प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
            
स्कौट (स्काउट) - बालवीर. स्कौट याचा मूळचा अर्थ, शत्रूंवर पाळत ठेवून त्यांची एकंदर माहिती आणण्यास पाठविलेला शिपाई असा आहे. १८९९-१९०२ च्या दक्षिण आफ्रिका युद्धानंतर लष्करी स्कौटिंगला इंग्लंडमध्यें बरेंच महत्त्व आलें. याला कारण मेफकिंगच्या लढाईंत प्रसिद्धीस आलेला मेजर-जनरल-बेडन-पॉवेल हा होय. यानें लहान मुलांत स्कौटचें सर्व उपयुक्त गुण आणण्यासाठीं प्रयत्न केले व त्याकरितां १९०८ सालीं बालवीर संस्था निर्माण केल्या. पुढें दोन वर्षांतच चोहोंकडे हजारों मुलें अशा संस्थांतून दाखल झालीं.

निरीक्षण, आज्ञाधारकपणा आणि आपल्या पायांवर उभे राहण्याची संवय या गोष्टी शिकवून मुलांनां उत्कृष्ट नागरिक बनवावयाचें; मुलांत राजनिष्ठा बिंबवून दुसर्यांविषयीं विचार करण्याची त्यांनां संवय करून द्यावयाची; लोकांच्या उपयोगी कसें पडता येईल हें त्यांनां शिकवावयाचें; त्यांनां स्वतःला उपयोगी असें हस्तकौशल्याचें शिक्षण द्यावयाचें, व त्यांचें आरोग्य व शारीरिक वाढ यांकडे लक्ष पुरवावयाचें; यांसारखें उदात्त हेतू बेडन-पॉवेलनें ही चळवळ सुरू करतांनां पुढें ठेवले होते; व स्कौटिंगच्या नियमावलीकडे व एकंदर कार्यक्रमाकडे पाहतां वरील सर्व हेतू पूर्ण करण्याची त्यांत सोय केली असल्याचें दिसून येईल.

गेल्या महायुद्धांत सुमारें एक लाख बालवीर लढाईच्या कामावर असून प्रत्यक्ष लढाईंत तेवढेच गुंतले होते. आरमारी खात्यांत किनार्यांचें सतत निरीक्षण करण्याकडेहि बालवीर नेमण्यांत आले होते यावरून शांततेच्या काळाप्रमाणेंच युद्धकालीन परिस्थितींतहि या चिमुकल्या वीरांचा राष्ट्राला किती उपयोग होतो ते चांगलें दिसून आलें.

इ ति हा स.— बोअरयुद्धामध्यें बेडन-पॉवेल यानें बोअर लोकांचीं लहान लहान मुलें, बोअरांच्या त्या स्वातंत्र्ययुद्धांत सैनिकांनां कशी उपयुक्त मदत करीत होती हें पाहिलें, व राष्ट्राच्या संकटकाली उपयोगीं पडणारीं ही मुलें पाहिल्यावर त्याच्या मनांत असेंच शिक्षण आपल्या इंग्लंडमध्यें सुरू करावे, अशी कल्पना आली. ही बालवीर-विद्येची कल्पना मनांत आल्यावर युद्धांतील मुलांच्या कामगिरीपासून मनांत आलेल्या त्या कल्पननेच्या भरीला, शांततेच्या काळांत उपयुक्त अशी उत्तम नागरिकत्वाची कल्पना घालून आपल्या नव्या बॉयस्काऊट शिक्षणाची त्यानें उभारणी केली. मनांत मूळ कल्पना आल्यापासून सुमारें सहा वर्षांनीं त्यानें ह्या विषयावर एक लेखमाला एका मासिकांत लिहिली. ते लेख पुष्कळांनां आवडले. त्यामुळें ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करा, अशी विनंति केल्यावरून त्या लेखांत योग्य ते फरक करून व योग्य ती माहिती घालून १९०८ सालीं ''स्काउटिंग फॉर बॉईज'' ह्या नांवानें एक पुस्तक प्रसिद्ध केलें. त्या पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें त्यानें ''ब्राऊन सी'' येथें प्रयोगादाखल एक कॅम्प केला व त्याप्रमाणें शिक्षण देणारी एक संस्था स्थापन केली. याप्रमाणें इंग्लंडमध्यें बालवीर चळवळीची प्राणप्रतिष्ठा झाली.

ही चळवळ तिच्यांतील अनेक नैसर्गिक सद्गुणांमुळें इतर राष्ट्रांनींहि थोडक्याच वेळांत उचलली, आणि हल्लीं जगांतील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांत ही चळवळ बद्धमूल झालेली आहे. सर्व इंग्रजी साम्राज्याची - सर्व जगाची नव्हे - यासंबंधीं एक संस्था आहे व तिची मुख्य कचेरी लंडन येथें आहे. इतर सर्व राष्ट्रांत जरी ही बालचर - चळवळ पसरलेली आहे. तरी तेथील संस्था स्वतंत्र असून त्यांच्यावर इंग्लंडमधील संस्थेच्या मुख्य कचेरीचा कोणत्याहि प्रकारचा ताबा नाहीं. पुष्कळ देशांनीं या चळवळीचे आद्य प्रवर्तक लेफ्टनेन्ट-जनरल सर रॉबर्ट वेडन पॉवेल यांनां सन्माननीय मुख्य बालवीर नेमिलें आहे.

ज्यावेळी पॉवेल, इंग्लंडमध्यें वरील प्रकारचें चिंतन करून नवीन बालचर चळवळ सुरू करण्याच्या विचारांत होता त्याच वेळीं अमेरिकेंत अर्नेस्ट थॉम्सन सेटन यानें वनविद्येची चळवळ सुरू केली होती. ह्या वनविद्येचें प्रस्थ बालचर चळवळीपूर्वी बरेंच वाढलें होतें व अद्यापि इंग्लंडमध्यें 'दि ऑर्डर ऑफ वुडक्रॅफ्ट शिव्हलरी' ह्या नांवाची एक संस्था आहेच. परंतु बालचर चळवळीला खरी सुरवात अमेरिकेंत सन १९१० त झाली. तेथील संस्थेस अमेरिकन काँग्रेसनें १९१६ सालीं एक कायदा पास करून स्थैर्य दिलें व तेव्हांपासून ही चळवळ तेथें फार झपाट्यानें वाढत आहे. आतापर्यंत ही चळवळ ३४ राष्ट्रांत पसरलेली आहे आणि सर्व जगांत एकंदर १२-१३ लाख बालचर आहेत. पैकीं एकट्या अमेरिकेंतच सहा लाख आहेत. आणि ही संख्या दहा लाखांवर नेण्याचा अमेरिकेचा निश्चय आहे.

हिंदुस्थानांत ही चळवळ हिंदी व यूरोपियन लोकांतहि आतां बरीच फैलावली आहे. व्हाईसरॉय हे हिंदुस्थानचे चीफ स्काउट असून, प्रत्येक प्रांताचे गव्हर्नर आपापल्या हद्दीतले चीफ स्काउट होत. निरनिराळ्या प्रांतांतील लहानमोठ्या बालवीरांची संख्या पुढील कोष्टकावरून कळेल:-

बालवीरसंख्यादर्शक कोष्टक.
प्रांत. स्काउट्स. कब्स एकूण संख्या
आसाम ५४२ १२१ ६६३
बलुचिस्तान ८० ३१ १११
बंगलोर १८४ २१ २०५
बंगाल १७०४ ४२८ २१३२
बिहार-ओरिसा १२३२ १३७  १३६९
मुंबई ४५१३ ६७० ५१८३
मध्यहिंदुस्थान ३८ ४४
मध्यप्रांत २६६२ १६९ २८३१
दिल्ली २२२ ५३ २७५
मद्रास ३२०९ ६३३ ३८४२
पंजाब  २१०७ ११४ २२२१
राजपुताना १७९ ७१ २५०
संयुक्तप्रांत १९४९ १५८ २१०७
ब्रह्मदेश २०६३  ३६६ २४२९
जोडलेल्या संस्था —
कोचीन संस्थान ३८४ ... ३८४
मारवाड संस्थान ... ... ...
एकंदर २१०६८ २९७८ २४०४६

एकंदर ब्रिटिश साम्राज्यांतील बालचरांची संख्या (१९२५ सालची) ४२५२३८ आहे.

बायस्काउट पथकांप्रमाणेंच मुलींचीं 'गर्ल गाईड' पथकें असतात. 'सेवा आणि भगिनीत्व' हें या कन्यावीरांचें ध्येय असतें. एकंदर जगांत ५४३००६ इतकी या कन्यावीरांची संख्या आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .