प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन    
 
सांगली संस्थान- मुंबई इलाखा. दक्षिण महाराष्ट्रांतील एक संस्थान सांगली संस्थानांत सहा तालुके असून मुंबई इलाख्याच्या चार जिल्ह्यांत उत्तरेस भीमेपासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत ते पसरलेले आहेत. संस्थानचें एकंदर क्षेत्रफळ ११३६ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) २२१३२१ आहे. सरासरी वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये आहे. संस्थान इंग्रजसरकारला वार्षिक खंडणी १३५००० रुपये देतें. शहापूर व सिरहट्टी हे तालुके सोडले तर एकंदर मुलुख सपाट, वृक्षरहित व वैचित्र्याभावामुळें कंटाळवाणा वाटण्यासारखा आहे. हवा उष्ण असली तरी रोगट नाहीं. हिवाळयांत हवा कोरडी असते. शहापूरखेरीज इतर भागांत पाऊस बेताचा असतो. पोलीसखेरीज दुसरें लष्कर संस्थानांत नाही. पोलिसांची संख्या सुमारें ५०० आहे. त्यांचा वार्षिक खर्च सुमारें पाऊण लाख रुपये असतो.

सांगली येथें एक मध्यवर्ती तुरुंग आहे. सर्व प्रकारच्या प्राथमिक व दुय्यम शाळांची संख्या १७५ वर आहे. शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च पाउणलाखांवर येतो. संस्थानांत १७ वाचनालयें आहेत. एकंदर सहा म्युनिसिपालिटया असून सांगली व शहापूर येथील म्युनिसिपालिटयांचे सभासद लोकनियुक्त असतात, व सांगली आणि रचकबी येथील म्युनिसिपालिटयांचा अध्यक्ष बिनसरकारी असतो. गूळ, हळद, तूप, तंबाखू, गहूं व मिरच्या या जिनसांचा व्यापार सांगली येथें फार भरभराटींत आहे. सांगली स्टेट रेल्वे झाल्यापासून स्थानिक व्यापारांत बरीच सुधारणा झाली आहे. संस्थानांतील दुसरी महत्त्वाचीं व्यापारी ठिकाणें म्हणजे रबकवी व शहापूर हीं होत. येथून कापूस, कापड, रंगीत कापड व रेशीम हे जिन्नस बाहेर पाठविले जातात. सांगली येथील तांब्यापितळेची भांडी फार प्रसिद्ध आहेत. तेथील सोन्याचांदीचे दागिने व इतर वस्तूहि प्रख्यात आहेत.

तेरदल व हंगडी येथें घरगुती कामाकरितां लागणारी तांब्यापितळेचीं मोठीं भांडीं होतात. शिरहट्टी व त्याच्या आजूबाजूच्या गांवांत देशी कांबळीं विणतात. कवठें-महंकल येथें बुरणूस व गालीचे होतात. शहापूर तालुक्यांत मरिहल व बालेकुंद्री, आणि शिरहट्टी तालुक्यांत बन्निकोप येथें कांचेच्या बांगडयांचे लहान कारखाने आहेत. व शिरहट्टी तालुक्यांत बेलहट्टी येथें मऊ दगडांच्या निरनिराळया वस्तू (उ. दगडया) तयार करतात. आजचे संस्थानिक लेफ्टनंट मेहेरबान सर चिंतामणराव धुंडिराज उर्फ आप्पासाहेब पटवर्धन हे आहेत. यांचे वय ३७ वर्षाचें आहे.

इ ति हा स.- संस्थानिक इतिहासप्रसिद्ध पटवर्धन घराण्यापैकीं असून चिंतामणराव आप्पासाहेबापासून या संस्थानचे पुरुष मोजले जातात. या पटवर्धन घराण्याची मागील माहिती मिरज संस्थानच्या इतिहासांत सांपडेल. हरभटाचा नातू व गोविंद हरीचा तिसरा मुलगा पांडुरंगराव कैदेंत पडल्यानंतर पेशव्यांनीं त्याची जहागीर त्याचा मुलगा हरिहरराव याजकडे चालू ठेविली (१७७८). हरिहरराव अज्ञान असल्यामुळें पटवर्धन घराण्याचें धुरीणत्व परशुरामभाऊंकडे गेलें. हरिहरराव जहागिरीचा उपभोग घेण्यास फार दिवस वांचला नाहीं. १७८२ त त्याचा लहानसें दुखणें येऊन अंत झाला. नंतर परशुरामभाऊनें पेशव्यांकडून पांडुरंगरावांचा दुसरा मुलगा चिंतामणराव यास जहागीर देवविली व त्यांच्यातर्फे आपण जहागिरीचा कारभार पूर्ववत पाहूं लागले. चिंतामणराव हे त्यावेळीं केवळ नऊ वर्षांचे होते. चिंतामणराव पुढें चिंतामणराव अप्पासाहेब असें म्हणत. हेच सांगलीचे संस्थापक होत. व संस्थानचा खरा इतिहासहि येथूनच सुरू होतो. चिंतामणरावांच्या कारकीर्दीतील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठे, निजाम व इंग्रज या तिघांनीं मिळून टिप्पूवर केलेली मोहीम ही होय. चिंतामणराव त्यावेळीं केवळ १७ वर्षांचे होते; तरीहि त्यांनां या मोहिमेवर जाण्याची फार उत्सुकता होती; व त्याप्रमाणें कांहीं मर्यादेपर्यंत मराठयांच्या सैन्याबरोबर ते गेलेहि होते. परंतु दुर्दैवानें वाटेंत आजारी पडल्यामुळें त्यांनां परतावें लागलें.

खडर्याची लढाई (१७९५) ही चिंतामणरावांच्या कारकीर्दीतील दुसरी महत्त्वाची गोष्ट होय. चिंतामणरावांची या वेळेची विशेष कामगिरी म्हणजे परशुरामभाऊंनां जखम लागून ते घायाळ झाले असतां ऐनवेळीं त्यांनी केलेली मदत ही होय. निजामाबरोबर तह झाल्यानंतर बक्षिसें वाटलीं गेली त्यावेळी चिंतामणरावांनां पेशव्यांकडून एक मौल्यवान्‍ कंठा अर्पण करण्यांत आला.

स. १७९९ च्या सुमारास धोंडया वाघाचा पुंडाबा व प्राबल्य बरेंच वाढत चालल्यामुळें कर्नाटकचा सर सुभेदार धोंडोपंत गोखले यांनां त्याचें पारिपत्य करण्याविषयीं पेशव्यांनीं आज्ञा केली व त्याच्या मदतीस कांहीं सैन्य पाठविलें. गोखल्यांनीं मदत करण्याकरितां चिंतामणराव पटवर्धनहि कित्तूरच्या दिशेनें आपल्या घोडेस्वारांसह चाल करून गेले. धोंडया वाघाची व मराठयांची गांठ वित्तूरजवळ दावणगीरनाला येथें पडून मोठी लढाई झाली; तींत मराठयांनां फारसें यश मिळालें नाहीं. तरीं चिंतामणराव आपल्या लहानशा सैन्यानिशीं फार शौर्यानें व धैर्यानें लढले. धोंडया वाघाचा पुरा मोड करण्याच्या कामीं पेशवे व इंग्रज यांस चिंतामणरावांनीं पुढेंहि अप्रत्यक्षपणें फार मदत केली; व याचा मोबदला म्हणून धोंडयानें काबीज केलेला मुलूख पटवर्धन घराण्याकडेच ठेवण्यांत आला. इ. स. १८०० पर्यंत पटवर्धन घराणें विभक्त झालेलें नव्हतें. परंतु चिंतामणराव अज्ञान असतां त्यांचे चुलते गंगाधरराव यांनीं बराच मुलुख अन्यायानें बळकावला; व चिंतामणराव व धोंडया वाघावरील मोहिमेंत गुंतले असतां त्यांच्या जहागिरीपैकीं आणखीहि कांहीं मुलुख घेण्याचा प्रयत्न केला. यामुळें पटवर्धन घराण्यांत अंतःकलह सुरू होऊन अखेर सांगली व मिरज हीं संस्थानें निराळीं झालीं. कलहाचें बीज एकदां पेरल्यावर पटवर्धन घराण्याच्या सर्व शाखांत त्याचा प्रसार होऊन जमखिंडी, कुरुंदवाड व खालसा झालेली तासगांव, चिंचणी, सोनी, कागवाड व इतर संस्थानें अस्तित्वांत आलीं.

दुसरा बाजीराव व पटवर्धन घराणें यांच्या मध्यें सख्य नव्हतें. शिंदे व भोंसले यांच्या विरुद्ध इंग्रजांचें युद्ध चालू असतां पटवर्धनांनीं तटस्थ वृत्ति धारण केल्यामुळें त्यांच्यावर पेशव्यांची इतराजी अधिकच झाली; त्यांनां शासन करण्याच्या उद्देश्यानें पेशव्यांनीं पटवर्धनांचा मुलुख जप्त करून तो बापू गोखल्यास सैन्याच्या खर्चाकरितां देण्याचा हुकूम केला. या वेळीं पटवर्धनांचा पक्षपाती जनरल वेलस्ली यानें त्यांच्या तर्फे पुष्कळ खटपट केली; इंग्रजांच्या मध्यस्थीमुळेंच १८१२ सालीं पंढरपूर येथें पेशवे व पटवर्धन यांच्या दरम्यान तह झाला व  १८१७ सालीं पेशव्यांचें ब्रिटिशांशीं धोरण संशयित दिसल्यावरून इंग्रजांनीं पेशव्यांकडून पटवर्धनांचे हक्क पुन्हां कायम करून घेतली. तथापि कित्येक कारणांमुळें १८१८ सालीं पेशवाईची अखेर होईपर्यंत पेशवे व पटवर्धन सरदार यांच्यामधील कलह चालूच होता.

पेशवाई बुडून माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा मुंबईचा गव्हर्नर झाल्यावर चिंतामणरावानें त्याचा स्नेह संपादन केला होता. १८२२ सालीं एल्फिस्टननेंहि स्नेहाचें चिन्ह म्हणून चिंतामणरावांनां 'पंचोपाख्यान' नांवाचें पुस्तक नजर केलें. मुंबई इलाख्यांत टाइपानें छापलेलें हेंच पहिलें मराठी पुस्तक होय. सर्व गव्हर्नरांशींहि चिंतामणरावांचें असेंच सख्य होतें इंगजसरकारचा त्यांच्यावर अत्यंत विश्वास असून जरूरीच्या व अडचणीच्या वेळीं इंग्रज सरकारास ते मनोभावानें मदत करीत. ब्रिटिशांच्या छत्राखाली चिंतामणरावांनीं सांगली संस्थानचा कारभार स. १८१८ पासून १८५१ पर्यंत चालविला. ते उत्साही, मोकळया मनाचे व अत्यंत निःपक्षपाती असून क्षात्रवृत्तीच्या राजाच्या अंगीं लागणारे सर्व गुण त्यांजमध्यें वसत होते असें पारसनीस म्हणतात. ''प्रजेच्या कल्याणाविषयीं ते फार दक्ष असून खाणी खोदण्याच्या धंद्यांकडे त्यांचें विशेष लक्ष असे; विशेषतः कमलगड डोंगरांतील सोन्याच्या खाणी खणण्याला त्यांनीं बरेंच उत्तेजन दिलें. रेशमाचा धंदा संस्थानांत सुरू करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला; ठग लोकांचा नायनाट करण्यांत इंग्रजांस मदत केली, सर्व धर्मांच्या लोकांनां त्यांनीं धर्मकार्यार्थ जमिनी दिल्या, व दुर्भिक्षप्रसंगीं हिंदुस्थानांत व आयर्लंड वगैरे इतर ठिकाणींहि उदारहस्तें लोकांस मदत केली.'' चिंतामणराव कलाकौशल्याचे व वाङ्मयाचे भोक्ते होते. त्यांच्याच आश्रयाखालीं प्रसिद्ध मूर्तिकर्मकार भिवा सुतार यानें सांगली येथील गणपतीची सुंदर संगमरवरी मूर्ति तयार केली. चिंतामणरावांनीं सांगलीस आणलेल्या कुमारी नांवाच्या कारागिरानें-ज्यांबद्दल सांगलीची प्रख्याति आहे तीं - पितळेचीं व चांदीचीं सुंदर भांडी करण्याचा धंदा सुरू केला.

चिंतामणराव व ता. १५ जुलई १८५१ रोजी मरण पावले. १८२६ सालीं त्यांचा मुलगा गणपतराव निवर्तला व १८३४ सालीं कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या परवानगीनें चिंतामणरावांच्या सुनेनें दत्तक घेतला; परंतु १८३८ सालीं त्यांनां धुंडिराव तात्यासाहेब हा मुलगा झाला व तोच १८५१ सालीं चिंतामणरावांच्या मागून संस्थानिक झाला.

१८५७ सालीं धुंडिराव तात्यासाहेब हे वयांत आले; व त्यांच्या हातीं राज्यकारभाराचीं सूत्रें देण्यांत आलीं. स. १८५७ च्या बंडाच्या वेळीं यांनीं ब्रिटिश सरकारला चांगली मदत केली. ४० वर्षें राज्य केल्यावर १९०१ (१२ डिसेंबर) सालीं हे निपुत्रिक वांरल्यामुळें संस्थानचा कारभार ब्रिटिश सरकारनें आपल्या ताब्यांत घेतला; व चिंतामणरावांचा दत्तक मुलगा विनायकराव यांचा पणतू विनायकराव भाऊसाहेब यांस चिंतामणराव आप्पासाहेब असें नांव देऊन, १९१० (ता. २ जून) सालीं राज्यकारभाराचीं सर्व सूत्रें यथाविधि त्यांच्या हवालीं केलीं. हेच हल्लीं सांगलीचें संस्थानिक आहेत. ते चांगले बुद्धिमान असून त्यांचें शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्यें झालेलें आहे. संस्थानांतील प्रत्येक खात्याकडे ते स्वतः नीट लक्ष देत असून राज्यकारभार चालविण्यांत त्यांनां चांगलें यश येत आहे. (रा. व. पारसनीकृत सांगली संस्थान, बाँबे १९२४-२५).

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .