विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सांगोलें, ता लु का व श ह र.- मुंबई, सोलापूर जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ६६४ चौ. मैल. ह्यांत एक शहर (सांगोलें) व ७५ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९२१) ७७८४०. तालुक्यांत झाडेंझुडपें विशेष नाहींत. मुख्य नदी माण. हवामान उष्ण आहे.
सांगोलें हें तालुक्यांचें मुख्य ठिकाण असून पंढरपूरच्या नैर्ॠत्येस १९ मैलांवर आहे. लोकसंख्या ५०००. विजापूरकरांच्या अमदानींत हें शहर इतक्या भरभराटीस आलें होतें कीं ह्यास लोक 'सुवर्णसांगोल' म्हणत असत. १८५५ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली.