित होऊन, लढाईस सुरवात झाली. पण अनेक कारणांमुळें सर्व्हियाला या झगडयांत माघार घ्यावी लागली १९१३-१४ सालांत सर्व्हियाचा प्रधान पासिक हा अंतस्थ सुधारणा करण्यांत निमग्न झाला होता. पण ता. २८ जून १९१४ रोजीं एका सर्व्हियन तरुणानें ऑस्ट्रियाचा आर्च डयूक फ्रान्सिस फर्डिनंड व त्याची बायको याचा खून केल्यामुळें ऑस्ट्रिया-हंगेरीला सर्व्हियाचा सूड घेण्याची आयतीच संधि मिळाली, व ऑस्ट्रियानें सर्व्हियाला निर्वाणीचा खलिता पाठवून ४८ तासांच्या आंत आपल्या अटी मान्य करण्यास सांगितलें पण त्याचें वेळेवर उत्तर न आल्यामुळें ऑस्ट्रियानें सर्व्हियाबरोबर लढाई पुकारली. या प्रकरणांतूनच महायुद्धाचा वणवा पेटला. प्रथमतः सर्व्हियानें ऑस्ट्रियन सैन्यावर बरेच जय मिळविले पण ऑस्ट्रियानें पुढें ही स्थिति पालटली व ऑस्ट्रिया, जर्मनी आणि बल्गेरिया यांच्या मा-यापुढें सर्व्हियाचा टिकाव लागेना. या दोस्त सैन्यानें आस्ते आस्ते बराच सर्व्हिया आपल्या ताब्यांत आणला.

या जिंकलेल्या सर्व्हियाचा प्रदेश ऑस्ट्रिया- हंगेरी व बल्गेरिया यांच्यामध्यें राज्यकारभारासाठीं वांटण्यांत आला. न जिंकलेल्या मुलुखावर सर्व्हियन सरकारचा ताबा होता व सर्व्हियन सरकारनें कोर्फू ही आपली राजधानी केली. १९१६ सालीं सर्व्हियाच्या प्रिन्स रीजंटला मारण्याचा कट उघडकीस येऊन कटवाल्यांची सक्त चौकशी करण्यांत येऊन त्यांनां शिक्षा देण्यांत आल्या. पण या चौकशीप्रकरणानें निरनिराळया पक्षांत फूट पडून पुन्हां बेबंदशाही माजली. तथापि महायुद्धाचा शेवट याच सुमारास होऊन ऑस्ट्रिया-हंगेरीच्या जुलमी अंमलापासून जुगोस्लाव्ह राष्ट्रांनीं आपली सुटका करून घेतली होती व या राष्ट्रसंघांत सर्व्हियानेंहि आपला प्रवेश करून घेतला. यापुढील सर्व्हियाच्या इतिहासासाठीं 'जुगोस्लाव्हिया' पहा.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .