प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन    
 
साखर- साखर हा शब्द संस्कृत शर्करा या शब्दापासून बनलेला आहे. रसायनशास्त्रांत, कर्बउज्जितांच्या एका मालिकेला, म्हणजे ज्या पदार्थांचें सामान्य सूत्र कन (उ१प्र)प्रम असें आहे अशा पदार्थांस दिलेलें जातिवाचक नांव. पूर्वी गोड पदार्थाला साखर हें नांव दिलें जात असे; परंतु हल्लीं या शब्दाचा उपयोग, वनस्पतिजन्य किंवा प्राणिज पदार्थांत आढळणारे किंवा त्यांच्याचसारखी रासायनिक रचना असणारे कृत्रिम पदार्थ दर्शविण्याकरितां केला जातो.

साखरेचे मुख्य दोन वर्ग आहेतः पहिला वर्ग शर्करस व द्विशर्करस. या वर्गांत कर्बाचे ६ परमाणू असून त्याचें सामान्य सूत्र क१२प्र असें असून दुस-या वर्गांतील पदार्थांचें सामान्य सूत्र क१२२१प्र११ असें आहे. ह्याशिवाय क१८३२प्र१६ या सूत्राचे कांहीं त्रिशर्करस माहीत आहेत. सर्व प्रकारची साखर रंगहीन व घनरूप किंवा पाकरूप असून तापविल्यानंतर तिचा कोळसा होतो. ती पाण्यांत द्रवते व तिची द्रावणें गोड असतात; परंतु ती मद्यसारांत सहजगत्या द्रवत नाहींत. साखरेची द्रावणें दृक्‍शास्त्रदृष्टया सजीव (किंवा कार्यकारी) असतात; म्हणजे त्यांच्या योगानें ध्रृवीभवनाची पातळी फिरते. ध्रुवीभवनाचें परिमाण द्रावणाचें निवेशन व उष्णमान यांवर अवलंबून असतें; द्रावणांतील साखरेचें प्रमाण भ्रमणावरून काढतां येतें. याद्रावणांचा लिटमसवर परिणाम होत नाहीं, व तीं पातळ अम्लांशीं किंवा भस्माशीं संयोग पावत नाहींत. साखरेची द्रावणें अंबवून दारू करतां येतें.

इ ति हा स.- साखर प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत होत असून हिंदुस्थान व अरबस्तान या देशांतूनच पाश्चात्य देशांत साखर पाठविली जात असे. साखर करण्याची कला चिनी लोक हिंदुस्थानांतूनच शिकले. इराणांतील खूझीस्तानापासून उंसाच्या लागवडीचा फैलाव पाश्चात्य देशांत झाला. अरब लोकांच्या अमदानींत, हिंदुस्थानापासून मोरोक्को देशांत सूसपर्यंत व सिसिली आणि अंदुलिशिया, येथें उंसाची लागवड होऊं लागली. मदिरा, सॅन डॉमिंगो, वेस्ट इंडीज व दक्षिण अमेरिका येथें पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनीं साखरेच्या लागवडीचा फैलाव केला. परंतु अठराव्या शतकांत चहा व कॉफी यांच्या वाढीमुळें रोजच्या खाण्याच्या पदार्थांपैकीं एक पदार्थ होईपर्यंत यूरोपांत साखर हा केवळ चैनीचा अथवा औषधोपयोगी पदार्थ समजला जात असे. स. १७४७ मध्यें ए. एस् मार्ग्रफ यानें बीट व समशीतोष्ण प्रदेशांत होणा-या कित्येक झाडांच्या मुळयांत साखर सांपडते असा शोध लावला. परंतु त्याच्या हयातींत ह्या शोधाचा फारसा उपयोग झाला नाहीं. बीट साखरेचा पहिला कारखाना, त्याचा शिष्य एफ्‍. सी. अचार्द यानें १८०१ सालीं सायलेशियांत क्यूनेर्न येथें काढला. प्रथम योजिलेल्या पद्धती विशेष पूर्ण नव्हत्या; परंतु नेपोलियनच्या धोरणानें यूरोपांत साखरेचे भाव फारच वाढल्यामुळें या धंद्याला चांगले उत्तेजन मिळालें; व जर्मनी आणि फ्रान्स या देशांत कित्येक नवीन कारखाने सुरू झाले. तथापि स. १८३० पर्यंत या धंद्याचा पाया चांगला मजबूत नव्हता.

यूरोपांतील ज्या देशांत संरक्षक व्यापाराचें तत्त्व चालू होतें, त्यांनीं निर्गत साखरेवर देणग्या देण्याची पद्धत सुरू केल्यामुळें हा धंदा इतका वाढला कीं, सरकारी मदतीखेरीज तो तितका वाढणें मुळींच शक्य नव्हतें. त्याच वेळीं देशी मालावरील जकात वाढवून मालाचा खप बराच कमी करण्यांत आला; यामुळें पुष्कळ मालाची निर्गत होऊन ब्रिटिश व इतर बाजारांत साखर स्वस्त भावानें व केव्हां केव्हां तर तयार करण्याकरितां लागलेल्या किंमतीपेक्षांहि कमी भावानें विकली जात असे यायोगानें ब्रिटन व जेथें साखर तयार केली जाते अशा वसाहती, त्याचप्रमाणें हिंदुस्थान, ह्यांचें फार नुकसान झालें. हें संकट टाळण्याकरितां ग्रेटब्रिटन या यूरोपांतील मोठमोठया देशांनीं कन्व्हेन्शनें भरवून निर्गत साखरेवर देणग्या देण्याचें बंद व्हावें व ज्या साखरेवर देणग्या देण्यांत येतात अशी साखर कोणत्याहि राष्ट्रानें आपल्या हद्दींत येऊं देऊं नये, किंवा निदान तिजवर जबरदस्त कर बसवावे वगैरे ठराव पास केले परंतु त्यांचा म्हणण्यासारखा परिणाम मुळींच झाला नाहीं हिंदुस्थानांतील साखरेच्या धंद्याचा इतिहास 'ऊंस' या लेखांत (ज्ञा. को. वि. ९) शेवटीं दिला आहे.

सा ख र ब न वि ण्या च्या क्रि या.- साखर मुख्यतः ऊंस व बीट यांपासून काढितात. ऊंस, त्याची लागवड व त्यापासून तयार करण्यांत येणारी साखर यांसंबंधीं सविस्तर माहिती 'ऊंस' या लेखांत आढळेल. ऊंस व बीट यांचीं मुळें ह्याखेरीज मॅपल, ताड, सोर्घम वगैरे झाडांपासूनहि साखर तयार करतात.

ऊंस व बीट यांपासून तयार करण्याच्या कृती एकमेकांहून भिन्न आहेत तरी (१) रस काढणें, (२) शुद्धीकरण किंवा मळी काढणें, (३) रसाचा पाक करणें (४) पाकनिविष्ट करून त्याचें स्फटिकीभवन होऊं देणें, व (५) काकवीपासून साखरेचे स्फटिक निराळे करणें ह्या क्रिया दोहोंसहि सामान्य आहेत.

(१)रस काढणें:- हिंदुस्थानातील शेंकडों गु-हाळांत, दोन दोन किंवा तीन तीन ऊंस लांकडाच्या किंवा लोखंडाच्या चरकांत घालून रस काढतात; यायोगानें उंसाच्या वजनाच्या फार तर चतुर्थांश रस निघतो. परंतु ज्या देशांतील मळयांत, रस काढण्याचें काम अर्वाचीन पद्धतीनें व फार व्यवस्थित रीतीनें केलें जातें तेथें उसाच्या वजनाच्या शेंकडा १२ भाग शुद्ध साखर मिळते. साखरेच्या प्रमाणावर हवामानाचाहि परिणाम होतो. रस काढण्याची एकच रीत सर्व ठिकाणीं सारखी फायदेशीर नसली तरी पुढील गोष्टी सर्व ठिकाणीं लागू पडतात:-(अ) ऊंस कितीहि दाबला तरी त्याच्या काष्ठमय भागांत त्या वेळेपुरता, त्याच्या वजनाइतका ओलावा राहातो, आणि वस्तुत: ओलाव्याचें प्रमाण शेंकडा १० नीं जास्त असतें. उदाहरणार्थ, ज्यांतून शक्य तेवढा सर्व रस काढला आहे अशा १०० पौंड चिपाडांत, ४७.६२ पौंड काष्ठमयतंतू व ५२.३८ पौंड ओलावा म्हणजे, पाणी व साखर किंवा रस असतो. (आ) निरनिराळया उसांत रसाचें प्रमाण व रसाचे गुणधर्म भिन्न असतात. रस पूर्ण निघाला आहे कीं नाहीं हें ठरवितांना रसाचें प्रमाण पहावें लागतें; व पुढें, साखरेचें प्रमाण काढतांना रसाचे गुणधर्म पहाणें जरूर असतें. दोन तीन वेळा ऊंस चरकांतून काढूनहि चिपाडांत रस राहिल्यामुळें पुष्कळ नुकसान होतें; याकरितां ऊंस एकदां चरकांतून काढल्यावर, त्यांत मूळच्या (चरकांतून काढण्यापूर्तीच्या) वजनाच्या शेंकडा २० किंवा ३० पासून चाळीसपर्यंत पाणी व वाफ यांचे शोषण होऊं देतात; यायोगानें शेवटीं चिपाडात रस न राहतां रस व पाणी यांचे मिश्रण राहतें, व नुकसान कमी होतें.

चरकांत ऊंस घालण्याच्या पद्धतींत सुधारणा झाली असून गाडयांमधून ऊंस काढून चरकाला लावीपर्यंत सर्व कामें यांत्रिक साहाय्यानें होऊं लागलीं आहेत. वेस्टइंडीजमधील उंसाच्या एका मोठया मळयांत यायोगानें ६० मजुरांचें काम कमी होऊन, त्याचा शेतांत दुसरीं कामें करण्याकरितां उपयोग होऊं लागला.

जावा, क्युबा, लुइशियाना, व सँडविच बेटें आणि ईजिप्तमधील एक दोन कारखान्यांत उंसाचा रस अभिसरण पद्धतीनें काढतात. परंतु विशिष्ट परिस्थितीखेरीज (म्हणजे साखरेला भाव चांगला असल्याशिवाय) ही पद्धत फारशी फायदेशीर पडत नाहीं.

(२) शुद्धीकरण:- दुसरी गोष्ट म्हणजे बलक घट्ट करून त्याबरोबर रसांत द्रवरूपानें असलेले अथवा अविद्रुत इतर पदार्थ काढून टाकणें ही होय. ऊंसाच्या बारीक रंध्रांतून रस निघाल्याबरोबर, त्यांत विपर्यसन सुरू होतें; तें थांबविण्याकरितां थंड रसांत चुन्याची निवळी मिसळून रसांतील स्वतंत्र अम्ल शिथिल करतात. पुढें रस तापविल्यानंतर तो इतर पदार्थांपासून पुढें दिलेल्या कृतींनी निराळा केला जातो:-(अ) डेमेरारमध्यें उकळत असलेला रस टांक्यांत सोडून थंड करतात, त्यावेळीं उष्णमान वाढविल्यामुळें गोळा झालेला बलक इतर पदार्थांबरोबर खालीं पडतो. नंतर टांक्यांच्या तळाशीं फिरत्या सांध्यानें बसविलेल्या नळीनें (या नळीचें वरचें तोंड नेहमीं रसाच्या पृष्ठभागाबरोबर राहील अशी व्यवस्था केलेली असते) वरचा स्वच्छ रस काढून घेतात. (आ) ऑस्ट्रेलियांत, रसपृथक्कारी यंत्राचा सामान्यत: उपयोग केला जातो. हें यंत्र पंचपात्रासारखें सुमारें सहा फूट उंचीचें असून त्याला खालीं तेवढयाच उंचीचा शंक्वाकृति नळ असतो. उष्ण रस एका मध्यनलिकेनें आडव्या आठ शाखांत नेल्यावर शंक्वाकृति तळाच्या पृष्ठभागाशीं (पंचपात्रासारखा भाग व शंक्वाकार भाग यांच्या सांध्यावर) तो यंत्रांत सोडला जातो. उष्ण रसापेक्षां थंड रसाचें विशिष्ट गुरुत्वांत उष्णतेनें फारसा फरक पडत नाहीं, यामुळें उष्ण रस वर जाऊन मळी व इतर घन पदार्थ तळाशीं जातात. उष्ण रस भांडयात सोडतांना त्याच्या आकारमानाच्या मानानें तो ब-याच मोठया पृष्ठभागावर सोडला जातो, आणि तो सोडतांना फार खळबळ होऊं दिली जात नाहीं, यामुळें वर जाणा-या रसाला कायमची गति मिळालेली असते. स्वच्छ रस यंत्राच्या पृष्ठभागाशीं आल्यावर बाष्पी करणा-या यंत्रांकडे नेला जातो. तळाशीं जमलेली मळी दोन तीन तासांनी खरवडून काढतात. (इ) क्यूबा, मॉर्टिनीक, पेरू, मारिशस, जावा वगैरें ठिकाणी दोन तळीं शोधकांचा उपयोग केला जातो.

(३) बाष्पीभवन:- वर सांगितलेल्या रीतींपैकीं एखाद्या रितीनें रस साधारणत: स्वच्छ केल्यानंतर कोणत्या तरी एका पद्धतीनें तापवून व बाष्पीकरण करून त्याचा पाक करतात. साधारण शुद्ध केलेल्या रसाचा स्फटिकीकरणयोग्य पाक होण्यापूर्वी तो सरासरी शें. ७० भाग (चिपाडें पाण्यांत भिजवून रस काढला असल्यास शें. ९० ते ९५ भाग) आटवावा लागतो. ही क्रिया खुल्या हवेंत न करतां निर्वात जागीं केल्यास खर्च कमी लागून काम सहज होतें. पाक करण्याकरितां पुष्कळ ठिकाणीं बहुपरिणामी बाष्पीकरणयंत्रांचा उपयोग केला जातो.

(४) निबिष्टीकरण व स्फटिकीकरण:- याप्रमाणें पाक तयार झाल्यावर निर्वात काढयांत (भट्टी लावण्याच्या भांडयांत) तो निविष्ट होऊन त्याचे स्फटिक बनूं देतात. रस चांगला शुद्ध झाला नसल्यास स्फटिकीभवन करणारा मनुष्य कितीहि कुशला असला तरी त्याचा काहीं उपयोग न होऊन साखर वाईट होते, म्हणजे तिचा रंग किंवा स्फटिक चांगले नसतात, व तिच्या अंगची ध्रुवीकरणशक्ति फार कमी होते. साखरेचे खडे मोठे पाहिजे असल्यास पाक पहिल्यानें कढईंत टाकण्यापूर्वी, त्याची घनता कमी म्हणजे २०० किंवा २१० 'बोमे' असावी लागते; परंतु खडे बारीक लागत असल्यास २७० ते २८० 'बोमे' घनतेच्या साखरेपासून ते सहज मिळतात. स्ट्रेटस सेंटलमेंट्ससारख्या कांहीं देशांत पाक निर्वात भांडयांत न तापवितां, दोनतळी उघडया भांडयांत उकळतात. याप्रमाणें एकसारखें ढवळून, बाष्पीकरण होऊं दिल्यास साखरेची ढेप बनतें.

(५) बाजारांत पाठविण्याकरितां स्फटिक तयार करणें:- याप्रमाणें स्फटिक तयार झाल्यानंतर ते काकवीपासून निराळे करावे लागतात. मेक्सिको व मध्यअमेरिकेच्या कांहीं भागांत अद्यापहि. शंक्वाकृति सांच्यांत साखर घालून व वर चिखलाचा थर देऊन ही क्रिया केली जाते. चिखलांतील पाणी हळू हळू पाझरून, त्याबरोबर काकवी निघून जाते आणि स्वच्छ साखर रहाते. परंतु ह्या पद्धतीनें खर्च फार लागून वेळहि जास्त म्हणजे कमीतकमी ४० दिवस लागतात. उलटपक्षीं हल्लीं पुष्कळ ठिकाणीं उपयोगांत असलेल्या मध्योत्सारी (सेंट्रिफ्युगल) यंत्रानें मजूर कमी लागून, आज तयार केलेले स्फटिक उद्यां बाजारांत पाठवितां येतात.

साखर तयार करण्याच्या वर सांगितलेल्या क्रिया सामान्य वाचकांस कळण्यास कठिण म्हणून आपल्याइकडे बेलापूरबारामतीसारख्या मोठाल्या कारखान्यांतून कशा प्रकारचें काम चालतें याची माहिती दिल्यास हा भाग सुलभ होईल.

शेतांतील ऊंस रेल्वेच्या डब्यांतून कारखान्यांत आल्यावर ते वजन करण्याच्या कांटयावर येतात. वजन घेतांना चूक होऊं नये म्हणून कांटयांत तिकीट घालून त्यांवर वजन आपोआप छापण्याची व्यवस्था केलेली असते. वजन केलेल्या उंसाचा डबा चरकाकडे जातो. तेथें डब्यांतला ऊस चरकांत टाकण्याचें काम यंत्रांनीच होतें. या चरकांत ब-याच लाटा असतात. त्या निरनिराळया लाटांतून ऊंस जात असतांना त्यावर पाणी शिंपण्याची व्यवस्था असते. अशा रीतीनें लाटांतून उंसाचें चिपाड निघाल्यावर त्यांतील बहुतेक रस निघून तें निःसत्व चिपाड बॉयलरमध्यें जळण्याकरितां जातें. चरक चालविण्याकरितां मोठालीं एंजिनें आहेत. चरकांतून जो रस निघतो तो चाळणींतून गाळून मग त्याचें माप होतें. नंतर वाफेच्या योगानें तो ७५० अंश (सेंटिग्रेड) पर्यंत तापवून मग मळी काढण्याच्या टांक्यांत जातो. तेथें त्यांत कळीचा चुना पाण्यांत कालवून मिसळतात आणि गंधकाची धुरी देतात व मग रस उकळी फुटेपर्यंत वाफेनें तापवितात. कळीचा चुना व गंधकाची धुरी यांच्या योगानें रसांतील मळी वेगळी होऊन टांकीच्या तळाशीं बसते, व स्वच्छ रस वर येतो. स्वच्छ रस निराळा करून तो आटविण्याकरितां जातो व खालच्या मळींत जो रस राहिलेला असेल तो काढण्याकरितां 'फिल्टर प्रेस' नांवाच्या यंत्रांत ही मळी दाबून धुतात. रस आटवून त्याचा पाक करण्याला संयुक्त कढया असतात; त्यांनां 'मलटिपल इव्हॅपोरेटर' असें म्हणतात. या संयुक्त कढईंतून दाट रस उर्फ पाक निघतो. तो दुसरी म्हणजे सोनमळी काढण्याच्या टांकीत जातो. या टांकींत पुन्हां थोडा कळीचा चुना टाकतात व पुन्हां गंधकाची धुरी देतात. नंतर हा सर्व पाक फिल्टर प्रेसमधून गाळतात. अशा रीतीनें शुद्ध झालेला पाक निर्वात कढयांत पुढें शिजविण्याकरितां जातो. या कढयांत रस शिजविण्याचें काम निर्वात स्थितींत होतें. भांडयांतील हवा काढून टाकली असतां त्यांत पातळ पदार्थ कमी उष्णमानावर उकळतो. या तत्त्वावर या कढईची रचना असते. उष्णतेच्या योगानें पाकांतील कांहीं शर्करेचें रूपांतर होऊन तांबडा रंग बनतो, व त्यामुळें साखर बिघडते. निर्वात कढयांत हें टाळतां येतें. यांनां इंग्रजींत 'व्हॅक्यूम पॅन्स' म्हणतात. प्रत्येक पॅनमध्यें एकेवेळीं १० टनवर राब तयार होतें. या कढयांत साखरेचें कण बनविण्याची कृति संक्रांतीचा हलवा करण्याच्या कृतीसारखी आहे. प्रथम थोडा पाक घेऊन तो आटविला म्हणजे त्यांत साखरेचे बारीक कण बनतात. त्यांत थोडा थोडा पाक घेऊन आटविण्याचें काम चालविलें म्हणजे हे कण हळू हळू वाढतात. ही कृति फार नाजूक असून या कढयांवर काम करणारे लोक फार तरबेज असावे लागतात. पाक आटून साखरेचे कण पुरेसे मोठे झाले म्हणजे साखरेचे कण व त्या भोंवतालची काकवी यांचें दाट मिश्रण तयार होतें, तिला राब म्हणतात. ही राब निवण्याकरितां टांक्यांत टाकतात. या टांक्यांत सावकाश फिरणारे असे दांडे असतात. या टांक्यांतून राव सेंट्रिफ्यूगल यंत्रांत जाते, तेथें काकवी व साखरेचे कण वेगळे वेगळे होतात. या यंत्रांतून जे साखरेचे कण निघतात त्यांवर काकवीचा पातळ थर राहिलेला असतो, तो काढण्याकरितां या कच्च्या साखरेंत शुद्ध पाक मिसळून ती पुन्हां दुस-या सेंट्रिफ्युगल यंत्रांत घालून वाफेनें धुतात म्हणजे साखरेचे कण पांढरें शुभ्र होतात. मग ही साखर चाळणींतून चाळून पोत्यांत भरण्याकरितां जातो.

बी ट साखर- इसवी सन १७६० च्या सुमारास बर्लिनमध्यें मार्ग्राफ यानें आपल्या प्रयोगशाळेंत मद्यसाराच्या योगानें, पांढ-या बीटपासून शेंकडा ६.२ व तांबडयापासून शेंकडा ४.५  साखर मिळविली. पुष्कळ वर्षांच्या काळजीपूर्वक अभ्यासानें हल्लीं बीं व खत (विशेषतः सिंधुनत्रित) यांची योग्य निवड केल्यास सामान्य बीट झाडाच्या मुळींत शेंकडा ७ तंतू व शेंकडा ९३ भाग रस मिळतो; त्यापासून जर्मनींत स्वतःच्या वजनापैकीं शेंकडा १२.७९ व फ्रान्समध्यें शेंकडा ११.६ साखर मिळते. ठोकळमानानें पहातां हल्लीं १ टन बीटचीं मुळें १ टन उंसाबरोबर आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं; एकाचीं चिपाडें गुरांनां खाण्याकरितां व दुस-याचीं जळण्याकरितां उपयोगी पडतात. बीटची मुळें हल्लीइतकी पूर्णावस्थेंस येण्यापूर्वी, व त्यांतून रस काढण्याकरितां पाण्याच्या दाबाचा उपयोग केला जात असे तेव्हां, या कारखान्याकरितां दिल्या जाणा-या देणग्यांमुळें उत्पन्न झालेल्या व चालू राहिलेल्या कृत्रिम चढाओढीला वेस्ट इंडीजमधील उंसाचे मळेवाले दाद देत नव्हते; परंतु मुळांची लागवड इतकी पूर्णावस्थेस पोंचल्यामुळें साखरेच्याव्यापारांत क्रांति घडून आली आहे. बीटच्या मुळांपासून साखर करतांना धुणें, तुकडे करणें, अभिसरण, गंधकीकरण, बाष्पीकरण, संपृक्तीकरण आणि शोधन या क्रिया कराव्या लागतात.

तुकडे करणें:- शेतांतील मुळें खटारे, किंवा आगगाडयांतून आणल्यावर त्यांचें वजन करून तीं धुण्याच्या यंत्रांत घालतात. हें यंत्र म्हणजे पाण्यांत बुडविलेला एक मोठा पिंजरा असून त्यांत एक आडवा दांडा फिरत असतो. त्याला स्क्रूसारख्या शाखा असल्यामुळें दांडा फिरतांना, मुळें एकमेकांवर घांसली जातात एवढेंच नव्हे तर ती पुढें ढकललीं जाऊन दुस-या टोंकापर्यंत जातात. तेथून एका यंत्राच्या साहाय्यानें ती उंच नेऊन तुकडे पाडण्याकरतां तुकडे पाडया यंत्रांत टाकतात. हल्ली, रस अभिसरणक्रियेनें काढला जातो; त्याकरितां तुकडे (गुळगुळीत) साफ कापलेले व शक्य तेवढया मोठया पृष्ठभागाचे असावे लागतात (म्हणजे पाण्याच्या अभिसरणाला फार प्रतिरोध होत नाहीं) तुकडेपाडया यंत्रांत, ७ किंवा अधिक फूट व्यासाच्या लोखंडी तबकडीच्या परिघावर पोलादी पातीं बसविलेलीं असून, एका मिनिटांत त्या तबकडीच्या ६० ते ७० फे-या होतात. २४ तासांत या यंत्रानें ३००००० किलोग्राम मुळांचे तुकडे होतात; व एवढया अवधींत पोलादी पातीं चार किंवा अधिक वेळ बदलावीं लागतात.

अभिसरणः- अभिसरणपट बंद, उभे, पंचपात्रीसारखे व साधारणपणें १३२० ग्यालनांचे असून १२ किंवा १४ घटांची एक ब्याटरी याप्रमाणें त्यांची मांडणी असते. कांही ठिकाणीं हे घट वर्तुळाकार व कांहीं ठिकाणीं एका रेषेंत मांडतात. पहिल्या मांडणींत, तुकडेपाडया यंत्राखालीं व घटांच्यावर फिरणा-या एका नळीनें तुकडे घटांत टाकणें फार सोपें जातें, परंतु निरुपयोगी व ऊन असे तुकडे काढतांना गैरसोय होते. उलटपक्षीं दुस-या मांडणींत तुकडे भरतांना थोडा त्रास पडतो, परंतु घट रिकामे करणें सोयीचें असतें. नवीन तुकडे भरलेला घट ब्याटरीचा मुख्य घट बनतो; शास्त्रीय रीत्या आणि कुशलतेनें काम केल्यास दुस-या घटांतील उष्ण द्रव्य ह्यांत आणण्यापूर्वी, यांतील तुकडे वाफेनें ऊन करणें ही उत्तम व फायदेशीर रीत होय. परंतु वाफ येऊं देण्यांत थोडाहि निष्काळजीपणा अगर दुर्लक्ष झाल्यास साखरेचें विपर्यसन होऊन नुकसान होतें, याकरितां जलतापकांचा सामान्यतः उपयोग केला जातो (नवीन घटांत येऊं देण्यापूर्वी जलतापकांतील पाणी तापविलेलें असतें). घट भरून त्यांतील तुकडे गरम केल्यानंतर, शेजारच्या घटांतील द्रव्य, जें आतांपर्यंत निविष्टीकारकांकडे जात होतें, तें नव्या घटांत सोडतात; व तेथें तुकडयांमधील रस त्यांत उतरल्यानंतर तें निविष्टीकारकांकडे जातें. नव्या घटांत क्रिया सुरू होऊन तो ब्याटरीचा मुख्य झाल्यानंतर, पहिला घट सोडून दिला जातो व दुसरा घट हा पहिला बनतो. एक घट नेहमी रिकामा होत असतो व एक तुकडयांनीं भरून तापविला जात असतो. तुकडयांतील सर्व रस निघाल्यानंतर यंत्रांत घालून त्यांतील फाजील पाणी काढून टाकतात, व ते वाळवून गुरांनां खाण्याकरितां विकतात.

संपृक्तीकरणः- अभिसरणब्याटरींत रसाबरोबर चुना मिसळून नंतर तो रस संपृक्तिकारकाकडे जातो. हें एक बंद भांडें असून त्यांत कर्बद्विप्राणिद सोडतात. हा वायु चुन्याशीं संयोग पावून चुन्याचा कर्बित तयार होतो. हें सर्व मिश्रण दाबांतून गाळल्यास स्वच्छ रस मिळतो. चुना मिळविण्यापासून या रसावर सर्व क्रिया आणखी दोन वेळां केल्या जातात. एक वेळ क्रिया संपल्यानंतर मध्यंतरी रंग नाहींसा करण्याकरितां रसांत गंधकाम्लवायु सोडतात.

बाष्पीकरण व स्फटिकीकरणः- याप्रमाणें तयार झालेल्या शुद्ध रसाचें बहुपरिणामी बाष्पीकारकांत बाष्पीकरण करून, निर्वात कढईंत स्फटिकीभवन केल्यानंतर मध्यशोषक यंत्रानें साखर निराळी करण्यांत येते. ही साखर धुतली नसल्यास तिला कच्ची साखर किंवा गूळ असें म्हणतात.

शोधनः- मध्यशोषकांतून स्वच्छ केलेली साखर आणखी शुद्ध करण्याच्या कित्येक कृती आहेत; व त्या सर्वांचा उद्देश साखर साच्यांतून काढल्याप्रमाणें दिसावी हा असतो. हल्ली हाडांचा कोळसा वापरल्याशिवाय स्वस्त, व दिसण्यांत शुद्ध अशी साखर तयार करण्यांत येते.

शुद्धीकरण किंवा स्वच्छ करणें:- गूळ (किंवा अस्वच्छ साखर) पाण्यांत मिसळून, त्याचा २७० ते २८० 'बोमे'घनतेचा रस केल्यावर, त्यांतील वाळू व इतर अविद्रुत पदार्थ काढून टाकण्याकरितां तो फडक्यांतून गाळतात आणि नंतर रंगीत पदार्थ व चुना काढण्याकरितां हाडांच्या कोळशांतून गाळतात. हा स्वच्छ रस निर्वात भांडयांत तापवून स्फटिकीभवन होऊं दिल्यास उत्तम स्वच्छ साखर मिळतें.

व्या पा र.- जगांत साखर कोठें व किती पैदा होते याची आंकडयांसह माहिती 'ऊंस' या लेखांत (ऊ. पृ. ११) दिलेलीच आहे. जगांत बीटची व उंसाची साखर सारख्याच प्रमाणांत तयार होतें.

हिंदुस्थानांत तयार होणारी सर्व साखर येथेंच खपते, व शिवाय परदेशांतूनहि बरीच येते. त्यापैकीं बहुतेक उंसाची असून ती मॉरिशस व जावा येथून येते. हाडांच्या कोळशाशिवाय, स्वच्छ व साखर अर्वाचीन पद्धतीनें होऊं लागल्यामुळें पूर्वीच्या काळीं धार्मिकदृष्टया येणारा आक्षेपहि नाहींसा झाला आहे; यामुळें हिंदुस्थानांत साखरेचा खप हल्ली बराच वाढला आहे. हिंदुस्थानांत परेदशांहून येणा-या मालांत किंमतीवरून पहातां साखरेचा चवथा नंबर लागतो. (१९२३-२४ सालच्या व्यापारी आकडयांवरून). १९२३-२४ सालीं एकंदर   कोटी रुपयांची साखर आयात झाली. शेंकडा ९० साखर जावांतून येते. या एकंदर नावांसाखरेपैकीं शेंकडा ४२ बंगाल्यांत, शेंकडा २७ मुंबईंत, शेंकडा २४ कराचीस, शेंकडा ५ ब्रह्मदेशांत व शेंकडा २ मद्रासेंत जातें. मॉरिशसची साखर बहुतेक मुंबईस खपते.

आपल्याकडे ऊंस पुष्कळ पिकण्यासारखी परिस्थिति आहे. तथापि तीस पस्तीस लाख एकरांपलीकडे ऊंस लावण्यांत येत नाहीं. जो ऊंस लावतात तो साधारणपणें बारीक व कठिण लावीत असल्यानें त्यांतून उत्कृष्ट प्रकारचा रस निघतो. ऊंस लावणारे बहुतेक रसाचा उपयोग गूळ करण्याकडे करतात. बाहेरून स्वस्त साखर येत असल्यानें ती करण्याकडे कोणाची प्रवृत्ति होत नाहीं. आधुनिक यांत्रिक पद्धतीनें साखर तयार करण्याचे कांही कारखाने संयुक्तप्रांत, बिहार व मुंबई इलाखा यांतून निघालेले आहेत पण ते चालण्याची फार मारामार पडते. अगोदर त्यांत यंत्रांकरितां फार भांडवल गुंतवावें लागतें; नंतर स्वतःचा ऊंस बारमास पुरण्याइतका असावा लागतो; शिवाय उंसांतून साखरेचें प्रमाण बरेंच पडावें लागतें. आणि शेवटीं सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयार होणारी साखर विलायती साखरेपेक्षां स्वस्त विकावी लागते. या गोष्टी शक्य होत नसल्यानें बारामती येथील 'नीरा व्हॅली शुगर फॅक्टरी'प्रमाणें मोठया भांडवलावर काढलेले कारखानेहि लवकरच बंद पडतात असा अनुभव आहे.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .