विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
क्षेमंकर (सुमारें १४६०)- एक जैन मुनि. जयचंद्र अगर जयसुंदर याच्या वेळीं हा उदयास आला. हा कदाचित् ''सिंहासनद्वात्रिशिका'' किंवा 'विक्रमचरित' या ग्रंथांच्या जैन भाषांतरांचा कर्ता असून भाषांतराच्या कामीं त्यानें सिंहासनबत्तिशीची एखादी अतिशय जुनी महाराष्ट्री प्रत वापरलेली दिसते.