प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
           
हरभरा- हरभऱ्याचें झाड फूट दोन फूट उंच वाढतें. त्याला फांद्या फुटतात व फांद्यांनां बारीक बारीक पानें येतात. हरभऱ्याला दाणा एका कडक वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात. दर एक घांट्यांत बहुतकरून दोन दाणें सांपडतात. सन १९१४-१५ सालीं सर्व हिंदुस्थानांत १ कोटी ४३ लक्ष एकर जमीन या पिकाखालीं होती. यापैकीं ५३ लक्ष एकर संयुक्त प्रांतांत; १३ लक्ष एकर बहार व ओरिसा प्रांतांत; ५२ लक्ष एकर पंजाबांत, १०१८४७४ एकर मध्य प्रांतांत; १४२७२८ एकर वऱ्हाडांत ५०४९२० एकर मुंबई इलाख्यांत व ११०६०७ एकर जमीन सिंध प्रांतांत होती. निजामचे राज्यांत मराठवाड्यांत हरभरा बराच होतो. मुंबई व मध्यप्रांत व वऱ्हाड या प्रांतांतील मुख्य मुख्य ठिकाणचें हरभऱ्याखालीं असलेलें क्षेत्रे खाली दिलें आहे.

मुंबई- अहमदाबाद, १७८८८ एकर, पश्र्चिम खानदेश ३०२९२; पंचमहाल ५८६१९; पूर्व खानदेश १४००६; नाशिक ७१८७७; अहमदनगर ७६३५१; पुणें ५२०३७; सातारा ६५५७१; विजापूर ५७२२५; (सीझन आणि काप रिपोर्ट)

मध्यप्रांत, वऱ्हाड:- जबलपूर ६१७४०; नरसिंगपूर ८९४८०; हुशंगाबाद ६६२२८; नागपूर १४१३०; वर्धा ६३०४; चांदा १८४०६; भंहारा ३९०००; बालाघांट २२२८७
गहूं व हरभरा ७०१९४६ एकर; दमोह १३४२३२ एकर; जबलपूर नरसिंगपूर १४०६६३, (सीझन आणि क्रॉप रिपोर्ट मध्यप्रांत व वऱ्डाड सन १९१५-१९१५).

जा ती:-- रंगाप्रमाणें हरभऱ्यांत ४ जाती आढळतात. काळा :-याची लागवड फार करून गोंवा प्रांतांत व कर्नाटकांत आढळते. हळद्या किंवा पिंवळा:-याची लागवड सर्वत्र होते याचा दाणा साधारण मोठा असून तो गुजराथेंत जास्त पिकतो. यास मध्यप्रांतांत इमली व गुजराथेंत चणी म्हणतात ही जात बहुतकरून स्वस्त असते. पांढरा:-काबुली, पर्वत्या (मध्यप्रांतांत) या जातींत दाणा रंगाला पांढरा असून खाण्याला नरम, गोड व स्वादिष्ट असतो. याची लागवड जबलपूर हुशंगाबादकडे विशेष होते. याची एक मोठ्या दाण्याची जात आहे. तिचें झाड मोठें असून दाणा मोठा व चवदार असतो. सर्व कडदण धान्यांत हरभरा श्रेष्ठ मानला जातो हरभरा रब्बी हंगामांत पेरतात. तो पिकण्यास चिक्कण काळी उत्तम प्रकारची जमीन लागते. गुजराथेंत गोराडू, बेसर इतर ठिकाणीं काळ्या जमिनींत, कोंकणांत व छत्तिसगडांत गरव्या जमिनींत हरभरा करितात. हरभरा बागाइतांत होतो हरभऱ्याला जमीन उघाडीच्या दिवसांत व पावसाळयांत वरचेवर पाळ्या घालून नांगरून, कुलवून, चांगली तयार करावी लागते. हरभरा शाळू, जोंधळा, बाजरी, गहूं, जवस, तीळ, मका, व भात यांच्याशीं फेरपालटीनें करितात.

जिराइतींत खत घालीत नाहींत पण बागाइतींत भरपूर खत घालतात. हरभरा स्वतंत्रपणें पेरितात. परंतु खानदेशांत जवसाच्या ओळी मधून मधून घालितात. अहमदनगर, सोलापूर व कर्नाटकांत करडईचें मोगण हरभऱ्यांच्या शेतांत घालितात. मध्यप्रांतांतील उत्तरेकडील जिल्ह्यांत गहूं व हरभरा मिसळून पेरतात. हरभरा जमिनींत फार खोल जाईल अशा बेतानें तो जड तिफणीनें आक्टोबरांत पेरितात. जबलपुराकडे हरभरा हातानें फेंकून अगर नारीनें पेरितात. येथें बियांचें एकरीं प्रमाण ६०-९० पौंडापावेतो असतें. हरभरा जेव्हां बाजरी व भात यांचे मागून करितात, तेव्हां नांगराच्या मागें बीं हातानें टाकतात. जिराइतांत दर एकरीं बीं ४० ते ६० व बागाइतांत ६०-७० पौंड लागतें.

हरभऱ्याला निंदणी, टिपणी फारशी करावी लागत नाहीं. कारण हरभऱ्याची फूट झाली म्हणजे तो जमीन आच्छादून टाकून तण मारून टाकतो. हरभऱ्याला फांद्या फुटूं लागल्या म्हणजे त्याचे शेंडें खुंडतात व त्याची भाजी करतात. या खुडण्यानें जास्त फूट होऊन जास्त घांटे येतात. हरभरा पेरिल्यापासून साडेतीन-चार महिन्यांत म्हणजे फेब्रुवारीत तयार होतो. झाडें वाळलीं म्हणजे तो उपटून शेतांत त्याची कडपें (ढीग) घालितात. नंतर खळयांत नेऊन तो पसरवितात, व नंतर चांगला वाळला म्हणजे तो बैलांच्या पायाखालीं मळतात. व वाऱ्यावर उपणितात. सरासरी दर एकरीं उत्पन्न धान्य:-५००-६०० पौंड जिराइत; ८००-१००० पौंड बागाईत; भुसा ५००-६०० पौंड. हरभरा फार कसदार व पौष्टिक आहे. तो घोडयांस व बैलांस भरडून व भिजवून घालितात. पंजाबाकडे हें धान्य जास्त पिकत असल्यामुळें दुभत्या गुरांनांहि तो रोज भरडून घालितात. मेंढयांनां तयार करण्याला हरभरा फार उपयोगी आहे. ओल्या हरभ-याच्या पेंड्या, हंगामांत गुरांस व घोडयांना चारतात. हरभरा हिरवा किंवा भाजून खातात. ओल्या व वाळलेल्या पाल्याची भाजीं करितात व हरभऱ्याचे फुटाणे करून खातात. रोजच्या स्वयंपाकांत डाळीचा पुष्कळ उपयोग होतो. त्याच्या पिठाचीं तऱ्हेतऱ्हेचीं पक्वान्नें करितात. हरभऱ्याची आंव धरितात, तींत आक्सालीक, म्यालिक व थोडेसें असिटीक यान नांवाचीं अम्लें असतात. मोडशी व अपचन झालें असतां पोटांत आंब देतात. आंब धरण्याची रीत अगदी सोपी आहे. शेत पेरिल्यांपासून सुमारें २ महिन्यांनीं पिकांवर घांटे धरूं लागले म्हणजे पहांटेस सूर्योद्यापूर्वी एका काडीस बारीक मलमलीचें फडकें बांधून तें झाडावरून फिरवावें म्हणजे तें पिकावरील दहिंवरानें आलें होतें. तें पिळून आंब बाटलींत भरावी. कित्येक ठिकाणीं आब धरण्याचें काम पीक भर फुलावर असतां करितात. अभ्रें आल्यास घांट्यांत कीड पडते.

पृथकरणाचे आंकडे येणेंप्रमाणें-पाणी ११.२; मांसजनक पदार्थ १९.५; शर्करासत्वादि पदार्थ ५३.८; स्निग्धांश ४.६; काष्ठतंतू ७ ८; निरिद्रियक्षार ३.१.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .